Wednesday, 13 March 2024

रिंगाण’ कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान 70 वर्ष पूर्ण झाल्याने अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव

 रिंगाण’ कादंबरीसाठी कृष्णात खोत यांना

साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

70 वर्ष पूर्ण झाल्याने अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव

 

             नवी दिल्ली12 : नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत  यांना रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता  साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

            कमानी सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा सादरीकरण सोहळा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. ओडिसा राज्याच्या प्रख्यात साहित्यिक व प्रमुख पाहुण्या प्रतिभा राय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

             अध्यक्ष माधव कौशिकउपाध्यक्ष कुसुम शर्मा तसेच सचिवके. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कृष्णात खोत यांच्या लेखन कार्याविषयी

            श्री. खोत यांना मराठी कादंबरी रिंगाण’ करिता साहित्य अकादमीतर्फे गौरविण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्रशाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम असे आहे.

            मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.

            कृष्णात खोत हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेश समूहनिष्ठ कादंबरी लेखनाने कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी श्री. खोत यांनी त्यांच्या लेखन कार्याला सुरूवात केली आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात, अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असूनया कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय 'नांगरल्याविन भुईहे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना विविध पुरस्कारांनी आणि सन्मानांनी नावाजले गेले आहे. यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कारमहाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कारवि. स. खांडेकर पुरस्कारबाबूराव बागूल शब्द पुरस्कारभैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

रिंगाण या कादंबरी विषयी

            'रिंगाणया कादंबरीला मराठी भाषा करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 साठी आज श्री खोत यांना पुरस्कार प्रदान झाला. 'रिंगाणकादंबरीत जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे आणि या समुदायाला धरण बांधण्याच्या कामासाठी एका प्रतिकूल समुदायामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असूनस्व-रक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. या कादंबरीतील नायकदेवप्पाचा वेदनादायी शोध मानवाच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातील दृढता आणि संघर्ष रेखाटतो. मानवाच्या वर्तणुकीमुळे आणि ताकदीमुळे कशी पर्यावरणीय आणि सामाजिक हानी झालेली आहे याचे अत्यंत महत्वपूर्ण विधान या कादंबरीत करण्यात आलेले आहे. भारतीय कादंबरी प्रकाराला मराठीतील 'रिंगाणहे महत्वपूर्ण योगदान आहे. माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.

कोंकणी भाषेतील वर्सलया लघुकथा संग्रहासाठी प्रकाश एस. पर्येंकर यांना पुरस्कार

            प्रख्यात कोंकणी लेखककवीअनुवादक तथा पटकथा लेखकप्रकाश एस. पर्येंकर यांना वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

70 वर्षे पूर्ण झाल्याने साहित्य अकादमीकडून 11-16 मार्च दरम्यान साहित्य महोत्सव आयोजित

            नॅशनल अकादमी ऑफ लेटर्सइंडिया या साहित्य अकादमीला यावर्षी ७० वर्षे पूर्ण होत असल्यानेसहा दिवसांचा सोहळा अकादमीकडून आयोजित करण्यात आला आहे. अकादमीतर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा 'साहित्योत्सवया वेळी जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी माहिती दिली की190 हून अधिक सत्रांमध्ये 1100 हून अधिक नामवंत लेखक आणि अभ्यासक सहभागी होत असूनदेशातील 175 हून अधिक भाषांचेही त्यात प्रतिनिधित्व केले गेले आहे.

            प्रसिद्ध उर्दू लेखक आणि गीतकार गुलजार यांचे प्रतिष्ठित संवत्सर व्याख्यान 13 मार्च रोजी मेघदूत खुले नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वाजता होणार.

            11 मार्च रोजी साहित्य अकादमी फेलोचेंही सत्कार करण्यात आले. बहुभाषिक काव्यवाचन आणि लघुकथा वाचनयुवा साहित्यअस्मितापूर्वोत्तरीभारतातील भक्ती साहित्यभारतातील बालसाहित्यभारताची कल्पनामातृभाषेचे महत्त्वआदिवासी कवी आणि लेखक संमेलन या विषयावर पॅनेल चर्चाया नियमित कार्यक्रमांव्यतिरिक्तभविष्यातील कादंबरीसांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून रंगभूमीभारताचा सांस्कृतिक वारसाभारतीय भाषांमधील विज्ञान कथानीतिशास्त्र आणि साहित्यभारतीय भाषांमधील चरित्रेसाहित्य आणि सामाजिक चळवळीपरदेशातील भारतीय साहित्य अशा विविध विषयांवर पॅनेल चर्चा आणि परिसंवादही होतील. या सहा दिवसीय महोत्सवात सहभागी होणारे हिंदी आणि विविध भारतीय भाषांमधील काही नामवंत लेखक आणि अभ्यासक असतील- एस.एल. भैरप्पाचंद्रशेखर कंबारपॉल जकारियाआबिद सुर्तीके. सच्चिदानंदनचित्रा मुदगलमृदुला गर्गके. एनोकममंग दाईएच.एस. शिवप्रकाशसचिन केतकरनमिता गोखलेकुल सैकियावाय.डी. थोंगचीमालश्री लालकपिल कपूरअरुंधती सुब्रमण्यमरक्षंदा जलीलराणा नायरवर्षा दाससुधा शेषयानउदय नारायण सिंगअरुण खोपकरशीन काफ निजाम आदी सहभागी होतील.

            तीन राज्यांचे राज्यपाल - आरिफ मोहम्मद खान (केरळ)श्री विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड)आणि श्री सी.व्ही. आनंद बोस (पश्चिम बंगाल) हे देखील महोत्सवात सहभागी होण्याबाबतची माहिती अकादमी सचिवांनी दिली.

*******

चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डन महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे

 चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डन महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

          1667 कोटींच्या विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन

            चंद्रपूर दि. 12 मार्च : चंद्रपूरला आजही चांदा’ या नावाने ओळखले जाते. आज येथे 1667 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. येथील बॉटनिकल गार्डन हे जागतिक दर्जाचे असून महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे आहेअसे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

            चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पणएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते.

            यावेळी मंचावर वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारखासदार अशोक नेतेआमदार किशोर जोरगेवारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकरप्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ताएसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेवजिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनडॉ. जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.

            पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी वनसंपदा वाढविणे गरजेचे आहेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेयेथील बॉटनिकल गार्डन हा राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प आहे. चंद्रपुरात सर्वोत्तम गार्डन होण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढाकार घेतला. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक असे हे बोटॅनिकल गार्डन तयार झाले असून लोकांचा याकडे कल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहेयेथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. सोबतच केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प हे सुद्धा विकासाचे मोठे काम चंद्रपुरात होत आहेयाचा आनंद आहे.

            पुढे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेचंद्रपूरला दूरदृष्टी असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या सारखे लोकप्रतिनिधी लाभले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण शक्तीनिशी करणारे ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत. गतकाळात अर्थमंत्री तसेच यावेळी वनमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खाते व सांस्कृतिक खाते बहरले आहे. आपल्या संस्कृतीची जोपासना कशी करायचीहे सांस्कृतिक कार्य विभागाने दाखवून दिले आहे. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणलीअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

पर्यटनासाठी पुढील तीन महिने बॉटनिकल गार्डन मोफत : सुधीर मुनगंटीवार

            वाघाच्या प्रेमापोटी या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनचे आज लोकार्पण करण्यात आले. पुढील तीन महिने पर्यटनासाठी बोटॅनिकल गार्डन मोफत असेलअशी घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

            चंद्रपूर मध्ये नुकताच झालेला ताडोबा महोत्सव हा जागतिक दर्जाचा ठरला असून 20 कोटी लोकांपर्यंत ताडोबा महोत्सव पोहोचला आहे. तसेच ॲडव्हाँटेज चंद्रपूर मध्ये विविध उद्योगांचे 75 हजार कोटींचे सामंजस्य करार येथे करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चंद्रपूर मध्ये उद्योगांनी गुंतवणूक केली असून पुढील दहा वर्षात येथील बेरोजगारी संपुष्टात येईल.

            आज चंद्रपूर मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 590 कोटीबॉटनिकल गार्डनचा पहिला टप्पा 264 कोटीमहानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना 270 कोटी आणि मलनि:स्सारण प्रकल्प 570 कोटी अशा एकूण 1667 कोटी रुपयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपुरात आज करण्यात आलेअसे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

            तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे चारही प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावित जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

            असे राहील एस.एन.डी.टी विद्यापीठ : ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे 50 एकर जागेवर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 589 कोटी 93 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्रस्तावित बांधकाम एकूण 87290 चौ. मीटरवर होणार असून यामध्ये शैक्षणिक इमारतप्रशासकीय कार्यालयेसेमिनार हॉलवर्गखोलीव्याख्यान सभागृहबोर्ड मिटींग रुमफॅकल्टी रुम700 विद्यार्थीनींसाठी बाल्कनी व संलग्न शौचालय ब्लॉकसह दोन वसतीगृह इमारतीग्रंथालय इमारतडीजीटल लायब्ररी860 क्षमतेची सभागृह इमारतकॅफेटेरीयाभोजनगृह इमारतक्रीडा सुविधांमध्ये बॅडमिंटनटेनिसबास्केटबॉल व विविध पारंपरिक खेळांकरीता इनडोअर स्पोर्टस् बिल्डिंगव्यायामशाळाकराटेबॉक्सिंगकुस्तीसाठी विशेष हॉलदर्शकांसाठी गॅलरीअतिथीगृह इमारतकर्मचारी निवास आदींची तरतूद आहे.

            बॉटनिकल गार्डन : चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर विसापूर येथे अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डनची) 108 हेक्टर क्षेत्रात निर्मिती करण्यात आली आहे. बॉटनिकल गार्डन निर्मितीचे उद्देश  : निसर्ग शिक्षणमनोरंजन आणि निसर्ग पर्यटन यात वाढ करणे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. फुल व फळ या शास्त्रासोबत रोपवाटिका तंत्राचा व व्यवस्थापनाचा पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक विकास करणे. रोपे लागवड आणि नवीन प्रजातींची ओळख करून उद्यान विज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणे. तसेच वातावरण बदल व ग्लोबल वॉर्मिंग याबाबत जनजागृती घडून ग्रीन एनर्जीचा वापर करण्याकरिता प्रोत्साहन देणे.

            चंद्रपूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा व मननि:स्सारण प्रकल्प : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान 2.0 अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 270 कोटी 13 लाख रुपयाच्या पाणीपुरवठा प्रकल्प व चंद्रपूर शहराकरिता प्रथम टप्प्यात 542 कोटी ५ लाख रुपयाचा मनानिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत शहरातील एकूण 54 हजार घरगुती जोडणी करण्यात येईल.

००००


 

एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ

 एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना

३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ

            राज्यातील औद्योगिक व कामगार न्यायालय तसेच श्रमिक भरपाई आयुक्त कार्यालयातील एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            1 नोव्हेंबर 1999 किंवा त्यानंतर एलएलएम पदवीसह सेवेत दाखल झाल्याच्या दिनांकापासून किंवा सेवेत असताना एलएलएम पदवी प्राप्त केल्याच्या दिनांकापासून हा लाभ मिळेल.  यापोटी येणाऱ्या 49 लाख एवढया खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांना दिलासा मुद्रांक शुल्क कमी करणार

 बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांना दिलासा

मुद्रांक शुल्क कमी करणार

            बीडीडी चाळीतील अनिवासी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे मुद्रांक शुल्क नाममात्र 1 हजार घेण्यात येईल.

            बीडीडी चाळीतील अनिवासी गाळेधारक तसेच परिसरातील झोपडपट्टीमधील अनिवासी झोपडीधारकांसमवेत करण्यात येणाऱ्या पुनर्विकसित गाळ्यांसाठीच्या तसेच पर्यायी जागेच्या भाडे करारनाम्यांवर आकारावयाचे शुल्क नाममात्र 1 हजार रुपये आकारण्यात येईल.

-----०-----

Tuesday, 12 March 2024

शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक

 शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक

            शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            १ मे२०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात सर्व शैक्षणिक कागदपत्रेमहसूली दस्तऐवजवेतन चिठ्ठीसेवापुस्तकविविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करुन नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा. तसेच केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म/मृत्यु नोंदवहीत बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            विवाहित स्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पध्दतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. तसेच स्त्रीला विवाहपूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म/मृत्यु दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात येईल.

-----०-

जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

 जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता

            वस्तू व सेवा कर विभागात नवीन ५२२ पदांना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            तसेच वस्तू कर व सेवा कर विभागाच्या 12 हजार 259 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला देखील मान्यता देण्यात आली.  नवीन पदांमध्ये 9 पदे अपर राज्य कर आयुक्त30 राज्य कर सह आयुक्त36 राज्य कर उपायुक्त143 सहायक राज्य कर आयुक्त275 राज्य कर अधिकारी27 राज्य कर निरिक्षक आणि 2 स्वीय सहायक लघुलेखक गट-अ अशा पदांचा समावेश आहे.  राज्याच्या कर संकलनाचा हिस्सा देशाच्या 15 टक्के आहे.  तसेच महसुलामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. राज्याच्या एकूण महसुलात जीएसटीचा हिस्सा 68 टक्के असून विभागाची पुनर्रचना करण्याची गरज भासत होती.

-----०-----

धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड

 धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड

            धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            नवी मुंबई मधील खारघर नोड येथील सेक्टर 5 मधील भूखंड क्र.46 बी हा 4000 चौ.मी. भूखंड धनगर समाजास देण्यात येईल. सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार भाडेपट्टा अधिमुल्य आकारून जाहिरातीने भूखंडाचे वाटप करण्यात येते. मात्र याबाबतीत अपवाद करण्यात येऊन इतर मागास बहुजन कल्याण विभागास भाडेपट्टयाने थेट वाटप करण्यात येईल. या विभागाने संबंधित समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थेला हा भूखंड योग्य रक्कम आकारून पोट भाडेपट्टयाने हस्तांतरित करावयाचा आहे. 

            या संदर्भात अभिनव समाज फाऊंडेशन या धनगर समाजासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने नवी मुंबई येथे भूखंड मिळविण्याबाबत विनंती केली होती.


Featured post

Lakshvedhi