Saturday, 9 March 2024

पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

 पाटण तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसन प्रकल्पाचे

                               मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

            सातारा,दि.९ : पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित आठ गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १६० कोटी  रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून बाधितांना उत्कृष्ट दर्जाची घरे देण्यात यावीत,अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. 

            मोरगिरीता.पाटण येथे दरडग्रस्त कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतराज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील प्रत्येक घटक सुखी-समाधानी रहावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून सर्व आपत्तीच्या प्रसंगी पाठीशी राहणारे सरकार आहे. संकटकाळात नेहमीच शासनाने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबांना सर्व सुविधायुक्त घरे देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. ते म्हणालेगेल्या दीड वर्षात शासनाने सर्व सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. राज्यात अनेक विकासाचे प्रकल्प सध्या सुरु असून शासनाने महिला सक्षमीकरणासाठी महिला धोरण जाहीर केले असून लेक लाडकी योजनाएसटी मध्ये ५० टक्के सवलतमहिला बचत गटांच्या खेळत्या भांडवलात वाढ दिल्याचे सांगून त्यांच्या उत्पादनांना विक्रीसाठी संधी उपलब्ध करुन द्यावीअसे आवाहन त्यांनी केले.

            मुख्यमंत्री म्हणाले कीसातारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १० टीएमसीने वाढ होईल. सातारा जिल्ह्यात अनेक सोयी-सुविधाप्रकल्प सुरु असून २२५ मॉडेल स्कुल८४  प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. मुनावळे प्रमाणेच पाटणमध्ये करण्यात येणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगून शिक्षणआरोग्य आणि पर्यटनाला चालना दिल्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ४२६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.पर्यावरणाचा समतोल राखून सर्व प्रकल्प पूर्ण करावेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

           शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील  लाखो नागरिकांना लाभ मिळाला असून राज्यातील चार कोटी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. राज्यात ७०० 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानासुरु करण्यात आले आहेत.  महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील लाभाची मर्यादा १.५० लाखाहून वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे,  असे मुख्यमंत्री म्हणाले.

   पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणालेअतिवृष्टीमुळे आंबेघर (खालचेवरचे)ढोकावळेमिरगावहुंबरळीशिद्रुकवाडीजितकरवाडी आणि काहीर या आठ भूस्खलनबाधित गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी  प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पुनर्वसनासाठी आवश्यक भूसंपादन करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून  निधी मंजूर करण्यात आला आहे. आठ गावांतील ४९९  कुटुंबांचे यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन होणार असून पुनर्वसित ठिकाणी अंतर्गत रस्तेपिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठाग्रामपंचायत कार्यालयसार्वजनिक शौचालयवैयक्तिक एकल विद्युत जोडणीअंगणवाडीखेळाचे मैदानसमाजमंदिर इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. असेही श्री देसाई यांनी सांगितले.

                                   महसूल अधिकाऱ्यांना वाहनांचे लोकार्पण

             सातारा जिल्ह्यात राज्यात प्रथमच  महसूल विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनांचे लोकार्पणही करण्यात आले. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना देखील ईनोवा गाड्या देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मल्हारपेठ पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे निवासस्थानांचे ई-लोकार्पण

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मल्हारपेठ पोलीस स्टेशन प्रशासकीय इमारत व निवासस्थानांचे तसेच पाटण पोलीस स्टेशन येथील अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानांचे ई-लोकार्पण करण्यात आले. 

                     यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडेअप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलालरविराज देसाई,जयराज देसाई,उपविभागीय अधिकारी सुनील गाडेजिल्ह्यातील लोकप्रतिनिधीपदाधिकारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन, काळकाई देवी मंदिर जीर्णोद्धार आणि रस्त्यांचे भूमिपुजन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन,

काळकाई देवी मंदिर जीर्णोद्धार आणि रस्त्यांचे भूमिपुजन

रत्नागिरीदि. ९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्‍या श्रेणीवर्धन करणेश्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम तसेच दापोली आणि मंडणगड येथील हॅब्रीड अन्युटी प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे भुमिपुजन आज करण्यात आले.

        या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंतखासदार सुनिल तटकरेआमदार योगेश कदममाजी मंत्री रामदास कदममाजी आमदार सदानंद चव्हाणकोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडेजिल्हाधिकारी एम देवेंदर सिंहमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारपोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णीप्रशिक्षणार्थी आय ए एस डा जस्मीनअपर जिल्हाधिकारी जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते.

        काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन करण्यात आले.  दापोली येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी २० कोटी २१ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. याही कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

            हायब्रीड अन्युटी (एमआरआयपी) अंतर्गत खेड व दापोली तालुक्यातील दापोली वाकवली साखरोली खेड भरणे रस्ता सुधारणा करण्याच्या कामास १३८ कोटी ६ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा शुभारंभही कोनशिलेचे उद्घाटन करुन करण्यात आले.

हर्णे मच्छीबंदराचा विकास करणे कामाचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

        २०५. २५ कोटी इतक्या किमतीच्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील मच्छी बंदराचा विकास करणे या कामाचा शुभारंभ खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी मंत्री रामदास कदमबाबाजी जाधव उपस्थित होते.  या बंदरामुळे स्थानिक ५५० व बाहेरील ८०० नौका लावता येणार आहेत. दापोली तालुक्यातील २३ मच्छीमार संस्थांना याचा फायदा होणार आहे.

०००

महिला कला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्रीशक्तीचा" महोत्सवाचे उद्घाटन

 महिला कला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्रीशक्तीचा" महोत्सवाचे उद्घाटन

             मुंबई दि. 9: पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र शासन आणि अमरहिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय "महिला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्रीशक्तीचा"  महोत्सवाचे उद्घाटन 8 मार्च रोजी  करण्यात आले.

          उद्घाटन सोहळ्याला  खासदार राहुल शेवाळेआमदार सदा सरवणकरमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेमीनाक्षी खारगे,  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकरअकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकरसदस्य श्वेता परळकरअमर हिंद मंडळाच्या कार्याध्यक्ष सीमा कोल्हटकर उपस्थित होत्या. 

     शासनाकडून महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्याचा लाभ घेऊन महिलावर्ग करत असलेली प्रगतीयाचा खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला. 

आपल्या संस्कृतीतील स्त्रीचे महत्त्व आणि समाजातील स्त्रियांचे योगदान याबद्दल प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढले आणि  कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व अमरहिंद मंडळाचे अभिनंदन केले.

             उद्घाटन सोहळ्यानंतर ए बी पी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत  शिबानी जोशी यांनी घेतली. त्यानंतर  सम्याक कलांश प्रतिष्ठान यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर भाष्य करणारे "दादला नको गं बाई" हे  विनोदी लोकनाट्य सादर केले. 

महिला कला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्रीशक्तीचा" महोत्सवाचे उद्घाटन

            मुंबई दि. मार्च   पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र शासन आणि अमरहिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ दिवसीय "महिला महोत्सव २०२४ - उत्सव स्त्रीशक्तीचा"  महोत्सवाचे उद्घाटन काल करण्यात आले.

          उद्घाटन सोहळ्याला  खासदार राहुल शेवाळेआमदार सदा सरवणकरमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेमीनाक्षी खारगे,  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकरअकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकरसदस्य श्वेता परळकरअमर हिंद मंडळाच्या कार्याध्यक्ष सीमा कोल्हटकर उपस्थित होत्या. 

      सरकारकडून महिलांसाठी कोणकोणत्या राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्याचा लाभ घेऊन महिलावर्ग करत असलेली प्रगतीयाचा खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला. 

आपल्या संस्कृतीतील स्त्रीचे महत्त्व आणि समाजातील स्त्रियांचे योगदान याबद्दल प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढले आणि  कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व अमरहिंद मंडळाचे अभिनंदन केले.

             उद्घाटन सोहळ्यानंतर ए बी पी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत  शिबानी जोशी यांनी घेतली. त्यानंतर  सम्याक कलांश प्रतिष्ठान यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर भाष्य करणारे "दादला नको गं बाई" हे  विनोदी लोकनाट्य सादर केले. 

            दि. 10 मार्च, 2024 रोजी सायंकाळी ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावेअभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा देवी - दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन  डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.

      अमर हिंद मंडळदादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

000

कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक :

 कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक :

                                                     राज्यपाल रमेश बैस

            मुंबई दि. 9 : देशातील आणि जगातील कर्क रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कुटुंब तसेच देशाकरिता कॅन्सरचे आर्थिक ओझे  फार मोठे असते.  अनेकदा कुटुंबांना घरदागिने विकावे लागतात.  त्यामुळे कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असून रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकभावनिक व आर्थिक समस्यांचा विचार झाला पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.   

            पहिले माझे कर्तव्य' (पीएमके) फाउंडेशनतर्फे कर्करुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांना मदत करणाऱ्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्तेआय इन्स्पायर पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात आले. अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा  येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.  

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ सुरेश अडवाणीटाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ राजेंद्र बडवे व अधिष्ठाता डॉ श्रीपाद बाणावली यांना जीवन गौरव सन्मान देण्यात आला. कॅन्सरवर मात करणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रातील २० कर्करोग योद्धे यांना यावेळी 'आय इन्स्पायर पुरस्कारदेण्यात आले. 

            गावांमधील लोकांना कर्करोग झाल्याचे समजते तोवर आजार बराच बळावलेला असतो. या दृष्टीने  केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागात १.५ लाख आयुष्मान आरोग्य मंदिर बनविण्यात आले आहेत. कर्करोगाचे निदान वेळेवर झाल्यास उत्तम उपचार करता येतो असे राज्यपालांनी सांगितले. लहान लहान मुलांना कर्करोग उपचार घेताना पाहतो तेंव्हा दुःख होते. अशा मुलांना तसेच त्यांच्या मातापित्यांना समाजाने धैर्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.     

कर्करोगाशी लढताना समाजाची मदत महत्वाची : डॉ सुरेश अडवाणी

            कर्करोगाशी लढताना रुग्णांचे तसेच समाजाचे सहकार्य आवश्यक असते.  सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून कर्करोगावर मात करता येऊ शकते असे कर्करोग तज्ज्ञ डॉ सुरेश अडवाणी यांनी यावेळी सांगितले.  

शहरी भागात कर्करोग वाढतोय: डॉ राजेंद्र बडवे

            कर्करोगाचे प्रमाण  देशात सातत्याने वाढत असून ग्रामीण भागांपेक्षा शहरात कर्करोगाचे प्रमाण जास्त आहेतसेच भारतापेक्षा पाश्चात्य देशात ते प्रमाण अतिशय जास्त आहे असे प्रतिपादन टाटा हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ राजेंद्र बडवे यांनी केले.  महिलांमध्ये कर्करोगातून बरे होण्याचा दर पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे असे डॉ बडवे यांनी सांगितले. 

            येत्या काही वर्षात देशातील कर्करोग रुग्णांची संख्या २० लाख झाली असेल. कॅन्सरवर उपचार महाग असल्यामुळे देशात कॅन्सर होण्यापूर्वीच आळा घालण्यासाठी  प्रयत्न झाले पाहिजे असे डॉ श्रीपाद बाणावली यांनी सांगितले. कर्करोगावरील उपचाराचा खर्च कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून राज्य व केंद्र सरकार देखील या कार्यात सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

            कार्यक्रमाला पीएमके फाउंडेशनच्या अध्यक्षा नयना कनलआयोजन सचिव डॉ संदीप बिपटे तसेच समाज सेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

०००

Governor honours Cancer Warriors on Women's Day

            Mumbai ९ : Governor Ramesh Bais presented the 'I Inspire Awards' to २० Cancer Warriors at a function organised by 'Pahile Majhe Kartavya' (PMK) Foundation in Mumbai on Fri ( Mar). 

The Pahile Majhe Kartyavya (PMK) Foundation started by Cancer Warrior Nayna Kanal is working for Cancer Care, Women’s Health and nutrition.

            Oncologist Dr Suresh Advani, former Director of Tata Memorial Hospital Dr Rajendra Badwe, Dr Shripad Banavali were given the Lifetime Achievement Award on the occasion.

000

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन

व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

            सातारा दि.९:-  मौजे दरे येथील बांबू मूल्यवर्धन केंद्र’ आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पाचे’  लोकार्पण व गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला.

       दरे तालुका महाबळेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईउद्योग मंत्री उदय सामंतआमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसलेज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दरे तर्फ तांब येथे बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. शेतकरीतसेच महिला व युवकांना कृषी व वनउपज उत्पादनासाठी पूरक रोजगार  मोठी संधी उपलब्ध होणार आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोयना धरणातील गाळ काढण्यात येणार आहे.

सह्याद्री पर्वतरांगातील शेतकऱ्यांसाठी टरस रेशीम शेती वरदान ठरेल

      टरस (वन्य) रेशीम शाश्वत रोजगार व संवर्धन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जंगल भागातील शेतकरी महिला व युवकांना टरस रेशीम शेती नाविन्यपूर्ण शाश्वत उद्योग आहे. ऐन झाडाची लागवड रोजगार हमी योजनेतून करता येते. कुठेही नांगरनग करायचे नाही,पाण्याचे आवश्यकता नाही,औषध फवारणीची आवश्यकता नाहीत्यामुळे सह्याद्रीपर्वत रांगांमधील शेतकऱ्यांसाठी टरस रेशीम शेती एक वरदान ठरणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

   या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेख,उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज उपस्थित होते.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना जल पर्यटन शुभारंभ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना जल पर्यटन शुभारंभ

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून

पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगारास प्राधान्य

                                                                        - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            सातारा दि.9 : कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र असून या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            सातारा जिल्ह्यातील  जावळी तालुक्यातील मुनावळे  येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंतराज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकरआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार मकरंद पाटीलजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनपोलीस अधीक्षक समीर शेखएमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रध्दा जोशी शर्माजलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेसह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारीबोटिंगजल पर्यटन यासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे. पाणी  प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही मुख्यमंत्री यांनी  यावेळी सांगितले. जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे.

स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट  खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल,असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता या बाबीही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत.

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीरोजीरोटीसाठी गावापासून आई-वडिलांपासूनकुटुंबापासूनतरुणांना दूर जावे लागते. त्यांना रोजगारासाठी गाव सोडून जावे लागू नयेउलट गाव सोडून गेलेले पुन्हा आपल्या घरी यावेतत्यांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावेत हा आपला उद्देश आहे. विकासात्मक काम करणारे शासन असल्यामुळे राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. एक लाख 37 हजार कोटीचे प्रकल्पांचे दावस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. तीन लाख 93 हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत. पाच लाख कोटींची गुंतवणूक आपण राज्याच्या विकासासाठी आणली आहे. उद्योग वाढीसाठी उद्योगांना सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

            आमदार  श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले की, जल पर्यटन प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावात्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात यावेमुनावळे गावचे सातबारे खातेदारांच्या नावावर करून मिळावेतअन्य उर्वरित रखडलेले प्रकल्पही मार्गी लावावेतजलाशयात मासेमारीचे परवाने मिळावेत.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्यासह अन्य मान्यवरांनी काउंटरवर तिकीट खरेदी केले. या कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली.

        कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसलेसरपंच श्री. भोसले,  विविध विभागांचे अधिकारीपदाधिकारीग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक :

 कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक :

                                                     राज्यपाल रमेश बैस

            मुंबई दि. 9 : देशातील आणि जगातील कर्क रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कुटुंब तसेच देशाकरिता कॅन्सरचे आर्थिक ओझे  फार मोठे असते.  अनेकदा कुटुंबांना घरदागिने विकावे लागतात.  त्यामुळे कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असून रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकभावनिक व आर्थिक समस्यांचा विचार झाला पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.   

            पहिले माझे कर्तव्य' (पीएमके) फाउंडेशनतर्फे कर्करुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांना मदत करणाऱ्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्तेआय इन्स्पायर पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात आले. अण्णाभाऊ साठे सभागृह भायखळा  येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.  

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ सुरेश अडवाणीटाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ राजेंद्र बडवे व अधिष्ठाता डॉ श्रीपाद बाणावली यांना जीवन गौरव सन्मान देण्यात आला. कॅन्सरवर मात करणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रातील २० कर्करोग योद्धे यांना यावेळी 'आय इन्स्पायर पुरस्कारदेण्यात आले. 

            गावांमधील लोकांना कर्करोग झाल्याचे समजते तोवर आजार बराच बळावलेला असतो. या दृष्टीने  केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागात १.५ लाख आयुष्मान आरोग्य मंदिर बनविण्यात आले आहेत. कर्करोगाचे निदान वेळेवर झाल्यास उत्तम उपचार करता येतो असे राज्यपालांनी सांगितले. लहान लहान मुलांना कर्करोग उपचार घेताना पाहतो तेंव्हा दुःख होते. अशा मुलांना तसेच त्यांच्या मातापित्यांना समाजाने धैर्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.     

कर्करोगाशी लढताना समाजाची मदत महत्वाची : डॉ सुरेश अडवाणी

            कर्करोगाशी लढताना रुग्णांचे तसेच समाजाचे सहकार्य आवश्यक असते.  सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून कर्करोगावर मात करता येऊ शकते असे कर्करोग तज्ज्ञ डॉ सुरेश अडवाणी यांनी यावेळी सांगितले.  

शहरी भागात कर्करोग वाढतोय: डॉ राजेंद्र बडवे

            कर्करोगाचे प्रमाण  देशात सातत्याने वाढत असून ग्रामीण भागांपेक्षा शहरात कर्करोगाचे प्रमाण जास्त आहेतसेच भारतापेक्षा पाश्चात्य देशात ते प्रमाण अतिशय जास्त आहे असे प्रतिपादन टाटा हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ राजेंद्र बडवे यांनी केले.  महिलांमध्ये कर्करोगातून बरे होण्याचा दर पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे असे डॉ बडवे यांनी सांगितले. 

            येत्या काही वर्षात देशातील कर्करोग रुग्णांची संख्या २० लाख झाली असेल. कॅन्सरवर उपचार महाग असल्यामुळे देशात कॅन्सर होण्यापूर्वीच आळा घालण्यासाठी  प्रयत्न झाले पाहिजे असे डॉ श्रीपाद बाणावली यांनी सांगितले. कर्करोगावरील उपचाराचा खर्च कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून राज्य व केंद्र सरकार देखील या कार्यात सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

            कार्यक्रमाला पीएमके फाउंडेशनच्या अध्यक्षा नयना कनलआयोजन सचिव डॉ संदीप बिपटे तसेच समाज सेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

०००

Governor honours Cancer Warriors on Women's Day

            Mumbai ९ : Governor Ramesh Bais presented the 'I Inspire Awards' to २० Cancer Warriors at a function organised by 'Pahile Majhe Kartavya' (PMK) Foundation in Mumbai on Fri ( Mar). 

The Pahile Majhe Kartyavya (PMK) Foundation started by Cancer Warrior Nayna Kanal is working for Cancer Care, Women’s Health and nutrition.

            Oncologist Dr Suresh Advani, former Director of Tata Memorial Hospital Dr Rajendra Badwe, Dr Shripad Banavali were given the Lifetime Achievement Award on the occasion.

000

Featured post

Lakshvedhi