Tuesday, 28 June 2022

शाळा

 *एकदा काय ते लवकर ठरवा..*

*मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत..*


*त्यांना जर शाळेत विचारले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?*

*तर बरोबर उत्तर देता आले पाहिजे..*


- *एक चिंताग्रस्त पालक* 🤷🏼‍♂️

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

मत्स्य योजना

 सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ;

30 जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 27 : मत्स्य व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन असे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील वर्सोवा येथील प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाच्या १२८ व्या सत्रासाठी इच्छूकांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता  ३० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप यांनी केले आहे.

            वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वेसागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधनेप्रात्याक्षिके आदींचे प्रशिक्षण दिले जाते. १२८ व्या प्रशिक्षण सत्रासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून ४५० रुपये आणि दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

            या प्रशिक्षणासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेतप्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा१८ ते ३५ वर्षे वयोगटातील असावापोहता येणे आवश्यककिमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यकमासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थींकडे बायोमॅट्रिक कार्ड अथवा आधारकार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज करताना त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थी असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्रसंबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची स्वाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

            निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारी करणाऱ्या तरुणांनी आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह विहित नमुन्यातील अर्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई-६१ येथे ३० जूनपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी  मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप संपर्क क्र. ८७८८५५१९१६ आणि यांत्रिकी निर्देशक जयहिंद सूर्यवंशी संपर्क क्र. ७५०७९८८५५२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे.


शिक्षण

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी

शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्य समिती.

            मुंबई, दि. 27 :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

            केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी टप्या-टप्प्याने कार्यवाही सुरू असून याअंतर्गत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरून प्राधान्याने करावयाच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध संस्थांची जबाबदारी व त्यानुसार करावयाची आवश्यक कार्यवाही याबाबत एकूण 297 कार्ये (टास्क) अंतिम करण्यात आली आहेत. राज्य स्तरावरून ही सर्व कार्ये विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी व कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

            या समितीमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे सहसंचालक, शिक्षण उपसंचालक पुणे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) चे विशेष अधिकारी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहायक संचालक (प्रकल्प), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अथवा कक्ष अधिकारी हे सदस्य तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य (समन्वय) हे सदस्य सचिव असतील.

            या समितीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार पूर्ण करावयाच्या कार्याची जबाबदारी राहील. हे कामकाज कालमर्यादित असल्याने सर्व कार्याबाबतची कार्यवाही त्वरित सुरू करण्यात येणार आहे. सर्व 297 कार्ये (टास्क) आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यांचे शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालयनिहाय विभाजन करण्यात आले असल्याचे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

 महाराष्ट्रातील लघु उद्योगांना शेअर मार्केटमधून भागभांडवल उभारून देणार - ललित गांधी*

-------------------------------

*जागतिक लघु उद्योग दिनी बीएसई आणि महाराष्ट्र चेंबरमध्ये सामंजस्य करार*

-------------------------------

मुंबई - लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा देशाच्या सकल उत्पादनात 22 टक्क्याहुन अधिक वाटा असुन हे क्षेत्र सक्षम करण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांची बीएसई-एसएमई च्या माध्यमातुन शेअर बाजारातुन भाग भांडवल उभारूण देणार असल्याची माहीती ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) च्या एसएमई व स्टार्टअप विभागातर्फे जागतिक लघु उद्योग दिनानिमित्त बीएसई इंटरनॅशनल कन्वेन्शन हॉल, फोर्ट, मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात भाषण करताना त्यांनी ही माहिती दिली.

बीएसई चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहाण, मुख्य वित्त अधिकारी नयन मेहता, बीएसई-एसएमई चे प्रमुख अजय ठाकुर, सहप्रमुख आनंद चारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या समारंभात लघु व मध्यम उद्योगांना भांडवल उभारणीसाठी बीएसई - एसएमई तर्फे उपलब्ध सुविधा व या संकल्पनेची व्याप्ती वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग व कृषि उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग‘ीक्लचर व बीएसई मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरच्या वतीने अध्यक्ष ललित गांधी व बीएसई तर्फे एसएमई विभागाचे प्रमुख अजय ठाकुर यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या कार्यकारी संचालक आशिष चौहाण यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.

ललित गांधी यांनी आपल्या भाषणात बीएसई तर्फे लघु व मध्यम उद्योगांना गेलया दहा वर्षात 4000 कोटी रूपयांचे भांडवल शेअर बाजारातुन उपलब्ध करून दिल्याबद्दल बीएसई चे अभिनंदन केले व चालु वर्ष अखेरीस 100 नवीन लघु व मध्यम उद्योगांना एसएमई शेअर मार्केट मध्ये सहभागी करून 1000 कोटी रूपयांचे भांडवल या उद्योगांना उपलब्ध करून देऊ अशी घोषणा केली. तसेच महाराष्ट्र चेंबर स्वातंत्र्यपूर्व काळापासून व्यापार-उद्योगांच्या विकासासाठी कार्य करत असून राज्य, देश व जागतिकस्तरावर राज्यातील व्यापार उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र चेंबरने महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. व्यापार उद्योगांच्या अडीअडचणी सोडविणे, व्यापार उद्योगांना सक्षम करणे हे चेंबरचे उद्धिष्ट असून राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र चेंबरने आपले धोरण तयार केले आहे. २०२७ पर्यंत राज्यातील ३६ जिल्ह्यात कृषी क्लस्टर , महिला क्लस्टर व उत्पादन आधारित क्लस्टरची निर्मिती राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. क्लस्टर निर्मितीमुळे स्थानिक व्यापार उद्योगांना व नवउद्योजकांना चालना मिळणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जात असल्याचे सांगितले.  

या सामंजस्य करारामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भांडवली बाजारात नोंदणी करण्यास आणि सार्वजनिक बाजारातून भांडवल उभारण्यास मदत होईल. नोंदणीकृत उद्योगांना बीएसई एसएमइ प्लॅटफॉर्ममध्ये सूचीबद्ध होण्यासाठी मदत होईल. तसेच एसएमइनी भांडवल बाजारात नोंदणी केल्यावर त्यांना भांडवल उभारण्यास मदत होऊन त्यांची आर्थिक गरज पूर्ण होईल. एसएमइनी बीएसई एसएमइ प्लॅटफॉर्ममध्ये सूचीबद्ध होऊन फायदा घ्यावा व येत्या वर्षभरात १०० एसएमइ बीएसई एसएमइ प्लॅटफॉर्ममध्ये सूचीबद्ध होतील असे आश्वासन अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग‘ीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांचा बीएसई तर्फे अजय ठाकुर यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

बीएसई एसएमइचे प्रमुख अजय ठाकूर यांनी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बीएसई एसएमइ एक्सचेंजवर सूचीबद्ध होण्याचे एसएमइचे फायदे आणि इक्विटी भांडवल वाढविण्याबाबतचे ज्ञान आणि जागृकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबरच्या मदतीने महाराष्ट्रातील एसएमइपर्यंत बीएसई एसएमइ एक्सचेंजचे फायदे पोचविणे व त्यांना बीएसइ एसएमइ प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध होण्यासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच बीएसइ लिमिटेड आणि महाराष्ट्र चेंबरमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मदत होणार आहे. आशिष चौहाण यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राज्यातील प्रमुख उद्योजक, बँकर्स यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, कार्यकारणी सदस्य निलेश घरात, मनीष पाटील, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते


फोटो कॅप्शन : बीएसई-एसएमई व महाराष्ट्र चेंबर यांच्यात झालेला सामंजस्य करार हस्तांतरण करताना अजय ठाकूर, ललित गांधी, आशिष चौहान, नवीन मेहता, आशिष पेडणेकर, करूनाकर शेट्टी, सागर नागरे इत्यादी.

Thanks and Regards,

Lalit Gandhi | President

Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (MACCIA)

Head Office - Oricon House, 6th Flr, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra | Tel: +91 22 6739 5811 | Fax: 2285 5861 

Monday, 27 June 2022

मराठी माय

 मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद - मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

महाराष्ट्राच्या सहा दशकांतील जडणघडणीचा मागोवा घेणाऱ्या ग्रंथांचे प्रकाशन.

            मुंबई, दि. 27 : मुंबईत मरिन लाईन्स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आणि मराठीसाठी त्या भाषेचा मंत्री म्हणून काम करता आले याचा अभिमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केलेला प्रयत्न, मराठी भाषा अनिवार्य करण्याचा आणि दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून असाव्यात यासाठी केलेला कायदा, अशा प्रकारचे मराठी भाषेसाठी भरीव काम करता आले याचा आनंद आहे. ‘ग्रंथाली’ व ‘मराठी भाषा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

            मराठी भाषा, साहित्य-संस्कृती आणि विज्ञान या क्षेत्रांत गेल्या सहा दशकांत काय प्रगती झाली, काय राहिले याची वस्तुनिष्ठ नोंद घेणारे तीन खंडांची ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने निर्मिती केली आहे. या खंडांचे आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

            श्री. देसाई म्हणाले, मराठी भाषा जगभरात 80 देशांत बोलली जाते. मराठीच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंच आणि प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक पुरावे केंद्राला सादर केले. केंद्रीय मंत्र्यांकडे व्यक्तीशः याचा पाठपुरावा केला आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरण आणि शासनाच्या कामकाजात मराठी भाषेतून व्यवहार करणे अनिवार्य केले आहे. सर्व मंडळांच्या शाळेतून मराठी विषय शिकविणे सक्तीचे केले आहे.

             राज्यात एक मोठी गुंतवणूक प्रस्तावित असून त्यासाठी नुकतेच दिल्ली येथे बैठकीला उपस्थित राहून याबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगमंत्री म्हणून राज्यातील मोठ्या तसेच लहान उद्योगांच्या विकासासाठी पोषक असे वातावरण तयार केले. राज्यात प्रस्थापित जुन्या उद्योगांच्या वाढीसह नविन 86 हजार स्टार्टअप्सने राज्यात सुरुवात केली आहे. शंभर युनिकॉर्न कंपन्यांमधे किमान 25 कंपन्या या मुंबई-पुण्यातल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी लिस्टींग करता यावे, यासाठी एस एम ई प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्यानंतर जवळपास 400 लघु उद्योगांनी शेअर बाजाराच्या माध्यमातून 15 हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

भाषेचे सौष्ठव सांभाळण्याची जबाबदारी माध्यमांची - राजीव खांडेकर

            भाषा जगवणे हे काम माध्यमांचे नाही, मात्र भाषेचे सौष्ठव सांभाळण्याची जबाबदारी माध्यमांनी सांभाळावी, अशी अपेक्षा वृत्त वाहिनी चे संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मराठीचा प्रवाह हा आकुंचन पावणार नाही यासाठी अनेक ठिकाणी काही लोक तन्मयतेने मराठी भाषेच्या संवर्धनाचे कार्य करीत आहेत त्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे.

            नव्या पिढीला राज्यातील गौरवशाली कामगिरीची ओळख करुन देण्याचे काम या ग्रंथांच्या माध्यमातून होणार असल्याची भावना डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली. चांगल्या प्रयत्नांना कायम साथ देण्याचे आश्वासनही श्री. पाटील यांनी दिले.

            मराठी भाषेच्या विकासासाठी केवळ तळमळ असून चालत नाही, त्यासाठी दूरदृष्टी देखील असावी लागते. ती ग्रंथालीच्या विश्वस्थांकडे आहे, म्हणूनच हे ग्रंथ निर्मितीचे काम पूर्ण होऊ शकले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक अरुण शेवते यांनी काढले.

महाराष्ट्राच्या जडण घडणीचा दस्तावेज

            ‘विज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवीविज्ञान-तंत्रज्ञानात हीरकमहोत्सवी महाराष्ट्र’ या ग्रंथाचे संपादन विवेक पाटकर, हेमचंद्र प्रधान यांनी केले. यात 36 विचारवंताचा समावेश आहे. ‘मोहरा महाराष्ट्राचा’ याचे संपादन रमेश अंधारे यांनी केले आहे. यात 43 अभ्यासकांचा सहभाग आहे. ‘मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान’ याचे संपादक म्हणून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. अजय देशपांडे यांनी काम पाहिले आहे. हे तीन महत्त्वपूर्ण खंड म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीचा दस्तऐवज आहेत. वाचक, अभ्यासकांसाठी पथदर्शी असणारा हा ऐवज संग्रही असावा, असा आहे. मूळ 3,000 /- रुपयांचा तीन खंडांचा संच ‘ग्रंथाली’ने केवळ 1,500 /- रुपयांत उपलब्ध केला आहे, असे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले.

            महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी 3 खंडांनिमित्त ग्रंथालीच्या गेल्या दोन वर्षातील निवडक 60 पुस्तकांचा संच, तीन खंड आणि 'शब्द रूची' या मासिकाचे तीन वर्षाचे तीन वर्ष अंक घरपोच केवळ 8500/- रुपयांत मिळणार असल्याची माहिती श्री. हिंगलासपूरकर यांनी यावेळी दिले.

            ‘ग्रंथसखा’चे श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले..

दिलखुलास

 दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ.प्रशांत नारनवरे यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 28 जून, बुधवार 29 जून व गुरूवार 30 जून 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.


            राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांबरोबरच मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचा सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जात असून गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


००००


पाणी रे पाणी

 पाण्याबद्दल एक माहितीचा लेख वाचनात आला. तो पाठवतो आहे.

*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️@✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 

       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 

4) एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 

5) एक लिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब,चिंच,जांबळ,अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 

      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 

           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

        

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 

       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. 

          झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏@🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi