मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी
सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त
मुंबई, दि. ०१ : मा.भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारण, दोन खर्च आणि एक पोलिस निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.धारावी व सायन कोळीवाडा या मतदार संघासाठी सत्यप्रकाश टी. एल. (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१६९६४०२ आणि ई-मेल आयडी dharavisionkoliwadagenobs
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक पोनुगुंतला रामजी (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण एलवीन गेस्ट हाऊस, हेन्री रोड, अपोलो बंदर, मुंबई असून संपर्क क्रमांक ८५९१७४३२६८ आणि ई-मेल आयडी observerpolicemumbaicity@
मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा,वडाळा, माहिम, वरळी या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता (भा.राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४००२१६ आणि ई-मेल आयडी exp178to182@gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रित (भा.राजस्व सेवा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांना भेटण्याचे ठिकाण सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई असून संपर्क क्रमांक ९३२४४७४०७३ आणि ई-मेल आयडी exp183to187 @gmail.com हा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असणार आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करतील. केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, कायदा– सुव्यवस्था याबाबत हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील. केंद्रीय खर्च निरीक्षक उमेदवारांच्या खर्चाची तपासणीबाबत कामकाज पाहणार आहेत.
0000