Friday, 12 May 2023

छातीत जळजळ, सारखी ॲसि़डीटी होते? डॉक्टर सांगतात ३ सोपे उपाय, ॲसिडीटीपासून मिळेल सुटका.....*

 *छातीत जळजळ, सारखी ॲसि़डीटी होते? डॉक्टर सांगतात ३ सोपे उपाय, ॲसिडीटीपासून मिळेल सुटका.....*


ॲसिडीटी ही अनेकांना नियमितपणे सतावणारी समस्या आहे. ॲसिडीटीमुळे कधी डोके जड होणे, छातीत जळजळणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. कधी कधी ॲसिडीटी इतकी जास्त होते की डोकं ठणकतं आणि अस्वस्थ होऊन उलट्या होऊन ती बाहेर पडते. जागरण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव, अपचन, व्यायामाचा अभाव यांमुळे ॲसिडीटी होते. काही जणांची प्रकृतीच पित्ताची असते असे म्हटले जाते


ॲसिडीटी झाली की काहीच सुधरत नाही मग आपण जेलोसिल, पॅन डी यांसारखी औषधे घेतो. एखादवेळी अशी औषधे घेणे ठिक असते, मात्र सातत्याने अशी औषधे घेतल्यास आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होतात. अशावेळी ॲसिडीटी होऊ नये म्हणून घरच्या घरी काही उपाय केले तर? प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार काही सोपे उपाय सांगतात. सलग ३ महिने हे उपाय केल्यास ॲसिडीटी कमी होते, आणि आराम मिळण्यास मदत होते. मायग्रेन, पोटाचे त्रास, हार्मोन्सचे संतुलन. 


*पाहूयात घरच्या घरी करता येतील असे हे सोपे उपाय नेमके कसे करायचे...*


*१. धण्याचा चहा...*

१ ग्लास पाण्यात १ चमचा धणे घालायचे. यामध्ये ५ पुदीन्याची पाने आणि १५ कडीपत्त्याची पाने घालायची. हे सगळे मिश्रण ५ मिनीटे गॅसवर चांगले उकळायचे. त्यानंतर हे मिश्रण गाळायचे आणि सकाळी झोपेतून उठल्या, उठल्या चहा घेतो त्याप्रमाणे चहाऐवजी घ्यायचे. 


*२. बडीशोप...*

आपण हॉटेलमध्ये गेलो की आवर्जून जेवणानंतर बडीशोप खातो. पण घरात आपण ती खातोच असे नाही. पण प्रत्येक जेवणानंतर बडीशोप खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे अॅसिडीटी बऱ्याच प्रमाणात कमी होते. 


*३. रोज टी...*

१ कप पाणी घ्यायचे ते ३ मिनीटे चांगले उकळायचे आणि त्यात गुलाबाची वाळलेली पाने घालून पुन्हा काही वेळ उकळायचे. दररोज झोपण्याआधी अर्धा तास हे पाणी प्यायचे.  


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



रोटी बँक एक अतुलनीय उपक्रम

 


शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ

 शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ


            मुंबई, दि. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (दि.१३ मे) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.


            राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


महारोजगार मेळावा, मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन


            ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातील युवावर्गाला ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातून गरजू रुग्णांच्या विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.


            ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


००००

साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा

 *साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा.....?*


*फुफ्फुसातील संसर्ग रोखतो...*  

गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.


*पोटाच्या तक्रारींवर गुणकारी...* 

पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.


*आंबट ढेकरींपासून सुटका...* 

गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.


*सांधेदुखीतून सुटका...* सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.


*थकवा दूर होतो...*  

गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.


*रक्ताची कमतरता भरून निघते...* 

गूळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.


*रक्तदाब नियंत्रणात राहतो...* -गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.


*हाडं मजबूत होतात...* गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.


 *शरीर कार्यक्षम राहतं...* गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.


 *सर्दीवरही गुणकारी...* सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.


*डोळ्यांसाठीही लाभदायी...* 

गूळ खाल्ल्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासही मदत होते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज 101 तक्रारींचे निराकरण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज 101 तक्रारींचे निराकरण


             मुंबई, दि. 11 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड वॉर्ड येथे आज 1 हजार 355 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच 101 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारींचे देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.


                   यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


                   दिनांक 12 मे रोजी एन वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजता सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्याचे लवकरच आयोजन

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्याचे लवकरच आयोजन

- गिरीश महाजन.

            मुंबई दि. 11 : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            मंत्री श्री.महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यस्तरीय निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उप सचिव सुनिल हंजे, अशासकीय सदस्य नामदेव शिरगावकर, अर्चना जोशी, कविता राऊत उपस्थित होते.


            मंत्री श्री महाजन म्हणाले, राष्टकुल क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रक्कमेत दुप्पट ते चौपट वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम तातडीने पदक विजेत्या खेळाडूंच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.


            राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे या हेतूने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू ,दिव्यांग खेळाडू आणि साहसी कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार याच महिन्यात प्रदान करण्यात येणार असल्याचे श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.


0000

प्रधानमंत्री यांच्या हस्ते 5,800 कोटी रुपयांहून

 प्रधानमंत्री यांच्या हस्ते 5,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्याविविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश


            नवी दिल्ली, 11 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात महाराष्ट्रात असणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.


            येथील प्रगती मैदानामध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री श्री मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.


            ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा लिगो-इंडिया (LIGO-India), हिंगोली, टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबईचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महत्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.


            राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये मुंबई येथील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा तसेच नवी मुंबई येथील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा, रेडिओलॉजिकल रिसर्च युनिट, तसेच महिला आणि लहान मुलांच्या कर्करोग रुग्णालयाची इमारत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्री यांनी भारतामध्ये अलीकडच्या काळात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही जारी केले.


            माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1999 मध्ये भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या आणि मे 1998 मध्ये पोखरण चाचणी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या सन्मानार्थ ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस नवीन आणि वेगळ्या संकल्पनेसह साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना ‘स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’ अशी आहे.


पार्श्वभूमी


            महाराष्ट्रात हिंगोली येथे लिगो-इंडिया (LIGO-India) विकसित केले जाणार असून जगातील निवडक लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ते एक असेल. या परिसरातील 4 किमी लांबीची ‘भूजा’ असलेले अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर असून कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे यांसारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी समजून घेण्यास सक्षम असणार आहे. अमेरिकेत हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथील एक आणि लिव्हिंग्स्टन, लुईझियाना येथील एक अशा दोन वेधशाळांबरोबर लिगो-इंडिया ( LIGO-India) समन्वयाने कार्य करेल.


            नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरची नॅशनल हॅड्रॉन बीम उपचार सुविधा ही एक अत्याधुनिक सुविधा आहे. शरीरात मात्रेची व्याप्ती गाठीच्या आजूबाजूच्या निरोगी अवयवांपर्यंत कमीतकमी ठेवत गाठीवर अत्यंत अचूक रेडिएशनचे वितरण करण्याचे कार्य या सुविधेमुळे शक्य होते.लक्ष्यित ऊतींना मात्रेचे अचूक वितरण करत रेडिएशन उपचाराचे प्रारंभिक आणि दीर्घकालीन दुष्परिणाम कमी करते.


            भाभा अणु संशोधन केंद्राच्या ट्रॉम्बे परिसरात फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा आहे. मॉलिब्डेनम-99 हे टेक्नेटियम-99एम चे मूळ आहे. त्याचा उपयोग कर्करोग, हृदयरोग इत्यादी व्याधींचे निदान लवकर करण्यासाठी आवश्यक 85% पेक्षा जास्त इमेजिंग प्रक्रियेमध्ये होतो. या सुविधेमुळे प्रतिवर्षी सुमारे 9 ते 10 लाख रुग्णांचे परीक्षण शक्य होणे अपेक्षित आहे.


            कर्करोग रुग्णालयांचे आणि सुविधांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये कर्करोगावरील जागतिक दर्जाच्या सेवांचे विकेंद्रीकरण होईल आणि त्याची व्याप्ती वाढेल.

Featured post

Lakshvedhi