सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 8 July 2023
काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं.....*
*काळा हरभरा खाल्ल्याने डायबिटिज खरेच नियंत्रणात येतो का? तज्ज्ञ सांगतात काय खरं काय खोटं.....*
मधुमेह किंवा डायबिटिज हा रोग धोकादायक मानला जातो. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, त्यामुळे पीडित व्यक्तीचे शरीर अशक्त, सुस्त होऊन वेगवेगळ्या रोगांचे घर बनते. भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, ज्यामुळे भारताला मधुमेहाची राजधानी म्हटली जाते.
मधुमेहग्रस्त रुग्णांना निरोगी आहार, यासह शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहण्याचा सल्ला दिला जातो. पण आहारात काय खावं काय टाळावं याची कवचितच माहिती रुग्णांना असते. डायबिटिस रुग्णांना नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. व साखरयुक्त पदार्थ खाण्यास टाळायला सांगतात. आपण आहारात काळा हरभऱ्याचा समावेश करून, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता.
यासंदर्भात, फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशियन शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, ''असे अनेक पदार्थ आहेत जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि त्यापैकी एक म्हणजे काळा हरभरा.'' डायबिटिज नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे सेवन कसे करावे?, काळा हरभरा डायबिटिजवर नियंत्रण कसे ठेवेल?, कोणत्या वेळेत हरभरा खावा?, याची माहिती त्यांनी दिली आहे.
*चण्याचे जीआय मूल्य आणि इतर पोषक घटक...*
चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ४३ आहे. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य अन्न आहे. फायबरयुक्त समृद्ध असल्याने, ते रक्तामध्ये हळूहळू पोषकद्रव्ये शोषून घेते. रक्तातील ग्लुकोजचे उत्सर्जन कमी करते. चणे देखील प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे.
*मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी चणे फायदेशीर...*
चण्यामध्ये १४ ग्राम फायबर असते. जे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राखते. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील फायबर दोन्ही असतात. मधुमेहव्यतिरिक्त, काळे हरभरे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. ज्यामुळे वजन कमी होते.
*मधुमेहग्रस्त रुग्णांनी चणे कसे खावे...?*
चणे अनेक प्रकारे खाल्ले जाते, याचा वापर इतर भाज्यांमध्ये देखील होतो. चणे उकळून, भिजवून, भाजी बनवता येते. यासह चाट आणि सॅलडमध्ये देखील होतो. ते खाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चाट बनवणे. टोमॅटो, कांदे, काकडी, धणे, लिंबू आणि हिरवी मिरचीचे छोटे तुकडे करून एक कप उकडलेल्या काळ्या हरभऱ्यात मिसळून खाऊ शकता.
*काळे चणे कधी खावे...?*
सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो. सकाळी पौष्टीक नाश्ता करावा. मधुमेह रुग्णांनी नाश्ता कधीही वगळू नये. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. काळा हरभरा खाण्याची उत्तम वेळ म्हणजे नाश्ता आहे.
*काळ्या हरभराचे इतर फायदे...*
अँटिऑक्सिडेंट समृद्ध काळा हरभरा हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, ज्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. काळ्या हरभऱ्यात लोह असल्यामुळे अॅनिमिया टाळता येते. काळ्या चण्यात फायबर अधिक प्रमाणावर आढळते. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. व वजन कमी होण्यास मदत होते.
*कुमार चोप्रा,*
*डॉ. सुनील इनामदार.*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
तणावमुक्त जगा.....*
*तणावमुक्त जगा.....*
सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस ताण तणावा खाली जगताना दिसून येत आहे. या ताणतणावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या आयुष्यातील घटना, काम, कामांचा दबाव, वैयक्तिक बाबी यामुळे मनावर सतत दाब येत असतो. ताण ही क्रियेची प्रतिक्रिया असली, तरी अनेकांच्या बाबतीत ताण ही कायमस्वरूपी समस्या बनू शकते.
भय म्हणून आपल्यासमोर आलेल्या कशाचाही सामना करण्यासाठीची यंत्रणा म्हणजे तणाव! आपल्या कर्तबगारीच्या किंवा मानसिक आरोग्याच्या सीमा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी काही प्रमाणात तणाव आवश्यकही असतो. तथापि अतिरिक्त ताणतणाव त्रासदायक ठरू शकतो.
तणावाची लक्षणे व्यक्तिगणिक भिन्न असतात व तणावाच्या प्रकारावर; तसेच व्यक्ती कोणत्या स्तरावर आहे, त्यावर अवलंबून असतात. खूप राग येणे, नैराश्य, पोटाचे विकार, स्नायूंच्या समस्या, खूप घाम येणे, हात-पाय गारठणे, आक्रमकता, नकारात्मकता, अधीरता, शत्रुत्वाची भावना, न संपणारी भीती, मायग्रेन, हिंसक वृत्ती अशी अनेक प्राथमिक ते गंभीर स्वरूपाची लक्षणे असू शकतात. आपले वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ताणतणाव आपल्यासमोर उभे राहणारच. त्यांना सामोरे जायला शिकले पाहिजे. व्यक्तिमत्त्वविकासात ताणतणावाचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे.
*ताणतणाव व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…*
*१.* कोणत्याही कामाची प्राथमिकता ओळखता यायला हवी. आजच्या युगात कोणतेही काम असेल, ते तुम्ही नीट व्यवस्थापन करून पूर्ण केले तर ते वेळेत तर पूर्ण होतेच आणि तुम्हाला त्या कामाच्या चिंतेपासून निर्माण होणाऱ्या तणावापासून दूर ठेवत.
*२.* एकसलग काम केल्याने शरीरावर व मनावर ताण येतो, त्यासाठी कामातून छोटा ब्रेक घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवावा. ताण जाणवत असल्यास थोडा वेळ आपल्या आवडीचे काम करावे. अर्थातच आपल्या आवडीच्या कामात आपण मनापासून रमून जातो आणि ताण कमी होण्यास मदत होते.
*३.* कामासाठी योग्य वेळ, कुटुंब, नातेसंबंध, योग्य विश्रांती, पुरेशी झोप याचा संतुलित जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्यात मदत करते.
*४.* वाचन, मनन, चिंतन... रुचिसंपन कार्यक्रमांचा आस्वाद घेणे, योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि बागकाम, संगीत, कला असे आवडीचे छंद जोपासणे यानेही तणाव कमी होण्यास मदत होते.
*५.* प्राप्त करण्यास योग्य अशा यथार्थवादी उद्दिष्टांची निश्चिती केल्यास सिद्धीची भावना येते व तणावदेखील कमी होतो.
*६.* गंभीर स्वरूपातील ताणतणावांसाठी औषधोपचार, गरज असल्यास समुपदेशन, वैकल्पिक उपचार, काही वेळाची सक्तीची विश्रांती, आधारगट यांची गरज असते.
एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवून आयुष्याचा प्रवास आखला, की ताणतणावांना उत्तमरित्या सामोरे जाण्याची ऊर्मी येते.
*मीनल ठिपसे,*
*सुनील इनामदार.*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
साथरोग परिस्थितीच्या प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज
मुंबई, दि. 6 : राज्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी - अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथ रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हिवताप तसेच विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वर, चंडीपुरा मेंदूज्वर, तर कोकणात लेप्टो स्पायरोसिस, शहरी भागात डेंग्यू अशा विविध आजारांच्य साथी पसरतात. विभागाने प्रत्येक जिल्ह्यात जोखीमग्रस्त गावांची निवड करून त्यांची यादी तयार केली आहे. जिल्हा व तालुकास्तरावर शीघ्र प्रतिसाद पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या शीघ्र प्रतिसाद पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या पथकांमध्ये राज्यात 4 हजार 180 वैद्यकीय अधिकारी व 19 हजार 171 कर्मचारी असणार आहेत. राज्यात 4 हजार 67 गावे जोखीमग्रस्त असून राज्यात सर्वात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात 411 गावे जोखीमग्रस्त आहेत. तर धुळे, मुंबई जिल्ह्यात एकही गाव जोखीमग्रस्त नाही.
प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांचे पंधरवडा सर्वेक्षण कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. दैनंदिन सर्वेक्षणासाठी करावयाच्या गृहभेटीच्या वेळी जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेण्यात येतो. जिल्ह्यातील आश्रमशाळा, वसतिगृह, वृद्धाश्रम अशा संस्थांना वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी नियमित भेटी देतात. जलजन्य आजारांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पाणी स्त्रोतांचे प्रभावी गुणवत्ता नियंत्रण करण्यात येत आहे. विरंजक चुर्णाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात 76 हजार 867 पाणी नमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये 3580 पाणी नमुने दूषित आढळले आहे.
दरवर्षी मान्सूनपूर्व सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचा सॅनिटरी सर्वे करण्यात येतो. त्यानुसार प्रत्येक गावाला हिरवे, पिवळे व लाल कार्ड दिले जाते. त्यानुसार राज्यात 27 हजार 853 गावांचा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये हिरवे कार्ड दिलेली गावे 24 हजार 139 असून पिवळे कार्ड दिलेली गावे 3 हजार 675 आणि लाल कार्ड दिलेली गाव 39 आहेत. साथरोग निदानासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, जोखमीच्या भागात कीटकनाशक फवारणी, अळीनाशकांचा वापर, डास उत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे तसेच वैयक्तिक संरक्षणासाठी मच्छरदाण्या, खिडक्यांना जाळ्या बसविणे व डास प्रतिरोधक क्रीम आदी एकात्मिक कीटक व्यवस्थापन कार्यक्रम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
--
व्हिटॅमीन डी ची कमी आहे
व्हिटॅमीन डी ची कमी आहे
मग हे उपाय करा. * हिवाळ्यात तुपाचे सेवन केल्याने व्हिटॅमिन Sीची कमतरता दूर होते. तुपात व्हिटॅमिन डी आढळते.
* सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केले जाऊ शकते.
एक चमचाभर पावडर करून ती कपभर। पाण्यात उकळून प्यावी. *सकाळी उठून शेवग्याच्या शेंगाचे (ड्रमस्टिक)
चे पाणी प्यावे किंवा सूप प्यावे.
* तुम्ही सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी देखील घेऊ शकता.
*काजूची पेस्ट बनवून तीच पाव कप या प्रमाणात आठवड्यात तीनदा सेवन करा.
* दह्याचे सेवन करावे. दह्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येते. *संत्र्याचा ज्यूस रोज घेतला तरीही व्हिटॅमीन डी वाढते
वैद्य गजानन
दात दुखी / दाढ दुखी वर काही उपाय,
दात दुखी / दाढ दुखी वर काही उपाय,
दातदुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूची झाडाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तुमची दातदुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यांमधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो
तुमच्या दातामध्ये दुखत असल्यास, त्या ठिकाणी कच्च्या कांद्याचा तुकडा ठेवावा. त्यामुळे पटकन दातदुखी बंद होते..##आंबटपदार्थखाल्ल्यानेहोणार्याकळाथांबतात..##दातदुखणेकमीहोते...
दातदुखीसाठी हिंगाचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये दोन चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर सैंधव घालून उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर या पाण्याने तुम्ही चूळ भरा. त्यामुळे लगेच दातदुखी बंद होईल
दाताला कीड लागली असेल आणि त्यामुळे तुमचे दात दुखत असतील तर दोन चिमूट सैंधवमध्ये तिळाचं तेल घालून ही पेस्ट कीड लागलेल्या दाताला लावा. असं केल्यास, तुमच्या कीड लागलेल्या दातातील वेग थांबतील
दातदुखीसाठी लसूनदेखील एक चांगला उपाय आहे. लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून ठेवावी. काही वेळातच दातामध्ये येणारे वेग कमी होतील
प्रत्येकाच्या घरात बटाटे तर असतातच. तुमच्या दातांमध्ये दुखत असल्यास आणि सूज आली असल्यास, बटाटा कापून त्याचे स्लाईस करून त्या भागावर साधारण 20 मिनिट्स ठेवा. लगेचच दुखणं बंद होईल
दातदुखीपासून सुटका होण्यासाठी तुम्ही टी - बॅगचादेखील वापर करू शकता. गरम पाण्यात टी बॅग्ज ठेवा आणि तुमच्या दातदुखीच्या ठिकाणी शेका. यामुळे दुःख कमी होईल
दातामध्ये खूप जास्त दुखत असेल तर 20 ते 25 मिनिटांपर्यंत बर्फ त्याच दातावर शेकवा, जिथे दुखत आहे. असं केल्यामुळे तुम्हाला लवकर सुटका मिळेल
लिंबामध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असतं. दात दुखत असलेल्या ठिकाणी लिंबाचा थेंब लावल्याने लगेचच तुमचं दुखणं थांबेल
दात दुखत असल्यास, ब्रँडीचादेखील उपयोग केला जातो. तुमच्या घरी ब्रँडी असल्यास, कापसावर थोडी घेऊन दुखणाऱ्या दातावर लावा. तुमचं दुःख दूर होईल
तुमचा जो दात दुखत आहे, त्यावर कापूर लावा. कीड लागल्याने दात दुखत असल्यास, त्या ठिकाणी कापूराचा चुरा भरा. दुखण्याबरोबर त्या कीड्यापासूनदेखील सुटका मिळेल
दातदुखीासाठी आलंदेखील खूपच लाभदायी आहे. आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर सैंधव घाला. ज्या दातामध्ये दुखत आहे, तिथे आल्याचा तुकडा दाबून धरा. या दरम्यान तोंडात जे पाणी येईल, ते न गिळता थुंकत राहा. त्यामुळे दातदुखी 5 ते 10 मिनिटांत बंद होईल
लवंग ठेचून त्यात लिंबाचा रस घाला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा दुखत असलेल्या दाताला लावा
दातदुखीपासून सुटका मिळण्यासाठी फिटकरी पावडर दुखत असलेल्या ठिकाणी लावा. असं केल्यामुळे तुम्हाला दातदुखीपासून मुक्ती मिळेल
दातदुखीची समस्या असल्यास, कडिलिंबाची तीन- चार पानं धुऊन घ्या. हे कडू असतं पण तरीही दातदुखीसाठी ही पानं चावा. यामुळे तुमचा त्रास बंद होईल
गुरूंच्या संपर्कात का राहावे !* 🌸🙏🏻
*गुरूंच्या संपर्कात का राहावे !* 🌸🙏🏻
एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..
वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.
गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.
थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, *तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ?* वाघ घुश्यात म्हणाला, मी तर या जंगलाचा राजा आहे; *माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे.*
गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही. वाघ गायीला म्हणाला की, *तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की.* तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून *शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.*
थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.
कथेतून बोध हाच की,
*गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.*
*वाघ हे आपले अहंकारी मन आहे.*
*मालक हे सदगुरू चे प्रतीक आहे*
*तर चिखल हा संसार आहे*
आणि *संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे.*
*कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही*
*परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही,*
*हाच अहंकार विनाशाचे बीज रोवतो*
🙏🙏
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...