Friday, 16 February 2024

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता

 नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या

१ हजार ८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता

विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

            मुंबईदि. १५ : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १ हजार ८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरिता अमृत टप्पा दोन मधून मलनि:स्सारणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावीअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्य सचिव डॉ. नितीन करीरएनएमआरडीए आयुक्त मनोज सूर्यवंशी उपस्थित होते.

            नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील दक्षिण ब आणि पूर्व अ या भागातील सुमारे २५ गावांमधील मलनि:स्सारणाकरिता ५०० किमी लांबीची मलनिस्सारण वाहिनी अमृत टप्पा २ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये चार मलनि:स्सारण प्रकल्प आणि एक पंप हाऊस यांचा समावेश आहे.

            प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या १ हजार ८८६.९१ कोटीच्या अंदाजपत्रकात कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा तीर्थक्षेत्र विकास टप्पा ३दीक्षाभूमी विकासकर्करोग रुग्णालयहिंगणा क्षेत्रातील मुलभूत सुविधापूर मदत निधीरस्ते विकासप्रधानमंत्री आवास योजनाश्री क्षेत्र धापेवाडा येथे मलनिस्सारण केंद्राचे बांधकामपर्यटन विकास यासारख्या विकासकामांचा समावेश आहे.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi