Thursday, 15 February 2024

अधिकाऱ्यांच्या पद भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

  अधिकाऱ्यांच्या पद भरतीसाठी

अर्ज सादर करण्यास १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

          मुंबईदि. 14 - सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.  भरती प्रक्रिये दरम्यान अर्ज सादर करण्याची मुदत दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावीअसे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. याआधी अर्ज सादर करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत होती.

            महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ पदांच्या एकूण १७२९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ ची १७२९ रिक्त पदांची सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया सुरु आहे. आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (एस-२०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिराती बघण्यासाठी http://arogyamaharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावीमुदतवाढीची सूचना संकेतस्थळावरही आहेयाची नोंद घ्यावीअसे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi