Monday, 19 June 2023

काकडी बी चे फायदे.

 काकडी बी चे फायदे.

उत्तर हिंदुस्थानात काकडी, खिरा, बालमखिरा, तरकाकडी, वालूक अशा वेगवेगळय़ा नावाच्या काकडय़ांच्या बिया वाळवून त्यांच्या मगजाचा वापर पौष्टिक म्हणून केला जातो. 

*काकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. 

*मासिक स्त्रावाचा दाह, रक्त फार जाणे, कष्टाने रक्तस्त्राव होणे या तक्रारी मध्ये लाभप्रद.

* लघवी कमी होणे, अडखळत होणे या तक्रारीत बियांचा चांगला गुण येतो.काकडीच्या बियांमधील मगज व मनुका एकत्र वाटून तांदळाच्या धुवणाबरोबर घ्यावे. त्यामुळे लघवीची तिडीक कमी होते. 

*एड्स या गंभीर रोगावस्थेत ज्या स्त्री-पुरुषांना मूत्रेंद्रियांचा दाह होतो, जखम असते. उपदंशाची लक्षणे आहेत त्यांनी काकडीच्या बियांचा वापर वरील प्रकारे करून पाहावा. 

*काकडीच्या बिया या मूत्रवह स्रोते सतत मोकळी ठेवतात. *शरीरात कांती सुधारते. *रक्तामध्ये जोश आणतात. आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात.

* शोष पडणे किंवा खूप तहान लागत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्या. कडकीवर काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्याबरोबर घ्याव्या. कडकी कमी होते.

*काकडीच्या बियांचा वाटून केलेला शिरा फारच पौष्टिक आहे. हिवाळय़ामध्ये वजन वाढविण्याकरिता उपयोग होतो.


* खिरा किंवा खजुराच्या बियांच्या मानाने काकडीच्या बिया कमी पौष्टिक आहेत. पण त्या पित्त कमी करण्याचे कार्य चांगले करतात. 

*काकडीच्या बियांचा वाटून केलेला लेप चेहऱ्याची त्वचा सुधारते. 

*काकडीच्या बिया या उत्साहवर्धक आहेत. शुक्र धातूचे उत्साह वाढविणे, टिकविणे हे कार्य काकडीच्या बिया चांगले पार पाडतात.

* कृश व्यक्तींचा आवाज बसणे या विकारात खिरा या जातीच्या काकडीच्या बिया वाटून मधाबरोबर खाव्या, आवाज सुधारतो. 

*उन्हाळय़ात अंगावर उष्णतेचे फोड उठणे, उबाळू, उन्हाळी ताप या तक्रारींत खिरा, काकडीच्या बियांचे सरबत उत्तम काम देते.




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi