Sunday, 8 August 2021

 मिठीला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देणार

                           -पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

          मुंबईदि. 7- गाळ काढणेतरंगता कचरा वेगळा करणे तसेच आजूबाजूने येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांमध्ये काम करून 'मिठीला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकामी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. 

          मिठी नदी स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाचे उद्घाटन श्री ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरएमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.

          एमएमआरडीए आणि मरीन डेब्रिज पार्टनरशिप यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आज हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पात नदीतील तरंगता कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाईल. याद्वारे नदीमार्गातून समुद्रात जाणारा प्लास्टिक आणि इतर तरंगता कचरा कमी केला जाणार आहे.

          मागील काही वर्षात मिठी नदीला नाल्याचे स्वरूप आले आणि पावसाळ्यात नागरी वस्तीला धोका निर्माण झाला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. मिठी नदीची स्वच्छता हा एक नियमित प्रक्रियेचा भाग आहेतथापि आता त्यावर भागणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी नाल्याचे स्वरूप आलेल्या मिठीला पुन्हा नदीचे स्वरूप प्राप्त करून देणे गरजेचे आहे, असे श्री ठाकरे म्हाणाले.

           नदीतील गाळ काढणेतरंगता कचरा वेगळा करणे आणि आजूबाजूच्या परिसरातून येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांवर काम करणे आवश्यक आहे. किनाऱ्यावरील नागरिकांची काळजी घेऊन हे काम करावे लागणार असल्याने थोडा वेळ लागला तरीही मिठी कायमस्वरूपी स्वच्छ व्हावी यासाठी नागरिकांचे सहकार्यही महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने मिठीला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्यापासून सुरूवात करून शासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांना सहकार्य करावेअसे आवाहन श्री ठाकरे यांनी केले.

          वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर जगभर समस्या निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसून येत असून हे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आपल्या वसुंधरेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले.  

          महापौर श्रीमती पेडणेकर यांनीदरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढण्यात येत असून महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक बाबी करीत राहीलअशी ग्वाही दिली. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एमएमआरडीए आपल्यामार्फत सर्व ते प्रयत्न करील, असे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले. यावेळी मिठी नदीच्या स्वच्छता प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

00000

 

 ऑलिंपिक कांस्यपदकविजेत्या बजरंग पूनिया याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

बजरंग पुनियाने पदकतालिकेत भारताचा आणि देशात कुस्तीचा सन्मान वाढवला

 

          मुंबई दि 7"टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनीगटात फ्रीस्टाइल कुस्तीचे कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंग पूनिया याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे .

                    दुखापतीमुळे उपांत्यफेरी  जिंकू न शकलेल्या बजरंगने कांस्य पदकासाठीचा सामना

8-0 असा निर्विवाद जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. बजरंगने जिंकलेलं कांस्यपदक भारताला पदकतालिकेत आणि कुस्तीला देशात वरच्या स्थानावर घेऊन जाईलअसा विश्वास वाटतो. बजरंग पूनियात्याचे प्रशिक्षकमार्गदर्शकसपोर्टटीम व चाहत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

 


 भालाफेक सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्रा याचं

उपमुख्यंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 

सुवर्णपदकविजेत्या नीरज चोप्राचं

कौतुक करायला शब्द अपुरे...

 

अजित पवारउपमुख्यमंत्री तथा अध्यक्षमहाराष्ट्र ऑलिंपिक संघटना

 

नीरज चोप्राच्या कामगिरीनं सुवर्णपदकांचा दुष्काळ संपला

देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झालेय...

 

अजित पवारउपमुख्यमंत्री तथा अध्यक्षमहाराष्ट्र ऑलिंपिक संघटना

 

            मुंबईदि. 7 :- टोकियो ऑलिंपिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतलं ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रानं आज इतिहास रचला आहे. सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे. कोट्यवधी देशवासियांची मनं जिंकली आहेत. त्याच्या कामगिरीनं ऑलिंपिक सुवर्णपदकाचा दुष्काळ आज संपला आहे. देशातील मैदानी खेळांच्या सुवर्णयुगाची सुरुवात झालेय. नीरज चोप्राचं मन:पूर्वक अभिनंदनअशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. 

            उपमुख्यमंत्री अजित पवार अभिनंदनपर संदेशात म्हणतात कीनीरज चोप्रानं भालाफेकीत जिंकलेल्या सुवर्णपदकानं पदकतालिकेतंच नव्हे तर जागतिक क्रीडाविश्वात भारताचा गौरव वाढला आहे. नीरज चोप्राचं सुवर्णपदक मैदानीखेळांकडे पाहण्याचा देशवासियांचा दृष्टीकोन बदलेल. मैदानी खेळांना लोकप्रियतावलय मिळवून देईल. भारतीय युवकांना मैदानी खेळांकडे वळण्यासाठी प्रवृत्त करेल. नीरज चौप्राचं सुवर्णपदक त्याच्या सातत्यपूर्णकठोर मेहनतीचं यश आहे. नीरज चोप्राचंत्याच्या सहकाऱ्यांचंप्रशिक्षकमार्गदर्शकचाहत्यांचंही सुवर्णपदकाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नीरज चौप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन अभिनंदन केलं आहे.


 74 व्या बेस्ट दिनी इलेक्ट्रिक बस आणि

पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण

 

इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल

                                   -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

          मुंबई दि 7: कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

          बेस्टच्या 74 व्या दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण, FAME II प्रकल्पातंर्गत 12 मीटर्स लांबीच्या इलेक्ट्रीक बसगाड्या, नविन वातानुकुलीत बस मार्ग क्र.ए-115 आणि ए-116 तसेच 24 इतर गाड्याचे लोकार्पण श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माहिम पश्चिम बसस्थानक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त  प्रकल्प पी.वेलारुस, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, आमदार सदा सरवणकर, नगरसेवक मिलींद वैद्य, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आदी उपस्थित होते.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सन 1874 ते 2021 हा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. वेळेनुसार बेस्टमध्ये बदल होत गेला. इलेक्ट्रीक बस प्रदूषण न करणारी व पर्यावरण पूरक बस आहेत. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण झाल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. आम्ही वचननाम्यात म्हटल्याप्रमाने बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे, असे नियोजन करण्यात येत आहे.  

          कोरोना काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. कोरोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील कारोनाग्रस्त झाले. काहींचे मृत्यू झाले तरीदेखील बेस्ट थांबली नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे बेस्टचे आधुनिकीकरण शक्य होत आहे. यापुढे ई पास सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असून एकाच तिकीटावर अनेक सुविधा मिळणार आहेत.

          गेल्या काही काळापासून निसर्गचक्र बदलते आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. एकेक गोष्टींवरचे निर्बंध आपण सावधगिरी घेऊन शिथिल करतो आहोत. कालच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालक भेटून गेले. त्यांनी वेळेची शिथिलता द्यावी, अशी विनंती केली. लोकलच्या प्रवासासंदर्भात देखील निर्णय घ्यायचा आहे. कोरोना उलटणार तर नाही ना हेही पहावे लागणार आहे. बेस्टच्या कोणत्याही कामात काही अडचण आल्यास सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.

          बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी इलेक्ट्रीक बसच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली. नविन इलेक्ट्रनिक धोरणानुसार 15 टक्के इलेक्ट्रॉनिक व्हेइकल वाढवण्यात येणार आहेत. मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थापनाविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक ॲप विकसीत करण्यात येणार आहे, असेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.  

सेवानिवृत्त एक हजार बेस्ट कर्मचाऱ्यांच्या उपदानाचे प्रदान

          बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान वितरणाचा शुभारंभ श्री.ठाकरे यांच्या हस्ते झाला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात उपदानाची रक्कम थेट जमा होणार आहे. 1005 सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी लागणारी रुपये 94.21 कोटी एवढी रक्कम कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

                         

000


 *'वन मिनिट प्रिंसिपल'* 


*दहा दिवस हा प्रयोग सगळयांनी मिळून करायचा आहे.* एखादी चांगली सवय जी आपल्याला असायला हवी असं मनापासून वाटतंय पण जमतच नाही, कळतंय पण मन वळत नाही असं वाटतंय. *अशी एकच एक सवय, चांगली गोष्ट निवडा.* या सवयीचा अक्षरशः लहानसा भाग ठरवा. लहान किती तर अक्षरशः काहीतरीच काय, फक्त इतकंच असं वाटेल, बालिशपणा वाटेल इतका लहान भाग.

*1. रोज एका पुस्तकाचं एकच पान.*

*2. रोज एकच सुर्यनमस्कार.*

*3. रोज एक योगासन.*

*4. रोज पाच मिनिट मेडिटेशन.*

*5. रोज दोन स्पेलिंग पाठ करणे.*

*6. रोज चांगल्या अक्षरात दोन ओळी लिहिणे.*

असंच.. कितीही ... काहीही..

*या अक्षरशः एका मिनिटाच्या व्रताने पुढे काय बदल होऊ शकेल हे प्रत्यक्ष अनुभवानेच समजून घ्या. रोज दिवसभरात कधीही एकदा तो एक मिनिट ते ठरवलेलं काम करायचंय.*

*21 दिवसात साधारण सवय लागते... त्यामुळे संकल्प 21 दिवसांचाच करा.* 

काय आहे वन मिनिट प्रिसिंपल?

 *Kaizen* 

जपान मध्ये kaizen चा शोध लागला आणि मानवी आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळाली. *Kai म्हणजे बदल आणि झेन म्हणजे शहाणपणा.*

 (Change +Wisdom).

*आयुष्याला आकार देणा-या या जादूच्या तंत्राचा उपयोग करून आपण आपले जगणे आणखी सोपे आणि सहज करू शकतो. वेळेच्या नियोजनात आजवर शिकलेल्या सर्व युक्त्यांपेक्षा अतिशय सोपी युक्ती म्हणजे, *‘वन मिनिट प्रिन्सिपल* ’

Masaaki Imai यांनी 'वन मिनिट प्रिन्सिपल’ चा शोध लावला आणि आज जपान या तंत्राचा अवलंब करत यशाची शिखरे गाठणारा देश ठरला आहे. आपण वेळेच्या नियोजनात अपयशी ठरतो त्याचे कारण सातत्य ठेवण्यात कमी पडतो. त्यामुळे अपराधी भाव येतो तो वाढत वाढत आत्मग्लानीचं रूप घेतो, आपण काही करू शकत नाही आपल्यात जिद्द नाही, आपण एखादे काम करण्यास लायक नाही अशी नकारात्मकता आपल्याला ग्रासून टाकते. अशा वेळी एखाद्या जादूसारखी ती टेक्निक काम करते. मला एका मिनिटात वेळेचे नियोजन शिकवा म्हटले तर मी हा नियम शिकवेन. काय आहे सूत्र? *तर सवयी किंवा आयुष्यातला बदल हा अचानक होत नसून तो सावकाश पण नियोजनपूर्वक शहाणपणाने करायला हवा, सातत्य आणि सराव यासाठी नियमित योजना असते. आत्मविश्वास देणारा हा नियम म्हणजे 60 सेकंद दररोज एखाद्या ध्येयासाठी वापरा.* आपल्याला हसू येईल, विश्वास बसणार नाही पण दररोज एक मिनिट हा चमत्कारासारखे रिझल्ट देतो. काय आहे नियम तर...

 **Every day* 

 *At the same time* 

 *Just for a minute** 

*दररोज ठराविक वेळी फक्त एक मिनिट कोणतेही ध्येयाशी संबंधित एखादे काम पूर्ण करायचे असेल तर व्रत घेतल्यासारखे ते करायचे हे यशाचे सूत्र आपण जाणतो.* पण त्यासाठी एकदम दोन तास, एक तास अशा तासांच्या भाषेत हट्टीपणा करतो आणि मन बंड पुकारते कधीकधी परिस्थितीची साथ नसते. अशा वेळी एक मिनिट फक्त एक मिनिट करायचे आहे हे ठरवताच हसत हसत आपण तयार होतो. मनाची साथ मिळते आणि तेवढा वेळ सहज काढू शकू असा आत्मविश्वास तयार होतो. आता कामाला कृतीला सुरुवात करायची. *एक मिनिट काम करायचे आणि अक्षरश: बाजूला ठेवून द्यायचे. दुस-या दिवशी परत तेच. गंजलेल्या चाकाला रोज एकदा फिरवायचे, बंद पडलेल्या गाडीला रोज एकदा फक्त सुरु करायची, रोज एक पान वाचायचे, रोज पाच ओळी लिहायच्या, रोज एक श्लोक वाचायचा, रोज एक काहीही छोटेसे..*

जमेल? सोप्पय हो नक्कीच!

एकदा मोमेंटम गती मिळाली की ते काम झपाट्याने पूर्ण होईल. हा प्रयोग करून तर पहा, अनुभव घ्या. मी तेच करत आहे, वेळेच्या नियोजनावर रोज थोडसं वाचायचं आणि थोडंसं लिहायचं... हाच माझा नियम.  


*अतिशय महत्वपुर्ण पोस्ट आहे .. आयुष्य बदलुन जाईल .... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻*

Saturday, 7 August 2021


 


 टोकियो ओलम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक, भालाफेकीत नीरज चोप्राने आणले देशासाठी सुवर्ण 😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳

Featured post

Lakshvedhi