Saturday, 3 May 2025

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक

 भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


मुंबई दि. २ : भारतीय संगीत क्षेत्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेला बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर विस्तारीत करत असताना स्पॉटीफायसारखी संगीत क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी निश्चितच सहाय्यक ठरणार असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.


बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित "वेव्हज २०२५ दृकश्राव्य मनोरंजन समिट " मध्ये स्पॉटीफाय ग्लोबलच्या मुख्य सार्वजनिक व्यवहार अधिकारी आणि व्यवसाय अधिकारी डस्टी जेनकिन्स यांच्यासोबत स्पॉटीफाय इंडियाच्या एमडी अमरजित सिंग बत्रा आणि गव्हर्नमेंट अफेयर्स इंडियाच्या संचालक विनीता दीक्षित यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे सचिव डॉ पी.अनबळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आणि संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पॉटीफायने संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवला आहे. भारतीय संगीत आणि कलाकारांना विस्तृत व्यावसायिक व्यासपीठाची संधी स्पॉटीफाय सोबत प्राप्त होईल,ही निश्चितच स्वागतार्ह बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


 डस्टी जेनकिन्स म्हणाल्या की, स्पॉटिफाय गेली सहा वर्षे भारतात कार्यरत आहे. भारत हा आमच्यासाठी सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे आणि आम्ही येथील समृद्ध संगीत परंपरेशी आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत.


गेल्या वर्षी स्पॉटिफायने जागतिक स्तरावर संगीत उद्योगाला १० अब्ज अमेरिकी डॉलर वितरित केले. जसे आपण ऑलिंपिकमध्ये खेळाडूंना स्टार्सप्रमाणे गौरवतो, तसेच आम्हाला भारतातील संगीत कलाकारांसाठीही असा आदर आणि ओळख निर्माण करायची आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला विविध माध्यमातून पाठिंबा दिला आहे आणि आम्ही ही भागीदारी भविष्यातही सुरू ठेवू इच्छितो, असे सांगून डस्टी जेनकिन्स म्हणाल्या की, लोकांमध्ये असा समज आहे की टेलर स्विफ्ट स्पॉटिफायवर सर्वात जास्त फॉलो केलेली कलाकार आहे. मात्र, खरे पाहता भारताचा अरिजीत सिंग हा स्पॉटिफायवर सर्वाधिक फॉलो केलेला कलाकार आहे – हे भारतीय संगीताच्या जागतिक प्रभावाचे उदाहरण आहे.


तसेच भारत सरकार कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून 'इज ऑफ डुइंग बिझनेस' सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे. भारतीय संगीताचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा, अशी इच्छा असल्याचे डस्टी जेनकिन्स यांनी यावेळी सांगितले.


००००

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 

मुंबईदि. २ : सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स फैसल बिन बंदर बिन सुलतान अल सऊद यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेव्हज परिषदेदरम्यान सदिच्छा भेट घेतली.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेक्रिएटिव्ह उद्योगांतर्गत येणाऱ्या गेमिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. गेमिंगबाबतची बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यातील गेमिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सौदीबरोबर काम करण्यास आपण उत्सुक आहोत.  गेमिंग आणि ई-स्पोर्ट संदर्भातील मार्गदर्शक तत्वे तयार करून या क्षेत्रात भागीदारी करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे चेअरमन प्रिन्स फैसल बिन बदर बिन सुलतान अल सऊद यांनी सौदीमध्ये ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची यावेळी माहिती दिली. सौदीच्या विकासात ई-स्पोर्ट आणि सॅव्ही गेम यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आशियाई देशांमध्ये गेमिंगचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात महाराष्ट्रासोबत काम करण्यास सौदी उत्सुक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

---०००---

Maharashtra and Gujarat State Foundation Day Celebrated in Maharashtra Raj Bhavan

 Maharashtra and Gujarat State Foundation Day

Celebrated in Maharashtra Raj Bhavan

           

The State Foundation Days of Maharashtra and Gujarat were jointly celebrated in the presence of Maharashtra Governor and Chancellor of Universities C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Thursday (1 May).

The programme was organised as part of 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative by Maharashtra Raj Bhavan in association with the Savitribai Phule Pune University (SPPU) and the Music Department of BMC.

Students of the University performed traditional folk dances like Koli, Waghya Murali, and Dindi, while artists from the Brihan Mumbai Municipal Corporation's Music Department presented a Powada.

Girl students of the University also performed the traditional Gujarati Tippani dance and sang the Gujarat state song, "Jay Jay Garvi Gujarat."

Short films showcasing the history, heritage, folk art, and culture of both states were screened during the event.

The Governor felicitated Vice-Chancellor Dr. Suresh Gosavi and presented certificates to the participating students.

Pro-Vice-Chancellor of SPPU Dr. Parag Kelkar, Deputy Secretary to the Governor S. Ramamoorthy, management committee members, cultural coordinators and students were present.

Secretary to the Governor Dr. Prashant Narnavare delivered the welcome speech, while Under Secretary (Education) Vikas Kulkarni proposed the vote of thanks.

0000

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक

 महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

महाराष्ट्र राजभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिवस

           

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागविण्यात अनन्यसाधारण असे योगदान आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये निर्माण झाली तरी उभय राज्यांचा आत्मा एकच आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

केंद्र सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमांतर्गत महाराष्ट्र तसेच गुजरात या दोन राज्यांचा राज्य स्थापना दिवस राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत  राजभवन मुंबई येथे गुरुवारी (दि. १ मे) साजरा करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.  

महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी भारताला अनेक महान राष्ट्रपुरुष दिले असून आज त्यांची ओळख त्यांच्या मूळ राज्यापुरती मर्यादित न राहता राष्ट्रव्यापी झाली आहे. महाराष्ट्र भूमीचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाकरिता आदर्श आहेततर गुजरातचे सुपुत्र महात्मा गांधी यांचे अहिंसेचे तत्वज्ञान आज संपूर्ण जगाकरिता मार्गदर्शक ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात लोकशाही रुजविण्यात मोठे योगदान दिले. आज गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र व तामिळनाडूच्या संबंधांचा ऐतिहासिक दाखला देताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडू येथील जिंजीवेल्लोर येथील किल्ले जिंकले होते तसेच तिरुवन्नामलै येथील शिव मंदिराची प्रतिष्ठापना करून धर्म रक्षणाचे कार्य केले होतेअसे सांगितले. तंजावर येथील भोसले राजांनी आपल्या 'सरस्वती महालग्रंथालयात दुर्मिळ असे तामिळ साहित्य जपून ठेवले. या सांस्कृतिक एकीमुळे आज भारत महान राष्ट्र झाले आहे असे सांगताना देश आपली एकात्मता यापुढेही कायम राखत जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र होईलअसा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

विविध धर्म व पंथांचे पंथाचे लोकविभिन्न भाषा बोलणारे लोक या देशात राहत असून देखील भारत एकसंध राष्ट्र कसे आहे असा अनेक जागतिक नेत्यांना प्रश्न पडतो. परंतु भिन्न भाषाभिन्न पोशाख व भिन्न खाद्य संस्कृती असली तरी देखील या देशाला धर्म व संस्कृतीचे अधिष्ठान आहेअसे सांगून एकात्मतेचे हे अधिष्ठान जपत भारत विकसित राष्ट्र होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे लोकनृत्य व गीते यांचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत विभागातील शिक्षक - कलाकारांनी देखील यावेळी एक पोवाडा सादर केला. 

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कोळी नृत्यवाघ्या मुरळी व दिंडी नृत्य ही राज्याची तर तिप्पाणी हे लोकनृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी 'जय जय गरवी गुजरातहे राज्यगीत देखील सादर केले. राज्य स्थापना दिवस कार्यक्रमात महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांचा इतिहासवारसालोककला व संस्कृती दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (शिक्षण) विकास कुलकर्णी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ पराग केळकरराज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्यकला दिग्दर्शक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश

 महाराष्ट्रासह 11 राज्यांना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) निर्देश

 

नवी दिल्ली 2 : यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेताराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्रासह 11 राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बलबेघरवृद्धलहान मुले आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. वर्षे 2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे देशभरात 3,798 मृत्यू झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीतून समोर आले. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) निवारापिण्याचे पाणीवैद्यकीय सुविधा आणि कामाच्या वेळांमध्ये बदल यासारख्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्रपंजाबहरियाणाउत्तर प्रदेशबिहारझारखंडपश्चिम बंगालओडिशाआंध्र प्रदेशतेलंगणा आणि राजस्थान या राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सांगितले आहे. आयोगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत उष्म्याशी संबंधित आजारांवर उपचारसार्वजनिक ठिकाणी पंखेपिण्याचे पाणी, ORS आणि सावलीची व्यवस्थातसेच कामगारांसाठी संरक्षक कपडे आणि विश्रांतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत: वसाहती आणि कामगार वस्त्यांमधील कुटुंबांना पंखेथंड छताचे साहित्य आणि ORS ची पाकिटे देण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

आयोगाने राज्यांना विद्यमान मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि एनडीएमए (NDMA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बलबेघर आणि उघड्यावर काम करणाऱ्या व्यक्तींवर उष्णतेचा होणारा परिणाम कमी होण्याची अपेक्षा आहे

मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करा

 मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करा

- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

  मुंबईदि. 2 : आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याचा अहवाल 30 मे 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

 

  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी बांधवांच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेकोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशीमुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

 

खाद के साथ लिंकिंग पाए जाने पर होगी कानूनी कार्रवाई

 खाद के साथ लिंकिंग पाए जाने पर होगी कानूनी कार्रवाई

– कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबई2 मई: कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे ने निर्देश दिए हैं कि किसी भी प्रकार से खाद के साथ लिंकिंग (अन्य उत्पादों के साथ अनिवार्य रूप से बेचना) पाए जाने पर तुरंत कानूनी कार्रवाई की जाए।

 

राज्य के थोक और खुदरा खाद विक्रेताओं की माफदा’ नामक संस्था द्वारा शुरू किए गए खाद क्रय बंद आंदोलन के संदर्भ में सह्याद्री अतिथिगृह में बैठक आयोजित की गई। इस बैठक में कृषि विभाग के प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीकृषि संचालक सुनील बोरकरखाद आपूर्तिकर्ता और उत्पादक कंपनियों के प्रतिनिधिमाफदा सदस्य और कृषि विभाग के अधिकारी उपस्थित थे।

 

कृषि मंत्री कोकाटे ने कहा कि खाद विक्रेताओं को किसी भी लिंकिंग वाले खाद की खरीद नहीं करनी चाहिए। अगर उन पर दबाव डाला जाए तो वे इसकी शिकायत कृषि विभाग से करें। तालुका और जिला स्तर पर भी कृषि विभाग को इस संबंध में सख्त निरीक्षण करने के निर्देश दिए गए हैं।

 

खाद उत्पादक कंपनियों के प्रतिनिधियों ने बैठक में यह आश्वासन दिया कि भविष्य में किसी भी प्रकार की लिंकिंग नहीं की जाएगी। माफदा’ संस्था ने कृषि मंत्री का आभार जताया और आंदोलन समाप्त करने की घोषणा की। माफदा’ अध्यक्ष विनोद तराळ और सचिव बिपिन कासलीवाल ने संघ का पक्ष रखा।

 

श्री विनोद तराळ ने कहा कि यदि कंपनियों द्वारा लिंकिंग के माध्यम से खाद की आपूर्ति की जाती हैतो सरकार को इस पर कड़ी कार्रवाई करनी चाहिए। इस संदर्भ में खाद उत्पादक कंपनियों के प्रतिनिधि और फर्टिलाइजर एसोसिएशन ऑफ इंडिया के सचिव डी. रामकृष्ण और महाराष्ट्र शाखा के प्रतिनिधि सुरेश शेटे ने उत्पादकों का पक्ष प्रस्तुत किया। उन्होंने सब्सिडी वाले खाद की स्थिति और मिट्टी की उर्वरता बनाए रखने हेतु जैविकसेंद्रिय और नैनो खाद के उपयोग पर सरकार की नीति की जानकारी दी।

0000

Featured post

Lakshvedhi