Tuesday, 9 May 2023

भवतालचा मार्च एप्रिल चा अंक प्रसिद्ध !

 भवतालचा मार्च एप्रिल चा अंक प्रसिद्ध !


नमस्कार.


भवताल मासिकाचा एप्रिल महिन्याचा अंक प्रसिद्ध झाला आहे. तो सोबत शेअर करत 


आहोत. अंकात पुढील लेखांचा समावेश आहे.


 


• मान्सूनचा पाऊस कसा बरसणार?


• "गंगा" जी आणि डॉल्फिनचा दोस्त


• पर्यावरणामध्ये "केल्प" चे योगदान


• पिवळ्या मुंग्यांमधील चमत्कार


• आणि बरेच काही...


 


आपण अंकासाठी नावनोंदणी केल्यामुळे आपणाला हा अंक देत आहोतच. जोडीला 


अंकाचे कव्हर आणि नावनोंदणीची लिंक देत आहोत. ती आपल्या संपर्कात पोहोचवून 


लोकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.


 


तसेच, आपणही वर्गणीसह अंकाची नावनोंदणी करून ‘भवताल’ च्या कार्याला पाठबळ 


द्यावे, ही विनंती.


 


नावनोंदणीसाठी लिंक:


https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and s

ustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

शिवकाळात चुन्याचा घाणा कसा कार्यरत असायचा याची माहीती सर्वांना व्हावी

 रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने नाना दरवाजाची पुर्नबाधंणी करत असताना, रायगडवाडी येथे पारंपरिक चुन्याच्या घाण्याचे चाक मिळाले.

यावरून शिवकाळात चुन्याचा घाणा कसा कार्यरत असायचा याची माहीती सर्वांना व्हावी यासाठी हा पारंपारीक चुण्याचा घाणा पुन्हा कार्यान्वीत करण्यात आला.

याच घाण्यात तयार झालेला चुणा सध्या नाना दरवाजाच्या पुर्नबाधंणीसाठी वापरण्यात येत आहे🙏🙏🙏🙏🚩🚩🚩


🚩

व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*

    व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फाईन 

सकाळी दिवस सुरू झाला की ओट्यापाशी नाश्ता, स्वयंपाक सगळ्यांचे डबे भरणे, मुलांचे आवरणे, साफसफाईची कामे आणि ऑफीसला जाण्याची घाई. पुन्हा ऑफीस सुटलं की घरी पोहचून स्वयंपाक करायचा असल्याने घरी पोहोचण्याची घाई. या सगळ्या धावपळीत महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होतोच असे नाही. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता आपण अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्याला नीट बसून खायलाही वेळ होत नाही. त्यामुळे व्यायामाला तर वेळ मिळेल याची शक्यताच नसते. घरातली कामे म्हणजे व्यायाम नाही. त्यातही दिवसभर बैठे काम असेल तर शरीराची फारशी हालचाल होत नाही. यामुळे कालांतराने पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा, सांधेदुखीच्या तक्रारी उद्भवायला लागतात.


आजकाल कमी वयातच या सगळ्या तक्रारी उद्भवत असल्याने आपण आपल्या हातानेच आरोग्याची हेळसांड करत असल्याचे दिसते. शरीराचे कार्य सुरळीत चालायचे तर शरीराला थोडा तरी व्यायाम हवाच. यासाठी रोजच्या दिनक्रमात सहज करता येतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया


*१. सूर्यनमस्कार...*

आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो, आंघोळ करतो. त्याचप्रमाणे १२ सूर्यनमस्कार घालण्याची शरीराला सवय लावली तर संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. १२ सूर्यनमस्कार घालायला मोजून १२ ते १५ मिनीटे लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर इतर गोष्टींप्रमाणेच आपण स्वत:साठी हा वेळ आवर्जून काढायला हवा. यामुळे आपल्याला नक्कीच दिवसभर फ्रेश वाटेल.


*२. जीने चढ-उतार...*

आपण वरच्या मजल्यावर राहत असू तर लिफ्टचा वापर न करता आवर्जून जिन्यांचा वापर करायला हवा. ऑफीसमध्येही लिफ्टच्या ऐवजी जिन्यानेच चढ-उतार करायला हवी. यामुळे किमान व्यायाम होतो. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा जीने चढ-उतार केल्यास आपला एन्ड्युरन्स चांगला राहण्यास मदत होते आणि स्टॅमिनाही वाढतो. 


*३. शतपावली...*

दिवसभराचे काम करुन आपण आधीच थकलेले असतो. त्यातही संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक आणि मागची आवराआवरी, दुसऱ्या दिवशीची तयारी हे करता करता आपण पार थकून जातो. त्यामुळे जेवण झाल्यावर कधी एकदा आपण आडवे होतो असे आपल्याला होऊन जाते. अशावेळी कंटाळा घालवण्यासाठी आपण टिव्ही पाहणे किंवा एकमेकांशी गप्पा मारणे हे आवर्जून करतो. त्या वेळात आपण घराच्या आजुबाजूला १५ मिनीटे शतपावली केल्यास दिवसभराचा ताण तर निघून जातोच पण अन्न पचण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. शरीराची हालचाल झाल्याने झोपही गाढ लागण्यास मदत होते. 


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


                                                                            ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे या उपक्रमातूनइंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहचेल


- कान्हुराज बगाटे


            मुंबई, दि. 8 : ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे नियंत्रक (शिधावाटप) व संचालक (नागरी पुरवठा) कान्हुराज बगाटे यांनी व्यक्त केले.


           यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३) समारोप कार्यक्रमात श्री. बगाटे बोलत होते.


           यावेळी बीपीसीएल चे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. (गेल) चे व्यवस्थापक शंतनू बासू, कार्यकारी संचालक अनिलकुमार पी, इंडीयन ऑइलचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित धक्रास, राजीव श्रेष्टा, एचपीसीएल चे व्यवस्थापक अकेला वि. एन. एस. के. लक्ष्मणराव, ऑलिम्पिक प्रशिक्षक तुषार खांडेकर, तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष निवेंदकर, अतिरिक्त संचालक नंदन गजभिये यावेळी उपस्थित होते.


         श्री. बगाटे म्हणाले, आज भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येबरोबरच सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देखील देश आहे.वाढत्या ऊर्जा वापराबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढत आहे. कार्बनचे वातावरणातील वाढते प्रमाण हे पृथ्वीवरील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. नैसर्गिक इंधन वापरताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे असेही श्री.बगाटे म्हणाले.


            ऑलिम्पिक प्रशिक्षक श्री. खांडेकर म्हणाले, सक्षम महोत्सव या शब्दाचा अर्थ नव्या पिढीला समजत आहे हीच मोठी गोष्ट आहे. भारताला विकासात पुढे नेण्यासाठी शाश्वत विकासासाठी इंधन बचतीची गरज आहे आणि शालेय मुलांपासून याची सुरूवात झालेली ही गोष्ट निश्च‍ितच आनंदाची आहे असेही श्री.खांडेकर म्हणाले.


        या कार्यक्रमात इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध नाटिकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध वादविवाद इतर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. निवदेन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले. अतिरिक्त संचालक दीपक वाघ यांनी आभार मानले. यावेळी सक्षम २०२३ मध्ये १००० पेक्षा जास्त विविध उपक्रमांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली.


*****

मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर

 मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर

- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 2023 चा अंतिम मसूदा आज भाषा सल्लागार समितीने शासनास सादर केला आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी हा अहवाल सादर केला.


          मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षणात, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने हा मसुदा तयार केला असून हे धोरण शासनातर्फे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 


            मराठी भाषा धोरणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून मराठी भाषा अधिक लोकाभिमुख, रोजगाराभिमुख व्हावी यासाठी समितीने सूचना केल्या असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे.


            महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली. या समितीला इतर अनेक महत्वाच्या कामांसोबत महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील '25 वर्षांचे मराठी भाषा धोरण ठरवणे' हे काम अग्रक्रमाने करण्याचे निदेश दिले आहेत. हे धोरण सर्वंकष स्वरुपाचे व सर्व स्तरांवरील लोकव्यवहार, ज्ञान-अर्थ-प्रशासन आणि संवाद - संपर्क आणि अभिसरणासाठी उपयुक्त असेल असा विश्वास समितीने धोरणाच्या प्रास्ताविकेत व्यक्त केला आहे.


***

स्वयंपुनर्विकासासाठीसहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य

 स्वयंपुनर्विकासासाठीसहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकाससंदर्भात बैठक


 


            मुंबई, दि. 8 :- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी तसेच या व्यवहारांसाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक व्यवस्था उभारावी, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार्याची भूमिका ठेवून यासंदर्भातील सर्व कामे कालबद्ध पद्धतीने करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास- पुनर्विकास यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय एस चहल, 'म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने द्यावयाच्या सवलतीबाबत शासन निर्णय 2019 मध्ये जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर या विषयाला चालना देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी तसेच या सर्व व्यवहारांसाठी 'इज ऑफ डुईंग' अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रस्तावांना तीन महिन्यांत परवानगी देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'एक खिडकी' योजना चालू करावी. स्वयंपुनर्विकासाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांसाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य सहकारी बँकेसह पात्र अन्य सहकारी बँकांनाही अनुमतीचा प्रस्ताव द्यावा. गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेयन्स प्रमाणपत्र देणे, नोंदणी करणे, मालमत्ता पत्रकात नोंद करणे, स्टॅम्प अॅडज्युडीकेशन देण्याची प्रक्रिया गतिमान आणि कालबध्द करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.


मानीव अभिहस्तांतरणाला गती देण्यासाठी अभय योजना


            मानीव अभिहस्तांतरणाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा एक वर्षाच्या कालावधीकरिता महसूल विभागाने अभय योजना (amnistey scheme) लागू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच मानीव अभिहस्तांरणामध्ये व्यवसायातील सुलभता (ईज ऑफ डुईंग बिझनेस - ease of doing business) चा वापर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.


            'महारेरा' कायदापूर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना सरसकट मानीव अभिहस्तांतरण देण्याबाबत तपासणी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास - पुनर्विकास यासंदर्भात


            स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी, या प्रकल्पांची वाटचाल सुरळीत होण्यासाठी गृहनिर्माण विभागामार्फत जारी शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, स्वयंपुनर्विकासासाठी जुनी इमारत संदर्भातील अट बदलावी, स्वयंपुनर्विकासासाठी 'एफएसआय'मध्ये बदल करावा, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना पतपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी, मुंबईत स्वतंत्र, सुसज्ज सहकार भवन मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,या

 सरकार आपल्या दारी उपक्रमात माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे126 तक्रारींचे जलद निराकरण.

               मुंबई, दि. 8 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १४९८ तक्रारी आज दाखल झाल्या असून महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज १२६ तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या आहेत.


       मुंबई महापालिकेच्या माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे महिला व बालविकास विभाग आणि मुंबई महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम झाला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती होती. महिला व बचत गटांना नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


              उद्या दिनांक ९ मे रोजी फोर्ट येथील ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) हा उपक्रम होणार आहे. महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम 31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


****



Featured post

Lakshvedhi