Saturday, 4 January 2025

१ जानेवारी ते ३१डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार*

 *१ जानेवारी ते ३१डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार*



भोगी १३/०१/२०२५-सोम 

मकरसंक्रांत १४/०१/२०२५-मंगळ

श्री. गणेश जयंती ०१/०२/२०२५-शनि 

महाशिवरात्री २६/०२/२०२५-बुध

एकादशी १०/०३/२०२५-सोम

होळी १३/०३/२०२५-गुरु

गुढिपाडवा ३०/०३/२०२५-रवि

वटपौर्णिमा १०/०६/२०२५-मंगळ

नागपंचमी  २९/०७/२०२५-मंगळ

नारळी पौर्णिमा ०८/०८/२०२५-शुक्र

रक्षाबंधन ०९/०८/२०२५-शनि

श्रीकृष्ण जन्माष्टमी- १५/०८/२०२५-शुक्र

श्रीगणेश चतुर्थी २७/०८/२०२५-बुध

गौरी विसर्जन ०२/०९/२०२५-मंगळ

अनंत चतुर्दशी ०६/०९/२०२५-शनि

महालयारंभ ०८/०९/२०२५-सोम

घटस्थापना २२/०९/२०२५-सोम

दसरा ०२/१०/२०२५-गुरु

धनत्रयोदशी १८/१०/२०२५-शनि

अभ्यंगस्नान २०/१०/२०२५-सोम

लक्ष्मीपूजन 

२१/१०/२०२५-मंगळ

दिपावली पाडवा 

२२/१०/२०२५-बुध

भाऊबीज २३/१०/२०२५-गुरु

तुलसी विवाहारंभ ०२/११/२०२५-रवि

त्रिपुरी पौर्णिमा ०५/११/२०२५-बुध

देव दीपावली २१/११/२०२५-शुक्र

श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव ०४/१२/२०२५-गुरु 

_*मराठी सणवार*_

महिन्याला दोन आनंदोत्सव, काय ही आपली श्रीमंती सभासद

ऋतुचक्राप्रमाणे घडले आहेत, उत्सव आहार, संलग्न सवयी

तरुणांपासून स्वर्गीयांची, बूज राखीली आहे कल्पकतेने

प्रत्येक तारखेची महती, संस्मरणीय त्याच्या वैशिष्ट्याने।।।।

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे

पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 

- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबईदि. १ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावेअसे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकरवित्तीय नियंत्रक अभय धांडेउपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदेअच्युत इप्परविजय चौधरी उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे म्हणाले कीप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईलजेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगार वेतन थकबाकीसंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला.

आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

 आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम असावा. आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला कुठेही पैसे भरावे लागू नयेअशा तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करावी. महात्मा फुले जन आरोग्य अभियानातील अंगीकृत असलेल्या रुग्णालयांचे कामकाज चुकीचे आढळल्यास चौकशी करून संबंधित रुग्णालय पॅनलवरून कमी करण्यात येईल. महिलांमध्ये सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्शवभूमीवर महिलांमधील कर्करोगाचे निदान व तातडीने उपचार मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देशही श्री. आबिटकर यांनी दिले.

बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानवैद्यकीय अधिकाऱ्यांची पद भरतीसध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ व रिक्त पदेमानसिक आरोग्य आस्थापनाडायलिसिस व अन्यसेवांचा विस्तारअर्थसंकल्पीय तरतुदीमाता व बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम१५ व्या वित्त आयोगाचा निधीराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमनियमित लसीकरणराष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमसिकलसेल निर्मूलन कार्यक्रमकर्करोग निदान कार्यक्रमराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमराष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य कार्यक्रम, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य अभियानमोबाईल मेडिकल युनिट, महाराष्ट्र वैद्यकीय आपत्कालीन सेवा आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर

नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

 

मुंबई, दि. 1 शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ड. आशिष जयस्वालमाजी मंत्री सुधीर मुनगंटीवारमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवले आहे.

ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहन श्री. मुंडे यांनी केले आहे.

संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवंत राहीली

 संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे

 भारतीय संस्कृती जिवंत राहीली

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात उपस्थित राहून संतधर्माचार्य आणि

कीर्तनकारांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले आशीर्वाद

पुणे,दि.03 :- भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवंत राहीली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            श्रीक्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संतधर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेपर्यावरणीय व वातावरणीय बदल,  पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेआ.उमा खापरेआ.महेश लांडगेआ.शंकर जगतापआ.अमीत गोरखेआचार्य स्वामी गोविन्ददेव गिरी महाराजहभप ब्रम्हगीरी मारोती महाराज कुसेकरभास्करगिरी महाराजजगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरेश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरमारुती महाराज कुरेकर  यावेळी उपस्थित होते.

            श्री.फडणवीस म्हणालेभारतीय सभ्यता ही जगातली सर्वात प्राचीन सभ्यता आहे. पाच हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमधील आजही सापडत असलेले अवशेष पूर्णपणे विकसीत आहेत. संतांनी आणि धर्माचार्यानी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे ही संस्कृती जिवंत राहीली. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटविल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही. 

आपला देश प्रगती करतानाच बलशाली होतोयहे सहन न झाल्यामुळे देशातील आणि विदेशातील विघातक शक्तींनी एकत्र येऊन एक प्रकारचे षडयंत्र रचून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतांनी समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन हे प्रयत्न हाणून पाडले. भारताची संस्कृती आणि विचार जेव्हा कमकूवत झाले त्या-त्यावेळी आपण गुलामगिरीत गेलो. येथील संतानी समाज जागृत केला आणि एकसंघ समाज निर्माण केला आणि दिग्वीजयी भारत आपल्याला पाहायला मिळाला.

            हिंदू जीवन पध्दतीमध्ये निर्गुण निराकार आहेसगुण साकार आहे. प्रत्येकाची जीवन पध्दती वेगळी असूनही या जीवन पध्दतीमुळे भारत एकसंघ आहे.  पूज्य गोविन्ददेव गिरी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज जनजागृतीचे मोठे कार्य केले आहे. सर्व समाज एक आहेदेश एक आहे पासून ते वसुधैव कुटुंबकम विचार त्यांनी मांडला. त्यामुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नसून राष्ट्रकार्य आहे. गोसेवा आणि नदी स्वच्छतेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गोसेवेचे महत्व वाढले पाहिजे. तसेच ज्या प्रकारे गंगानदी स्वच्छ केली जात आहेत्याचप्रमाणे इंद्रायणीगोदावरीचंद्रभागा स्वच्छ वाहणाऱ्या नद्या बनवण्यासाठी येत्या काळात संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यकत् केला.

 कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आलेले संतकिर्तनकारनागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

०००

गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधण्यात येणार ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य म्हाडा, गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा नागरिकांना सुलभपणे लाभ मिळावा

 गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्याटिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार

गिरणी कामगारांसाठी 1 लाख घर बांधण्यात येणार

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य

 

म्हाडागृहनिर्माण विभागाच्या योजनांचा नागरिकांना सुलभपणे लाभ मिळावा

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

          मुंबईदि.३ : 'सर्वांसाठी घरेही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्याटिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतीलअसा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवासनगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ताम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकरमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकरमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहेनोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहेकामगारांसाठी घरेभाडेतत्त्वावर घरकुलेपुनर्विकासइको फ्रेंडली घरकुलेनाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यात विविध गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरकुलांचे अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मुंबईतील या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी.

गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे गिरणी कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना त्यांच्या गावी घर देता येईल का याबाबत तपासणी करावी. तसेच गिरणी कामगार युनियन सोबत बैठकीचे आयोजन करावेअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मार्फत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर या झोपड्यांचा पुनर्विकास केला जात आहे. गृहनिर्माण विषयक माहितीसाठी केंद्रिकृतपारदर्शक आणि वेब आधारित राज्य गृहनिर्माण बाबत माहिती पोर्टल तयार करण्यात यावेधोकादायक इमारतीतील रहिवाशांसाठी ट्रान्झिट कॅम्प तयार करण्यात यावे त्याबाबत सविस्तर धोरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पपत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पमोतीलाल नगर १,,व ३ वसाहतींचा पुनर्विकासकामाठीपुरा क्षेत्राचा म्हाडामार्फत पुनर्विकासपोलिसांसाठी घरेगिरणी कामगारांसाठी घरकुल योजनाजीटीबी नगर सोयम येथील पुनर्वसन प्रकल्पप्रधानमंत्री आवास योजना आदीबाबत आढावा घेतला.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती दिली.

००००


 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याचे उद्धाटन राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारतीय सैन्यदल सक्षम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नो युवर आर्मी मेळाव्याचे उद्धाटन

राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारतीय सैन्यदल सक्षम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि.  3 : भारत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे;  भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भूजल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहेअसे गौरवोउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

'समर्थ भारत सक्षम सेनाया प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्यावतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित 'नो युवर आर्मीमेळाव्याच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णीआमदार सुनील  कांबळेदक्षिण कमांडचे  आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठपोलीस आयुक्त अमितेश कुमारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीराज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक आंचल दलालजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतीश हंगेमाजी राज्य मंत्री दिलीप कांबळेमाजी आमदार विलास लांडे,आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेया मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहेशिवाय युवकांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्यादृष्टीने प्रेरणा मिळणार आहे. भारतात संरक्षण क्षेत्रात सुरक्षितेतच्यादृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय सैन्यदलाचे यांनी अभिनंदन केले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने भारतीय सैन्याचे साहसशौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या  छायाचित्रांचे बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील विविध संरक्षण विषयक अत्याधुनिक शस्त्रेरणगाडेउपकरणाची पाहणी करुन माहिती घेतली.

Featured post

Lakshvedhi