Wednesday, 8 January 2025

स्त्रियांच्या सुंदर छटां" *स्त्रीचं जीवन*

 "स्त्रियांच्या सुंदर छटां"

*स्त्रीचं जीवन*

      दूध ते तूप"

चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा  होतो . 

तिथे एकाच ठिकाणी 

"दूध,दही,ताक,लोणी,तूप"

बघून वाटलं की अरेच्या,ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..! 

पाहूया कसे ते..?

*"दूध"* 

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:

कुमारिका . 

दूध म्हणजे माहेर . 

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र,

सकस,

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.

*त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

"दही"

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं कि कुमारिकेची वधू  होते . 

दुधाचं  नाव बदलून दही होतं! 

दही म्हणजे त्याच अवस्थेत   थिजून घट्ट होणं!

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. 

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. "कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, 

मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी" स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ? 

नवरा हा "पती परमेश्वर" म्हणून ? नव्हे

तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

*"ताक"* 

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते,म्हणजे "ताक" होतं.

"दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी."

*'बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)'*

*ताक दोघांनाही शांत करतं यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.

"ताक" म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच!

'दूध' पाणी घालून बेचव होतं पण 'ताक' मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं .

*"लोणी"* 

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं.मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा, 

मऊ,

रेशमी, 

मुलायम,

नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . 

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं.रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  'लोणी' होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . 

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

'ताकाला' पुन्हा 'दूध' व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

*"तूप"*

[लोणी' ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. 

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं "साजूक तूप होतं"

वरणभात असो 

शिरा असो 

किंवा 

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे 'तूप' संपून जातं.हीच ती स्त्रीची  अंतिम उच्च  अवस्था होय.

'दूध ते तूपं'

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. 

स्री आहे तर श्री आहे हे म्हटलं वावगं ठरूं नये.

असा हा स्री चा संपूर्ण प्रवास न थांबणारा,सतत धावणारा,न कावणारा,न घाबरणारा,कुटूंबासाठी झिजणारा,कुटूंबाची काळजी घेणारा...

 स्त्री जातीस मानाचा मुजरा...👏🙏

मुंबईतील हवेची गुणवत्ता फेब्रुवारीपर्यंत उत्तम करण्यासाठी प्रयत्न करावेत

 मुंबईतील हवेची गुणवत्ता फेब्रुवारीपर्यंत

उत्तम करण्यासाठी प्रयत्न करावेत

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. 7 : मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या असलेल्या पातळीपेक्षा चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवा गुणवत्ता पातळी चांगली असली तरीदेखील ही गुणवत्ता पातळी फेब्रुवारीमध्ये उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या. मंत्रालयात आज मुंबईतील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

   मुंबईमध्ये सध्या हवेतील कणांचे प्रमाण (PM 2.5 आणि PM 10) या प्रदूषणात वाढ झाली असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीहवेतील हे धुली कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांचे अथवा इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्प्रिंकलरचा वापर बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अनेक विकास कामे सुरू आहेत. त्याठिकाणी नियमांचे पालन होते का, याची तपासणी करावी. प्रदूषण नियंत्रणात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी एक ॲप तयार करावे. या ॲप च्या माध्यमातून लोकांना प्रदूषण विषयी तक्रारी करता येतील तसेच संबंधित विभागांना कारवाई करता येईलअशा सूचनाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

  मुंबईत बेकरी आणि रेस्टॉरंट मधील तंदूर भट्टी यामुळेही प्रदूषणात भर पडत आहे. त्यासाठी या सर्व तंदूर भट्टी इलेक्ट्रिकवरबेकरी पीएनजी वायुवर चालवण्यासाठी धोरण तयार करावे. तसेच यामध्ये काही अनुदान देण्याचाही अंतर्भाव करावा. प्रदूषण नियंत्रणाचे मासिक वेळापत्रक तयार करावे अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

    मुंबईसह महाराष्ट्रात प्रदूषणाच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवणेही महत्वाचे आहे. त्यादृष्टीने पर्यावरण विभागाने आरोग्य


माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

 माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. 7 : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा घेवून आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

माजी सैनिक कल्याण महामंडळाची माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण महामंडळाचे सचिव  डॉ.प्रशांत नारनवरे  उपस्थित होते.

    मंत्री श्री. देसाई म्हणाले की,माजी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनास्वयंरोजगाराच्या योजनांसाठी नव्याने आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत सर्व योजनांचा आढावा घ्यावा. माजी सैनिकांसाठी आलेला शंभर टक्के निधी खर्च करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही मंत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या संचालक मंडळाची रचनाकार्ये आणि जबाबदाऱ्याउपलब्धीकार्यालयीन मनुष्यबळ यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

****

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ आणि "सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठक संपन्न

 उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली

मुंबई विद्यापीठ आणि "सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठक संपन्न

 

मुंबईदि. 7 : "सिद्धांता नॉलेज फाउंडेशन" (IKS - Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक  फाउंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरातत्त्वज्ञानसंस्कृतीआणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचे संवर्धनअभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकनसंवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करताना या संस्थेचे विद्यापीठाने सहकार्य घ्यावे आणि आराखडा तयार करावा, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीत सांगितले.

मुंबई विद्यापीठ आणि सिध्दांता नॉलेज फाऊंडेशन (आयकेएस) यांच्या समवेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तंजावरचे महाराजा राजे बाबाजी भोसलेगायत्री राजे भोसलेमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी,एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रवर्तीसिद्धांता नॉलेज फाउंडेशनचे अध्यक्ष जयकिशन झवेरीकार्यकारी संचालक सुदर्शन जीसत्या अत्रेयममहाराजा तंजावर टीम प्रीत खोनावरिष्ठ प्रबंधक प्रमोद निशाणकर  उपस्थित होते.

            सिद्धांता नॉलेज फाउंडेशनने तयार केलेला अभ्यासक्रम  विद्यापीठात व महाविद्यालय स्तरावर, भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाशी मॅपिंग करून  युजी आणि पीजीच्या विद्यार्थ्यांसाठी  राजे बाबाजी भोसलेतंजावर व सिद्धांता नॉलेज फाउंडेशनच्या समन्वयाने लागू करता येईल का यावर चर्चा करण्यात आली.

000

खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणणार

 खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणणार

- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. 7 : खनिकर्म विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे  करून सर्व कामकाजामध्ये सुसूत्रता आणणार असल्याचे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी   सांगितले तसेच खनिकर्म विभागातील सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.

            खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खनिकर्म विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे, विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. रावसह व्यवस्थापकीय संचालक अंजली नगरकरखनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके तसेच विभागाचे  इतर अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री श्री. देसाई यांनी राज्य खनिकर्म महामंडळ व खनिकर्म विभागखनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषयखनिज क्षेत्राची इ लिलाव प्रक्रिया जिल्हा खनिज प्रतिष्ठाननिधीचा विनियोग यासंबंधी कामकाजांचा आढावा सादरीकरणाद्वारे घेतला. राज्य खानिकर्म महामंडळ संदर्भात संचालनालयाबाबत सामान्य माहितीराज्यातील खनिज निहाय खाणपट्टीमहसूल यशस्वीरीत्या लिलाव झालेली खनिज क्षेत्रे,एकात्मिक लीज व्यवस्थापन प्रणाली,तंत्रज्ञान अंमलबजावणी इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे संचालनालय मार्फत चालू असलेल्या अन्वेषण प्रकल्पांचा तपशीललिलाव झालेल्या खनिज क्षेत्राची स्थितीखनिज उत्पादन इत्यादींचा सविस्तर आढावा मा. मंत्री यांनी घेतला.

      तसेच विभागामार्फत मसुदा तयार करून सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या

पुढील १०० दिवसांत खनिकर्म विभागांतर्गत घ्यावयाच्या कामांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. निष्पादन झालेल्या आठ खाणक्षेत्रांपैकी चुनखडक या खनिजाच्या एक खाणपट्ट्याचे कार्यान्वयन करणेजास्तीत जास्त खाणपट्टी लिलावास काढण्यासाठी राज्यांमध्ये अन्वेषण वाढविणेएकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन, संगणकीय प्रणाली २.० लागू करणेमहाजेनको- एमएसएमसी- कोल वॉशरी यांच्या कामामध्ये सुसूत्रता आणणेमहसूल वाढीच्या दृष्टीने २०१५ च्या अधिसूचनेनुसार घोषित गौण खनिजांचे पुनर्वर्गीकरण करून त्यांचे   संनियंत्रण खनिकर्म विभागाकडे घेणे याबाबत चर्चा करण्यात आली.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर कराव्यात

 विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर कराव्यात

मंत्री अतुल सावे

 

            मुंबईदि. ७ : इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृह मिळण्याबाबत तसेच येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर करून या कामाला प्राधान्य द्यावेअसे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

मंत्री श्री. सावे म्हणाले कीइतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्ध होत नसेलतर संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि  जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून यावर तातडीने मार्ग काढावा. विभागांतर्गत सुरू करण्यात येणारी वसतिगृह ही सर्व सोयीसुविधा युक्त असावीत. विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे काम हे लोकांशी संबंधित योजनांशी आहे. त्यामुळे या  विभागाच्या योजना या ऑनलाईन कराव्यात. विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून घ्याव्यात.

 मंत्री श्री. सावे म्हणाले कीउद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या आयजीटीआर या  प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)  या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. यानुसार उद्योगासाठीच्या तांत्रिक  प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) करीत आहे. महाज्योती संस्थेच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा नुकताच नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनावसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनाआश्रमशाळांच्या संच मान्यताबंद पडलेल्या आश्रमशाळांचा आढावाधनगर समाजाच्या विकासासाठीच्या विशेष योजनामॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रलंबित प्रकरणांचा  आढावाइतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनायाबाबतचा आढावाही मंत्री श्री. सावे यांनी या बैठकीत घेतला.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल तसेच महाज्योती, अमृत या संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन

 आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन

 

मुंबईदि. ७ : मातंग समाजाच्या सामाजिकशैक्षणिकआर्थिकसांस्कृतिक  असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असूनमातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षणस्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षाकौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

उमेदवारांनी गुगल फॉर्म भरल्यानंतर त्यांनी निवडलेल्या कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहेतत्यांना व्यवसायाकरिता आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन गुगल फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.

असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस

स्पर्धा परीक्षा : एमपीएससीयुपीएससीबॅंक (आयबीपीएस)रेल्वेजेईई- नीटयुजीसी- नेट/सेटपोलीस/ मिलीटरी,

कौशल्य विकास : परदेशात नोकरी व शिक्षणाची संधीशेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षणहार्डवेअर व सॉफ्टवेअरतसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील कोर्सेस.

योजना : पीएच. डीपोस्ट पीएच.डी संशोधनासाठी अभिछात्रवृत्ती (फेलोशिप)

असा अर्ज करावा :

• इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवर गुगल लिंक व स्कॅनर देण्यात आले आहे.

• उमेदवारांना गुगल लिंक किंवा स्कॅन करुन संपुर्ण फार्म भरता येईल.

0000

Featured post

Lakshvedhi