Wednesday, 10 May 2023

##.. हिंग... असा फोईटिडाया

 ...##.. हिंग... असा फोईटिडाया...


.... पेरूला फोईटिडाया वनस्पतिच्या मुळाचा रस काढून, सुकवून, त्यापासुन बनवलेला पदार्थ म्हणजे..#. हिंग#.. होय.  आपण दैंनदिन जीवनात याचा भरपुर वापर करतो.


... अतिशय उपयुक्त मसाला आहे..  तर बघू या याचे औषधिय फायदे....


......             ##निरामय ##आयुर्वेद..


१)  केळ्यात हिंग घालून किंवा गुळासोबत अथवा बाजरिसोबत हिंग खाल्यास उलटि,  ढेकर, उचकि लागणे बंद होते.

२)  दातात किड झाल्यास रात्रि झोपताना दातात हिंग भरून झोपावे. किड पडते.

३)  कान दुखत असल्यास तिळाच्या तेलात हिंग शिजवून त्याचे दोन थेंब दुखर्या कानात टाकल्यास कानदुखि थांबते.

४)  उलटि होत असल्यास हिंगाच पाणि,  पोटावर लावल्यास आराम पडतो.


                    ##निरामय ##आयुर्वेद..

५) पायात काटा गेल्यास चिमुटभर हिंग पाण्यात मिसळून त्या जागेवर लावाव. वेदना कमि होतिलच पण काटाहि वर येतो.

६) बद्धकोष्ठ  झाल्यास हिंगात थोड मिठ व चिमुटभर सोडा टाकुन रात्रि झोपण्यापूर्वि सेवन करावे. म्हणजे

 पोट साफ होते.

७)  पोटात क्रुमि, जंत झाल्यास हिंगाच्या पाण्याचा एनिमा दिल्यास जंत बाहेर पडतात.

८)  उघड्या जखमेवर  किडे झाल्यास त्यावर हिंगाच चूर्ण लावल्याने किडे मरतात.

९)  ज्यांना भूक लागत नाही त्यांनि जेवणापूर्वि तुपात घोळवलेलं.हिंग, आल्याचा तुकडा, लोण्याबरोबर खाल्यास भूक वाढते.

१०) मूळव्याधिवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम पडतो.

११) खाज- खुजलि यां सारख्या त्वचाविकारांवरहि हिंग अतिशय उपयुक्त असुन ते पाण्यात भिजवून दाह होणार्या 

 भागावर लावल्यास आराम पडतो.


                  ##निरामय ##आयुर्वेद..

१२)  पायाला, टाचेला भेगा पडल्या असतील तर कडुलिंबाच्या तेलात हिंग घालून ते तेल तिथे लावल्यास भरुन येतात.

१३)  सर्दि झाल्यास हिंगाच्या गोळिचा वास घेतल्यास नाकातलि सर्दि बाहेर पडते.

१४)  क् हिंग हे एक उत्तम पेनकीवर आहे.  दातदुखी, डोकेदुखि, पोटदूखी, मासिक पाळीच्या वेळी होणार्या वेदना,  या सर्वावर हिंगाचे पाणि व तिथे लेप लावल्यास बरे वाटते.

१५)  छातित जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठि हिंग व मध व आले एकत्रित करून घ्यावे. याने खोकला हि बरा होतो.

१६)  मधुमेहात हिंग घेतल्यास  रक्तशर्करा कमि होते.

  स्वादुपिंड कार्यशिल होतात.

१७)  हिंगात   * क्युमेरिन* नावाचे तत्व असते जे

 रक्ताला पातळ करते.  त्यामुळे गुठळ्या होत नाही

 व बँड कोलेस्ट्रोल वाढत नाही. ह्रूदयविकार होत नाही.

१८)  विषमज्वर, टायफाईड, मुदतिचा तापात हिंगाचे पाणि दिल्यास  हे लवकर बरे होतात.

   कारण हिंग अँटिबँक्टेरिअल आहे.


.. अश्या प्रकारे हिंग हा अतिशय फायदेशिर मसाला आहे..


                

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Tuesday, 9 May 2023

रेल्वे तिकीट जाणून घ्या आता फायदे

 👆🏻 मित्रांनो मुंबई मधे फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त वगवेगल्या ठिकाणी जात असताना आपल्याला प्रतेक स्टेशनवर टिकिट काढावी लागते...

या पर्यटक टिकिट चा वापर केल्यास Rs.80 मधे मुंबई मधून चालु असनाऱ्या कुठलाही लोकल ट्रेन मधे दिवसभर कितीही वेळा कुठेही प्रवास करू शकता ( हे टिकीट असता ना रिटन टिकीट काढायची गरज नाही)

 हे टिकिट रोहा, वसई ट्रेन मध्ये आणि सर्व मुंबई लोकल ट्रेन मधे दिवसभर वापरू शकतो...

 या टिकीट बद्दल माहिती नसल्याने या टिकीट चा फायदा घेता येत नाही म्हणून मित्रांनो माहिती पुढे शेअर कारा जेणेकरून या पर्यटन टिकीट चा फायदा घेता येईल...


.🙏

लोकराज्य’चा कृषी विशेषांक प्रकाशित

 लोकराज्य’चा कृषी विशेषांक प्रकाशित



            मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' मासिकाच्या एप्रिल-मे 2023 च्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.


          या विशेषांकामध्ये कृषी, फलोत्पादन, पशुसंर्वधन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सहकार व पणन, मृद व जलसंधारण आदी विभागाच्यावतीने राज्यात राबविण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशकथांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. याच बरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विशेष लेख तसेच महत्त्वाच्या घडामोडी, ‘मंत्रिमंडळात ठरले’ या सदरांचाही समावेश या अंकात आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर हा अंक वाचकांसाठी उपलब्ध आहे.

युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट.

 युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट.


"महाराष्ट्र, पंजाब यांचे देशासाठी योगदान फार मोठे"


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 9 : पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांमधील अंतर दीड हजार किलोमीटर पेक्षा अधिक असले तरी दोन्ही राज्ये अध्यात्मिक व सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे भगिनी राज्ये असून स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतर राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये दोन्ही राज्यांचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित 'युवा संगम' उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र भेटीवर आलेल्या पंजाबमधील ४५ युवक -युवतींनी मंगळवारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.


            संत नामदेव महाराष्ट्रातून पंजाबला गेले व भक्तिमार्गाचा पुरस्कार केला तर शिखांचे दहावे गुरु गोबिंद सिंग यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे वास्तव्य केले. हुतात्मा भगतसिंह यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांनी साथ दिली.


            आज महाराष्ट्र व पंजाब या दोन्ही राज्यांमधील सर्वाधिक युवक सैन्यदलामध्ये भरती होतात. महाराष्ट्राच्या विकासात देखील राज्यातील पंजाबी बांधव मोठे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले. युवकांनी खूप शिकावे, नवनवी कौशल्ये आत्मसात करावी, व्यसनांपासून दूर रहावे व आपण निवडलेल्या क्षेत्रातून देशसेवा करावी असे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.


            आयआयटी मुंबईने एनआयटी जालंधर या संस्थेला शैक्षणिक सहकार्य करावे तसेच दोन्ही संस्थांनी शिक्षक व विद्यार्थी आदान प्रदान करावे अशीही सूचना राज्यपालांनी केली.


मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मुलांनी देश पाहावा


            पूर्वी लोक सुटीच्या दिवशी मित्रांकडे, नातलगांकडे जात. त्यामुळे संवाद होत असे. आज मोबाईल - लॅपटॉपच्या युगात माणसे कुटुंबापासून दुरावत आहेत. युवकांनी देशातील विविध प्रदेशांना भेटी दिल्यास त्यातून संवाद वाढेल व खूप काही शिकायला मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.


पुरण पोळी, श्रीखंड पहिल्यांदा खाल्ले


            महाराष्ट्रात पहिल्यांदा येऊन खूप आनंद झाला व येथून परत जाऊच नये असे वाटते. मात्र येथे उकाडा फार जास्त आहे, असे पंजाब मधून आलेल्या एका युवतीने सांगितले. महाराष्ट्रातील पुरणपोळी, श्रीखंड व शिरा खूप आवडल्याचे एका युवकाने सांगितले तर येथील जनजीवन खूप धावते असल्याचे मत एका युवतीने नोंदवले.


            राज्यपालांशी झालेल्या चर्चेनंतर युवकांनी राजभवनाला भेट दिली. यावेळी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रो. टी.जी सीताराम, आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. सुभासिस चौधरी, 'युवा संगम'चे निमंत्रक प्रो. मंजेश हनावल, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार सुरेंद्र नाईक, आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार गणेश भोरकड़े, पंजाब येथून आलेले शिक्षक समन्वयक, आयआयटीच्या जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी बॅनर्जी नाहा आदी उपस्थित होते.


            'युवा संगम' उपक्रमांतर्गत पंजाबमधील युवकांना महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, विकास व औद्योगिक प्रगती यांची झलक दाखवली जाणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील ३५ व दादरा नगर हवेली दमण - दिऊ येथील १० युवक देखील पंजाबला भेट देत आहेत. महाराष्ट्राला भेट देत असलेल्या पंजाब मधील युवकांचे पालकत्व आयआयटी मुंबई करीत आहे.

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीतराज्यातील प्रकल्पांबाबत बैठक

 केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीतराज्यातील प्रकल्पांबाबत बैठक


राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून


प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश


 


            मुंबई, दि. 9 : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि नवीन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, वाढते शहरीकरण त्याचबरोबर वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपूलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता आहे.


            जे प्रकल्प जमीन संपादन अभावी रखडलेले आहेत, त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत जमीन संपादन करावी. या कामी वेळ जात असल्याने प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होते त्यामुळे लवकरात लवकर जमीन संपादन करून प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करावे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


            १५ वर्षापूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावी, यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्याची सूचना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी केली. मोठ्या आणि विकसित जिल्ह्यांमध्ये ४ आणि लहान अविकसित जिल्ह्यांत दोन अशी किमान १५० ते २०० युनिट सुरू करण्याची सूचना श्री. गडकरी यांनी यावेळी केली. यामुळे किमान १० ते १५ हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करण्यात यावी, असे श्री. गडकरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई विभागात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे ९ प्रकल्पांच्या ४३५ कि.मी. लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ६२१ कि.मी. लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, १७८ कि.मी. लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या ५ एलिव्हेटेड कॉरिडोअर्सचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेच्या कामांमध्ये ब्लॅकस्पॉट दूर करणे, उड्डाणपूल, सर्वीस रस्ते, पादचारी पूल यांची ६८ ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत.


            यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात कि.मी.च्या जमीन संपादनाविषयी देखील चर्चा झाली.


०००००

श्री हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट,महाड


 








हाता-पायाच्या तळव्यावरखो (कोकोनट) तेल लावा आणि अनेक रोगांपासून मुक्त व्हा*

 *हाता-पायाच्या तळव्यावरखो (कोकोनट) तेल लावा आणि अनेक रोगांपासून मुक्त व्हा*


१. एका सौ.शेट्टी या महिलेने लिहिले की, माझ्या आजोबांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, त्याना पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही ना दात दुःखी नाही. 

माझे आजोबा सांगायचे,ते मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याचा सल्ला दिला होता. आणि हाच तेंव्हापासून आजोबांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत होता. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.


२. मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की, लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हापासून तो हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याची ही प्रक्रिया सुरू ठेवली, तेव्हा १ महिन्यानंतर माझ्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे नियमित झाला. 


३. उडुपी येथील एक व्यापारी गृहस्थ श्री. कामथ सुट्टीसाठी केरळला गेले असता, तिथल्या हॉटेलमध्ये ते झोपू शकले नाही. म्हणून बाहेर चालू लागले. तेव्हा रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकऱ्याने विचारले, "काय झाले आहे, असे का भटकता?" 

ते म्हणाले "मला झोप येत नाही!"  

तो हसला आणि म्हणाला, "तुमचा कडे नारळ तेल आहे का?"  

मी म्हणालो "हो". 

तो म्हणाला, "मग त्याने आपल्या हाता-पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा, शांत झोप येईल." 

आता श्री कामथ स्वस्थ आणि सामान्य आहेत.


४. रात्री झोपण्यापूर्वी हाता-पायाना नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .


५. पोटाचा त्रास- हाता-पायाच्या तळांवर नारळाच्या तेलाने मालिश केल्यानंतर पोटाचा त्रास 2 दिवसात बरे होते.


६. लहान मुलांच्या पायाच्या तळव्यांवर नारळ तेलाने मालिश देखील केल्यास, त्यांना खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.


७. पाय दुखणे/मुंग्या येणे- रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांची मालिश करण्यास सुरवात करावे. या प्रक्रियेमुळे पायांच्या दुखण्यापासून व मुंग्या येणे यापासून बराच आराम मिळातो.


८. पाय नेहमी सुजलेले आणि चालत असताना थकवा येत असेल, तर, रात्री झोपायला जाण्यापूर्वी पायांच्या तळांवर नारळ तेलाने मालिशची ही प्रक्रिया सुरू करावी. फक्त दोन दिवसातच, पायांची सूज अदृश्य होते.


९. पायाला जळजळ होत असल्यास आपल्या हाता-पायाचा तळव्यांवर नारळाचे तेल लावायला सुरुवात करा. आठव्या दिवसापासून वेदना कमी होतील आणि परत जळजळ कधीच होणार नाही.


१०. थायरॉईड रोगाने पाय सर्व वेळ दुखत असल्यास झोपायच्या आधी पायाच्या तळांवर नारळ तेलाची मालिश करा आणि स्वस्थ व्हा.


११. पायाला फोड असल्यास रात्री झोपायच्या आधी चार दिवस नारळ तेलाने पायातील तळांची मालिश करावे. बराच मोठा फरक दिसेल.


१२. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने झोपेत घोरणे प्रतिबंधित करते.


१३. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने गुडघ्यात वेदना कमी होतात.  


१४. रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेलाची हाता-पायाचा तळव्यावरील मालिश या पद्धतीने पाठीचा, मणक्याचा त्रास कमी होतो.


दक्षिण भारतीय रहस्य खालीलप्रमाणे आहेः


एकमात्र रहस्य आणि प्रत्येकासाठी खूप सोपे, आहे.

झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.


प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.

ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात. याला - *फूट रिफ्लेक्सोलॉजी*

असं म्हणतात. ही फुट मालिश थेरपी संपूर्ण जगभरात वापरली जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*

Featured post

Lakshvedhi