Tuesday, 2 July 2024

भुशी धरण धबधबा दुर्घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी

 भुशी धरण धबधबा दुर्घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी

न करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

            मुंबईदि. : लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहाने एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या घटनेत मार्गदर्शक तत्वानुसार कर्तव्य न बजावणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावीअसे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. त्याचबरोबर राज्यात आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावीअसेही त्यांनी सांगितले.

            पुण्याच्या हडपसर येथील अन्सारी कुटुंबावर कोसळलेल्या या दुर्देवी आपत्तीची दखल डॉ.गोऱ्हे यांनी घेतली असून आपद्ग्रस्त कुटुंबास मदत पुरविण्यात यावी तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात यावेअसे निर्देशही त्यांनी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांना दिले आहेत.


सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक

 सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. १ : सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र वाढवून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध  करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

            सदस्य शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात आयटी सेक्टर किंवा एमआयडीसीचा विस्तार व्हावा यासाठी शासन सकारात्मक विचार करीत आहे.   सातारा एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र स्कूटर ही कंपनी अनेक वर्षापासून बंद आहे ही जागा शासनाकडे घेण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील युवक रोजगारासाठी बाहेर जावू नये यासाठी विविध उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत, अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वारसा हक्क सोडून सर्व लाभ

 नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत,

अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वारसा हक्क सोडून सर्व लाभ

            मुंबईदि. १ : नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचा-यांना वारसा हक्क सोडूनलाड-पागे समितीने केलेल्या शिफारशीनुसारइतर सर्व लाभ देण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य अभिजित वंजारी यांनी नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचाऱ्यांविषयी उपस्थिती केलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, राज्य शासनाद्वारे दि. २० सप्टेंबर २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये नागपूर महानगरपालिकेतील ४४०७ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करून समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे, अशा एकूण ३८०५ पात्र ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर सद्यस्थितीत समावून घेण्यात आले आहे. उर्वरित ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना पात्र झाल्यानंतर अधिसंख्य पदावर सामावून घेण्याची प्रक्रिया महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत अधिसंख्य कर्मचा-यांना देण्यात येत असलेल्या लाभात  वेतन भत्तेआठवडा सुट्टीवैद्यकीय रजावैद्यकीय सुविधानिवासस्थान व सेवानिवृती वेतन योजना इत्यादींचा समावेश आहे. अधिसंख्य पदावर कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना लागू असणारे परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनाकुटुंब निवृत्तिवेतनमृत्यु उपदानरुग्णता निवृत्तिवेतनसेवानिवृत्ति उपदान इ. लाभ अनुज्ञेय आहेततसेच रजेचे रोखीकरणगटविमा योजना इ. लाभ अनुज्ञेय आहेत.

            शासन निर्णय दि. २० सप्टेंबर २०१९ नुसार केवळ कार्यरत ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण झाली असल्यानेही अधिसंख्य पदेकोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ती त्या दिनांकापासून आपोआप व्यपगत होत असल्यानेऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यात्ताठी कोणतेही अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार नाही अथवा व्यपगत झालेले पद पुनर्जिवित करता येत नाही. यामुळे ज्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर समावून घेण्यात आले आहेत्यांच्या वारसांना नियुक्ती देणे शक्य होत नाही. या अटीशिवाय लाड - पागे समितीच्या इतर सर्व शिफारशी व लाभ पात्र ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेद्वारे देण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगतापविजय गिरकर, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला.

मुंबई महानगरपालिकेतील स्वच्छता कंत्राटाची निविदा तत्काळ स्थगित करणार

 मुंबई महानगरपालिकेतील स्वच्छता कंत्राटाची

निविदा तत्काळ स्थगित करणार

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 1 :"मुंबई शहरातील झोपडपट्टीतील स्वच्छतेसाठी नव्या कंपन्यांना काढण्यात येणाऱ्या निविदा तातडीने स्थगित करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद सांगितले.

            सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

            मंत्री श्री. सामंत म्हणालेसद्यःस्थितीत स्वच्छतेची कामे बेरोजगार संस्थासेवादिव्यांगमहिला संस्था व महिला बचत गटाकडून करण्यात येत असून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फतही झोपडपट्टयांमधून घराघरातून कचरा जमा केला जात आहे.  या परिसरातील जागाड्रेनेज व शौचालयस्वच्छतागृहजाळी साफसफाई अशी कामे या विभागामार्फत करण्यात येतात.

            या स्वच्छतेसाठी  कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आल्यास  बेरोजगारसेवादिव्यांग व महिला आणि महिला बचत गट अशा सुमारे २ ते अडीच हजार संस्था बंद पडून सुमारे ७५ हजार कामगारांमध्ये बेरोजगारी होणार अशी शंका उपस्थित केल्याने निविदा स्थगित करण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या पध्दतीने काम सुरू राहणार असलेल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजहंस सिंह, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला

0000

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी -

 मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब

44 हजार 784 मते मिळवून विजयी

- विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी.वेलरासू

            नवी मुंबईदि. 01:- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी  64 हजार 222  मते वैध ठरली तर  3 हजार 422  मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  32 हजार 112  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परबउद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)

2) किरण रवींद्र शेलारभारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772

3) योगेश बालकदास गजभिये  :- 89

4) ॲड.अरुण बेंडखळेअपक्ष :- 39

5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहूअपक्ष  :- 11

 6) मुकुंद आनंद नाडकर्णीअपक्ष :- 464

 7) रोहन रामदास सठोणेअपक्ष  :- 26

 8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) निअपक्ष :- 37

            पहिल्या पसंतीची  44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड. अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे.....!*

 *तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात आश्चर्यकारक फायदे.....!* 


लसूण हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु त्याचे फायदे खाण्याच्या पद्धतीवर देखील अवलंबून असतात. 


तुपात तळलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.


या दोघांमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 


लसणात अँटी- बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, तर तुपात जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड आढळतात. ते अनेक रोगांशी लढण्याचे काम करतात.


*हृदयासाठी चांगले आहे...* 


लसूण हृदयासाठी चांगले मानले जाते. तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तुपात तळलेला लसूण देखील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. अशा प्रकारे लसणाचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.


*श्वसनासंबंधित रोग चांगले होतात...* 

लसणाचा प्रभाव हा गरम असतो. हिवाळ्यात लसूण तुपासोबत खाल्ल्यास श्वासासंबंधीच्या समस्या टाळता येतात. अशा प्रकारे लसूण खाल्ल्याने श्वसनसंस्था मजबूत होते. दम्यासारख्या आजारातही हे फायदेशीर आहे.


*पचनासाठी चांगले...* 

लसूण हे चांगले पाचक मानले जाते. तुपात लसूण तळून खाल्ल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने अन्न पचायला सोपे जाते.


*प्रतिकारशक्ती वाढते...* 


तुपात तळलेला लसूण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो. लसणात असलेले औषधी गुणधर्म सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. 


तुपात भाजून लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकला यांसारख्या समस्या दूर होतात.


*हाडे मजबूत होतात...* 


लसणात कॅल्शियमसारखे खनिजे आढळतात जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. तुपात तळलेला लसूण खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सूज आणि दुखण्याची समस्याही दूर होते.


*🌲🌾शुभ प्रभात🌾🌲*

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण

 हरित महाराष्ट्र करणे हीच 

वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण

            मुंबईदि. १ : गेल्या काही वर्षांत तापमान वाढपर्यावरण असमतोलअवेळी पाऊस असे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वप्नातील हरित महाराष्ट्र व्हावा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हरित आच्छादित महाराष्ट्र हीच वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे कृषी दिन, वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलआमदार निलय नाईकआमदार राजेश राठोडआमदार इंद्रनील नाईकराहुरी येथील महात्मा जोतिराव फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटीलप्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवालेसचिव दीपक पाटीलविश्वस्त डॉ. आनंद पटवर्धनमुश्ताक अंतुर्ले आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीशेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या योगदानाशिवाय देशाचा किंवा महाराष्ट्राचा उत्कर्ष अशक्य आहे. शेतकरी हा अन्नदाता आहेअसे मानणारे राज्य शासन असून त्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शेतकरी पुत्र होते. त्यांना शेतकऱ्यांच्या श्रमाचीकष्टाची जाणीव होती. अन्नधान्याच्या टंचाईत त्यांनी विविध योजना राबविल्या. संकरित ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले.  त्यांनी हरित क्रांतीचे स्वप्न पाहिले. हरित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने मिशन बांबू लागवड सुरू केले आहे. बांबू हे हिरवे सोने असून त्यापासून विविध उत्पादने तयार केले जातात. त्यामुळे राज्यात एकूण २१ लाख हेक्टर क्षेत्रात बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

            शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांना भरपाई देण्यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषात बदल केले. शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम दुप्पट केली. दोन हेक्टर क्षेत्राऐवजी तीन हेक्टर क्षेत्राचा निकष लागू केला. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानालाही भरपाई मंजूर केली. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर सहा हजार रुपयांची मदत सुरू केली. अर्थसंकल्पात सात अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांचे वीज बिल माफ केले आहे. शासनाने विविध निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याबरोबर तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीवसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद आहे. वसंतराव नाईक यांनी सुरू केलेली रोजगार हमी योजना देशाला मार्गदर्शक ठरली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्यात येतो. त्याचा शेतकरी बांधवांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कृषी पुरस्कार विजेत्यांपासून प्रेरणा घेत अन्य शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करतीलअसा विश्वास मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बारवाले यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांची पार्श्वभूमी विशद केली. सचिव दीपक पाटील यांनी आभार मानले.

            प्रतिष्ठानचे पुरस्कार विजेते असे : वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार- श्री कन्हय्यालाल बहुउद्देशीय संस्थारोहोडता. साक्रीजि. धुळे. वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार- महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कास्ट प्रकल्पराहुरीजि. अहमदनगर. वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ व साहित्य पुरस्कार- कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत बी. कलंत्रीनागपूर. वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार- श्रीकांत कुवळेकरमुंबई. वसंतराव नाईक कृषी निर्यात पुरस्कार- लुकमान इस्माईल शेखअंतुर्लीता. मुक्ताईनगरजि. जळगाव. वसंतराव नाईक फलोत्पादन पुरस्कार- भीमराव कडूपार्डी- देशमुखता. कळमेश्वरजि. नागपूर. वसंतराव नाईक भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कारमधुकर ईश्वरदास गवळीमु. पो. उगावता. निफाडजि. नाशिक. वसंतराव नाईक दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार- श्री. दगडू व सौ. कविता लोखंडेमु. पो. बेवणूरता. जतजि. सांगली. वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार- वैजिनाथ घोंगडेमु. पो. वाडेगावता. सांगोलाजि. सोलापूर. वसंतराव नाईक जैवविविधता संवर्धन पुरस्कारबोरगड राखीव वनसंवर्धन क्षेत्रबोरगडजि. नाशिक (राजेश कुरुपअनमल खान). वसंतराव नाईक आधुनिक फुल शेती पुरस्कार- डॉ. भाग्यश्री प्रसाद पाटीलपुणे. वसंतराव नाईक आधुनिक कृषी यंत्र निर्मिती स्टार्टअप पुरस्कार- अजित खर्जुलमु. पो. एकलहरेता. जि. नाशिक. वसंतराव नाईक सामाजिक वनीकरण पुरस्कार- संजीव शशिकांत करपेमु. पो. पिंगुर्लीता. कुडाळजि. सिंधुदुर्ग. वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम विकास पुरस्कार- मु. पो. परुळे बाजारता. वेंगुर्लाजि. सिंधुदुर्ग. वसंतराव नाईक नावीण्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- राहुल अमृता रसाळमु. पो. निघोजता. पारनेरजि. अहमदनगर. वसंतराव नाईक नैसर्गिक शेती पुरस्कार- वासुदेव भास्कर गायकवाडमु. पो. चळेता. पंढरपूरजि. सोलापूर. वसंतराव नाईक कडधान्ये संवर्धन पुरस्कार- शरद सर्जेराव पवारमु. पो. अहिरवाडीता. वाळवाजि. सांगली.

०००००

Featured post

Lakshvedhi