Sunday, 18 May 2025

पश्चिम बंगालचे अरुण गोऱाईन, सहाय्यक प्रणाली व्यवस्थापक निलंबित – निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई

 पश्चिम बंगालचे अरुण गोऱाईनसहाय्यक प्रणाली व्यवस्थापक निलंबित

 – निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई

 

मुंबई, 17 : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अरुण गोऱाईनसहाय्यक प्रणाली व्यवस्थापक (ASM), काकद्वीप उपविभाग यांनी स्वपनकुमार हालदारसहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), 131-काकद्वीप विधानसभा मतदारसंघ यांच्या लॉगिन तपशीलांमध्ये बेकायदेशीरपणे आपला मोबाईल क्रमांक समाविष्ट करून काही अर्ज निकाली काढले.

या प्रकरणी श्री.गोऱाईन यांना काकद्वीपचे एसडीओ  आणि ईआरओ यांच्याद्वारे 17 मार्च 2025 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर 24 मार्च 2025 रोजी दिलेल्या उत्तरात त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याचे नमूद करून अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नयेम्हणून उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. त्यांनीझालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.

तथापित्यांनी अधिकृत परवानगीशिवाय दुसऱ्या अधिकाऱ्याच्या लॉगिनमध्ये आपला मोबाईल क्रमांक समाविष्ट करून त्यावर आलेल्या ओटीपीचा वापर करत फॉर्म क्रमांक ६७ आणि ८ वर कारवाई केल्यामुळे ही कृती फसवणूक आणि अप्रामाणिक हेतू दर्शवते. ही कृत्ये केवळ शासकीय कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणाच नव्हे तर जनप्रतिनिधित्व कायदा१९५० च्या कलम ३२ अंतर्गत निवडणूक यादी तयार करण्याच्या कर्तव्यातील उल्लंघन देखील ठरते.

या अनुषंगानेपश्चिम बंगाल सेवा (वर्गीकरणनियंत्रण आणि अपील) नियम१९७१ मधील भाग IV, नियम ७(१)(अ) नुसार श्री.गोऱाईन यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध मोठी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असूनत्यासाठी आवश्यक असलेले आरोपपत्रसाक्षीदारांची विधाने आणि संबंधित दस्तऐवज जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारीदक्षिण २४ परगणा यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

निलंबनाच्या कालावधीत श्री.गोऱाईन यांना त्यांच्या सेवा अटींनुसार निर्वाह भत्ता मिळेलअसे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

000

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi