Thursday, 2 February 2023

10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या

 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या


- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील - दानवे


            नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्रमध्ये असणाऱ्या ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. यासह राज्यात सध्या 8 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू असून येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील - दानवे यांनी आज येथे दिली.


            केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी श्री. पाटील - दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. पाटील - दानवे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वांसाठी आहे. मध्यम वर्गीयांना न्याय देणारा, हा अर्थसंकल्प दूरदृष्टी ठेवून मांडलेला आहे.


            रेल्वेला वर्ष 2014 पासून भरीव आर्थिक तरतूद केली जाते. महाराष्ट्राला 16 हजार कोटी रूपये मागील अर्थसंकल्पात देण्यात आले होते. त्यातून राज्यातील रेल्वे प्रकल्पाची बरीच प्रलंबित कामे झालेली आहेत.


            भारतात येत्या काळात एकूण 400 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया धावतील. यातील सध्या 8 वंदे भारत रेल्वेगाड्या राज्यात आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू होणार असल्याची, माहिती श्री. पाटील - दानवे यांनी यावेळी सांगितले. या वंदे भारत रेल्वेगाड्या सोलापूर ते मुंबई पहिली आणि दूसरी मुंबई ते शिर्डी अशा असणार आहेत.


वंदे भारत एक्सप्रेस


            वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट आणि अधिक गतीचा अनुभव देते. ही रेल्वेगाडी प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यात रेल्वे गाड्यांची धडक टाळण्यासाठीची स्वदेशी विकसित ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम - कवच समाविष्ट आहे. वंदे भारत 2.0 अधिक अत्याधुनिकतेने सुसज्ज आहे आणि ही गाडी केवळ 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकतो आणि या रेल्वेगाडीचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत पोहोचतो, ही या रेल्वेगाडीची सुधारित वैशिष्ट्ये आहेत. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 392 टन आहे, जे आधी 430 टन होते. यात वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधाही उपलब्ध आहे . या रेल्वेगाडीच्या मागील आवृत्‍तीत असलेल्या 24 इंच रुंदीच्या स्‍क्रीनच्‍या तुलनेत प्रत्‍येक डब्यामध्ये 32 इंच रुंदीचे स्‍क्रीन आहेत ज्याद्वारे प्रवाशांना माहिती आणि मनोरंजन उपलब्ध होते. या गाडीतील वातानुकूलन 15 टक्के अधिक ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस पर्यावरणस्नेही देखील ठरत आहे ट्रॅक्शन मोटरच्या माध्यमातून धूळ-मुक्त स्वच्छ हवा वातानुकूलनासह, या रेल्वेगाडीतील प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. आरामदायी आसनांची म्हणजेच साइड रिक्लायनर सीटची सुविधा जी पूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील प्रवाशांना दिली जात होती ती आता सर्व श्रेणीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये 180-अंशात फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी असलेल्या रूफ-माउंटेड पॅकेज युनिटमध्ये (आरएमपीयु) फोटो-कॅटॅलीस्ट अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित करण्यात आली आहे. चंदीगढच्या केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार, ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारे जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादींपासून मुक्त हवा गाळून स्वच्छ करण्यासाठी डिझाईन केलेली प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही टोकांवर स्थापित करण्यात आली आहे.


00000

मुख्यमंत्री शिष्यवृत्ती निधी १८ लाखांवरुन १ कोटी रुपये

 मुख्यमंत्री शिष्यवृत्ती निधी १८ लाखांवरुन १ कोटी रुपये

महाराष्ट्र एनसीसी पथकाचे यश गौरवास्पद


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने केलेली कामगिरी दिमाखदार आणि गौरवास्पद असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिष्यवृत्ती निधी १८ लाख रुपयांवरुन १ कोटी रुपये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


            सह्याद्री अतिथीगृहात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून दिल्ली येथे संचलनात सहभागी झालेल्या १२५ एनसीसी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कर्नल निलेश पाथरकर, ब्रिगेडिअर लाहेरी, राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी, प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर सुपूर्द करण्यात आला, तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.


            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, एनसीसीच्या पथकाने नवी दिल्ली येथील संचलनात उत्कृष्ट कामगिरी करून प्रधानमंत्री ध्वज मिळवून महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राचा प्रत्येक युवक हे यश पाहून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी होईल.


            महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य आहे आणि प्रगत राहील. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, कुशल प्रशासक अशा राजाचा वारसा लाभला आहे. राज्याच्या या युवकांनी कठोर परिश्रम करुन यश प्राप्त केलेले आहे. त्याना उत्कृष्ट प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करणारे अधिकारी लाभले असल्याने हे यश सुकर झाले. भविष्यात यापुढेही असेच यश मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.शिंदे यांनी एनसीसी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.


             एनसीसीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील. भविष्यात ही अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी व्यास यांनी केले, तर आभार मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी मानले

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करावा

 पणन विभागातील कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 1 : राज्यातील बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेतयादृष्टीने सर्व बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा आणि त्यामाध्यमातून दर्जेदार सोयी-सुविधांची निर्मिती करावीअसे निर्देश मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

            सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पणन विभागाचा आढावा घेण्यात आला. सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्य वखार महामंडळपणन महासंघकृषी राज्य पणन मंडळग्राहक महासंघकापूस उत्पादक पणन महासंघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            काळाची गरज लक्षात घेता बाजार समित्यांचा पुनर्विकास करून तिथे येणारे शेतकरीकष्टकरीकामगार यांच्यासाठी सोयी-सुविधा तयार करण्यात याव्यात.  पाणीस्वच्छताअंतर्गत रस्ते आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या.

            पणन महासंघाच्या माध्यमातून शेतमालाला उत्तम भाव देण्यासोबतच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीला चालना द्यावी तसेच शेतीपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याला प्राधान्य द्यावेअसे निर्देश देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            समृद्धी महामार्गालगत उभारण्यात आलेल्या ॲग्रो लॉजिस्टिक पार्कचा विस्तार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी  वखार महामंडळपणन महासंघकृषी राज्य पणन मंडळग्राहक महासंघकापूस उत्पादक पणन महासंघाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. 

००००

अनुभव ची सत्यता

 *कुणी आपल्याला त्याचा अनुभव सांगितला की आपल्यालाही वाटतं की, मला पण तो अनुभव यावा. कुणी म्हटलं की हे स्तोत्र खूप प्रभावी आहे, हा मंत्र खूप भारी आहे, की लागले मागे त्या मंत्राच्या... अनुभव ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट असते, त्याला आला तसाच आपल्याला कसा येईल बरं?? प्रत्येकाचं प्रारब्ध, पापपुण्य, संचित, भाव हा वेगवेगळा असणार की नाही?* 


*तुमची जिथं श्रद्धा, प्रेम आहे ना त्याच शक्तीचा तुम्हाला अनुभव येईल नेहमी. असं कोण न कोण तुम्हाला भेटत राहीलच आणि त्यांचे अनुभवही सांगत राहतीलच, त्यानं एवढं हुरळून जाऊ नये*


*अनुभव हा श्रद्धेतून जन्म घेत असतो. आपण जी उपासना करतोय, त्यावरच आपली श्रद्धा नाही, त्यामुळेच अनुभव येत नाही... विचित्र मानसशास्त्र आहे.*


*काही दिवस रामरक्षा म्हणायची, कुणी अजून काही म्हटलं की शाबरी कवच म्हणायचे. कुणी अजून काही... आयुष्य संपून जाईल, पण काहीच मिळणार नाही. जर १०० फुटांवर पाणी लागणार असेल तर एकाच ठिकाणी १०० फूट खणाल का १ फुटाचे १०० खड्डे खणाल??*


*तुलना करायची घाणेरडी सवय असते प्रत्येकाला. प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य असतंच की नाही?? गुलाबाचं फुल डोक्यात घालतात, झेंडूच्या माळा करतात, मोगऱ्याचा गजरा करतात. झेंडूचा गजरा करायचा प्रयत्न नका करू. प्रत्येक उपासना आपल्या जागी श्रेष्ठ आहे, पण आपल्या विचारानेच त्याला आपण कमीपणा आणतो. मन हे फार बेइमान असतं बरं. आपलं काम झालं नाही की देवच बदलायचा, हे कुठलं गणित? शेवटी सगळ्या नद्या समुद्रालाच जाऊन मिळतात ना??*


*एकदा समर्थ श्रीरामदास स्वामींकडून ज्याने गुरुमंत्र घेतला होता, असा माणूस श्री तुकाराम महाराजांकडे आला आणि म्हणाला की, "मला गुरुमंत्र द्यावा." तुकाराम महाराजांनी आपल्या अंतर्ज्ञानाने सगळं जाणलं आणि म्हणाले की, "ठीक आहे, पण तू तुझ्या गुरूंना मंत्र परत देऊन ये, मग मी देतो." मग आला हा समर्थांकडे आणि म्हणाला की, "मला तुमचा गुरुमंत्र परत करायचा आहे, याच्यात ताकद नाही." समर्थ हसले आणि म्हणाले की, "ठीक आहे. जा आणि चूळ भरून टाक त्या दगडावर." त्यानं तसं करताच त्या दगडावर सुवर्ण अक्षरात गुरुमंत्राची अक्षरे उमटली. मग त्याला पश्चात्ताप झाला आणि त्याने समर्थांची माफी मागितली.*


*चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल, तितकाच उशीर होत जाईल, हे विचित्र सत्य आहे. फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते. जितकं मन फळासाठी आतुर, तितकंच ते श्रद्धाहीन असतं.*


*🌺श्री स्वामी समर्थ🌺*

बांधा आंब्याची पाने चे तोरण,करेल आरोग्याचे रक्षण

 आंब्याची पाने कापल्यानंतर किमान दोन दिवस ऑक्सिजन सोडत राहतात. म्हणूनच ते सर्व सण आणि कार्ये मध्ये वापरले जातात विशेषत: जेव्हा आसपास बरेच लोक असतात तेव्हा हवा ताजी ठेवण्यासाठी. आपली संस्कृती आंब्याची पाने आपल्या दारात बांधण्यास का प्रोत्साहन देते. या व्हिडिओमध्ये प्रयोगशाळेत आंब्याचे पान कापून सूक्ष्मदर्शकाखाली ठेवले आहे. पानांमधून बाहेर पडणारे बुडबुडे ऑक्सिजन असतात. आपल्या ऋषीमुनींना हे हजारो वर्षांपूर्वी माहीत होते आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचा एक भाग बनवला.


आपल्या बऱ्याच सांस्कृतिक पद्धतींचा वैज्ञानिक अर्थ होता ज्याची आपल्याला माहिती नाही. सनातन हिंदु संस्कृती |


>

Wednesday, 1 February 2023

सगळेच म्हातारे थोडे क्रॅक असतात !!*

 *सगळेच म्हातारे थोडे क्रॅक असतात !!*


काही आऊट ऑफ

ट्रॅक असतात

काही फारच

फ्रॅंक असतात

काही सपोर्टिंग

आर्क असतात 

काही अडगळीतले

रॅक असतात.

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही रगेल असतात

काही रंगेल असतात

काही बनेल असतात

काही टगेल असतात.

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही खवय्ये असतात

काही गवय्ये असतात

काही लढवय्ये असतात

काही नचैय्ये असतात ( बायकोच्या तालावर)

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही फक्कडबाज असतात

काही पिअक्कडबाज असतात

काही अक्कडबाज असतात

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही खवट असतात

काही तिखट असतात 

काही आंबट ( शौकीन ) असतात

काही खारट असतात

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही जण अस्वस्थ असतात

काही जण नेमस्त असतात

काही स्वतःच्यात मस्त असतात

काही समाजातील प्रस्थ असतात

पण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*


काही इतिहासात रमले असतात

काही वर्तमानात हरवले असतात

काही उद्याच्या चिंतेत भरकटले असतात

पण सगळेच डिपेंडन्सीच्या जाळ्यात

अडकले असतात.

कारण सगळेच *म्हातारे क्रॅक असतात !!*

जागतिक मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प -

 जागतिक मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प - ललित गांधी


जागतिक मंदी असतांनाही देशात जागतिक मंदीचा परिणाम जाणवू न देता मंदी थोपवणारा सकारात्मक अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. पुढे ते म्हणाले, या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, पर्यटन व कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी कोविड काळात नुकसान झालेल्या व्यापार्‍यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. सुक्ष्म, लघु व व मध्यम उद्योगांसाठी 9000 कोटी रूपयांचा कर्जपुरवठा करून त्याकरीता वसुलीसाठीचे संरक्षण योजना 1 एप्रिल पासून अमलात येणार आहे, तसेच बॅटरीवर चालणार्‍या आणि इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणारे कच्च्या मालाच्या आयातीवर स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली. अर्थसंकल्पातून व्यापार उद्योग क्षेत्राला जीएसटी संबंधी अथय योजना व सुधारणा अपेक्षित होत्या त्या मिळाल्या नाही.

देशात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरतूद व देशांतर्गत विमानसेवेसाठी 50 विमानतळ उभारणे, रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद, प्रधानमंत्री कौशल्य योजनेत पुढच्या तीन वर्षात नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजानुसार युवकांचे कौशल्य विकास करण्यावर भर देणार असून त्यासाठी विविध राज्यांमध्ये 33 किल डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी,

1 कोटी शेतकर्‍यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, यासाठी दहा हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना, छोट्या सहकारी संस्थांना प्रगतीसाठी प्रोत्साहन देणार या योजनांमधून अप्रत्यक्षरीत्या व्यापार उद्योगांना फायदा मिळेल अशी अपेक्षा आहे. एक जिल्हा एक उत्पादनासाठी मॉल उभारणार राज्याच्या राजधानीमध्ये राज्याच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी युनिटी मॉल उभारणार यामुळे स्थानिक उत्पादनांना चालना व बाजारपेठ देण्याचा प्रयत्न चांगला आहे.

Featured post

Lakshvedhi