Thursday, 5 August 2021

 दिव्यांगांना शक्ती देण्यासाठी

सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता

 - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

·        ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

 

            मुंबई, दि. 05 : दृष्टिहीन असून काम करू शकणारी व्यक्ती असामान्य असते. दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा त्यांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

            नाशिक येथील ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने अंध दिव्यांग बांधवांसाठी निर्मिलेल्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या पुस्तकाचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन करण्यात आले.

            संगणकाची ओळखसॉफ्टवेअरहार्डवेअरडेटा एन्ट्री आदी विषयांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला असून5 भागांतील या पुस्तकाचे लेखन श्री. हेमंत दवे व श्रीमती गौरी कापुरे यांनी केले आहे. या प्रकाशन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरुण बारस्करसंचालक अर्जुन मुद्दामानद अध्यक्ष सौ. कल्पना पांडेउपाध्यक्ष विश्वासराव गायकवाडकोषाध्यक्ष विजया दवे आदी उपस्थित होते.

            संस्थेने ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रिंटिंग करण्यासाठी विभागाकडे मागणी केली असूनत्यास श्री. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अद्ययावत प्रिंटर उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. राज्यातील अंध बांधवांना ब्रेल लिपीतून संगणकाची माहिती देणारे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.मुंडे यांनी राज्य सरकारच्या वतीने ब्लाइंड वेल्फेअर संस्थेचे आभार मानले.

००००


 

परदेश शिष्यवृत्ती योजनेत आणखी 50 जागा याच वर्षी वाढविण्यात येणार

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

·        योजनेच्या निकषात सुधारणा करण्यासाठी बैठक

·        आर्ट्स व डिझाईन विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालये क्यू एस रँकिंगमध्ये 300 मध्ये बसत नसल्याने सब्जेक्टवाईज रँकिंग ग्राह्य धरून दिला जाणार लाभ

           

            मुंबई, दि. 5 : राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी संख्या 75 वरून वाढवून 200 पर्यंत करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असूनआणखी 50 जागांची वाढ याच वर्षीपासून करण्यात येईल तसेच याच शैक्षणिक वर्षात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            परदेश शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या काही निकषात सुधारणा करण्यासंबंधी सह्याद्री अतिगृह येथे श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदमअपर मुख्य सचिव अरविंद कुमारसह सचिव दिनेश डिंगळेआयुक्त प्रशांत नारनवरे यांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            कला शाखेतील फाईन आर्ट्सफिल्म मेकिंगऍनिमेशनडिझाईन आदी विषयात परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात शिक्षण देणारी महाविद्यालय जागतिक क्यू एस रँकिंग च्या 300 मध्ये येत नसल्यामुळे लाभ मिळत नव्हता. त्यामुळे क्यू एस रँकिंग सोबतच क्यूएस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सब्जेक्ट रँकिंगचा पर्याय ग्राह्य धरण्यात यावा, कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही या योजनेतून लाभ देता यावाया अनुषंगाने निकषात बदल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

            महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युरोपियन विद्यापीठांचे आकर्षण आहेपण सोबतच दक्षिण कोरियातील अनेक विद्यापीठे दर्जेदार त्यांच्याकडील शिक्षणामुळे जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी आले आहेतया विद्यापीठांकडे देखील विद्यार्थी आकर्षित होतीलया दृष्टीने काही उपाययोजना करण्याचे यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सुचवले.

            राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेची अर्ज करण्यापासूनची सर्व निवडप्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावीतसेच यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ व प्रशासकीय खर्चाची तरतूद करून देण्यात येईल. यादृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश श्री. धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

 इमाव व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी

निधीपदभरतीबाबत प्राधान्यक्रम ठरवा

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  

            मुंबई दि.5 :- इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसेच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

            वर्षा शासकीय निवासस्थान येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवारमुख्य सचिव सीताराम कुंटे, सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमारविभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्तामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  विकास खारगेवित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीइमाव व बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयासाठी सामजिक न्याय विभागाने सामाजिक न्याय भवनात जिथे जागा उपलब्ध आहेत तिथे जागा उपलब्ध करून द्यावी. विभागाच्या योजनाशिष्यवृत्ती यासह आवश्यक निधी बाबत प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत.

            इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणालेइमाव विभागाच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत असून यासाठी स्वतंत्र आस्थापना, कल्याणकारी योजनांकरितातसेच शिष्यवृत्तीसाठीवसतिगृहांसाठीचे अनुदान तसेच विविध महामंडळांसाठी निर्धारित केलेला निधी मिळावा यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात यावी. 

            यावेळी महाज्योती संस्थेसाठी आकृतिबंधानुसार पदभरतीआश्रमशाळांसाठी आवश्यक पदभरती याबाबतही चर्चा झाली.

०००


 

 [05/08, 17:53] Baby: *🌺लाखातील एक सुन🌺* 


रात्री आठ सव्वा आठची वेळ, अमित ऑफिस मधून घरी परतला व अत्यंत उत्साहाने मुग्धाला आवाज देवू  लागला.

        "मुग्धा, ए मुग्धा, अगं ऐक ना, उद्या संध्याकाळी गेट टुगेदर ठरलं आहे आपल्याकडे. प्रतिक आणि प्रिया आले आहेत गोव्याहून एका लग्नासाठी, फक्त दोनच दिवस आहेत ते इथे मग काय आपल्या अख्ख्या गॅंगलाही आमंत्रण देऊनच टाकलं. 

       अनायसे रविवारच आहे उद्या धम्माल करूया सगळे मिळून. आणि हो, प्रतिकचा खास निरोप आहे तुझ्यासाठी काही तरी अगदी साधा आणि लाईट मेनू ठेव म्हणून. खाऊन खाऊन त्याच्या पोटाचं पार गोडाऊन झालंय म्हणे, असं  म्हणून अमित खळखळून हसला. 

      त्याला असं खुश बघून मुग्धाही सुखावली. खरंच किती दिवसांनी असा दिलखुलास हसतोय हा ? नाहीतर नेहमीच कामाच्या व्यापात नको तेवढा बुडालेला असतो. 

      मैत्रीची जादूच खरं आगळी, सळसळत्या चैतन्याने ओथंबलेलं निखळ निरागस हास्य ही मैत्रीचीच तर देणगी असते ना ?

      बऱ्याच दिवसांनी मैफिल रंगणार होती. एव्हाना अमितचे सगळे मित्र व त्यांच्या बायका ह्या सगळ्यांसोबत मुग्धाची छान घट्ट मैत्री जमली होती आणि नेहमीच्या रुटीनला फाटा देवून कधीतरी फुललेली अशी एकत्र मैफिल म्हणजे फ्रेशनेस आणि एनर्जीचा फुल्ल रिचार्जच. त्यामुळे मुग्धालाही खूप आनंद झाला होता. 

        हा हा म्हणता रविवारची संध्याकाळ उगवली आणि चांगली दहा बारा जणांची चांडाळचौकडी गॅंग अमित व मुग्धाकडे अवतरली. हसणे, खिदळणे, गप्पा टप्पांना अगदी ऊत आला होता. 

       घरात कितीतरी दिवसांनी गोकुळ भरलेलं पाहून अमितचे बाबा, म्हणजेच नानाही खूपच खुश होते. घरी कुणी चार जण आले की घरात काहीतरी उत्सव असल्यासारखंच त्यांना वाटत असे आणि लहान मुलांसारखं अगदी मनमुरादपणे ते सगळ्यांमध्ये सहज मिक्स होत असत. 

       मुग्धाने मस्तपैकी व्हेज पुलाव आणि खास नानांच्या आवडीची भरपूर जायफळ, वेलदोडा व सुकामेवा घालून छान घट्ट बासुंदी असा शॉर्ट, स्वीट आणि यम्मी बेत ठेवला होता.  

        गप्पा तर रंगात आल्याच होत्या पण त्याचबरोबर बासुंदी व पुलाव ह्यावरही यथेच्छ ताव मारला जात होता. 

      सगळेच जण हसण्या - बोलण्यात व खाण्यात मश्गुल असताना अमित जोरात ओरडला, "नाना अहो हे काय, नीट धरा तो बासुंदीचा बाऊल, सगळी बासुंदी सांडवली अंगावर. नविन स्वेटरचे अगदी बारा वाजवले नाना तुम्ही. जा तुमच्या रूम मध्ये जावून बसा पाहू."   

