Thursday, 1 August 2024

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

 सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

            मुंबईदि. 31 : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली.

            राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवारविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमंत्रिमंडळ सदस्यलोकप्रतिनीधी, मुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीअपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकरविविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिवराज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते.

            प्रारंभी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबतचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदेश वाचून दाखवला. शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त परिचय

            श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी दि. 31 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

            श्री. राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म 4 मे 1957 रोजी तिरुपूरतमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. सन 1998 मध्ये ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.

            आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.

            सन 2004 मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते.

            सन 2016 मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्डकोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात 2532 कोटी रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.

            दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी श्री. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व 24 जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

            उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.

            श्री. राधाकृष्णन यांनी अमेरिकाइंग्लंडफ्रान्सजर्मनीइटलीस्पेनपोर्तुगालनॉर्वेडेन्मार्कस्वीडनफिनलंडबेल्जियमहॉलंडतुर्कीचीनमलेशियासिंगापूरतैवानथायलंडइजिप्तसंयुक्त अरब अमिरातबांगलादेशइंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.

राज्यात १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चे आयोजन

 राज्यात १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत

पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चे आयोजन

 

            मुंबईदि.३१ ; राज्यातील पशुपालकांमध्ये पंचसुत्रीच्यासंदर्भात जागृती निर्माण करणे तसेच  पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात दि.१ ते दि.१५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत "पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४" आयोजित करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली व महसूलपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यभर राबविला जाणार आहे.

      पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विभागाकडून "उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदासपशुस्वास्थपशुखाद्यपशुचारा व व्यवस्थापन" या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

  पंधरवड्यादरम्यान पंचसुत्रीची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी  गावपातळीवर शिबीरेकार्यशाळा,व्याख्याने,  तज्ञांचे मार्गदर्शनयशस्वी पशुपालकांचे अनुभव कथन यासांरख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

        राज्यातील पशुधनाची पूर्ण उत्पादनक्षमता वापरात आणणे तसेच उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने पशुपालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबर पशुपालन व्यवसाय फायदेशीरपणे करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

            व्यावसायिक दृष्टीकोनातून व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी पशुजन्य पदार्थ (उदा. मांसलोकरअंडी इ.) तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादनखरेदीविक्री याची माहिती पशुपालकांना करुन देणे आवश्यक आहे.  पशुपालन हा व्यवसाय केवळ शेतीपूरक अथवा जोडधंदा न राहता तो पशुपालकाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होईल या दृष्टीकोनातून पशुपालन उद्योजकता निर्माण करण्यासाठी  या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

     या कालावधीत पंधरवड्याची माहिती सर्व पशुपालकांना व्हावी यासाठी व्यापक स्वरुपात  देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखानेशासकीय कार्यालयेग्रामपंचायतकृषि उत्पन्न बाजार समितीआठवडी बाजार  इत्यादी ठिकाणी पशुपालकांसाठी कार्यक्रमांचे माहितीबाबत प्रसिध्दी करण्यात येईल.

 पशुसंवर्धन पंधरवड्यादरम्यान दैनंदिन कार्यक्रमांचे संयोजन व संनियंत्रण आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्फत करण्यात येईल, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

जागतिक वारसा नामांकनाबाबत युनेस्कोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांचे गुरुवारी मार्गदर्शन ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ वारसा यादीत समावेशासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न

 जागतिक वारसा नामांकनाबाबत युनेस्कोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी

विशाल शर्मा यांचे गुरुवारी मार्गदर्शन

भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ वारसा यादीत समावेशासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न

 

            मुंबईदि. 31 राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्यावतीने भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत मुंबई येथे गुरुवारदिनांक 1 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. जागतिक वारसा केंद्र समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती असणार आहे.

            दिनांक 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6-30 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक होणार आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश हा वैशिष्ट्यपूर्ण वारसा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील 12 किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा केंद्र समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. श्री. शर्मा यांच्या मार्गदर्शनाबरोबरच गुरगाव  येथील द्रोण संचालक तथा प्रसिद्ध वास्तूविशारद डॉ. शिखा जैन या भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश  (मराठा मिलीटरी लॅण्डस्केप ऑफ इंडिया) याविषयावर सादरीकरण करणार आहेत. 

            श्री. शर्मा हे दुसऱ्या दिवशी (शुक्रवारदिनांक 2 ऑगस्ट) बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भेट देणार आहेत. दिनांक 3 ऑगस्ट रोजी श्री. शर्मा हे लोहगड किल्ल्यास (जि. पुणे) भेट देणार आहेत.

            राज्यातील गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत समावेशाच्या दृष्टीने ही बैठक महत्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी सांगितले.

            दरम्यानजागतिक वारसा केंद्र समितीचे 46  वे अधिवेशन दिनांक 21  ते 31 जुलै या कालावधीत नवी दिल्ली येथे झाले. या अधिवेशनादरम्यान जागतिक वारसा नामांकनासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे 12 किल्ल्यांचे स्केल मॉडेल (प्रतिकृती) आणि माहितीफलक प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील प्रस्तावित 12 किल्ल्यांविषयी राज्य शासनाचा पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालये आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणनवी दिल्ली आणि आयसीओएमओएसइंडिया यांच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.                        

अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार

 अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार

-  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि.३१ : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे वेगळे मॉडेल तयार करून तातडीने प्रस्ताव तयार करावाराज्य सरकार यासाठी पुढाकार घेईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीला वस्त्रोद्योग विभाग मंत्री चंद्रकांत पाटीलआमदार रवी राणाआमदार बच्चू कडू (ऑनलाइन) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सलसहसचिव प्राजक्ता लवंगारे,  उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजयवस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंहफिनले मिल मधील कामगार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीफिनले मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सहकार्य करायला तयार आहे. महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीचा सहभाग घेऊन वेगळे मॉडेल  विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करावा. मिलमधील काही कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

            अमरावती जिल्ह्यातील फिनले मिल सुरू होणे आवश्यक असून या मिलमुळे मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारशी समनव्य करून मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले

            वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फिनले मिल सुरू करण्यात येत असलेल्या अडचणीस्थानिक लोकप्रतिनिधी आणि मिल कामगार यांची मागणी यासंदर्भात माहिती देऊन मिल सुरू करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाचा सहभाग याबाबत माहिती दिली.

0000

इस्त्रायलने विविध क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय

 इस्त्रायलने विविध क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. ३१ : भारत आणि इस्त्रायल यांना दोन हजार वर्षांचा समृध्द असा इतिहास लाभला आहे. दोंन्ही देश एकच वेळेस स्वतंत्र झाले. इस्त्रायलने अल्पावधीत विविध क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

            इस्रायलच्या स्वतंत्रता दिनानिमित्त हॉटेल सेंट रेजिस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोनवाणिज्य दूत कोबी शोष्णयमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरमुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकरमाजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीभारत आणि इस्त्रायल यांनी आपापली संस्कृती जपली आहे. ज्यू बांधवांनी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेली प्रगती शिकण्यासारखी आहे. दोन्ही देशांची मुळे खोलवर रुजलेली आहेत. इस्त्रायलमधून अनेक ज्यू बांधव भारतात स्थलांतरित झाले. त्यापैकी काही महाराष्ट्रात आले. ते येथील संस्कृतीत मिसळून गेले. ते चांगल्यापैकी मराठी बोलतात. भारत आणि इस्त्रायल यांच्यातील संबंध आणखी दृढ होतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            महनगरपलिका आयुक्त श्री. गगराणी म्हणाले कीइस्त्रायलने संघर्षपूर्ण परिस्थितीतून स्वतःचा विकास केला. आज इस्त्रायलने विज्ञान आणि तंत्रज्ञानात बजावलेली कामगिरी उल्लेखनीय आहे

            महाराष्ट्र आणि इस्त्रायल यांच्यात विशेष नाते आहे. कोकण भागात बेने इस्त्रायल या नावाने ज्यू बांधव ओळखले जातात. भारत आणि इस्त्रायल यांच्यातील संबंध आणखी वृद्धिंगत होतीलअसा विश्वास व्यक्त केला.

            अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर म्हणाल्या की,भारत आणि इस्त्रायल यांच्यात दोन हजार वर्षापासून संबंध आहेत. इस्त्रायल मधील काही ज्यू बांधव स्थलांतरित होऊन कोकणात स्थायिक झाले. ते विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. भारत आणि इस्त्रायल यांच्यात व्यापारी संबंध चांगले आहेत. भारताच्या अमृत काळात हा व्यापार आणखी वाढेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इस्त्रायलला भेट दिली आहे.

            श्री. गिलोन यांनी सांगितले कीभारत आणि इस्त्रायल यांच्यातील परस्पर संबंध अतिशय चांगले आहेत. भारताची आर्थिक क्षेत्रातील प्रगती कौतुकास्पद आहे. भारताच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले.

            वाणिज्य दूत श्री. कोबी यांनी मनोगत व्यक्त करताना इस्त्रायलच्या इतिहासाबरोबर इस्रायलने कृषीविज्ञान - तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीची माहिती दिली. तसेच त्यांनी भारत आणि इस्त्रायल यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांना उजाळा दिला. यावेळी कलासामाजिकसांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

०००००

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा वाहनतळ निर्मिती, अतिक्रमण हटविणे, गर्दीवेळी अवजड वाहनांना निर्बंध यासारख्या तातडीच्या उपाययोजना राबवून नागरिकांना देण्याचे निर्देश · चाकण परिसरातील नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी अर्थसंकल्पात १७९ कोटी, · आता कचरा प्रक्रिया केंद्रासाठी एमआयडीसीची ४ एकर जागा देण्यात येणार

 चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उपाययोजनांचा आढावा

वाहनतळ निर्मितीअतिक्रमण हटविणेगर्दीवेळी अवजड वाहनांना निर्बंध

यासारख्या तातडीच्या उपाययोजना राबवून नागरिकांना देण्याचे निर्देश

 

·        चाकण परिसरातील नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी अर्थसंकल्पात १७९ कोटी,

·        आता कचरा प्रक्रिया केंद्रासाठी एमआयडीसीची ४ एकर जागा देण्यात येणार

            मुंबईदि. ३१ :- पुणे जिल्ह्यासह राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रहदारीच्या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देणेराष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविणेकंपन्यांमधील कर्मचारी येण्या-जाण्याच्या वेळांमध्ये औद्योगिक परिसराबाहेर अवजड वाहने थांबविणे आदी उपाययोजना तातडीने कराव्यात. चाकणकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पुण्याच्या जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी स्वत: परिसराची पाहणी करावी आणि तातडीने योग्य उपाययोजना कराव्यातअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

            चाकण (ता. खेड) परिसरातील वाहतूक कोंडी समस्येबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतआमदार दिलीप मोहिते पाटीलनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तासार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी अंशुमन श्रीवास्तवपीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसेपुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेपोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेचाकण येथील तळेगाव चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून येथील वाहतूक व्यवस्था सुरळित करण्यासाठी पोलीस विभागाने प्राधान्याने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. विनापरवाना रिक्षांची संख्या आटोक्यात आणावी. वाहतूक चोवीस तास नियंत्रित करून वाहनचालकांना शिस्त लावावी. सार्वजनिक बांधकाम विभागएमआयडीसीमहसूलराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपोलीस अशा सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा. परिसरातील रस्तेमहामार्गांवरील सर्व प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत. अतिक्रमण काढण्याची कारवाई नियमितपणे करावी. चाकण परिसरातून जाणाऱ्या चार पदरी महामार्गाच्या बाजूला असणारी मोकळी जागा एमआयडीसीने उपलब्ध करून द्यावी. त्याठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने सहा पदरी रस्त्याचे काम प्राधान्याने सुरु करावेअसे निर्देश त्यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीनागरिकांना कुठल्याही प्रकारच्या वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जाऊ लागू नये याची खबरदारी घेऊन तळेगाव चौकातील वाहतूक सुयोग्य पद्धतीने पर्यायी मार्गावर वळवावी. सकाळी तसेच सायंकाळी कंपन्या सुटण्याच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन या गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी पीएमआरडीएने भंडारा डोंगराच्या बाजूला असणाऱ्या गायरान जमिनीवर जड वाहनांना थांबवून ठेवण्यासाठी ट्रक टर्मिनसची सुविधा उभारावीअशी सूचना त्यांनी केली.

            वाहनतळांची संख्या वाढविण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेचाकण परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. त्यांच्यामुळे विविध चौकांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी एमआयडीसीच्या हद्दीतील ट्रक टर्मिनलसाठीची नियोजित जागा पीएमआरडीएला हस्तांतरित करावी. त्या जागेवर वाहनतळ विकसित करण्याचे काम पीएमआरडीएने सुरु करावे. आपल्याकडे येणाऱ्या ट्रककंटनेरच्या पार्किंगची व्यवस्था आपल्या आवारातच करण्याबाबत संबंधित कंपन्यांना बंधनकारक करण्यात यावे. वोक्सवॅगन कंपनीसमोर असणाऱ्या पाझर तलावाच्या जागा परिसराचा वापर करून नवीन वाहनतळ उभारावे. त्यातून मध्यवर्ती भागात वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध होईलअसे निर्देशही त्यांनी दिले.

            चाकण परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी नवीन रस्त्यांसह रुंदीकरणासाठी १७९ कोटींचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीचा वापर करून गतीने कामे करून घ्यावीत. औद्योगिक परिसरातील कचऱ्यासह आसपासच्या १७ गावांमधील कचऱ्यावर स्थानिक परिसरात प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीने ४ एकर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया केंद्र उभे करावेअसे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

--------------०००००-------------


 


येथे कर माझे जुळती


 

Featured post

Lakshvedhi