Saturday, 3 May 2025

मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करा

 मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करा

- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

  मुंबईदि. 2 : आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून याचा अहवाल 30 मे 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

 

  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी बांधवांच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलारआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेकोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशीमुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

 

आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा - पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही बालक कुपोषित राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी 30 मे पर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणालेमुंबई उपनगर जिल्ह्यात 222 आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांचे सर्वेक्षण होऊन बरेच वर्ष झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या पाड्यांचे सर्वेक्षण करावे व याबाबतचा अहवाल कोकण विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सादर करावा. आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जनमन योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभापासून एकही आदिवासी बांधव वंचित राहू नये. आभा योजनावनपट्टेतसेच इतर केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती लाभार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे यासाठी सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे. आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी सी. एस. आर. च्या माध्यमातून आदिवासी‍ औद्योगिक समूह तयार करण्यात येणार आहेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”निमित्त 'दिलखुलास' 'जय महाराष्ट्र'

 टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीकनिमित्त

'दिलखुलास' 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात

अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची मुलाखत

 

मुंबईदि. २ : महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनाने ५ ते ९ मे २०२५ दरम्यान टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीं आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले आहे.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या विषयावर अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 'दिलखुलासकार्यक्रमात ही सोमवार दि.५मंगळवार दि.६ आणि बुधवार दि. ७ मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ६ मे २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.०० वा. प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

 

महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनातर्फे टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असलेली टेक वारी म्हणजे पहिली डिजिटल वारी असून याची सुरूवात मंत्रालयातून होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची प्रयत्न करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासकीय कामामध्ये कुशलता वाढवून कामांची गुणवत्ता वाढवणेसमाजाप्रती आपले उत्तरदायित्व जोपासणेकमी कालावधीत अधिक अचूक काम करणे व लोकाभिमुख असणे आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या Integrated Government online Training (iGOT) प्रणालीवर प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने 'दिलखुलासव 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून या कार्यक्रमाचे स्वरूप आणि पार्श्वभूमीयाविषयी अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी माहिती दिली आहे.


खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई

 खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास

कायदेशीर कारवाई

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

    

मुंबईदि. 2 : कोणत्याही स्वरूपात खतासोबत लिंकिंग केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

              सह्याद्री अतिथीगृह येथे घाऊक व किरकोळ खत विक्री करणाऱ्या राज्यातील सर्व विक्रेत्यांच्या ‘माफदा’ या संघटनेमार्फत पुकारलेल्या खत खरेदी बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीकृषी संचालक सुनिल बोरकरखत पुरवठादार,उत्पादक कंपन्या व ‘माफदा’ संघटनेचे सदस्य यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले कीखत विक्रते यांनी लिंकिंगचे कोणतेही खत खरेदी करू नये व सक्ती झाल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. तालुका व जिल्हापातळीवर देखील याबाबत कृषी विभागाने सक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश यावेळी कृषीमंत्री यांनी दिले.

           खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील यापुढे कोणत्याही स्वरूपात लिंकिंग न करण्याचे आश्वासन बैठकीत उपस्थित विक्रेता संघटना व विभागाला दिले. ‘माफदा’ संघटनेमार्फत कृषिमंत्री यांचे आभार मानण्यात आले. यावेळी महाराष्ट्र खते, कीटकनाशके बियाणे विक्रेते संघटनेने (माफदा) खत खरेदी बंदचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. ‘माफदा’ संघटनेच्या वतीने अध्यक्ष विनोद तराळ व सचिव बिपिन कासलीवाल यांनी संघटनेचे म्हणणे मांडले.

            श्री विनोद तराळ यांनी सांगितले की, कंपन्यांच्याद्वारे लिंकिंगमध्ये खतपुरवठा होत असल्यास त्यावर शासनाने कठोर भूमिका घ्यावी. याअनुषंगाने खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया या उत्पादकांच्या संघटनेचे सचिव डी रामाकृष्ण व महाराष्ट्र शाखेचे प्रतिनिधी सुरेश शेटे यांनी खत उत्पादक कंपन्यांची बाजू मांडली. अनुदानित खतांबाबतची स्थिती तसेच जमिनीची सुपीकता राखण्यासाठी सेंद्रिय, जैविकनॅनो खते वापरण्यासंदर्भातील धोरणाबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदीत पारदर्शकतेसाठी केंद्रिकरणावर भर

 महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदीत पारदर्शकतेसाठी केंद्रिकरणावर भर

– सचिव निपूण विनायक

 

मुंबईदि. 2 : महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे कार्य अधिक गतिमान करण्यात यावे जेणेकरून रुग्णांना वेळेवर औषधे व वैद्यकीय सामग्री उपलब्ध होऊ शकतीलअसे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्राधिकरणामार्फत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. रुग्णसेवेत गुणवत्ता व औषध पुरवठ्यात गती साधण्यासाठी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत सुधारणा यावर चर्चासत्रात भर देण्यात आला.

यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाडमहाव्यवस्थापक स्नेहल किस्वे मुख्य लेखाधिकारी विक्रमसिंह यादवमहाव्यवस्थापक डॉ. संजीवकुमार जाधव यांच्यासह औषध व वैद्यकीय सामग्री उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सचिव निपूण विनायक यांनी यावेळी सांगितले कीतामिळनाडू राज्याच्या धर्तीवर औषधांसाठी एक वर्ष व वैद्यकीय उपकरणांसाठी दोन वर्षांच्या कालावधीचे टेंडर काढण्यात येणार आहेत. यामुळे पुरवठा प्रक्रियेत स्थिरता येईल व रुग्णसेवा अधिक गतिमान होईल. त्यांनी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत समन्वय व पारदर्शकता असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत उपस्थित प्रतिनिधींकडून मते जाणून घेतली

प्रत्येक जिल्ह्यात औषध साठवणूक करण्यासाठी वेअरहाऊसची उभारणी करण्यात येणार असूनप्राधिकरणाचे mmgpa.maharashtra.gov.in या संकेतस्थळामुळे उत्पादक कंपन्यांसाठी व्यवहार सुलभ होतील.

औषध पुरवठ्यामध्ये एका कंपनीची मक्तेदारी होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार असूनविविध जिल्ह्यांमध्ये औषधाचे दर व गुणवत्तेचे प्रमाण राखण्यासाठी स्टँडर्ड इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

औषध पुरवठादारांची मते जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल औषध उत्पादक कंपनी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. श्री. महेश आव्हाड यांनी आभार मानले


महाऍग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश करावा

 महाऍग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणीमध्ये

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश करावा

- कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

मुंबईदि. 2 : पीक घेताना कोणत्या पिकाची पेरणी केली तर फायदा होवू शकतो. आपल्या क्षेत्रात कोणत्या पेरणी केलेली आहे याची माहिती शेतकऱ्यांना होण्यासंदर्भातील तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे असून महाऍग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश होणे गरजेचे आहे, असे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

         महाऍग्रीटेक प्रकल्प अंमलबजावणी संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीमायक्रो नेट सोल्युशनचे धीरज मेहेरा, कृषी विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

            कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, पीक उत्पादन व उत्पन्न अंदाज, उपग्रह आधारित पीक क्षेत्र, उत्पन्नाचे अंदाज व नियोजन  करणेउपग्रह प्रतिमा वापरून पीक व साठ्याचे मॅपिंग करणेपीक नुकसानहानीचे मूल्यांकनपिकाच्या वाढीचा कालावधी टिपणेपेरलेली पिकेपर्यायी पीकयोग्यता विश्लेषण या बाबींसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी विविध संस्थाकडून त्यांच्या यंत्रणांची काम करण्याची क्षमता पाहून धोरणात्मक निर्णय घेवून अद्यावत प्रणाली विकसित करण्यात येईल असेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.


Padma Awardees from the State Honored by Maharashtra Governor

 Padma Awardees from the State Honored by Maharashtra Governor

Posthumous Honours for Manohar Joshi and Pankaj Udhas;

Achyut Palav, Ashok Saraf felicitated for Padma Shri

 

Mumbai, 2nd May : Padma awardees and other national awardees from Maharashtra were felicitated at the hands of Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at a programme held at Raj Bhavan Mumbai on Fri (2 May).

 

The felicitation ceremony was organized by the Vasantrao Naik Rural Development and Agricultural Research Foundation.

 

Unmesh Joshi, the son of Padma Bhushan awardee former Chief Minister Manohar Joshi accepted the honour meant for his late father. The honour for Pankaj Udhas was accepted by the wife of the late playback singer.

 

Calligrapher Achyut Palav and actor Ashok Saraf accepted the honour in person. The recipient of the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar Kareena Thapa from Amravati was also honored by the Governor.

 

The felicitation for the social worker Chaitram Pawar, flautist Ronu Majumdar, and renowned doctor Vilas Dangre – all Padma Shri awardees - were accepted by members of their family.

 

Minister of State for Industries Indranil Naik, President of the Vasantrao Naik Foundation Rajendra Barwale, Working President Avinash Naik, former trustees Mushtaq Antulay, Anand Patwardhan and Anjali Naik Piramal were among those present.

0000

 

भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध

 भारतीय सर्जनशीलतेला भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था सारख्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी वचनबद्ध –केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

·         वेव्हज 2025 मध्ये भारतात निर्मिती करण्याच्या आव्हानांतर्गत 32 सर्जनशील आव्हानांच्या विजेत्यांचा सन्मान

·          60 हून अधिक देशांमधील 750 हून अधिक अंतिम स्पर्धक नाविन्य आणि प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र

·         तरुण मने सर्जनशीलता आणि तंत्रज्ञान यांचे सुंदर संमिश्रण कसे करतात याचे हे व्यासपीठ एक उत्कृष्ट उदाहरण : राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

 

मुंबई२ :-जगभरातील सर्जकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारतात निर्मिती आव्हानाच्या (सीआयसी) पहिल्या सत्राचा समारोप वेव्हज 2025 मध्ये एका भव्य समारंभात झालाज्याने भारताच्या सर्जनशील परिदृश्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा चिन्हांकित केला. या ऐतिहासिक कार्यक्रमात माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या 32 विविध आव्हानांच्या  विजेत्यांचा सन्मान करण्यात आलात्यात अॅनिमेशनगेमिंगचित्रपट निर्मितीकृत्रिम प्रज्ञासंगीत आणि डिजिटल कला यांचा समावेश होता.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी तरुण सर्जक आणि दूरदृष्टी असलेल्यांना संबोधित करताना हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. 

Featured post

Lakshvedhi