      भेदरलेले नाना स्वतःला सावरत कसेबसे उठले, तशी मुग्धा लगेच त्यांच्याजवळ धावली. "असू द्या नाना, धुतलं की होईल स्वच्छ स्वेटर. काही काळजी करू नका." असं म्हणत त्यांच्या अंगावर सांडलेली बासुंदी तिने हळूच मऊ रुमालाने पुसून घेतली व त्यांना फ्रेश करून त्यांच्या रूम मध्ये घेवून गेली.  

      थोड्याच वेळात मैफिलही संपुष्टात आली व सगळे आपापल्या घरी गेले, तसं प्रेमभराने अमितने मुग्धाचा हात हातात घेतला व म्हणाला, "वा ! मुग्धा, पुलाव काय, बासुंदी काय, तुझं सगळ्यांशी वागणं बोलणं काय, सगळंच अगदी नेहमीप्रमाणे खूप लाजवाब होत गं. 

       खरंच खूप छान वाटतंय आज मला. फक्त एक गोष्ट ह्यापुढे लक्षात ठेव मुग्धा, अशा कार्यक्रमांमध्ये नानांना आता नको इन्व्हॉल्व करत जावू. काही उमजत नाही गं आताशा त्यांना. उगाच ओशाळल्यासारखं वाटतं मग."

     अमितचं बोलणं संपताच इतका वेळ पेशन्स ठेवून शांत राहिलेली मुग्धा आता मात्र भडकली. "हो रे, अगदी बरोबर आहे तुझं. कशासाठी त्यांना आपल्यात येवू द्यायचं ? पडलेलं राहू देत जावूया एकटंच त्यांना त्यांच्या रूम मध्ये, नाही का ?

       मला एक सांग अमित, तू ही कधीतरी नकळत्या वयाचा होताच ना रे ? तू ही त्यांना क्वचित कधीतरी ओशाळवाणं वाटेल असं वागतच असशील, मग तुलाही असं एकटं ठेवायचे का रे तुझे आई बाबा ? नाही ना ?

        लहानपणापासून तर अगदी आता आता पर्यंत कितीतरी वेळा तुला त्यांनी सावरलं असेल.  जन्मदाता बाप, तुला वाढवताना ज्याने रक्ताचं पाणी केलं, प्रेमाने मंतरलेला चिऊ काऊचा घास तुला भरवला.

      वेळ पडली तेव्हा तुझं गच्च भरलेलं नाक स्वतःच्या हाताने स्वच्छ केलं. तू दिलेला शी - सू चा आहेरही कौतुकाचा क्षण समजून सेलिब्रेट केला, तुला फ्रिडम दिलं,  उच्च शिक्षण, उत्तम करियर, परफेक्ट लाईफ दिली आणि तू मात्र ?... असो तुला हवं तसं वागायला फ्री आहेस तू. पण माझंही जरा स ऐकून घे.  

       मी ह्या घरात आल्यानंतर पदोपदी ज्यांची मला साथ लाभली ते म्हणजे नाना. नविन नविन खूप रडायला यायचं. आईची आठवण त्रस्त करायची.

        तू कामात बिझी असायचा, अश्या वेळी माझ्या डोळ्यातलं पाणी टिपून डोक्यावरून मायेचा हात फिरवायचे ते नाना. एखाद्या वेळी आईंचा ओरडा खाल्ल्यावर घाबरलेल्या मला प्रेमाने पाठीशी घालून धीर द्यायचे ते नानाच. कधीतरी उदास वाटलं तर जिवलग मित्र बनून ओठांवर हसू फुलवायचे ते माझे नाना.

       आई गेल्या तसे थोडे खचले आणि वर्षभरात तर वयोमानानुसार आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे मुळे बरेच थकले, गांगरून गेले. अश्या अवस्थेत त्यांना मी दूर लोटायचं ? 

       हे मुळीच शक्य नाही अमित. त्यांचा अपमान मी मुळीच खपवून घेणार नाही. उभं आयुष्य मुलांसाठी वाट्टेल तश्या खस्ता खाऊनही आई वडिलांचा जीव अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील आपल्या पिल्लांमध्येच अडकलेला असतो. 

       पण त्यांच्याही आयुष्यात शेवटचं असं एक नाजूक वळण येतं, जेव्हा त्यांनाही आधाराची गरज भासते. मग अश्या वेळी  काही काळ मुलांनी त्यांची जागा घेऊन त्यांना जरासं सावरलं तर कुठे बिघडलं ?    

        अमितचे डोळे भरून आले. तो नखशिखांत गहिवरला. त्याला त्याची चूक उमगली तसा तो म्हणाला, "मुग्धा, अगं मी काय नानांचा शत्रू आहे का ? पण त्यांच्या अश्या अवस्थेत कुणी त्यांना नावं ठेवलेले किंवा त्यांची टिंगल केलेली मला नाही सहन होणार. बस ह्याच एका कारणामुळे मी डिस्टर्ब झालो आणि निष्कारण ओरडलो त्यांच्यावर."

       "अरे का म्हणून कुणी टिंगल करेल त्यांची ? आपणच जर आपल्या व्यक्तीचा मान ठेवला तर आपसूकच सगळे तिचा मान ठेवतात आणि आपलाही मान वाढतो अशाने, 

       आणि आपणच जर का आपल्या व्यक्तीचा अपमान केला तर इतरांनाही फावतं तसं करायला आणि आपलीही पत कमीच होते अमित."

      अमितला मुग्धाच म्हणणं तंतोतंत पटलं. अनावधानाने का असेना पण त्याचं चुकलंच होतं. नानांना भेटण्यासाठी व्याकुळ झालेला अमित धडपडतच उठला आणि नानांच्या रूम मध्ये शिरला.

       नाना अजूनही जागेच होते. अमितची चाहूल लागताच ते उठून बसले. "अरे अमित तू ? ये बाळा, झोपला नाहिस का अजून ? अरे आताशा हात जरा थरथरतात रे माझे म्हणून मघाशी बासुंदी सांडली अंगावर पण आता नाही हं येणार बाळा तुमच्या मित्रमंडळीत मी."

       नानांनी असं म्हणताच अमितचं अवसानच संपलं आणि नानांना मिठीत घेऊन तो लहान लेकराप्रमाणे रडू लागला. 

       "नाही नाना, असं नका म्हणू. मी चुकलो. उलट यापुढे मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. आतापर्यंत जाणते अजाणतेपणी खूप त्रास दिला मी तुम्हाला पण यापुढे फक्त जीवच लाविन नाना तुम्हाला मी."

      लेकाच्या प्रेमात पुरत्या वाहून गेलेल्या नानांना जणू आभाळच ठेंगणं झालं आणि त्यांच्याही नकळत त्यांच्या डोळ्यातले दोन टपोरे तेजस्वी मोती त्यांच्या मिठीत विसावलेल्या त्यांच्या लेकाच्या खांद्यावर खळकन निखळले. 

       केव्हापासून बापलेकाच्या उदात्त प्रेमाचा सोहळा हृदयात साठवत दारात उभ्या असलेल्या मुग्धानेही गालात हसत समाधानाने डोळे पुसले आणि.. चिमुकले घरही मग आनंदाने हसले….


लेखक-अनामिक.

[05/08, 17:53] Baby: असावे घरटे आपुले छान

 [04/08, 20:28] Baby: ( *खर जिवन Real Life*)


नोकरी करणाऱ्याला वाटतं *धंदा* बरा ,


व्यवसाय करणाऱ्याला वाटतं *नोकरी* बरी , 


घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी *करावं* पण घराबाहेर पडावं ,


एकत्र राहणाऱ्याला वाटतं *वेगळा* राहण्यात *मजा* आहे .


वेगळा राहतो त्याला वाटतं *एकत्र* राहतो त्याला *जबाबदारी* आणि *खर्च* नाही ,


गावात राहणाऱ्याला वाटतं *शहरात* मजा ,


शहरातला म्हणतो *गावातलं आयुष्य साधं सरळ* सोपं आहे ,


*देशात* राहतात त्यांना वाटतं *परदेशी* जावं ,


परदेशात राहणाऱ्याना वाटतं आपण इथे *खूप तडजोड* करतो ,


*केस सरळ* असणारी म्हणते *कुरळे* किती छान ,

कुरळे केसवाली म्हणते किती हा *गुंता*.


*एक* मूल असतं त्याला वाटतं  *दोन* असती तर ,


दोन* असणाऱ्याला वाटतं , *एक वाला मजेत*,


*मुलगी* असली की , वाटतं *मुलगा*  हवा होता ,


*मुलगा* असला की वाटतं *मुलीला माया* असते .


ज्याला *मूल* नसतं , तो म्हणतो *काहीही चालेल*,


नावे ठेवणारे *रामातही दोष* बघतात ,

कौतुक करणारे *रावणाचीही स्तुती* करतात .


*मिळून काय *?*

*नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही* .

मी *बरोबर* आहे , पण *सुखी नाही* दुसरा मात्र *चुकीचा* आहे , तरी *मजेत* आहे .


*किती गोंधळ रे देवा हा?*


*म्हणुन जे आहे ते स्विकार करा आणि आयुष्य आनंदात जगा...*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

[04/08, 20:30] Baby: *देवाघरी जातानाही हात रिकामा नको.*

💫🌪🌪💫🌪🌪💫🌪🌪💫

*आयुष्याचा शेवटचा मुक्काम कुणीही पाहिलेला नाही पण असं म्हणतात की, हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो.*


 *ज्याला आपण कधीही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही मग,*


*ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हातांनी कसे जाणार ?*


 *म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे म्हणजे देवाच्या घरी जाताना, त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल ना...*


: *किती करशील भरवसा या सुंदर नरदेहाचा।*

*अजून तुला कळला नाही फटका या यमाचा।*

          *मृत्यूची नोटीस नसते,समन्स नसते तर डायरेक्ट पकड वाॅरंट असते.*

       कोणत्याही वयामध्ये ते येऊ शकते.मृत्यू राजा,रंक, लहान,थोर स्त्री,पुरूष काहीही पहात नाही.

         यमदूत वाॅरंट घेऊन येतात तेंव्हा 

दुस-या कोणाला ते सही करून घेता येत नाही किंवा तो माणूस घरात नाही असे सांगताही येत नाही.

कारण *वाॅरंट रिसीव्ह करणे हा प्रश्नच नसतो तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात (फास आवळला जातो) यमस्य करूणा नास्ती:भूकेलेल्याला ताटावरून,तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून,शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून,शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते.

मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही.

मग आपल्याला नेतात  कुठे? हा विचार करणारे फार थोडे. (लंडन,अमेरिकेला जाताना पौंड्स,डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते,)

*पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात "पुण्य करन्सी" महत्वाची असते ती जिवंतपणीच जमा करायची असते*

ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही.आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते.

99 व्या वर्षी 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो.         *दागदागिने आणि कॅश लाॅकर मध्येच रहाते,*

*गुरे गोठ्यात रहातात.*

*बरोबर काहीच नेता येत नाही*

तरी जीव नश्वराच्याच मागे लागतो.

अजगर बेडकाला गिळतअसतो आणि बेडुक माशा पकडण्यात रंगून जातो.

सहस्त्रचंद्रदर्शन झालेले *राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात आणि कलावंत करोडो रुपये कमवूनही दहा मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात*.भक्ती बर्वे,पद्मा चव्हाण,मॅरिलीन मनरो,जयश्री गडकर,गणेश भालेराव यांची काय जाण्याची वये होती का?पण *यमाग्रजाने वाॅरंटच* काढले होते.

*बरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात*

या व्यस्त कलावंताना कुठे वेळ होता पुण्यसंचयासाठी? म्हणून श्रीगुरूचरित्रात महाराज सांगतात की वय तरूण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरवसा नाही.ते मातुःश्रींना म्हणाले,

*"आई तू मला सांगतेस की अग्राह्य संन्यास बालपणी,*

     वानप्रस्थानानंतर 

संन्यास घ्यावा

पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का?

" मातुःश्री निरुत्तर झाल्या.

*प्रपंचाबरोबरच आध्यात्मही जवळ केले म्हणजे ज्ञान व सुरक्षितता लाभते!*


 *"नाही भरवसा या घडीचा रे अभिमान धरीसी कोणाचा"*


यासाठी *भंगवताला प्रेम , भक्ती द्या.* मग तो तुमच्या आवडीचा देव,संत चालेल पण *एकच संत,गुरु,देव* पाहिजे: अनेक नको; तुमची श्रद्धा, भाव त्यावर पाहिजे.मग बघा चमत्कार होतो कि नाही.

*"हरि नामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा।*

    *ही हरीनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा"

______________________________

*🌹।। श्री स्वामी समर्थ।। 🌹*

_________________________

Wednesday, 4 August 2021

 सिक्क‍िमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

 

            मुंबई, दि. 4 : सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्क‍िमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी  बुधवारी  (दि. ४) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवनमुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

००००

 

Sikkim CM Calls on Maha Governor

 

            Mumbai Dated 4 : The Chief Minister of Sikkim Prem Singh Tamang called on the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Wednesday (4th Aug)

 .स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या

मानद सल्लागारपदी हेमंत टकले

 

            मुंबईदि. 4 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या मानद सल्लागारपदी विधानपरिषदेचे माजी सदस्य हेमंत टकले यांची नियुक्ती करण्यात आली असून दि. 4 ऑगस्ट रोजी त्यांनी पदभार स्वीकारून कार्यारंभ केला. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक-निंबाळकर यांनी श्री. हेमंत टकले यांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विविध प्रबोधनात्मक उपक्रम आणखी मोठ्या संख्येने आयोजित केले जावेत अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विधानसभा सदस्य श्री. मकरंद जाधव-पाटीलमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवतविशेष कार्य अधिकारी डॉ. अनिल महाजनवि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदानेमा.सभापतीमहाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव महेंद्र काजअवर सचिव संतोष पराडकर उपस्थित होते.

            कुसुमाग्रज प्रतिष्ठाननाशिक तसेच नॅशनल ब्लाईंड असोसिएशनअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदराष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट अशा अनेक संस्थांसाठी श्री. हेमंत टकले यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी २००८ ते २०१४ आणि २०१४ ते २०२० या कालावधीत विधानपरिषद सदस्य म्हणून देखील उल्लेखनीय योगदान दिले आहे. वाचन आणि लेखन हे छंद जोपासलेले श्री. हेमंत टकले हे उत्तमोत्तम साहित्यकृतींचे रसिक मर्मज्ञ आहेत. प्रभावी वक्तृत्व आणि नेटके सूत्रसंचालन ही त्यांची आणखी एक ओळख आहे.

००००

निलेश मदाने

 स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण

महामंडळाची कार्यालय तातडीने सुरू करा

 - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

 

·        ऊसतोड कामगार नोंदणीअधिकारी - कर्मचारी नेमणूक तातडीने पूर्ण करा

·        संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत वसतिगृहांसाठी इमारती भाड्याने मिळवण्याचे निर्देश

            मुंबई, दि. 03 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कार्यालये तातडीने सुरू करावे असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. पुणे व परळी वैजनाथ या दोन ठिकाणी महामंडळाचे कार्यालय स्थापित होणार आहे.

            ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत आदेश देऊन तलाठी व ग्रामसेवक यांच्याकरवी सुरू करावी तसेच ती माहिती साखर कारखाने यांच्याकडूनही उपलब्ध करावी, असे निर्देशही श्री. मुंडे यांनी दिले आहेत.

            ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला गती देऊन संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमारसमाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरेयांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            पुणे व परळी येथे महामंडळाचे कार्यालय सुरू करावेत्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्याची महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी तसेच कार्यालयात लागणारे अन्य कर्मचारी तातडीने उपलब्ध करून घ्यावेत असेही श्री. मुंडे यांनी निर्देशित केले आहे.

वसतिगृह योजनेची अंमलबजावणी

            स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या 20 वसतिगृहांसाठी इमारती उपलब्ध करण्यासाठी संबंधित जिल्हा स्तरावर जाहिराती प्रसिद्ध करून इमारती उपलब्ध करून घ्याव्यात तसेच प्रति वसतिगृह 100 विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक अन्य सामग्री खरेदी करावी असेही निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले. वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या मुलांना नामांकित शाळा/महाविद्यालय येथे प्रवेश मिळावा यासाठी देखील मदत करण्यात येणार आहे.

            ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास भागभांडवल खर्चासाठी नुकताच मंजूर केलेला निधी महामंडळाच्या लेखाशीर्षात वर्ग करून वरील कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

            ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शरद आरोग्य वाहिनीऊसतोड कामगार अपघात विमा योजना आदी काही कल्याणकारी योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेतया योजनांचा प्रस्ताव पूर्ण करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे लवकर पाठवण्यात यावा असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

            ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या रचनेमध्ये संचालक मंडळतसेच आवश्यकतेनुसार कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार असूनसंचालक मंडळात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदमसमाज कल्याण आयुक्तसाखर आयुक्तकामगार आयुक्त हे पदसिद्ध सदस्य असतील तसेच ऊसतोड कामगारांच्या काही प्रतिनिधींची देखील यामध्ये नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती  यावेळी देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi