Friday, 8 March 2024

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’ चा वाढदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या दुवा’ चा वाढदिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा

 

        कोल्हापूरदि.8 (जिमाका): मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मागील वर्षी वेळेत अर्थसहाय्य झाल्यामुळे प्राण वाचलेल्या "दुवा" या चिमुकलीचा महिलादिनी पहिला वाढदिवस हातकणंगले येथे झालेल्या 'शिवराज्य भवनकोनशिला अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आला.

            यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागरखासदार संजय मंडलिकखासदार धैर्यशील मानेजिल्हाधिकारी अमोल येडगेजिल्हा वैद्यकीय समन्वयक प्रशांत साळुंखेसाई स्पर्श हॉस्पिटलचे डॉक्टर विजय गावडे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्यामुळे प्राण वाचलेल्या चिमुकलीच्या आईने कोल्हापूर मध्ये 13 जून 2023 मध्ये तपोवन मैदान येथे झालेल्या 'शासन आपल्या दारीकार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आभाराचे पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेने त्यांनी मुलीचे नाव दुवा असे ठेवल्याचे तिची आई फरिन मकुबाई यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले होते.

            आज याच "दुवा" चा पहिला वाढदिवस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाल्यामुळे खूप आनंद झाल्याची भावना तिची आई फरिन मकुबाई यांनी व्यक्त केल्या.

**


राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मारकासाठी 199 कोटींची निधी देणार

 राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

संयुक्त स्मारकासाठी 199 कोटींची निधी देणार

                                                              -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील इंदूमिल येथील स्मारक जगाला हेवा वाटेल असे करणार

        कोल्हापूरदि. 08 (वि. मा. का.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडन मधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहेत्याचीच प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एैतिहासिक परिषद माणगाव येथेच झाली होती. या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी 199 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            माणगाव येथील माणगाव परिषदेच्या 15 ठरावांच्या शिलालेखाचे उद्घाटनहोलाग्राफिक शो व माणगाव येथे साकारलेल्या लंडन हाऊस प्रतिकृती इमारत लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफविधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेखासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील मानेखासदार संजय मंडलीकआमदार राजूबाबा आवळेआमदार प्रकाश आवाडेराज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागरजिल्हाधिकारी अमोल येडगेमहापालिका आयुक्त के.मंजुलक्षीमाणगावचे सरपंच राजू मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील संयुक्त स्मारकाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील इंदू मिल येथील स्मारकही संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीने करणार आहे. राजर्षी शाहू महाराज महान समाजसुधारक होते. शिक्षणात आणि नोकरी मध्ये बहुजनांना आरक्षण देणारे व शिक्षणासाठी वसतिगृहाची उभारणी करणारे ते पहिले राजे होते. तर बहिष्कृत समाजाला स्वाभिमानाची आणि स्वत:ची जाणीव करुन त्यांचा उध्दार करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.  डॉ. आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या उपस्थितीत जगातील पहिली बहिष्कृत वर्गाची एैतिहासिक माणगाव परिषद घेतली त्यामुळे ही पावन भूमी आहे. या भूमीला मी वंदन करतो,  असे श्री. शिंदे म्हणाले.

             माणगाव या ठिकाणी साकारण्यात आलेला होलोग्राफिक शो पाहताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत असे दुर्मिळ क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळत आहेतहे आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

            केंद्र व राज्य शासनही गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवित आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना सुरु आहेत. यामधून कष्टकरीकामगार,महिलातरुण युवा वर्गासह सर्वांनाच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबध्द आहे. बार्टीसारथीमहाज्योतीआदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था सक्षमपणे समाजाच्या उध्दारासाठी काम करीत आहे. असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला दिन व महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

 राज्याचं चौथं महिला धोरण ही जागतिक महिला दिनाची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आदितीताई तटकरे यांचे केले विशेष अभिनंदन

                                                          

            मुंबईदि. 8 :- यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणून महाराष्ट्रानं राज्यातील महिलाशक्तीला नवी ऊर्जानवी उमेदनवं बळ दिलं आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ केला आहे. महिलांचे आरोग्यमहिलांना पोषक आहारमहिलांचे शिक्षण व कौशल्यवृद्धीमहिलांची सुरक्षामहिलांसाठी रोजगारनिर्मितीनिर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभागमहिला खेळाडूंना आर्थिक सहाय्यसांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढविण्यासारख्या निर्णयांच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या सामाजिकसांस्कृतिकआर्थिक विकासाची मजबूत पायाभरणी केली आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचे स्वागत केले असून जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            राज्याचे नवीन महिला धोरण जाहीर केल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीत्यानंतर महिला व बाल विकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समितीजिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करणार आहे. या समित्यांच्या संपर्कसंवादसमन्वयातून महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी प्रभावी होईलमहिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

            राज्याच्या चौथ्या महिला धोरणामुळे महिलांना सर्वक्षेत्रात समान संधीशासन-प्रशासनात योग्य स्थानअर्थसंकल्पात योग्य तरतूदरोजगार-स्वयंरोजगारात समान संधीकौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षणसंपत्तीत समान वाटाउद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठआरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे.  निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावीअसा प्रस्ताव आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे. राज्याचे चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी यंदाच्या जागतिक महिला दिनाची आगळीवेगळी भेट असून ही भेट कायम स्मरणात राहिलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

०००००

 

40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर येवून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार

 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर येवून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 9000 मे.वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र

 40,000 कोटींची गुंतवणूक25 हजार रोजगार

            मुंबईदि. 7 : राज्यातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून 40,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार असून25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असूनशेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून हे देकारपत्र आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावीयासाठी 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती. त्यानंतरच्या काळात 2000 मे.वॉट पर्यंत निर्मिती करण्यात आली. आता 9000 मे.वॉट सौरऊर्जा तयार करण्यात येणार आहेत्यामुळे 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येतील.

            यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवसा वीजेची सातत्याने मागणी होती. ही मागणी आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषी जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. अतिशय कमी कालावधीत प्रकल्पासाठी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे कार्यान्वयन शक्य होणार आहे.  सर्वांत आधी सौर ऊर्जेवरील ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राळेगणसिद्धी जि. नगर येथे साकारण्यात आली. ती कमालीची यशस्वी झाली. आता जागा उपलब्धतेसाठी महसूल यंत्रणेने केलेल्या भरीव कार्यामुळे हे शक्य झाले. विकासकांना यापुढेही सर्व शासकीय यंत्रणा मदत करतील. कुठेही अडचण आल्यास त्या सोडविण्यासाठी शासन कायम पाठीशी असेल.

            राज्यात 3600 मेगॅवॉट सौर ऊर्जा क्षमता आतापर्यंत स्थापित आहे. पणआता अवघ्या 11 महिन्यात 9000 मेगॅवॉटची प्रक्रिया राबवून सरकारने एक नवा विक्रम घडविला आहे. सरकारने कमीत कमी कालावधीत जागा उपलब्ध केल्याने हा प्रकल्प कार्यान्वित करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पामुळे शासनावरील विविध वीज सवलतींमुळे पडणारा आर्थिक भारही कमी होणार आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले. हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करायचा असला तरी सोबत काम केले तर 15 महिन्यातच तो पूर्ण होऊ शकतो. आता हा प्रकल्प सुरू होणार म्हणून अधिकाऱ्यांनी थांबू नये. उर्वरित 50 टक्के कृषी फिडर सौरऊर्जेवर आणण्यासाठी नियोजनाच्या तयारीला तत्काळ लागावे. पुढील दोन ते तीन वर्षात 8 लाख सौर ऊर्जा पंपसुद्धा शासनाला द्यावयाचे आहेतत्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना 1.25 लाख रुपये प्रतिहेक्टर वार्षिक भाडे दिले जाते. यावेळी हुडकोसोबत एक सामजंस्य करार सुद्धा करण्यात आला. यामधून 5 हजार कोटी रूपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मिळणार आहेत. रिलायन्ससोबत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी सामजंस्य करारसुद्धा करण्यात आला. या करारामुळे राज्यात ग्रीन हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात बुस्ट मिळणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होतेतर सभागृहात अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रमहाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या महासंचालक कादंबरी बलकवडेमुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सौनिकउपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी आदींसह विकासक उपस्थित होते.

००००

कल्याण डोंबिवली २७ गावे, नवी मुंबई १४ गावांतील नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

 कल्याण डोंबिवली २७ गावेनवी मुंबई १४ गावांतील नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

उल्हासनगरची अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत

 आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. ७ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावातील नागरिकांना २०१७च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे जाहीर करतानाच संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याची कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

            वर्षा निवासस्थानी कल्याण डोंबिवलीउल्हासनगरनवी मुंबईतील १४ गावे यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणखासदार डॉ. श्रीकांत शिंदेआमदार राजू पाटीलडॉ. बालाजी किणीकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.

            या बैठकीत २७ गावेकल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील पुनर्विकास१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेशउल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करणेसंत सावळाराम स्मारकासाठी जागा आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

            कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांमध्ये मालमत्ता कराचा विषय प्रलंबित होता. त्यावर मार्ग काढत २०१७ च्या दराप्रमाणे आता कराची आकारणी करावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिका हद्दीत १४ गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतीलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

            उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            वास्तविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतींच्या उंचीबाबतचा नियम कल्याण डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

००००

 


महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) मार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध उपक्रम

 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) मार्फत

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध उपक्रम

 

            मुंबईदि. ७ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवीत असते. सध्या महामंडळ रिसॉर्ट्सउपहारगृहजल पर्यटनअजिंठा व वेरूळ अभ्यागत केंद्रकलाग्राम,जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) समुदाय आधारित पर्यटन (Community Based Tourism) हे यशस्वीरित्या राबवीत आहे.

            पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले पर्यटन विभागमहाराष्ट्र शासन यांच्या आई महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत महिलांसाठी विविध उपक्रम पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महामंडळ राबवीत आहे. एमटीडीसी हे भारतातील एकमेव पर्यटन महामंडळ आहे की जे आई महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण प्रथम अंमलात आणुन महिलांचे पर्यटनात योगदान वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे.

            “आई महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणांतर्गत महिलांसाठी महामंडळामार्फत पोषक असे वातावरण पर्यटन सचिवजयश्री भोज व  व्यवस्थापकीय संचालकमपविमश्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आखले जात आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी येणाऱ्या जगभरातील महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एमटीडीसीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

            “आई’ धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस 50% सूट देण्यात आली होतीया कालावधीत महिला पर्यटकानी प्रचंड प्रतिसाद देत 1500 हून अधिक महिला पर्यटकांनी भेट दिली आहेतसेच 8 मार्च रोजी सुट्टी तसेच लॉंग वीकेंड असल्या कारणाने अधिक 200-300 पर्यटकांनी भेट देण्याची शक्यता आहे, असे मत एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

            या धोरणांतर्गत महामंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे व महामंडळास भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. महामंडळाद्वारे 3 पर्यटक निवास संपूर्णपणे महिला संचलीत  आहेत. महामंडळाद्वारे नागपूरछत्रपती संभाजी नगर व खारघरनवी मुंबई येथील पर्यटक निवासउपहारगृहे आणि कार्यालयीन कर्मचारी हे सर्व महिलांद्वारे संचलीत करण्यात आले आहे. या ठिकाणी रिसॉर्ट मॅनेजर पासून ते हाऊस किपींगफ्रंट ऑफीसफुड ॲन्ड बेवरीजेसलेखा सहाय्यकशिपाईमदतनीसचौकीदारटॅक्सी चालक इ. सर्व अर्हता प्राप्त महिला असुन संपूर्णपणे महिला संचलीत करण्यात आले आहे. यानुषंगाने 40 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.पर्यटक निवसांमध्ये महिलांसाठी 50% इतकी सूट: आई धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवसआणि 1 ते 6 जून 2024, 1 ते 5 ऑगस्ट 2024 व 1 ते 5 ऑक्टोबर 2024 असे वर्षातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस महिलांकरिता महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50% इतकी सूट देण्यात आली आहे.एक दिवसीय सहलशहरी सहल आयोजनसाहसी सहल आणि ट्रेकिंग टूर इ. चे आयोजन: त्यामध्ये हेरीटेज वॅाकअनुभवात्मक पर्यटन (Experiential Tourism), शैक्षणिक सहल, 1 व 2 दिवसीय टुर्ससाठी महिलांना पर्यटक मार्गदर्शक (Tour guide) म्हणून मपविमद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचप्रमाणे जल पर्यटनासाठी महिला प्रशिक्षक देखील उपलब्ध आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात सर्व टुर्स हे प्रशिक्षित महिलांमार्फत राबवित आहे. या टुर्समध्ये क्युरेर्टसगाईड महिला असणार आहे.एमटीडीसी मालमत्तेच्या ठिकाणी महिला बचत गटांना विविध स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य आहे.विशेष खेळ व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन पाच वर्षांपर्यंतची मुले असलेल्या महिला पर्यटकांसाठी पाळणाघरया आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व उपक्रम महिलांना पर्वणी ठरतील. या उपक्रमामुळे एकट्या महिला प्रवासी (solo women traveller) व महिला ग्रुप टूर यांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.महिलांना त्यानुषंगाने महिला चालवत असलेले उपक्रममहिला पर्यटक व महिला उद्योजक असा सर्वांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल.

0000

छत्रपती संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे भाग्य

 छत्रपती संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे भाग्य

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण

ब्रेल लिपीमधील शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि गोंड समुदाय पुस्तकाचे प्रकाशन

            चंद्रपूरदि.7 : जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. अशा या वाघांच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे हे माझे भाग्य आहेअशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

            प्रियदर्शनी सभागृह येथे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकिटछत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रेमराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड – 1ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि महाराष्ट्र : गोंड समुदाय या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. मंचावर नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळेजिल्हाधिकारी विनय गौडासांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरेगॅझेटिअर विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकरपुराभिलेख विभागाचे संचालक सुजित उगलेप्रा. अशोक जिवतोडेराहुल पावडेडॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.

            शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 12 महान व्यक्तिरेखा आणि 12 ऐतिहासिक प्रसंगावर आधारीत पोस्ट तिकिट काढण्याचा निर्णय घेण्यात आलाअसे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेकेवळ 32 वर्षाच्या वयात छत्रपती संभाजी महाराज 120 लढाया लढले आणि जिंकलेही. छत्रपती संभाजी महाराजांची वीरतापराक्रम आणि शौर्य शब्दबध्द करता येत नाही. जगात अनेक राजे होऊन गेलेत्या सर्वांनी आपले साम्राज्य वाढविण्यावर भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी ख-या अर्थाने रयतेचे राज्य चालविले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरचे टपाल तिकीट हा केवळ एक कागदाचा तुकडा नाहीतर आपला शक्तीशाली वारसा आहे.

            श्री. मुनगंटीवार म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सुर्याची उर्जा देणारा स्त्रोत होय. आग्र्याच्या ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेथेच गत दोन वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे नियोजन आहे.  दिनांक 4 मे रोजी वाघ नखे भारतात येत आहेत. ही वाघनखं पाच ठिकाणी जाणार आहे. दिल्लीच्या जे.एन.यु. विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे संचालक विभीषण चवरेगॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांचे कौतुक केले.

            चंद्रपूर सतत प्रगतीच्या मार्गावर जात राहावा. राज्यातच नव्हे तर देशातील इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावाया जिल्ह्याचे अनुकरण करावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            प्रास्ताविका संचालक विभीषण चवरे यांनी केले. यावेळी पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.  

अंध बांधवांसाठी ब्रेललिपीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा :

            आपल्या राज्यात नोंदणीकृत अंध नागरिकांची संख्या 5 लक्ष आहे. या लोकांपर्यंतसुध्दा शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास पोहचविण्यासाठी ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ पोहचिवण्याचा निर्णय घेतला. अंध बांधवांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पोहचवू शकलोयाचा आनंद आहे. सर्व दिव्यांग शाळांमध्ये हा ग्रंथ पोहचविण्याच्या सूचना विभागाला दिल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र : गोंड समुदाय पुस्तकाचे विमोचन : गोंड समाजाच्या वीरतेचा इतिहास सर्वदूर पोहचविण्याच्या दृष्टीने प्रा. श्याम पोरेटे यांनी लिहिलेले महाराष्ट्र : गोंड समुदाय’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावेयासाठी आपल्या अर्थमंत्री पदाच्या काळात 200 एकर जागा उपलब्ध करून दिली. तसेच विद्यापीठासाठी 800 कोटी रुपये मंजूर केल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचे कॉफीटेबल बुक : पुराभिलेख विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे उपलब्ध असून ही पत्रे सामान्य जनेतपर्यंत पोहचावितया दृष्टिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळपत्रांचे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. तसेच पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारीत मराठेकालीन टाकसाळी संबंधाची मोडी कागदपत्रेखंड – 1 हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

विभागाच्या वतीने आतापर्यंत विविध टपाल तिकिटे प्रकाशित : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शहाजी महाराजांवरील 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण6 जून रोजी राजभवन येथे शिवराज्याभिषेक तिकीटाचे अनावरण करण्यात आले असून केवळ 6 दिवसांत टपाल तिकीट काढण्याचा विक्रम देशात सर्वप्रथम झाला आहे. संत जगनाडे महाराजबाबा आमटेशहीद बाबुराव शेडमाकेअण्णाभाऊ साठे या महान व्यक्तीवरसुध्दा टपाल तिकीट काढण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi