Tuesday, 20 May 2025

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी समुपदेशन कार्यक्रम घ्यावा

 अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी

 समुपदेशन कार्यक्रम घ्यावा

-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबईदि.१९:- अतिरिक्त  ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येते. ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा समुदेशन कार्यक्रम घ्यावाअसे  शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले.

राज्यातील प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस  संचालक (माध्यमिक) श्री. पालकरसंचालक (प्राथमिक) श्री. गोसावीशिक्षण उपसंचालक संदीप संगवेमुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितलेमुंबईत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत समायोजन होण्यासाठी महापालिका व शिक्षण विभागाने एकत्रित बैठक घ्यावी. पती - पत्नी शिक्षक समायोजन संदर्भातील प्रकरणे वेगळी कळवावीत.

या बैठकीत शिक्षक संघटनांनी अतिरिक्त शिक्षक समायोजनअतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन यासह शिक्षकांच्या समस्या मांडल्या. शिक्षक संघटनांनी मांडलेल्या शिक्षकांच्या समस्या सकारात्मकतेने सोडवल्या जातील असेराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

०००००

राज्याचे 'पार्किंग' धोरण लवकरच आणणार

 राज्याचे 'पार्किंगधोरण लवकरच आणणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १९  : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी 'एकात्मिक पार्किंग धोरणआणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईलअशी माहिती परिवहन मंत्री  ‌प्रताप सरनाईक यांनी दिली.

या संदर्भात मंत्रालयात आयोजित मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये श्री. सरनाईक बोलत होते. बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह  एम.एम.आर.डी.ए. मधील सर्व महापालिका आयुक्त उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेएकात्मिक पार्किंग धोरण आणण्याआधी  अंमलबजावणी दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये. यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये  वाहतूक कोंडी समस्येने उग्र रूप धारण केले आहेत्या महापालिका आयुक्तांच्या सूचनाअभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेलतर  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये ते प्रभावीपणे राबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविले असल्याचेही श्री.सरनाईक यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईलअसे  श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले कीप्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईलअशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार वाहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीतरस्ते मोकळे करावेत. विकास आणि सुविधासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत. यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर  महापालिकांनी स्वीकारावेजेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईलअसेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले.

००००

Chief Minister Devendra Fadnavis Releases ‘Shikshanvedh 2047’ Quarterly Magazine

 Chief Minister Devendra Fadnavis Releases ‘Shikshanvedh 2047’ Quarterly Magazine

 

Mumbai, May 20: Maharashtra is actively implementing the National Education Policy, with a strong focus on fostering innovation and research. As part of this initiative, the Department of Higher and Technical Education has launched a new quarterly publication titled ‘Shikshanvedh 2047’. The magazine was officially released today by Chief Minister Devendra Fadnavis ahead of the Cabinet meeting.

 

Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil, other Cabinet members, Chief Secretary Sujata Saunik, and Additional Chief Secretary of the Higher and Technical Education Department B. Venugopal Reddy were present on the occasion.

 

The ‘Shikshanvedh 2047’ quarterly will feature comprehensive coverage of various schemes, initiatives, policies, and success stories of the department. It will also include insights from education experts, inspirational stories of successful students, and updates on emerging trends in the education sector. Additionally, the magazine will provide consolidated information on technical education, higher education, arts education, and library services. The publication aims to serve as a source of inspiration and guidance for students, professors, and all stakeholders in the education sector.

0000

Former Dy CM Chhagan Bhujbal Inducted into the State Cabinet Governor administers Oath of Office to Chhagan Bhujbal

 Former Dy CM Chhagan Bhujbal Inducted into the State Cabinet

Governor administers Oath of Office to Chhagan Bhujbal

 

Mumbai, 19 May :Former Deputy Chief Minister Chhagan Chandrabhaga Chandrakant Bhujbal was today inducted in the Maharashtra State Cabinet as a Minister. Maharashtra Governor C. P. Radhakrishnan administered the oath of office and secrecy to the former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal at a brief oath taking ceremony held at Raj Bhavan Mumbai on Tue (May 20).

Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar, Ministers in the State Cabinet and other invitees were present.

The swearing-in ceremony was attended by Chairman of the Maharashtra Legislative Council Prof. Ram Shinde, Speaker Rahul Narwekar, Cabinet Ministers Dadaji Bhuse, Chandrakant Patil, Chandrashekhar Bawankule, Hasan Mushrif, Narhari Zirwal, Radhakrishna Vikhe Patil, Atul Save, Mangal Prabhat Lodha, Sanjay Rathod, Ashok Uike, Uday Samant, Sanjay Shirsat, Sanjay Rathod, and Dattatraya Bharane, MPs Praful Patel and Sunil Tatkare, Police Commissioner Deven Bharti, Governor's Secretary Dr. Prashant Narnaware, senior government officials, and members of Bhujbal's family.

The oath taking ceremony began with Chief Secretary Sujata Saunik seeking the Governor’s permission to commence the ceremony. The Governor then administered the oath to Chhagan Bhujbal. The Governor presented a bouquet to Bhujbal and congratulated him. Subsequently, Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar also congratulated Bhujbal by presenting him with floral bouquets.

00000

पूर्व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडल में शामिल राज्यपाल ने दिलाई मंत्री पद की शपथ

 पूर्व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मंत्रिमंडल में शामिल

राज्यपाल ने दिलाई मंत्री पद की शपथ

मुंबई20 मई : महाराष्ट्र के राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ने राज्य के पूर्व उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ को मंत्री पद की शपथ दिलाई। उन्हें महाराष्ट्र मंत्रिमंडल में शामिल किया गया है।

मुंबई के राजभवन में आयोजित एक संक्षिप्त शपथ ग्रहण समारोह में विधानपरिषद के सभापति प्रो. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख रूप से उपस्थित रहे।

राज्यपाल राधाकृष्णन ने छगन भुजबळ को पद और गोपनीयता की शपथ दिलाई। इस अवसर पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलजलसंपदा (गोदावरी एवं कृष्णा खोरे विकास महामंडल) मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळउद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंतआदिवासी विकास मंत्री अशोक उईकेइतर मागास बहुजन कल्याण व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावेखेल व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेकौशल विकासरोजगारउद्यमिता व नवाचार मंत्री मंगल प्रभात लोढासामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटमृदा व जलसंधारण मंत्री संजय राठौड़सांसद प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेमुंबई पुलिस आयुक्त देवेन भारतीराज्यपाल के सचिव प्रशांत नारनवरे तथा श्री भुजबळ के परिवारजन उपस्थित थे।

शपथ समारोह की शुरुआत मुख्य सचिव सुजाता सौनिक द्वारा राज्यपाल से अनुमति लेने के साथ हुई। इसके बाद राज्यपाल ने छगन भुजबळ को शपथ दिलाई। शपथ के बाद राज्यपाल ने पुष्पगुच्छ देकर भुजबळ का स्वागत किया। इसके बाद मुख्यमंत्री फडणवीसउपमुख्यमंत्री शिंदे और उपमुख्यमंत्री पवार ने भी पुष्पगुच्छ देकर उन्हें बधाई दी।

आज मंत्रीपदाची शपथ घेतलेले मा. श्री.छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

 आज मंत्रीपदाची शपथ घेतलेले

मा. श्री.छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय

 

जन्म :- १५ ऑक्टोबर १९४७.

जन्म ठिकाण :- नाशिक.

शिक्षण :- एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).

ज्ञात भाषा  :-  मराठीहिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती :-  विवाहितपत्नी श्रीमती मीना.

अपत्ये :- एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय :- शेती.

पक्ष  :-  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

मतदारसंघ :- ११९ - येवलाजिल्हा-नाशिक.

इतर माहिती :- संस्थापक-अध्यक्षमुंबई एज्युकेशनल ट्रस्टबांद्रामुंबईमाजी विश्वस्तव्हि. जे. टी. आय. संस्थामुंबईविश्वस्तनायर रुग्णालयविश्वस्तप्रिन्स आगा स्थान रुग्णालयमुंबईसंस्थापकमहात्मा फुले समता परिषदया संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलितमागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेचमहात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकरशाहु महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटी दरम्यान महात्मा फुले यांनी लिहिलेल्या "गुलामगिरी" या पुस्तकाचा "स्लेव्हरी" हा अनुवादीत ग्रंथ भेट दिलामाजी विश्वस्तमुंबई पोर्ट ट्रस्ट१९८५ "दैवत" व १९९०"नवरा बायको" या मराठी चित्रपटांची निर्मिती१९७३ सदस्य१९७३-८४ विरोधी पक्षनेते१९८५ व १९९१ महापौरमुंबई महानगरपालिकायाकाळात गृहनिर्माणझोपडपट्टी सुधारणामुंबई शहराचे सौंदर्यकरणचौकांचे सुशोभिकरणहुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले१९९१ अध्यक्षऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स१९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य१९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरतजून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यसंस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्षराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष१९८५-९०१९९०-९५२००४-२००९२००९-२०१४२०१४-२०१९ सदस्यमहाराष्ट्र विधानसभा १९९६-२००२ व २००२-२००४ सदस्यमहाराष्ट्र विधानपरिषदः डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ महसूल खात्याचे मंत्रीमार्च १९९३ ते मार्च १९९५ गृहनिर्माणगलिच्छ वस्ती सुधारघरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री१९९६-१९९९ विरोधी पक्ष नेतेमहाराष्ट्र विधानपरिषदः ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्रीनोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ मुंबई शहराचे पालकमंत्रीजानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृह मंत्रीनोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्रीनोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्रीया काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तु उभी केलीऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवडः जानेवारी २०२० मध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीनोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड

 

छंद :- क्रिकेटचित्रपटवाचन व प्रवास

 

परदेश प्रवास :- १९८० आणि १९८६ मध्ये अमेरिकाफ्रान्सइंग्लंडजर्मनीनेदरलैंड आणि रशिया या देशाचा अभ्यास दौरा१९९१ मध्ये ओसाकाजपान येथे जागतिक महापौर परिषदेसाठीच्या शिष्टमंडळासमवेत सहभागऑक्टोबर २००० मध्ये फ्रान्सजर्मनी व इंग्लंडदुबईमस्कतअबुधाबीकॅनडा, फ्रान्सनेदरलँडबेल्झिअम व स्वित्र्झलँड इत्यादी देशांचा अभ्यास दौरायाच दौऱ्यात लंडन मधील स्कॉटलैंड वार्ड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चाः २८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्युयॉर्कजिनिव्हालंडन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा तसेच ऑस्ट्रियास्वीडननॉर्वेस्पेन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.

                                                        0000000

 

 

 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश

 राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

 

 

मुंबईदि. 20 :  महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ  यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली.

 

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे  झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ  यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळउद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेइतर मागास बहुजन कल्याणदुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावेक्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेकौशल्य विकास, रोजगार  उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढासामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेलसुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे,तसेच मंत्री  छगन भुजबळ यांचे कुटूंबीय यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी श्री.भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील श्री.भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Featured post

Lakshvedhi