मोटेने पाणी काढणारी विहीर तुम्ही पाहिलीए?- ऐतिहासिक जलव्यवस्था पाहण्याची संधी
मोट... हा शब्द आता अनेकांना आठवत नसेल. मग पलान, धाव, थारोळं, पखाल, वाडवान, पायटा हे शब्द खूपच लांबचे. ते मोटेच्या व्यवस्थेतील विविध भागांचे शब्द. मोटेचे महत्त्व असे की, त्याद्वारे उपसलेल्या पाण्यामुळे आपल्या आधीच्या कितीतरी पिढ्यांची शेती फुलली आणि अर्थकारण सुरू राहिले. आता अशा मोटेच्या विहिरी उरल्या नाहीत. ज्या आहेत त्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत.
पण आजही अशी एक विहीर आहे. जिच्यावर मोट बसवली आणि बैलजोडी जुंपली की लागलीच पाणी काढता येईल. तिचे सर्व भाग व्यवस्थित आहेत. मोटेची विहीर नेमकी कशी होती, हे या विहिरीवरून नेमके समजते. ही विहीर आहे, सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी या दोन प्रमुख गावांच्या दरम्यान. तिचे वय भरेल, साधारणत: दोनशे-अडीचशे वर्षे. अशा क्वचितच विहिरी महाराष्ट्रात शिल्लक आहेत. हीसुद्धा किती काळ अशी राहील हे सांगता येत नाही.
ही मोटेची विहीर आणि अशा कितीतरी भन्नाट जलव्यवस्था पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी ‘भवताल’ने दोन दिवसांची इकोटूर आयोजित केली आहे. ती शनिवार-रविवार, १६ व १७ सप्टेंबर २०२३ या काळात होणार आहे. आपला वारसा जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही संधी आहे.
ती तुम्ही घेणार का?
अधिक माहिती व नावनोंदणीची लिंक:
https://bhavatal.com/Ecotour/Watersystems
किंवा
संपर्कासाठी:
9545350862 / 9922063621
जागा मर्यादित असल्याने फार वेळ दवडू नका, हे आवाहन.
- भवताल टीम
Vihir 1.jpg
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9
545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment