म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. १२ : विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.
बांधकाम परवानगीसाठी आकारण्यात येणारे विकास शुल्कावरील दंडनीय व्याजाचा दर कमी करणे, म्हाडास उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाच्या सदनिका या संक्रमण शिबिरासाठी वापरणे अथवा सोडतीद्वारे विक्री करणे, विनिमय 33(4) अंतर्गत रहिवाश्यांना अतिरिक्त क्षेत्राचा लाभ देणे व या क्षेत्रावर प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्राचा लाभ देणे यासह विनिमय ३३(५), ३३(७), ३३(९) व ३३ (२४) अंतर्गत सुचविण्यात आलेल्या सुधारणांवर तसेच म्हाडा वसाहतीतील विकास आराखड्यातील आरक्षण, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
No comments:
Post a Comment