Tuesday, 20 May 2025

Maharashtra Governor condoles demise of renowned scientist Dr Jayant Narlikar

 Maharashtra Governor condoles demise of renowned scientist Dr Jayant Narlikar

 

Mumbai, 20th May : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan has expressed grief over the demise of renowned astrophysicist Padma Vibhushan Dr. Jayant Narlikar in Pune.

 

In a condolence message, the Governor stated:  “I am deeply saddened to learn about the passing of Dr. Jayant Narlikar — a towering figure in the field of astrophysics, an author and an advocate of science popularization. As the founder of IUCAA in Pune, Dr. Narlikar made immense contributions to the advancement of scientific research and education in India. Dr. Narlikar had a rare gift of making complex scientific ideas accessible to the common man. Through his science fiction, short essays and newspaper articles, he inspired generations of young minds to pursue science. With his passing, the nation has lost a visionary sage scientist. I convey my condolences to the members  of the bereaved family."

डॉ. जयंत नारळीकर एक महान विज्ञान तपस्वी - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

डॉ. जयंत नारळीकर एक महान विज्ञान तपस्वी

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. २० : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञलेखक आणि विज्ञान प्रसारक पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. पुण्यातील 'आयुकासंस्थेचे संस्थापक असलेल्या डॉ. नारळीकर यांनी विज्ञान कथालघु निबंध व वृत्तपत्रातील लेखांच्या माध्यमातून विज्ञान विश्वातील नवनवीन घडामोडी व संशोधन जनसामान्यांसमोर आणले. कठीण वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजून सांगण्याची त्यांच्याकडे हातोटी होतीअसे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'शिक्षणवेध २०४७' त्रैमासिकाचे प्रकाशन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

'शिक्षणवेध २०४७त्रैमासिकाचे प्रकाशन

 

मुंबईदि. २० : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या धोरणाच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनास अधिक चालना  देण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षणवेध २०४७’ हे त्रैमासिक सुरू करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी  या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलमंत्रिमंडळातील सदस्यमुख्य सचिव सुजाता सौनिक आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी उपस्थित होते.

शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाच्या माध्यमातून विभागाच्या विविध योजनाउपक्रमधोरणेयशोगाथा,  शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे विचारयशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नवप्रवृत्तींचाही समावेश असणार आहे. तसेच  तंत्रशिक्षणउच्च शिक्षणकला शिक्षण आणि ग्रंथालय संचालनालय या विभागांची एकत्रित  माहिती वाचकांना उपलब्ध होणार आहे. शिक्षणवेध त्रैमासिक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक 

व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक कंपनीने डिजिटल इंडिया साकारण्यात योगदान द्यावे

 व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक कंपनीने

डिजिटल इंडिया साकारण्यात योगदान द्यावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. १९ : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील नोंदणी (लिस्टिंग) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानाहून ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीसन १९९७ मध्ये व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक कंपनीची सुरुवात नागपूरमध्ये अविनाश शेंडे आणि सचिन पांडे यांनी केली. छोट्या स्वरूपात सुरू झालेली ही कंपनी भारताच्या आयटी क्षेत्रात एक मोठी शक्ती बनली आहेयांचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे. कंपनीची  देशात १६ ठिकाणी व विदेशात तीन ठिकाणी कार्यालय आहेत.या कंपनीला मिहान नागपूर येथील येथे १० एकर जागा मिळाली असून येथील मोठ्या प्रमाणात उद्योग विकास होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा,१५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

 परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

 

मुंबई दि. १९ :-  परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी - कर्मचाऱ्यांना मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागातील ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावीतसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात परिवहन विभागातील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या (IMV) ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या.

बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन आयुक्त विवेक भीमनवारसहसचिव राजेंद्र  होळकर आदी उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणालेऑनलाइन  बदल्या करतांना अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या  विशेषतः महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्याही प्राध्यान्याने सोडवाव्यात. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑनलाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी, असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. तसेच यावेळी मागील वर्षी राबविलेल्या ऑनलाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला.

१.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मुंबईची क्षमता

 १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मुंबईची क्षमता

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी साधला विदेश सचिवांशी संवाद

मुंबईदि. १९ : चौथ्या मुंबईतील वाढवण बंदर हे जेएनपीटी पेक्षा तीन पटीने मोठे असून आता वाढवण बंदर हे जगात पहिल्या प्रमुख दहा बंदरात गणले जाणार आहे. त्यामुळे हे बंदर पुढील २० वर्षात नवीन अर्थव्यवस्था निर्माण करेल. एकट्या मुंबईत सध्या १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१३-१४ या तुकडीच्या भारतीय विदेश सेवेतील १४ अधिकाऱ्यांशी सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीराजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव सीमा व्यास आदी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमुंबईच्या विकासासाठी बंदराचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी कोस्टल मार्ग तयार करण्यात येत आहे. अटल सेतूमुळे तिसरी मुंबई तयार होत आहे. त्याचबरोबर आता मुंबईत ‘एज्यूसिटी’ तयार करण्यात येत आहे. या एज्यूसिटीत देशातील १२ विद्यापीठ असतील. ही ‘एज्यूसिटी’ २०० एकर जागेवर उभी करण्यात येणार असून यामध्ये अंदाजे १ लाख विद्यार्थी शिक्षण घेतील. तसेच ३०० एकर जागेवर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईला तंत्रज्ञानामध्ये सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी १००० एकर जागेवर नॉलेज सिटी उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षात संपूर्ण बदललेली मुंबई दिसेल.

विदेश सचिव आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या संवादात विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या जागतिक स्तरावरील गुंतवणूक संधीपरराष्ट्र धोरणाशी संबंधित राज्याचा सहभागविकसित भारत तसेच महाराष्ट्रातील विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांविषयी विचारविनिमय झाला.

कृषि कर्ज पुरवठ्याचे 100 टक्के उद्द‍िष्ट पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 कृषि कर्ज पुरवठ्याचे 100 टक्के उद्द‍िष्ट पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीकृषी कर्ज पुरवठ्याचा विषय बँकांनी गांभीर्याने घ्यावा. तसेच कृषी कर्ज पुरवठ्याचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे. उद्योजकांना विशेषतः महिला उद्योजकांना बँकांनी सहकार्य करावे. महामुंबई क्षेत्रातही कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा. या क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगेसचिव डॉ. श्रीकर परदेशी राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष आदेश पांडेसर्व विभागांचे सचिववरिष्ठ अधिकारी आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीचे सदस्य आणि विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi