Sunday, 3 September 2023

सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार

 सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


‘शासन आपल्या दारी’ मध्ये 17 लाख व्यक्तींना लाभ    


 


मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार


राज्य शासनाने जनकल्याणाचे निर्णय घेतले


 


बुलडाणा, दि. 3 : राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकाचे सरकार आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत केवळ जनतेच्या व्यापक हिताच्या निर्णयाला प्राधान्य देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावरून उतरून मदत करणारे सरकार आहे. येत्या काळातही सर्वसामान्याच्या हितासाठी गतीने निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


बुलडाणा येथील कऱ्हाळे ले आऊटजवळील मैदानात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज पार पडला, यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, सर्वश्री आमदार किरण सरनाईक, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सुरू केल्यापासून शासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत आहे. राज्यात सातत्याने कार्यक्रम घेण्यात आले आहे. यातून आतापर्यंत एक कोटी 61 लाख नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. या उपक्रमातून नागरिकांच्या दारापर्यंत जाणारे देशातील एकमेव राज्य आहे. अभियानातून बुलडाणा जिल्ह्यात आजच्या दिवशी 1 लाख तर आतापर्यंत 17 लाख 43 हजार नागरिकांना लाभ देण्यात आला आहे.


राज्य शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. गेल्या काळात बंद पडलेल्या असंख्य योजना नव्याने पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. 32 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यातून आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नदीजोड प्रकल्प, दुष्काळग्रस्तांना मदत, महिलांना बस प्रवासात सवलत, 75 हजार पदभरती असे हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या मदतीने राज्याचा विकास करण्यात येत आहे. महिलांच्या विकासासाठी बचतगटांना चालना देण्यात येत आहे. बचतगटांना कमी व्याजदराची कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच विपणनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


मराठा समाजाला आरक्षण देणारच


            जालना जिल्ह्यात घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आवश्यकता भासल्यास न्यायालयीन चौकशी करण्यात येऊन यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यासोबतच मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे असेल. आरक्षण देण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन मदत देण्यात आली. तसेच मेहकर तालुक्यातील 50 तलाठी कार्यालयांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर आधारित कॉफी टेबलबुकचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रास्ताविक केले.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वाटप


कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात लाभ देण्यात आले. यात सुनीता प्रशांत खरे, रा. सुंदरखेड, ता. बुलडाणा, (पिठाची चक्की), राजू भीमराव हिवाळे, रा. भीमनगर वार्ड, क्रमांक दोन, बुलढाणा, (वाहन करातून सूट), हरिदास काळमेघ, रा. काकोडा, ता. संग्रामपूर, (विमा संरक्षण निधी), टी. एस. घुले, कुलाभवानी फार्मर प्रोड्युसर कंपनी, रा. वडगाव पाटण, ता. जामोद, (ड्रोन), रामेश्वर मदनराव कोल्हे, रा. धोडप, ता. चिखली, (सामाजिक कल्याण), ज्योती निलेश पाटील, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली, (कुकुट पालन), चंद्रकला मनोहर सोनवणे, बुलडाणा, (आत्मनिर्भर निधी), शितल पंडीत खंडागळे, रा. कोलवड, ता. बुलडाणा, (प्रधानमंत्री मातृवंदन योजना), भूषण विनायक काळे, रा. राऊतवाडी, ता. चिखली, (अनुकंपा नोकर भरती), सविता गजानन आंधळे, रा. खामगाव, (राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय), प्रभाकर शंकर पहूरकर, रा. भानेगाव, ता. शेगाव, (प्रधानमंत्री मत्स्य योजनेतून इन्सुलेटेड वाहन), प्रियंका गजानन ताटे, रा. बुलडाणा, (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम), लता कृष्णा गवते, रा. चिखली, (ई-व्हेईकल), अनुराधा सोळंकी, रा. पाटोदा, ता. चिखली, (खेळाचे अद्ययावत साहित्य), सुमेध तायडे व कीर्ती तायडे, रा. संग्रामपूर, (सामुदायिक विवाह), पी. पी. सोनुने, रा. मलकापूर, (स्मार्ट प्रकल्प), उषा विजय मिसाळ, रा. बुलडाणा, (नागरी जीवनोन्नती अभियान), सरला गजानन जाधव, रा. कोलवड, (ग्रामीण जीवनोन्नती), निर्मला देशमुख, रा. मेहकर, मंगला शेजोळ, रा. देऊळगाव माही (ट्रॅक्टर), प्रथमेश जवकर, रा. बुलडाणा, (खेळाचे साहित्य), ऋषीकेश ढारे, रा. शेगाव, अर्चना जाधव, रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, राहुल लोखंडे, रा. भालगाव, ता. चिखली (रोजगार मेळावा) या लाभार्थ्यांना लाभ देऊन गौरविण्यात आले. तसेच चांद्रयान मोहिमेत योगदान देणारे उद्योजक गितीका जयेश विकमशी आणि राजेंद्र भोसले यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.


मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत विविध साधनांचे वितरण बचत गट, एफपीओ व वैयक्तिक लाभार्थ्यांना करण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील कुलभवानी शेतकरी उत्पादक कंपनीला ड्रोन फवारणी यंत्र महाडीबीटीअंतर्गत ४० टक्के अनुदानावर देण्यात आले. त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कंपनीचे टी एस घुले यांना प्रदान करण्यात आले. ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, हार्वेस्टर आदी अनुदान तत्वावरील अनेक उपसाधने वितरित करण्यात आली.


शिबिरात विविध शासकीय विभागातर्फे 50 दालनांद्वारे शासकीय योजनांच्या माहितीचे प्रदर्शन करण्यात आले. मुद्रांक नोंदणी कक्षाचे उद्धाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


 


बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे लोकार्पण


बुलडाणा शहर पोलीस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर आदी उपस्थित होते. नव्या इमारतीमध्ये शहर पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासह, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरीता सुसज्ज कक्षांचे निर्माण करण्यात आले आहे. चार कोटी खर्चून ही

 इमारत बांधण्यात आली आहे.


000000


 


 


जालना आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी ; दोषींवर कारवाई करणार

 जालना आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी ; दोषींवर कारवाई करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषण

            बुलढाणा, दि. 3 : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालकांमार्फत करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.  


            जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा संदर्भ देऊन आज बुलढाणा येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कारवाईबाबत घोषणा केली.


            या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले असून अपर पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही, आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            सर्वसामान्य मराठा कुटुंबात जन्मलेला मी एक असून मराठा समाजाच्या वेदनांची मला पूर्ण जाण आहे. मराठा समाजाला टिकेल, असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर आपण स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


            जालना येथील आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सूरु असताना नक्की दगडफेक कुणी केली याचीही माहिती आता येत असून, मराठा आंदोलनाच्या अडून कुणी आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे, तेही लवकरच कळेल असेही त्यांनी सांगितले.


            मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर साडेतीन हजार मराठा तरुण हे नोकरीपासून वंचित राहिले होते. त्यांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य पदे भरण्याचा निर्णय घेतला, सर्वसामान्य मराठा तरुणांना न्याय देण्यासाठी जेव्हा सगळे नेते गप्प होते, तेव्हा न्यायालयाच्या अवमानाची परवा न करता आपण हा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा समाजाला आपल्या पाठीशी नक्की कोण आहे याची पूर्ण कल्पना आहे, असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.


            जालना येथे आंदोलन करणारे मनोज जरांडे पाटील यांच्याशी या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. यावेळी त्यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन केले होते. त्यांना अपेक्षित असलेला निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर अधिकारी प्रयत्नशील होते. मात्र त्यापूर्वीच ही घटना घडल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठा समाज हा अत्यंत संवेदनशील पण तितकाच संयमी समाज आहे. यापूर्वी लाखालाखांचे मोर्चे काढताना या समाजाने कधीही आपला संयम ढळू दिला नव्हता, त्यामुळे यापुढे देखील त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.  

बाली इंडोनेशिया के गहन जंगलों में अत्यंत सुरम्य शिवलिंग..

