Saturday, 3 December 2022

सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य

 सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे राज्याचा बहुआयामी संदर्भमूल्य कोष शक्य

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई दि 2:- सॅटेलाईट तंत्रज्ञानाद्वारे विविध क्षेत्रांत उपयोगिता वाढविताना राज्याचा स्वत:चा असा एक बहुआयामी आणि बहुउपयोगी दर्जेदार संदर्भमूल्य असलेला कोष तयार करता येऊ शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            सॅटेलाईट तंत्रज्ञानाव्दारे विविध क्षेत्रातील संनियंत्रणाच्या उपयोगितेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.


            यासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, बंदरे व परिवहन विभाग व माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मायक्रोनेट सोल्युशनचे धीरज मेहरा, एअरबसचे श्री व्ह्यूग उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विविध विभागांच्या विविध क्षेत्रातील योजना राबविताना सॅटेलाईट तंत्रज्ञानाव्दारे संनियंत्रणाची संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने एखाद्या प्रणालीतील मानवी हस्तक्षेप अत्यंत कमीत कमी ठेवणे सोपे होऊ शकते व यामुळे संबंधित योजनेचा लाभ पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचवणेही सोपे होऊ शकते असे श्री फडणवीस यांनी सांगितले.


            आर्टिफिशियल इंटेलिजन्स पद्धतींच्या वापराव्दारे अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे याबाबतही संबंधित विभाग व यंत्रणांना पूर्वसूचना मिळू शकते. पूर व्यवस्थापन तसेच रस्ते व्यवस्थापन यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरु शकते, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            सॅटेलाईटव्दारे विविध क्षेत्रातील संनियंत्रण याबाबत एअरबसच्या कामांसंदर्भात श्री व्ह्यूग यांनी सादरीकरण केले. एअरबसचे स्वतंत्र सॅटेलाईट असून संरक्षण, मेरीटाईम, ऑईल आणि गॅस, शेती, विमानचालन (एव्हिएशन) अशा विविध क्षेत्रात यासंदर्भात मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले.


            मायक्रोनेट सोल्युशनचे धीरज मेहरा यांनी सॅटेलाईट ईमेजबाबत सादरीकरण केले. श्री मेहरा म्हणाले, सॅटेलाईट तंत्रज्ञानाव्दारे विविध क्षेत्रात वस्तूनिष्ठ संनियंत्रण करणे सोपे होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही यामध्ये वापर करण्यात येतो. रिमोट एरियावर लक्ष ठेवणे सोपे होते. थ्रीडी मॅपिंग करण्यात येते. स्मार्ट सिटीसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. पूर नियंत्रणाच्या कामांतही या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. ड्रोन व्हिडिओग्राफीचाही यामध्ये वापर करण्यात येतो. 'रोड अॅसेट' व्यवस्थापन करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. याद्वारे सुरक्षित रस्ते वाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असेही त्यांनी सांगितले.


0000

गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना.

 गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना.

            मुंबई, दि. 2: राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आणि विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


            राज्यस्तरीय समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, संजय केळकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर, ऋषिकेश यादव, डॉ. पुष्कर सोहोनी, डॉ. सचिन जोशी, अतुल गुरु, गिरीश टकले, संकेत कुलकर्णी, मुकुंद गोरक्षकर या समितीत सदस्य असतील. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.


            विभागीय समितीमध्ये कोकण विभागासाठी डॉ. जी.एस. महाडिक, मृदुला माने, प्रवीण कदम, प्रवीण भोसले सदस्य असतील. पुणे विभागासाठी उमेश झिरपे, पंडित अतिवाडकर, संतोष हसुरकर, श्रमिक गोजमगुंडे, भगवान चिले हे सदस्य असतील. नागपूर विभागासाठी बंडु धोत्रे, राहुल नलावडे, अशोक सिंघ ठाकूर, अशोक टेमझरे हे सदस्य असतील. नाशिक विभागासाठी महेश तेंडुलकर, प्रशांत परदेशी, अंकुर काळे, राजेंद्र टिपरे हे सदस्य असतील. औरंगाबाद व नांदेड विभागासाठी राजेश नेलगे, डॉ. प्रमोद बोराडे, सतिश अक्कलकोट, तेजस्विनी जगदिश आफळे, शैलेश वरखडे हे सदस्य असतील.


0000

रोजगार उपलब्ध

 विविध कंपन्यांमधील 8 हजार 448 रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न

300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार

- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, दि. 3 : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन 8 हजार 448 रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या.


            राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सकाळी मेळाव्याचे उद्घाटन झाले. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकरी देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

            याप्रसंगी कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, कौशल्य विकास उपायुक्त डी. डी. पवार, उपायुक्त शालिक पवार, माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. 

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम राबवीत आहे. नुकतेच १ लाख २५ हजार रोजगार देण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर विभागाने सामंजस्य करार केले आहेत. रोजगार मेळावा उपक्रमालाही चालना देण्यात येत असून येत्या काळात राज्यभरात असे ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे. उद्योग आणि बेरोजगार उमेदवारांमध्ये समन्वय साधण्यासाठी येत्या दोन महिन्यात मोबाईलवर महास्वयम ॲप उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी घोषित केले. 

            कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, रोजगार मेळाव्यांसाठी आतापर्यंत 60 हजार रुपयांची खर्च मर्यादा होती, ती आता शासनाने ५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. यामुळे रोजगार मेळावे प्रभावी पद्धतीने आयोजित करणे शक्य होत आहे. रोजगार मेळाव्यांमध्ये नोकऱ्यांबरोबरच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांची माहिती, उमेदवारांचे कौन्सिलिंग असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. 

मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग

       टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, बझवर्क्स बिजनेस सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, शार्प एचआरडी सर्विस, मॅट्रिक्स कॅड अकॅडमी, युनिकॉर्न इन्फोटेक, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, करिअर एन्ट्री, टीम हायर, क्रिस्टल सोल्युशन्स लिमिटेड, पियानो प्रेसिडेल या कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 


            याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्याकरिता मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली.

            राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांचेही स्टॉल मेळाव्यामध्ये होते. त्यांच्या मार्फत कौशल्य विकास आणि रोजगारविषयक विविध योजनांची माहिती देण्यात आली.

वॉर्ड बॉयपासून सायंटिस्ट पदापर्यंतच्या रिक्त जागांसाठी मुलाखती

            दहावी-बारावी पास-नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, आयटी, विज्ञान पदवीधारक, मीडिया आणि एंटरटेनमेंटअशा विविध क्षेत्रातील नोकऱ्या या मेळाव्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. बँक जॉब, एचआर एडमिन, आयटी जॉब्स, बीपीओ, बँक ऑफिसर, सेल्स ऑफिसर, पायथॉन डेव्हलपर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्विस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट, हाउसकीपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायंटिस्ट, सीनियर सायंटिस्ट, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध पदांसाठी या कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.


 

मार्गशीर्ष गुरूवार च्या पूजेच्या नारळाचं


*मार्गशीर्ष गुरूवार च्या पूजेच्या नारळाचं तुम्ही काय करता. वाढवता की विसर्जन करता???* 

आम्ही पण प्रसाद करून खायचो पण आज व्हाट्सएपच्या माध्यमातून एक माहिती मिळाली,

|| श्री महालक्ष्म्यै नमः ।।


काही दिवसांपूर्वी एका ज्योतिष विषयक फेसबुक ग्रुपवर एका महिलेने सार्वजनिक स्वरुपात एक प्रश्न विचारला होता....


"मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं?"

यावर उत्तर देताना काहींनी योग्य ते अपेक्षित उत्तर दिलं.


पण काही अतिउत्साही मंडळींनी आपलं मत ठोकलं, की

*त्या नारळाचा प्रसाद करून खावा*.


तर त्याचं थोडक्यात सविस्तर उत्तर आपणास देणं मी माझं कर्तव्य मानतो !!


मुळात नारळ हा केळ किंवा चिकू सारखा सहजपणे खाता येत नाही. नारळावर शस्त्र प्रहार करून वाढवावा लागतो. 

जो नारळ आपण लक्ष्मीमातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून पुजतो, त्या प्रतिकात्मक (पार्थिव) मुखकमलावर शस्त्र प्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेषदायक आहे. 


फक्त मार्गशीर्षातीलच नव्हे, तर इतर कोणत्याही मंगल प्रसंगी, शुभ कार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो. वाढवायचा नसतो.


परंतु काही ठिकाणी जल प्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल, तर तो कलशावर पुजलेला नारळ 3 वेळा पाण्यातून बुडवून तो नारळ मोकळ्या जागेत भूमीत अर्पण करावा (त्यानिमित्ताने वृक्षारोपण होईल). नारळ बुडवलेलं पाणी तुळशीला घालावे.


मुळात कलश पूजन म्हणजे नेमकं काय?

त्याचं स्वरूप काय ते समजून घ्या !


जलयुक्त कलश म्हणजे वरुणादि देवतांचं निवासस्थान !

(फक्त पाण्याचा तांब्या नसतो)


कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित:।

मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता:।।

कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा।

ऋग्वेदोथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथवर्ण:।।

अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिता:।

अत्र गायत्री सावित्री शांतिपृष्टिकरी तथा।

आयांतु मम शांत्यर्थ्य दुरितक्षयकारका:।।

गंगे च यमुनेचैव गोदावरी सरस्वती |

नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरु ||

ॐ कलश देवाय नमः |


हे कलशाचं मूळ स्वरुप आहे.


यासोबत जेव्हा आंब्यांचा डहाळा/ विड्याची पानं व इतर काही वस्तू कलशात घालून वर नारळ ठेवून वस्त्रालंकारांनी सजवतो व संपुर्ण कलशाची पुजा करतो.


तेव्हा त्या संपुर्ण कलशात देवीचं तत्व प्रकट झालेलं असतं. काही पूजांमध्ये कुलस्वामिनी (महिषासूर मर्दिनी/ भगवती/ तुळजाभवानी) म्हणून कलश पुजला जातो. 

तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी (अष्टलक्ष्मी सहित महालक्ष्मी) म्हणून पुजला जातो.


तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पुजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा भूमीत अर्पण करा.

पण कृपा करून वाढवू नका आणि कोंडाळ्यात देखील टाकू नका.


कायम लक्षात ठेवा !!

🙏🙏🙏🙏🙏


लक्ष्मीं क्षीरसमुद्र राजतनयां श्रीरंगधामेश्वरीम् | दासीभूतसमस्त देव वनितां लोकैक दीपांकुराम् || श्रीमन्मन्दकटाक्षलब्ध विभव ब्रह्मेन्द्रगङ्गाधरां |

त्वां त्रैलोक्य कुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियाम् || सिद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मीर्जयलक्ष्मी सरस्वती | श्रीलक्ष्मीर्वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा ||


🌸🌸🌸🌸🌸

🙏🙏🙏🙏🙏

ब्रम्‍हपूरी वनविभागातील ६२ गावांसाठी १५ कोटी निधी वितरित.

 ब्रम्‍हपूरी वनविभागातील ६२ गावांसाठी १५ कोटी निधी वितरित.

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने होणार उपाययोजना.

            मुंबई, दि. २ : ब्रम्‍हपूरी वनविभागातील मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने संवेदनशील असलेल्‍या एकूण ६२ गावांकरिता डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आलेला आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. श्री.मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार ६२ गावांकरिता प्रत्‍येकी २५ लाख रूपये प्रमाणे १५ कोटी ५० लाख रूपये निधी दि. १ डिसेंबर २०२२ च्‍या शासन निर्णयानुसार वितरित करण्‍यात आला आहे.


            ब्रम्‍हपूरी वनविभागाचे क्षेत्र वनबहुल असून ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प या संरक्षित क्षेत्राच्‍या लगत असल्‍याने तसेच ब्रम्‍हपूरी वनविभागाचे कार्यक्षेत्र डिस्‍पर्सल क्षेत्रात मोडत असल्‍याने हे क्षेत्र वन व वन्‍यजीवांच्‍या बाबतीत अतिशय समृध्‍द आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गावे वनालगत वसलेली असल्‍याने सातत्‍याने ब्रम्‍हपूरी वनविभागात मानव-वन्‍यप्राणी संघर्षाच्‍या घटना घडत आहेत. यामध्‍ये मनुष्‍यहानी, मनुष्‍य जखमी, पशुधन हानी, पशुधन जखमी, शेतपीक नुकसानाची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याकरिता वनालगतच्‍या गावांमधील लोकांचे वनावरील अवलंबत्‍व कमी करणे आवश्‍यक आहे. याकरिता डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत भ्रमण मार्गातील गावांची निवड करण्‍यात आलेली आहे. याबाबत कायमस्‍वरूपी उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने या ६२ गावांसाठी प्रती गाव २५ लाख रूपये असा एकूण १५ कोटी ५० लाख रूपये निधी मंजूर व वितरित करण्‍यात आला आहे.


            या ६२ गावांमध्‍ये ब्रम्‍हपूरी वनविभागाअंतर्गत नागभीड तालुक्‍यातील बनवाही माल, डोंगरगांव, तिवर्ला तूकूम, खडकी, कान्‍पा, विलम, म्‍हसली, बिकली, कसर्ला, कोरंबी, पेंढरी, नवखळा, रेंगातूर, कुनघाडा चक, कोदेपार, वासाळा मक्‍ता, मिंडाळा, कोसंबी गवळी, वासाळा मेंढा, कन्‍हाळगांव, वलनी, सावर्ला, उमरगांव, खरकाडा, राजोली बोंड, पारडी, सोनूर्ली, नवानगर, येनोली कोट, बाळापूर, गोविंदपूर, सोनापूर, येनोली माल, वैजापूर, कोजबी माल, नांदेड, झाडबोरी, बोडधा, लोहारा, रामपूर, सावरगांव, उपरपेठ तसेच ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील मरारमेंढा, दिघोरी, सावरदंड चक, बरडकिन्‍ही, तळोधी खुर्द, रानबोथली, चक बोथली, गवर्ला चक, विकासनगर, कोरेगांव रिठ, रामपुरी, बेलदाटी, मुडझा, आवळगांव, कोसंबी, पवनपार, सायगांव, एकारा, चिकटबोदरा, बोद्रा या गावांचा समावेश आहे.


0000

गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना.

 गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना.

            मुंबई, दि. 2: राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आणि विभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.


            राज्यस्तरीय समितीमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष तर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, संजय केळकर, पांडुरंग बलकवडे, प्र.के. घाणेकर, ऋषिकेश यादव, डॉ. पुष्कर सोहोनी, डॉ. सचिन जोशी, अतुल गुरु, गिरीश टकले, संकेत कुलकर्णी, मुकुंद गोरक्षकर या समितीत सदस्य असतील. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील.


            विभागीय समितीमध्ये कोकण विभागासाठी डॉ. जी.एस. महाडिक, मृदुला माने, प्रवीण कदम, प्रवीण भोसले सदस्य असतील. पुणे विभागासाठी उमेश झिरपे, पंडित अतिवाडकर, संतोष हसुरकर, श्रमिक गोजमगुंडे, भगवान चिले हे सदस्य असतील. नागपूर विभागासाठी बंडु धोत्रे, राहुल नलावडे, अशोक सिंघ ठाकूर, अशोक टेमझरे हे सदस्य असतील. नाशिक विभागासाठी महेश तेंडुलकर, प्रशांत परदेशी, अंकुर काळे, राजेंद्र टिपरे हे सदस्य असतील. औरंगाबाद व नांदेड विभागासाठी राजेश नेलगे, डॉ. प्रमोद बोराडे, सतिश अक्कलकोट, तेजस्विनी जगदिश आफळे, शैलेश वरखडे हे सदस्य असतील.


0000



 



पिछडे वर्ग में अंतर्भूत सभी को समान न्याय देने का काम करुँगा.

 पिछडे वर्ग में अंतर्भूत सभी को समान न्याय देने का काम करुँगा.

- अध्यक्ष हंसराज अहीर

राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग के अध्यक्ष पद का पदभार स्वीकारा

नई दिल्ली, 02: राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग के अध्यक्ष पद का पदभार हंसराज अहीर ने आज स्वीकारा।

            राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग, नई दिल्ली में अध्यक्ष पद का पदभार स्वीकारने के बाद उन्होंने माध्यम प्रतिनिधियों से वार्तालाप साधा।एक प्रश्न के जवाब में राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग में देश के पिछडे वर्ग की सूची में अंतर्भूत सभी को समान न्याय के साथ में इस वर्ग के सभी परिवारों को सामाजिक, शैक्षिक, आर्थिक एंव सांस्कृतिक हितों की रक्षा करने का दायित्व के साथ न्याय दिलाने की दिशा में काम करता रहॅूंगा ।

            अध्यक्ष बनाए जाने पर आनंद की अनुभूति होने की जानकारी देते हुए,अध्यक्ष श्री. हंसराज अहीर ने कहा की, देशभर में लगभग 2500 जातियाँ है तथा 5500 उपजातियाँ है । देश के पिछडे वर्गों में योग्यता, कुशलता, कारीगीरी, मेहनती लोगों की कमी नहीं है । इस वर्ग की अधिकांश जातिया कृषी क्षेत्र से जुडी हुई है । भारतरत्न डॉ. बाबासाहब अम्बेडकर के विचार एवं संविधान के अनुसार सामाजिक विषमता दूर करने हेतु तथा प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के मूल मंत्र “सबका साथ सबका विकास और सबका विश्वास” को ध्यान में रखते हुए देश के पिछडे वर्ग के हित में कार्य करने का संकल्प लिया है, यह जानकारी हंसराज अरीर ने दी ।

Featured post

Lakshvedhi