Friday, 3 September 2021

 [02/09, 12:26] B Vaishali: *"कात्रीची" धार गेली तर कापड एकवेळ कापलं जात नाही पण "खात्रीची" धार गेली की "नातं" मात्र हमखास कापलं जातं.*                                                  

*अपयश हे संध्याकाळी विसरून* 

*जायचे असते  कारण*

*उद्याची येणारी सकाळ*

*ही तुम्हाला एक नवीन संधी असते* 

*यशापर्यंत पोहचण्याची …*


🙏🙏 शुभ  सकाळ 🙏🙏

 ( वैज्ञानिक मानवी शरीराचा अभ्यास करुन थक्क झाले आहेत ! )


*मानवी शरीर अदभुत आहे.*


*मजबुत फुफ्फुस :-*

आपलं फुफ्फुस दररोज २० लाख लिटर हवेला फिल्टर करते. आपल्याला याचा अंदाज पण नाही येत. 

जर फुफ्फुसाला खेचून लांब केलं तर ते टेनिस कोर्टचा एक हिस्सा पूर्ण व्यापून टाकेल.


*अशी कोणतीही फॅक्टरी नाही :-*

आपले शरीर दर सेकंदाला २५ करोड, नविन सेल बनवते. दररोज २०० अब्जां पेक्षा जास्त रक्त कोषिकांचे उत्पादन / नाश  होते. शरीरात २५०० अब्ज रक्त कोषिका सतत असतात. रक्ताच्या एका थेंबात २५ करोड कोषिका असतात.


*लाखो किलोमीटर चा प्रवास :-*

मानवाचे रक्त शरिरात दररोज १'९२'००० किलोमीटर चा प्रवास करत असते. आपल्या शरीरात साधारणपणे  ५.६ लिटर रक्त असते. जे दर २० सेकंदाला एकवेळा,  संपूर्ण शरीराचे भ्रमण करते.


*धडधड :-*

तंदुरुस्त व्यक्तीचं ह्रदय दररोज १'००'००० वेळा घडकतं !  वर्षभरात ३० करोड पेक्षा जास्त वेळा धडकतं. ह्रदयाच्या पंम्पिंग चा  दाब एवढा जास्त असतो की, रक्ताची चिळकांडी ३० फूट वर उडू शकते !


*सर्व कॅमेरे आणि दूर्बिण निष्फळ :-*


मानवाचे डोळे एक करोड रंगांना ओळखून, लहानातला लहान फरक ओळखू शकतात. अजुनपर्यंत जगात अशी कोणतीही मशिन नाही, जी यांच्या बरोबर स्पर्धा करु शकेल. 


*नाकात एअर कंडीशनर :-*

आपल्या नाकात नैसर्गिक एअर कंडीशनर आहे. जी थंड हवेला गरम आणि गरम हवेला थंड करुन फुफ्फुसात पाठवते.


*ताशी ४०० कि.मी ची गती :-*

चेतनातंत्र शरीराच्या बाकी हिश्यात तासाला ४०० की.मी गतीने तडक उपयुक्त सूचनांच प्रसारण करतं. 

मानवाच्या मेंदुत १०० अब्जांपेक्षा जास्त नर्व्हस् सेल्स आहेत.


*जबरदस्त मिश्रण :-*

शरीरात ७० % पाणी आहे. या शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन, जस्त, कोबाल्ट, केल्शियम, मेग्नेशियम, फाॅस्फेक्ट, निकेल आणि सिलिकोन आहे.


*अजब शिंक :-*

काय करेल मास्क (मुस्क) . . .

शिंकतांना बाहेर येणारी हवेची गती, प्रती ताशी १६६ ते ३०० कि.मी पर्यंत असू शकते. उघड्या डोळ्यांनी शिंकणे निव्वळ अशक्यच आहे.


*बेक्टेरियांचे गोदाम :-*

मानवाच्या शरीराच्या १० %  वजन हे, शरीरात असलेल्या बेक्टेरियांचे असते. एक चौरस इंच त्वचे मध्ये सुमारे ३.२ कोटी बेक्टेरिया असतात.

( साबन, सेनिटायजर, किंवा केमिकल अपायकारक ! )


*विचित्र विश्व :-*

डोळ्यांचा विकास लहानपणीच पूर्ण झालेला असतो. नंतर त्याचा विकास होत नाही. पण नाक, कानाचा विकास संपूर्ण जीवन पर्यंत चालुच राहतो. कान लाखो आवाजाचे फरक जाणू शकतो. कान १'००० ते ५०'००० हर्टज आवाजांना ओळखू शकतो.


*दातांची काळजी घ्या :-*

मानवी दात दगडा सारखे मजबुत असतात पण,  जसे शरीराचे अन्य भाग स्वत: ची काळजी स्वत: च घेतात. तसे दात आजारी पडल्यावर स्वत: ची सुधारणा करण्यासाठी सक्षम नसतात.


*तोंडातली लाळ :-*

मानवाच्या तोंडात दररोज *१.७  लिटर* लाळ बनते. लाळ भोजन पाचन करण्यास मदत करते. जीभेत असलेल्या १०'००० पेक्षा जास्त स्वाद ग्रंथींना ओली ठेवते.


*पापण्या झपकणे :-*

वैज्ञानिक सुद्धा मानतात की,  पापण्या झपकल्यास कचरा निघतो, यामुळे डोळ्यांच्या दृष्टीत फारच फरक जाणवतो.


*नखांचे वेगळेपण :-*


अंगठ्याचे नख सर्वात हळू वाढते आणि मधल्या बोटाचे नख सर्वात वेगाने वाढते.


*दाढीचे केस :-*

पुरुषांच्या दाढीचे केस सर्वात वेगाने वाढतात. जर कोणी व्यक्ती संपूर्ण जीवन दाढी नाही करत तर,  ती ३० फूट लांब होवू शकते.


*जेवणाचे गणित :-*

व्यक्ती सामान्यरीत्या जेवणासाठी एकूण ५ वर्षाचा वेळ खर्ची करतो. जीवनपर्यंत आपण आपल्या वजनाच्या ७'००० पट जेवण खाल्लेलं असतं !


*स्वप्नाची दुनिया*

बाळ जगात येण्या आधी पासुनच, आईच्या गर्भाशयातच स्वप्न पाहायला सुरु करते. 

*वसंत ऋतुमध्ये* बाळाचा विकास वेगाने होतो.


*झोपेचे महत्व :-*

झोपे दरम्यान माणसाची उर्जा वाढते. मेंदु महत्वपूर्ण माहिती गोळा करतो. शरीराला आराम मिळतो आणि डागडुजीचे ( रिपेरिंग ) काम पण होते. झोपे दरम्यान शरिराच्या विकासासाठीचे आवश्यक होर्मोन्स मुक्त होतात.


*तेंव्हा तुमच्या किंमती शरीराचे कमी मुल्यांकन करु नका !*


*म्हणून निसर्गाचे ( नियतीचे )  दिवसात ३ वेळा, आभार म्हणून, आठवण करा.*

*सकाळी उठतांना, जेवतांना, रात्री झोपतांना.*



*🌹मन करा रे प्रसन्न... सर्व सिद्धिचे कारण...*🙏

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर

एसटी महामंडळाला 500 कोटी तातडीने वितरित

 

            मुंबईदि. 2 :- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेतअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

            कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसर तातडीने निधी वितरित करण्यात आला.

०००००


Thursday, 2 September 2021

 कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता

कृषी क्षेत्रात क्रांती आणावी

- राज्यपाल कोश्यारी

 

            मुंबई, दि. 2 : भारत अन्नधान्य उत्पादनदुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेतीपेटेंटभौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अश्यावेळी कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावेअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ३९ वा पदवीदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झालात्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी व कृषीवर आधारित उद्योगफलोत्पादन यांमुळे देश संपन्न आहे. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले. नंतरच्या काळात हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात धवल क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. उत्तम खेतीमध्यम बाननिकृष्ट चाकरीभीख निदान’ या जुन्या काळातील प्रचलित म्हणीचा दाखला देऊन राज्यपालांनी युवकांना कृषी क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.   

            कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

            भारतातील सामान्य शेतकऱ्याकडे देखील शेतीचे पारंपरिक ज्ञान असून कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

            यावेळी कृषिमंत्री व विद्यापीठाचे प्र-कुलपती दादाजी भुसे यांनी संबोधन केले तर कृषि वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी दीक्षांत भाषण दिले. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले. 

            दीक्षांत समारोपात एकुण २०८७ स्नातकांना पदवीपदविकापदव्युत्तर व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

००००

 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आदेश

 

          मुंबईदि. 2 : राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्यावतीने शिष्यवृत्तीशैक्षणिक शुल्क देण्यात येते परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी असे आदेश उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

            मंत्रालयात विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री.विकासचंद्र रस्तोगी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्लाउच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज मानेतंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघमाहिती तंत्रज्ञान विभागाचे  व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोलथे, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागबहुजन कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणालेविद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधा सुद्धा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून विद्यार्थी आणि संस्था अडचणीत येत आहेत. यासाठी संबंधित विभागाने समन्वयातून या अडचणी  तातडीने दूर करून मागील 2 वर्षापासून जी शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. ती तातडीने वितरित करण्यात यावी. तसेच ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि संबंधित विभागाने या आठवड्यात बैठक घेऊन सर्व शिष्यवृत्तीचा आढावा घ्यावा आणि ज्या त्रुटी असतील त्या दूर करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृती वितरीत करण्यात यावी. प्रत्येक महिन्याला याबाबत  आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी केल्या.

            विद्यार्थ्यांची कागदपत्रे देण्यास महाविद्यालयांनी नकार देऊन नये. विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

0000


 सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा – इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ची

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा

शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवकांची तयारी

 

·        3 ते 5 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे आयोजन

·        जिल्हास्तरीय स्पर्धेत २२ हजार ९० युवकयुवतींचा सहभाग

·        राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार 263 उमेदवार

 

            मुंबईदि. 02 : शांघाय (चीन) येथे ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवक-युवतींची तयारी करुन घेण्यात येत आहे. यासाठी राज्यात आयोजित स्पर्धेला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २२ हजार ९० जणांनी यात सहभाग घेतला. जिल्हा आणि विभागीय स्तरावर यांची स्पर्धा झाली असून आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 263 उमेदवार सहभागी होत आहेत. तरुणांमधील नवसंकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारी इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ही सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा असून कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माकौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह उपस्थित होते.

            प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजीलँडस्केप गार्डनिंगइंडस्ट्रियल कंट्रोलएअरक्राफ्ट मेंटेनन्सआयटीअॅग्रीकल्चरफ्लोरिस्ट्री यासारख्या कौशल्य व्यवसायांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेची अंतिम फेरी 45 कौशल्य श्रेणींमध्ये 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कुर्लामुंबई येथील डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणार आहे. तर रविवार 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता लोअर परेलमुंबई येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. येथे राज्यस्तरीय चॅम्पियन्सना रोख बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईलअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेमुळे युवक-युवतीमधील नवसंकल्पना आणि त्यांच्यातील उद्यमशीलता यांना चालना मिळेलअसा विश्वास मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केला.

            स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2018 मध्ये झालेल्या राज्य कौशल्य स्पर्धेच्या तुलनेत यंदाची संख्या 70 टक्के पेक्षा जास्त आहे. स्पर्धेचे नियोजन तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आले. लेव्हल 1 ची स्पर्धा जिल्हास्तरावर 17 ऑगस्टपासून झाली. ही फेरी सर्व जिल्ह्यांतील विविध आयटीआय आणि प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीनंतर 263 उमेदवार अंतिम फेरीसाठी पात्र झाले आहेत. हे अंतिम स्पर्धक आता राज्यस्तरीय अंतिम फेरीत 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान मुंबईपुणे आणि इतर शहरांमधील विविध कौशल्य प्रशिक्षण अकादमी तथा केंद्रांवर स्पर्धेत सहभाग घेतील.

            महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेतील जवळपास 100 विजेत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स 2021 विभागीय स्पर्धेत आणि पुढे डिसेंबर 2021 मध्ये इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. इंडिया स्किल्स 2021 मधील विजेत्यांना वर्ल्ड स्किल्ससह विविध आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. ऑलिम्पिकच्या बरोबरीने कौशल्यामध्ये वर्ल्ड स्किल्स ही व्यावसायिक कौशल्यांची जागतिक स्पर्धा आहे आणि दर दोन वर्षांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केली जाते. वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनलची पुढील आवृत्ती ऑक्टोबर 2022 मध्ये चीनच्या शांघाय येथे आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये 60 हून अधिक देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

            यापुर्वी रशियाच्या काझान येथे आयोजित वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल 2019 स्पर्धेमध्ये भारतीय संघाने एक सुवर्णएक रौप्य व दोन कांस्य आणि १५ उत्कृष्ट सादरीकरणाची पदके अशा एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरून ६३ देशांमधून तेराव्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. महाराष्ट्राने १ कांस्य आणि ३ उत्कृष्ट सादरीकरणाची अशी एकूण ४ पदके मिळविली होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवकयुवतींना संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

 *प्राचीन भारतीय वाद्य यंत्र, डमरू*


सनातन संस्कृति में संगीत मोक्ष का मार्ग है. संगीत के विभिन्न वाद्य यंत्रों में प्रमुख है डमरू. भगवान शिव के हाथों में डमरू सदैव होता है.


शंकु आकार के बने इस ढोल के बीच के तंग हिस्से में एक रस्सी बंधी होती है जिसके पहले और दूसरे सिरे में पत्थर या कांसे का एक-एक टुकड़ा लगाया जाता है.


हिन्दू, तिब्बती और बौद्ध संस्कृति में इसका अत्यधिक महत्व माना गया है.


जब डमरू बजता है तो उसमें से 14 तरह की ध्वनि निकलती हैं, उक्त ध्वनि में सृजन और विध्वंस दोनों के ही स्वर छिपे हुए हैं.


*मेरी संस्कृति ..मेरा देश ..मेरा अभिमान 🚩*

Featured post

Lakshvedhi