 *बाली इंडोनेशिया के गहन जंगलों में अत्यंत सुरम्य शिवलिंग...इतने सुन्दर प्राचीन शिवलिंग का इंडोनेशिया के घने जंगलों में होना अपने आप में कोई आश्चर्य नहीं है। सनातन धर्म सर्वत्र व्याप्त था और है। जब श्रृष्टि का निर्माण हुआ था तब केवल सनातन धर्म ही था।* 

                                                             *हर हर महादेव...*🔱

 🔱🙏🏻🚩🕉️🚩

*यत्र-तत्र सर्वत्र महादेव...*🔱🔱🙏🏻🙏🏻


जिजाऊ - शिवरायांनी बांधून घेतलेले धरण ! - ऐतिहासिक वारसा पाहायला येणार का?

 



जिजाऊ - शिवरायांनी बांधून घेतलेले धरण !

- ऐतिहासिक वारसा पाहायला येणार का?


शिवरायांच्या बालपणाचा काळ. जिजाऊ-शिवरायांचे शिवापूर परिसरात वास्तव्य होते. सिंहगडाच्या घेऱ्याचा भाग. त्या काळी तो चांगल्या पावसाचा प्रदेश होता. सिंहगडाच्या परिसरात उगम पावणारी शिवगंगा नदी तिथून वाहते. पण एक समस्या होती. पावसाळ्यात भरपूर पाऊस. शिवगंगा दुथडी भरून वाहायची, पण नंतरच्या काळात शेतीसाठी, बागांसाठी, लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसे. मग यावर उपाय काय?


तिथं धरण बांधलं तर पाणी वर्षभर मिळणार होतं. रांजे गावाजवळ कुसगावच्या हद्दीत हे धरण बांधायचे ठरले. अवतीभवती असलेल्या गावांच्या पाटलांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबतची कथा अशी सांगते- जिजाऊ-शिवरायांनी ही जबाबदारी सोपवल्यावर एक अडथळा होता. तो म्हणजे एक मोठी धोंड होती, ती फुटता फुटत नव्हती. कोंढव्याच्या कामठे पाटलांनी हे आव्हान पेलले आणि मोहीम फत्ते केली. तिथे धरणाचे बांधकाम केले. ते इतके पक्के आहे की, आज तब्बल पावणे चारशे वर्षांनंतरही हे धरण दिमाखात उभे आहे. त्याचा चिराही ढासळलेला दिसत नाही.


इतका मोलाचा वारसा असलेले हे धरण तुम्ही ते पाहिले आहे का?... ते पाहण्याची, समजून घेण्याची संधी "भवताल" तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. हे धरण आणि इतर ऐतिहासिक जलव्यवस्था पाहण्यासाठी शनिवार-रविवार, १६-१७ सप्टेंबर २०२३ या काळात दोन दिवसांची इकोटूर आयोजित करण्यात आली आहे. ज्यांना आपल्या वारशाबद्दल कुतूहल आहे, त्याच्यासाठी खास हे आयोजन आहे.

तुम्ही सहभागी होताय ना?


अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/Ecotour/Watersystems


संपर्कासाठी: 

9545350862 / 9922063621


मर्यादित जागा असल्याने नावनोंदणीसाठी फार वेळ दवडू नये, हे आवाहन.

- भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

95

45350862 / bhavatal@gmail.com

मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत

 मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे,

दोषींवर कठोर कारवाईचे निर्देशआंदोलकांच्या भावनांशी सहमत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठा आंदोलकांच्या भावनांशी सहमती व्यक्त

 

मुंबईदि. २ :- "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमारहवेतील गोळीबारबळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

            मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेकजाळपोळहिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेकजाळपोळहिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेकजाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्यालोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

            मी मराठा समाज बांधवांनामराठा संघटनांचे नेतेपदाधिकारीकार्यकर्ते यांना आवाहन करतो कीराज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्याबांधवांच्या जीवाला धोका होणार नाहीयाची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्यामहाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तत्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था कायम राहिलयासाठी आपण सर्वांनी सहकार्यप्रयत्न करुया...," अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्याहिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा आंदोलक नेत्यांनाकार्यकर्त्यांना केले आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे.

०००

दि. 2 सप्टेंबर २०२३


Saturday, 2 September 2023

Featured post

Lakshvedhi