Saturday, 9 December 2023

विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा.

 विकसित भारत संकल्प यात्रा  अभियानाच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात

महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा.

                                                                                                              मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

         प्रत्येक नागरिकाला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व्हावीत्याचा लाभ वंचित घटकाला मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रयत्न करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,विकासाच्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थीपर्यंत पोहचण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिलाव्यापारीउद्योजकविद्यार्थी या सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी हा प्रयत्न असणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचा आढावा घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत  सुचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

    महाराष्ट्रातील विकास कामांसाठी केंद्र शासन पाठीशी आहे. राज्यात वेगाने विकास कामे सुरू असून विदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य एक नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात राज्य अव्वल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

            कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीउज्ज्वला योजनाविविध क्रीडा योजनाआधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींचे दालन उभारण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले.

            यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशीउप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादारमुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरनियोजन विभागाच्या संचालिका डॉ.  प्राची जांभेकरसी विभागाचे सहायक आयुक्त श्री. उद्धव चंदनशिवे, नगर परिषद प्रशसनाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते.

***


विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही

 

                                                  
विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही
                                                     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

          मुंबईदि. 9 : भारतातील प्रत्येक नागरिकाचागावाचाशहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यातत्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिलायुवकशेतकरीखेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
        राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नयेयासाठी आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            'विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज  देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दि.15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे.

              बृहन्मुंबईतील 227 प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दि. 28 नोव्हेंबर 2023 ते दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी’ विभागातील माधव बागकावसजी पटेल मार्गसी. पी. टँक सर्कलभुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

            यावेळी केंद्रीय सूक्ष्मलघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेशालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकरआमदार राम कदममाजी आमदार अतुल शहामहानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचंदीगढजम्मू काश्मिरबिहार आणि गुजरात येथील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधीक संवाद साधला.

    'विकसित भारत संकल्प यात्रेबाबत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेदेशभरातील कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणेआधुनिक अवजारेवीज-पाणीरुग्णांना वेळेवर उपचार-औषधेबेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल,  युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी हे यावेळी म्हणाले.

 

ठाणे मनपा क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांगीण आराखडा

 ठाणे मनपा क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांगीण आराखडा

- मंत्री उदय सामंत

            नागपूरदि. ८:  ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका शाळांच्या दुरुस्तीबाबत सर्वांगीण आराखडा तयार करण्यात येईल. सर्वोच्च प्राथमिकता असणाऱ्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेकडे निधीची कमतरता असेल, तर जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी मिळण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती करण्यात येईलअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

            सदस्य संजय केळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले कीठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९३ इमारती / संरचनेत एकूण १९४ शाळा व बालवाड्या भरत आहेत. शिक्षण विभागामार्फत ३४ शाळा व ११ बालवाडी दुरुस्ती करण्याकरिता केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेमार्फत माहे मार्च२०२३ पासून या शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या शाळांच्या इमारती (शाळा व बालवाडीसह) ऑडिट करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्यात आला असून महानगरपालिकेच्या तालिकेवर नियुक्त असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्स मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.

            ठाणे महानगरपालिकेच्या शाळांपैकी सद्य:स्थितीत शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३४ शाळा व ११ बालवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी घेऊन निविदा मागविण्यात आल्या. सद्य:स्थितीत ही कामे महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये सुरु असूनसुमारे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेने कळविले असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

            ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा इमारतीच्या दुरुस्तीची निकड व उपलब्ध आर्थिक तरतूद या बाबींचा विचार करून शाळा इमारती दुरुस्तीचे कामे महानगरपालिका हाती घेत आहे. तसेच या शाळांच्या इमारतींची तपासणी व सुरक्षा उपाययोजना इ. बाबी लक्षात घेताशाळांचे दुरुस्ती व नुतनीकरण प्राधान्याने करण्यात येईलअशी माहितीही त्यांनी दिली.

0000


नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

 नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

            नागपूरदि. ८ - नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दूर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात  अहवाल मागवला जाईलअशी माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

        सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी दिलेल्या उत्तरात मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.

राज्य शासनाच्या सुरु असेलेल्या उपयायोजनांमुळे  बालकांचा मृत्युदर कमी होत आहे. नवजात शिशुंची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. राज्यात आजारी नवजात शिशूच्या उपचाराकरिता एकूण ५२ विशेष नवजात काळजी कक्ष (SNCU) स्थापन करण्यात आले असून त्याअंतर्गत श्वसनाच्या उपचाराकरिता (सीपीएपी) मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेतया कक्षात बालरोग तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विशेष नवजात काळजी कक्षामधील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांचे  प्रशिक्षण राज्यस्तरावरुन घेण्यात आले असल्याची माहिती, मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली.

        याशिवायवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुसज्ज प्राथमिक अतिदक्षता केंद्र (PICU) तसेच बालरोग व नवजात अतिदक्षता केंद्र (NICU) उपलब्ध आहेत. तेथे रुग्णखाटा व्हेंटीलेटरसह उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या बालकांना रुग्णालय प्रशासनातर्फे सुयोग्य उपचार देण्यात येतात. कुठलाही रुग्ण उपचाराविना वंचित राहत नाही. सर्व आजारी नवजात शिशुकरिता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधेतपासण्या तसेच वाहतूक लाभ देण्यात येतो. तसेच नवीन सुविधा वाढविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

        सन २०१८-१९ मध्ये ३७ विशेष नवजात काळजी कक्ष  कार्यरत होतेतर सन २०२३-२४ मध्ये ५२ विशेष नवजात काळजी कक्ष  कार्यरत आहेत. माता व नवजात बालकांना तज्ज्ञ सेवा मिळण्यासाठी रुग्णालयांना प्रथम संदर्भ सेवा केंद्र म्हणून स्थापित केले आहे व तेथे स्त्री रोग तज्ञबालरोग तज्ञरक्ताची सोयसोनोग्राफीसिझेरीयन सेक्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच मोफत संदर्भ सेवा आजारी नवजात बालकांसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली

        राज्यात माता व बालकांच्या आरोग्याकडे सतत व विशेष लक्ष दिल्याने अर्भक मृत्यू दर १६ तर बालमृत्यु दर १८ झालेला आहे. देशातील मोठ्या राज्यांमध्ये हा दर कमी करण्यामध्ये राज्याचा ३ रा क्रमांक आहे. यात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे.. तसेच पायाभूत सविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रग्रामीण रुग्णालयजिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविदयालये यांची आवश्यकतेनुसार नवीन निर्मिती करण्यात येत आहेअसेही त्यांनी सांगितले.

        यावेळी सदस्य श्री. रवी राणाश्री.योगेश सागरश्री.प्रताप अडसडश्री.राजेश एकडेश्री.राम सातपुते यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.

0000

आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी आदर्श कार्यपध्दती तयार करणार

 आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी आदर्श कार्यपध्दती तयार करणार


                                                             - आरोग्य मंत्री तानाजी सावंत


            नागपूर, दि.8 : राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती, आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.


            भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील आरोग्य सुविधेबाबत सदस्य अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.सावंत बोलत होते.


            आरोग्य मंत्री श्री.सावंत म्हणाले आरोग्य व्यवस्थेत उपलब्ध संसाधनांचा 100 टक्के वापर चांगल्या पद्धतीने करणे, विभागातील आशाताईंपासून डॉक्टर, नर्स या मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवणे आणि रुग्णांसोबत आत्मियतेने वागण्याबाबतची आदर्श कार्यपध्दती (एसओपी) करण्याचे काम सुरू आहे. रुग्णालय इमारत आदी संसाधनांची दुरुस्ती करून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्याचे काम सुरू आहे.


            आरोग्य व्यवस्थेसाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत केली आहे. राज्यातील 12 कोटी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज वाढली आहे. आरोग्य व्यवस्थेत वाढ होणे आणि अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ होणे अपेक्षित आहे. सन 2012 पासून बिंदूनामावली तयार नव्हती ती करण्यासाठी देखील एसओपी करण्याचे काम सुरू असून मॉडेल आरोग्य यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचे परिणाम येत्या काळात दिसून येतील.


पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील असुविधेबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक


            भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील शवागारात शवपेट्या नादुरुस्त असल्यामुळे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवावे लागल्याचा प्रकार घडला होता. या रुग्णालयातील शवागारात शवपेट्या खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून निधी देऊन शवपेट्या खरेदी करण्याच्या सूचना आजच देण्यात येतील. हे रुग्णालय महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. रुग्णालयातील असुविधेबाबत लवकरच मा.मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी सभागृहात सांगितले. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्रताप सरनाईक, बच्चू कडू, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेत उपप्रश्न उपस्थित केले.


०००

वात्सल्य मूर्त

 ✍️ एक महिला


जी वर्णाने काळी आहे, गल्फ देशांमध्ये एका घरात मुले सांभाळण्याचे काम करत होती ती तिच्या मायदेशी चालली आहे. तिने ज्या लेकरांना सांभाळले त्यांची ती कोणिही नव्हती तरीपण ते सख्या जनमदात्यि आई, बापाला सोडून त्या वर्णाने काळ्या असलेल्या पण मायेने संभाळणाऱ्या आईलाच कशी बिलगत आहेत. त्यांचे रडणे कोणी ही थांबवू शकत नाही, यावरुन लक्षात येईल की जन्मताच वर्ण -जात, कुळी, धर्म काही नाही. फक्तं मानव धर्म ....पुढे मात्र हे सर्व शिकवले जाते, शिकवावे लागते आणि काही विनाशकी जातीच्या कार्यपद्धतीमुळे जाती-जातीत अंतर वाढले जाते अन्यथा या ईश्वर निर्मित अंतराळात *फक्त माया- प्रेम, ममता -जिव्हाळा -आपुलकी* हेच शब्द सर्व दूर प्रचलित आहेत वास्तवात आहेत🙏

निवासी आश्रमशाळांमधील 282 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

 निवासी आश्रमशाळांमधील 282 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

-इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

 

          नागपूरदि. 8 : राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण 977 खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषणइमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी 225 कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत 180 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण 2 लाख 23 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विज्ञान आणि गणित विषय शिकविण्यासाठी 282 पदे भरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

 सदस्य विकास ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

          या अनुषंगाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रिक्त पदे भरण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत मंत्री श्री. सावे म्हणाले कीसर्व आश्रमशाळांमधील रिक्त पदे त्वरीत भरण्यात येतील. येत्या जानेवारी पर्यंत राज्यात 52 वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरात भाडे अधिक असल्याने ते वाढवून मिळण्यास शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ती मान्य झाल्यानंतर या शहरांमध्ये देखील उर्वरित शाळा सुरू करण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी आधार योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 600 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या आता 50 वरून 75 इतकी वाढविण्यात आली असल्याचे सांगून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रदान करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

          सदस्य बाळासाहेब थोरात यांनीही या अनुषंगाने चर्चेत सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi