Wednesday, 1 June 2022

दोस्ती


 

Rishte


 

 *हौसिंग सोसायटीची रिडेव्हलपमेंट म्हणजे काय असतं?*


*जुनं घर बिल्डरला द्यायचं आणि त्याच्या बदली फुकट, नवं, मोठ्ठ आणि आधुनिक सुखसोई असलेलं घर घ्यायचं!*


रिडेव्हलपमेंट म्हणजे जर इतकी सोपी गोष्ट असती तर इतके प्रोजेक्ट्स फेल गेलेच नसते!! खरं कि नाही?


मग रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी काय करायला हवं?


महेश गजेंद्रगडकरच्या म्हणण्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट हा सोसायटीच्या सभासदांच्या मानसशास्त्राच्या व्यवस्थापनाचा विषय आहे. हे व्यवस्थापन ज्यांना जमते तेच रिडेव्हल्पमेंट करण्यात यशस्वी होतात. हा महेशचा अनुभव आहे. कारण महेश १०० सभासद असलेल्या सोसायटीचा चेयरमन आहे. आणि तो त्याच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट करतो आहे..


महेश वकील असल्याने त्याला स्वानुभवाबरोबरच कायद्याचेही ज्ञान आहे. आणि आता रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कॅन्सल्टंट हा त्याचा व्यवसाय झाला आहे.


माझ्या सोसायटीची रिडेव्हल्पमेंट करायची ठरल्यावर मला जेंव्हा भयंकर अनुभव आले तेंव्हा मी महेशकडे गेलो आणि रिडेव्हल्पमेंट कशी करावी हे समजून घेतले. 


मला रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या करण्याची पद्धत समजली पण माझ्या सोसायटीतल्या इतर सभासदांना हे कसे समजून सांगावे हा प्रश्नच होता. 


खरं तर महेश रिडेव्हल्पमेंटवर सेमिनार घेतो. सोसायटीत जाऊन सभासदांना मार्गदर्शन करतो..पण त्याकरता तो जी फी घेतो ती द्यायला माझ्या सोसायटीच्या रिडेव्हलोपमेंट कमिटीला पटवणं मला अशक्य होते. 


का अशक्य होते हे तुम्हाला माहीतच आहे. सोसायटीची रिडेव्हल्पमेंट हा फुकटचा खेळ आहे. बिल्डर सगळं करून देतो. फक्त जास्तीत जास्त टक्के वाढीव क्षेत्रफळ देणारा आणि "नावाजलेला" - म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर होर्डिंग लावणारा - बिल्डर पकडला की झालं. असं जगातल्या सगळ्या सोसायटीतल्या सगळ्यांचं मत असतं.


यावर उपाय म्हणून मी एक आयडिया केली. महेशला म्हटलं कॅमेऱ्या समोर बसून तू मला रिडेव्हलपमेंट कशी करावी हे शिकव. तो व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करतो.म्हणजे माझ्या सोसायटीतल्या लोकांना रिडेव्हल्पमेंट यशस्वी अशी करावी हे कळेल. त्यांचा सोईच्या वेळी ते घर बसल्या फुकट व्हिडिओ बघू शकतील. आणि मग त्यांना रिडेव्हल्पमेंट करण्याची योग्य पद्धत कळेल..आमची सोसायटी फसणार नाही. लटकणार नाही. अडकणार नाही. आणि मग तुझ्या सोसायटीसारखी माझीही सोसायटी रिडेव्हलप होईल.


महेश माझा खरा मित्र असल्याने तो लगेच तयार झाला. आम्ही विडिओ तयार केले. विषय फारच मोठ्ठा असल्याने त्याचे ४० - ५० मिनिटांचे ३ एपिसोड झाले. रिडेव्हल्पमेंटचा विचार मनात आल्या पासून बिल्डर अपॉईंट करेपर्यंत काय काय करावे याची सविस्तर माहिती यात आहे. रिडेव्हल्पमेंटची कायदेशीर प्रक्रिया, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्ट अँपॉईंट करणे, टेंडर कसे काढावे, एमओयू कसा करावा, बिल्डरबरोबरच्या अग्रीमेंटमध्ये कुठले कुठले मुद्दे असावेत वगैरे वगैरे सगळं यात सांगितलं आहे.


आज मी माझ्या सोसायटीला हे विडिओ बघण्याचं आग्रहाचं आणि कळकळीच निमंत्रण दिलय.     


तुमच्या सोसायटीत जर रिडेव्हलोपमेंटकरण्याचा बेत शिजत असेल तर तुम्हीही हे ३ विडिओ एपिसोड यूट्यूबवर जरूर बघा. आणि तुमच्या सोसायटीतल्या सगळ्यांना बघायला सांगा. म्हणजे मग रिडेव्हलपमेंट यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी काय करायला हवं हे त्यांनाही माहिती होईल 

Part 1 - - https://youtu.be/Z0utipsa12o


Part 2 - - https://youtu.be/CC3JYxB-GDY


Part 3 - - https://youtu.be/76YXke3ULn4

Tuesday, 31 May 2022

हसू नका बरे

 याला म्हणतात खरं प्रेम


 होळीवरून मारल्या गेलेल्या,

झांज्या-पुंज्या पहेलवानांची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी २१)

रायजांभूळ ओढा  हेंकळदरा परिसराला लागून झांज्या-पुज्या नावाच्या दोन टेकड्या उभ्या आहेत. झांज्या-पुंज्या या नावाची कहाणी एका महिलेकडून समजलीपाराळाभादलीवडजी परिसरातील गावात होळी सणाबाबत एक समज होताहोळीचा विस्तव जो गाव घेऊन जाईलत्या होळीच्या गावची लक्ष्मी (दौलत-संपत्ती-बरकतदुसऱ्या गावात विस्तवाबरोबर जात असेम्हणून होळी पेटली कीरात्रभर पहारा सेया पहारेकरी पहिलवानांना सणासाठी गावाच्या वतीने खुराक दिला जात असेएका प्रसंगात होळीचा विस्तव नेताना दोन्ही गावांची हाणामारी झालीत्यात झांज्या-पुंज्या नावाचे दोन पहेलवान मारले गेलेहे सारे आदिवासी-बलुतेदार-दलित होतेत्यांच्या नावाने या दोन टेकड्या ओळखल्या जातात.

हेंकळदराटपक्याचे लवणधारकडानकटीचा ओहोळ... अशा टापूंच्या या गोष्टीत्या कदाचित तुमच्या गावातील वेगवेगळ्या ठिकाणांची आठवण करून देईल... बघाकाही आठवतंय का?

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही एकविसावी गोष्ट.)

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/Parala-Tapu2

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)



--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


पुरस्कार

 


विविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून घोषणा.

चित्रपट/नाटक/संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार

- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख.

            मुंबई, दि. 31 : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट, नाटक आणि संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही यावेळी मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

            महाराष्ट्रातील गायन आणि संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना दरवर्षी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो. सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार पं.हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककला क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास ‘विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. सन 2019-20 या वर्षाचा पुरस्कार आतांबर शिरढोणकर यांना तर सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर’ यांच्या नावे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार दत्ता भगत यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सतिश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार लता शिलेदार ऊर्फ दिप्ती भोगले यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पाचही पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

            सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. नाटक या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी कुमार सोहोनी आणि सन 2020-21 साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी पंडितकुमार सुरुसे आणि सन 2020-21 साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शौनक अभिषेकी आणि सन 2020-21 साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सुभाष खरोटे आणि सन 2020-21 साठी ओमकार गुलवडी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019-20 साठी मधु कांबीकर आणि सन 2020-21 साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. किर्तन/समाजप्रबोधन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि सन 2020-21 साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शिवाजी थोरात आणि सन 2020-21 साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाहीरी या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शाहीर अवधुत विभूते आणि सन 2020-21 साठी दिवंगत शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नृत्य या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शुभदा वराडकर आणि सन 2020-21 साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोककला या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सरला नांदुलेकर आणि सन 2020-21 साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी मोहन मेश्राम आणि सन 2020-21 साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कलादान या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी अन्वर कुरेशी आणि सन 2020-21 साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

            आज जाहीर करण्यात आलेले पुरस्कार लवकरच सर्व पुरस्कारार्थींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील असेही मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.



 




 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनाजयंती निमित्त अभिवादन.

            मुंबई, दि. ३१ : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. या सर्वांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

            अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत. कुशल राज्यकर्ती, रणधुरंधर, मुत्सद्दी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.



Featured post

Lakshvedhi