Tuesday, 19 September 2023

श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या

 श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

 

            मुंबईदि. 18 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ताविघ्नहर्ता श्री गणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरांत धनधान्याची समृध्दी येईल. समाजात आनंदउत्साहभक्तीचैतन्याचं वातावरण निर्माण होईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला आहे. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावाअसे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

            श्री गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतातश्री गणेश चतुर्थी सणालासार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकतेचीसमाजप्रबोधनाचीराष्ट्रभक्तीची,  गौरवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा अधिक वृद्धिंगत करतानाच नागरिकांनी समाजातील सर्वांना सोबत ठेवून गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि आपण सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळेगणपती बाप्पांचा उत्सव त्याच पद्धतीने साजरा झाला पाहिजे. कुटुंबातीलनात्यातीलमित्र परिवारातीलसमाजातील सर्वांनी मतभेदमनभेद विसरुनएकत्र येऊनसमाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आनंदातभक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा.

            राज्यातील काही भागात अजुनही पुरेसा पाऊस पडला नाही. राज्यात चांगला पाऊस पडावाशेतकऱ्यांवरील हे संकट दूर व्हावे. शेतात धान्याच्या आणि घरात धनाच्या राशी याव्यात. यंदाचा गणेशोत्सव शेतकऱ्यांसह आपल्या सर्वांच्या जीवनातसुखसमृद्धीआनंदउत्साहचैतन्य घेऊन येवो. श्री गणरायांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छाआकांक्षा पूर्ण होवोतअशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी श्रीगणरायांच्या चरणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi