Wednesday, 8 January 2025

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार

 दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये महसूल विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

 

            मुंबईदि. ८ : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळवैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरमहसूल राज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यातील जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई - मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी  प्रथम टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामीत्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोन द्वारे जीआयएस सर्वेक्षण व गावठाण भूमापन करण्यात येणार आहे. पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहेत.

   जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी  सुलभ वाळू धोरण आणण्यात येईल. लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. रेडी रेकनरचे दर पीडीएफ स्वरुपात राहते मात्र हे दर आता गाव निहायप्लॉट निहाय मिळविता येणार आहे. वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठी अधिमूल्य व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम बनविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. महसूल विभागातील चार कॅडरची संपूर्ण माहिती पोर्टलवर आणण्यात येणार असून महसूल अधिकाऱ्यांसाठी मॅन्युअल तयार करण्यात येणार आहे. केंद्राच्या ‘अभिनव पहल’ या पोर्टलमध्ये राज्यातील अधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रॅक्टिस टाकण्यात येत आहे. नवीन जिल्हा करताना प्रशासकीय यंत्रणा यापूर्वीच तयार करावी. संपूर्ण यंत्रणेला अतिरिक्त स्वरूपात तयार करून ठेवावे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमारमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा

 रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या १०० दिवस नियोजनाचा आढावा

 

मुंबईदि. ८ : राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या  माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसात मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखडा बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरमुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेक्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये महाराष्ट्राने नेतृत्व करावे. या अभियानात क्षय रुग्ण शोधून त्यांच्यावरती उपचार करण्यात यावे. स्तन व गर्भाशय कर्करोग निदान करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी.  रुग्णवाहिका व्यवस्थेमध्ये 108 रुग्णवाहिका महत्वाची आहे. रुग्णवाहिका खरेदीच्या न्यायालयीन प्रकरणी महाधिवक्ता यांचा सल्ला घेवून प्रकरण तातडीने निकाली काढावे.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेबॉम्बे नर्सिंग कायद्यात सुधारणा करून उपचाराचे दर निश्चित करण्याचा मानस आहे.  राज्यातील खाजगी प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी कायदा करून विभागाचा आकृतीबंध निश्चित करण्याचे नियोजन आहे.  आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे अहवाल वेळेत उपलब्ध होत नसल्याबाबत चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई  करण्यात येणार आहे.

बैठकीस अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्तामुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीसचिव डॉ. निपुण विनायकसचिव विरेंद्र सिंगआरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक उपस्थित होते.

0000

शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्याव्यात औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी

 शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्याव्यात

औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसात वैद्यकीय शिक्षण,अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांनी करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबईदि. ८ : शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे  वैद्यकीय शिक्षणअन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली, या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफअन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी  झिरवाळ,राज्यमंत्री माधुरी मिसाळराज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीवैद्यकीय  शिक्षण विभागाअंतर्गत रक्तदान मोहीमअवयव दान,स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचारलठ्ठपणा जनजागृती आणि उपचारमिशन थायरॉईडअंधत्व  प्रतिबंधात्मक उपाय योजना,मिशन मौखिक आरोग्य  मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणेआयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियानयोगा सेंटरची स्थापनाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा  यंत्रणा कार्यान्वित  करणेवैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणेमहात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणेवैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीअन्न व औषध प्रशासन विभागात  ऍलोपॅथी  औषध निर्मातेरक्तपेढ्या,  शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची  गुणवत्ता तपासणी,फूड टेस्टिंगसाठी लॅबोरेटरी सुरू केली आहे तेथील कामकाज सुरू करणे या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा,अन्न व औषध अंतर्गत नोंदणी व परवाने तपासणी,मंदिर व देवस्थाने येथील प्रसाद गुणवत्ता तपासणी ही कामे प्राधान्याने करा.

  मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,राज्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी निगडित सेवा अधिक सुलभ होण्यासाठी भर  देण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी वेगवेगळे प्रशिक्षण व उपक्रम राबवा. विभागांतर्गत परीक्षानियुक्ता वेळेत देणेबदल्यागोपनीय अहवालस्थायित्व लाभसेवानिवृत्ती प्रकरणाबाबतची कार्यपद्धती सुलभता आणणेवैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि पदोन्नतीचा मानीव दिनांक देणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावी. भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ताब्लॉकचेन सायबर सुरक्षिततासांख्यिकीय माहिती गोळा करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना द्या असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिकअपर मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्तामुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारेअपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरासामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधाप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव श्रीकर परदेशीवैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकरअन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.

प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावी - क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

  

प्रबळ इच्छाशक्तीकष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावी

-         क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. 8 :- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाकडे वाटचाल करणे ही आपल्या राज्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी युवा पिढीने योगदान द्यावेअशी अपेक्षा व्यक्त करत प्रबळ इच्छाशक्तीकष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावीअसे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पी पी टी चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघातील युवकांशी सह्याद्री अतिथीगृहात क्रीडामंत्री श्री. भरणे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या उत्स्फूर्त शैलीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले कीदिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना राष्ट्रीय स्तरावरील संस्मरणीय असा अनुभव मिळणार आहे. खरं तर आपल्या युवकांचे उज्ज्वल भविष्य हेच आपल्या देशाचे आणि राज्याचे भविष्य आहे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपणच राष्ट्राची खरी शक्ती आहात. युवा पिढी सक्षम होण्यासाठीयुवकांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

            क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले कीपी पी टी चॅलेंज स्पर्धेमध्ये दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. मिळालेल्या या संधीचे आपण सोनं करावे. युवा पिढीचा देशाच्या प्रगतीत सहभाग वाढावा या उदात्त हेतूने असे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी आपली निवड झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे स्पष्ट करत सर्वांना या पुढच्या काळात लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणेसहसचिव मंगेश शिंदेसहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक नवनाथ फडतरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे

 विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे

-  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. 8 : शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते तर प्रशिक्षण त्यांच्या कौशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोपासना करते.  विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांची छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. विविध राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर आहेत. या विद्यार्थ्यांची मंत्री श्री.पाटील यांनी विचारपूस केली.

मंत्री श्री.पाटील म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यामध्ये आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भरशिक्षणाची उपलब्धता आणि शिक्षणामध्ये प्रवेशमातृभाषेमध्ये शिक्षण,जागतिक एकात्मतेवर भर यावर अधिक लक्ष केंद्रित करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.त्याची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची व्यावहारिक उपयुक्ततता शिकवतेजे पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगून मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही सांगितले.

००००

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती

 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती

 

नवी दिल्ली8 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरेअभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळेतसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.

मराठी भाषेला मान मिळाल्याचा अभिमान

मंत्री श्री. सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना सांगितले की११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहेहा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री मोदींचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार

महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानतमंत्री श्री. सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

मराठी भाषेच्या विकासासाठी निधीची मागणी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये मंत्री श्री. सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला केंद्रीय मंत्री श्री.शेखावत यांनी येण्याचे मान्य केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. "दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्य शासन उभे असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. 

पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही तेवढीच मदत दिली जाईलअसे मंत्री श्री. सामंत म्हणाले. दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेलअसे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. 

००००

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करावी -

 अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी

योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करावी

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. 8 :- अल्पसंख्याक समाजाचा  सामाजिकशैक्षणिकआर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावीनाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. भरणे यांनी आज मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी सचिव रुचेश जयवंशीसहसचिव मोईन ताशिलदारवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले कीअल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनामौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणेस्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. या विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाअशी सूचनाही त्यांनी केली.

0000

Featured post

Lakshvedhi