Tuesday, 31 December 2024

*मृत्यु नंतर सुद्धा पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय* ***********************************

 *मृत्यु नंतर सुद्धा  पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय*

***********************************

🔜 *(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रन्थ भैंट करा , जेव्हा कोणी त्याचे पठण करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(3). = कोणत्याही अन्नक्षेत्र साठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण करेल पुण्य तुम्हाला लागेल*❗️

🔜 *(4). = कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाटर कुलर लावा, नेहमी पुण्य मिळेल*❗️

🔜 *(5). = कोण्या अनाथला शिक्षित करा, तो आणि त्याची येणारी पिढीही तुमच्या सुखाची प्रार्थना करेल , तर पुण्य तुम्हाला मिळेल*❗️

🔜 *(6). = तुमच्या मुलांना परोपकारी बनवू शकाल तर ,  सदैव पुण्य मिळत राहील*❗️

🔜 *( 7). = सर्वात सोपी आहे की ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा एकाने जरी या पैकी एक गोष्ट पूर्ण केली तर पुण्य तुम्हाला लागेल*❗️ 

🔺 *सर्वात पहिले सेंड करा कारण जो पर्यंत कोणी हा  MSG वाचत राहील*

*तुमच्या नावाचे पुण्याचे झाड लागत राहतील आणि तुम्हाला फळ मिळत राहील , म्हणूनच बोलतोय थांबू नका , निरंतर चालू रहा।* 


*🙏 जय श्रीराम 🙏*

Monday, 30 December 2024

वेळ अमावास्या*

 *वेळ अमावास्या*


संकलन - सुधीर लिमये पेण 


वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.


मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे. शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे.


वेळा अमवस्याच्या आदल्या दिवशी रात्री भाकरी करतात. भाकरीला त्या दिवशी भाकर न म्हणता ‘रोडगा’ म्हणतात. त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी, खीर, आंबील, सजगुरऱ्याचे (बाजरीचे) व ज्वारीचे उंडे, तिळाच्या भाकरी, भजी, शेंगदाण्याचे लाडू हे नैवेद्याचे पदार्थ करून ठेवतात. आदल्याच दिवशी सगळा भाजीपाला आणि ‘आळंदे’ खरेदी केले जाते. 'आळंदे' म्हणजे एक लहान बिंदगी (लहान मडके) आणि त्यावर झाकायला एक येळणी (खापराची प्लेट). या ‘आळंद्यात सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतात घेऊन जायचे असा रिवाज आहे.


वर्षाच्या सर्व उत्सवांमध्ये वेळामावास्या हा एकमेव उत्सव असा आहे की, या उत्सवासाठीचा स्वयंपाक हा आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खातात. काहीजण तर आंबील आणि तत्सम पदार्थ शेतातच ठेवून दोनदोन दिवस त्यावर ताव मारतात.


पूर्वी बैलगाडीमध्ये हे सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजमा याच बैलगाडीत धडधड आदळत आपटत मस्त सफर करत शेताला जायचा. आता मात्र सवडीप्रमाणे मोटारसायकल, ऑटोचा वापर केला जातो. काहीजण डोक्यावर डालगे (मोठे टोपले) घेऊन शेतात जातात. या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेगावी असणारी माणसे वेळामावस्याला मात्र आपापल्या गावी आवर्जून सहकुटुंब येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्र साजरा करतात.


शेतात आल्यानंतर एका झाडाखाली पाच पांडव मांडतात. त्यांना चुन्याने रंगवतात. त्यावर कडब्याच्या पाच पेंढ्या उभ्या करून एक सुंदर खोप (कोप) करतात. लाल शालीने ते बांधतातही. डालग्यातून साहित्य काढतात. पांडवासमोर हिरवे कापड ठेऊन लक्ष्मीची पूजाही मांडतात. नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवतात. कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवाची पूजा करतात. शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने पूजा संपवतात, हा नैवेद्य एका माठात भरतात.


पूजाविधी झाल्यानंतर लगेच जेवणाची पंगत बसते. यात काल रात्री केलेल्या सर्वच पदार्थांचे आनंदाने सेवन केले जाते. या मजेच्या वनभोजनात शेजारी पाजारी, मित्रवर्ग, सगेसोयरे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकत्रित जेवण करतात. एखादी अनोळखी व्यक्ती जरी जवळून बांधाने जात असेल, तर तिलाही आवर्जून बोलावतात. जेवायला नको म्हटले तर किमान आंबिलीचा थोडा स्वाद तरी घ्यायचा आग्रह केला जातो.


थंडगार बिंदगीतली आंबील पिली की, एक प्रकारची मस्त झिंग येते. ( झिंग म्हणजे नशा नाही!) जेवण करून, आंबिलीचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान झोप घेतात. काहीजण शेताशेतांतील आमंत्रणाचा मान स्वीकारत फिरत असतात. अशी फिरस्तीचीही मजा वेगळीच असते.


या मार्गशीर्ष महिन्यात गहू, ज्वारी, करडई, हरभरा, वाटाणा, तुरी, ऊस ही रब्बीची पिके जोमात आलेली असतात. शेतात निसर्गाची उधळण झालेली असते. बोरांच्या झाडाला बोरे लगडलेली असतात. आंब्याला नुकताच मोहोर फुटायला सुरुवात झालेली असते होतो. वातावरणात गुलाबी गारवा असतो. जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरल्याचा भासच व्हावा अशी हिरवळ असते. जेवण झालं की, काहीजण झोका बांधून झोक्यावर हिंदोळे घेतात. मुली ‘भजी रोडगा, आंबट भात खिचडा’ असे म्हणत झोक्यावर झुलण्याचा आनंद घेतात. काही पुरुष, पोरे हातात कुऱ्हाड नाहीतर एखादा विळा घेऊन मधमाश्यांचे मोहोळ शोधायची मोहीम हातात घेतात. सोबत एखादी काडीपेटी आणि पांघरायला एखादे कापड. झाडाझुडपात नजर बारीक करून पाहात पाहात चालत राह्यले की अवघड जागी एखादे मोहाळ दिसते. मग सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून पोरे मधमाशांचा हल्ला सहन करून ते शेवटी मधाचा गड्डा ओढून घेतात. आणि ताठ छाती करून ते मोहाळ घेऊन येतात. महाकष्टाने घेऊन झाडलेल्या त्या मोहाळाच्या गोडगोड मधाचा सर्व मिळून आस्वाद घेतात. आंबटगोड बोरे-ऊस तोडतात आणि खातात.


गोल आकाराच्या मडक्यावर चुन्याने बोटे ओढतात. कुंकू, काव यांचेही पट्टे ओढतात आणि नंतर त्यात काठोकाठ आंबील भरतात. बाजरीचे मुटके, ज्वारीचे मुटके, पुरणपोळी यांचा नैवेद्य करतात. शेतात पिकलेल्या पालेभाज्या शिजवून त्याचा गरगटा तयार करतात जातो, व एका मडक्यात भरतात. शेतात आल्यावर शेतकरी आपल्या डोक्यावर मडके घेतो व घोंगड्याच्या खोळीने झाकतो. तसे करून तो संपूर्ण शेताच्या बांधावरून “ओलगे ओलगे ..सालम पोलगे, पाची पांडव सहावी द्रौपदी. हर हर महादेव... हर भगत राजोss हारभलंss..!!!’च्या घोषात 'काळ्या आईचं चांगभलं” असा पुकारा करीत, शेताला फेरी मारतो. नंतर तो काला शेतात फेकतो. एका झाडाखाली खड्डा करतात. तेथे माठाची पूजा करतात. सगळेजण माठातील आंबील, पुरणपोळी यांचे सेवन करतात. रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्यात पुरतात. पाच खडे घेऊन त्यांचीही पूजा केली जाते.


संध्याकाळी छोट्या मटक्यात दूध आणि शेवया शिजवतात. त्याला उतू येऊ देतात. ते दूध ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी चांगले पीक येईल असा समज असतो. थोड्या वेळात पेंढ्या पेटवतात. त्या पेटत्या पेंढ्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा घालतात. यामुळे पिकांवर कसल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असा समज असतो. काही ठिकाणी त्या पेंढ्या तशाच पेटत्या ठेऊन गावात आणतात आणि मारुतीच्या देवळाला एक फेरी मारून मंदिरासमोर टाकतात. ज्यांची शेते दूर आहेत असे शेतकरी इथेच पेंढ्या पेटवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच मंदिरासमोर टाकतात. शेतातली सर्व मंडळी सूर्यास्ताच्या वेळी दिवसभरात हा अनोखा आनंदोत्सव साजरा करून सुखासमाधानाने घरी येतात.


या दिवशी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात शाळेला सुट्टी असते. वेळामावसेच्या पूर्वसंध्येला बसलाही खूप गर्दी असते. सर्वजण या दिवसासाठी रजेची मागणी करतात. जणू शेतकऱ्यांसाठी हा सणांचा राजाच असतो. येळवशीची भजी दोन दिवस पुरवून खातात. भज्यांमधे वाटाणे, हरबरा, तूर, मेथी, कोथिंबीर, गाजर, वांगे, आले, लसूण यांचे सुरेख मिश्रण असल्याने ती चविष्ट असतातच मग ती एकमेकांना भेट देऊन, बायका एकमेकींचे कौतुक करतात. कर्नाटकातली सून असेल, तर पातळ पापडासारख्या बाजरीच्या भाकरी असतात.


मातीचे मडके हे मानवी शरीराचे प्रतीक आहे. मडके मातीत गाडले जाते त्याप्रमाणेच माणूस गेल्यावर त्याची राखही मातीत पुरली जाते. पिके आणि भूमी यांना अन्न देण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून काला शेतात फेकला जातो. माठावरचे चुना, कुंकू हे रंग शुचिता आणि समृद्धीचे प्रतीक होत. काळी घोंगडी अंथरून घेण्यात जणू शेतकरी काळी माती अंगभर माखण्यात धन्यता मानतो असा आशय ध्वनित होत असावा असा याचा प्रतीकात्मक आशय सांगितला आहे.



स्त्रोत: विकिपीडिया.

पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना

 पी के अत्रेंनी एकवेळ यशवंतराव यांना


निपुत्रिक म्हटले. ही टीका अंत्यत वाईट तर होतीच.पण १९६० साली महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाल्यावर केली होती.  तरीही यशवंतराव यांनी एक चकार शब्द काढला नाही. त्यांनी एक फोन केला आणि अत्रेंना खुलासा करून म्हणाले,  'माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी  हल्ला केला, व त्यात तिचा गर्भपात  झाला आणि गर्भाशय कायमचे  निकामी झाले' यशवंतराव हे सांगताना ना अत्र्यांवर रागावले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला.   मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्या घरी आले.  अंत्यत भावनिक होत त्यांनी त्यांची व वेणूताई यांची माफी मागितली, पश्चाताप केला होता. वेणुताई अत्रेंना म्हणाल्या  भाऊ त्यानिमित्ताने तरी घरी आला.असे उदगार काढले होते. तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते.  आणि यशवंतरावांनी हसतमुखाने अत्रेंना माफ केले.  ही महाराष्ट्रातील नेत्यांची  त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसे कुठल्या मातीने बनलेली असावीत  ? हा यशवंतराव साहेबांचा  महाराष्ट्र... आजची संस्कृती म्हणजे  तुला चप्पलने मारतो, कानशिलात मारतो, कोथळा काढतो वगैरे वगैरे . आज यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी त्या निमित्ताने विशेष लेख🙏🙏🙏


#YashwantraoChavhan

#MaharashtraCM

#politicalikon

T N शेषन, का दर्द

 


दरवर्षी आम्ही जी करतो ती उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा दहा एप्रिल ला आहे.

 दरवर्षी आम्ही जी करतो ती उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा दहा एप्रिल ला आहे. 


म्हणजे आधी दहा एप्रिल ला उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा व नंतर २६ मे २०२५ ला समुद्र पंचक्रोशी परिक्रमा येत आहे.


इच्छुक साधकसंख्या समजली कि मग कुणीतरी उत्साही व अनुभवी साधक पुढाकार घेउन सारे नियोजन करतील.

समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा!*

 *समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा!*

(येती सोमवती अमावास्या २६ मे २०२५ ला आहे, या दिवशी आपण ही समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा आपल्याकडून करवून घेण्याची प्रार्थना मैय्याला करत आहोत! तरी इच्छूक नर्मदाभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा!)


नर्मदामाईची परिक्रमा हा एक अपूर्व सोहळाच असतो. अनेक जण ही परिक्रमा करतात. ती जिथे रत्नसागराला (अरबी समुद्र) मिळते तेथील काही तीर्थांच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांना होणार आहे. दक्षिण किनाऱ्यावरील श्री कोटेश्वर आणि श्री विमलेश्वर यांचं दर्शन झालं. भरुच जवळच्या हांसोट जवळचा हा संपूर्ण परिसर म्हणजे नर्मदा माईचा विशाल त्रिभुज प्रदेशच आहे. याच दोन ठिकाणी ती दक्षिण बाजूने सागर विलीन होते. तेथील दर्शन झाल्यावर एक अपूर्व योग जुळून येतो तो योग असतो, नर्मदा पंचक्रोशी परिक्रमा करण्याचा. ही परिक्रमा सोमवती अमावास्येला हजारो भक्त वर्षानुवर्षे करत आली आहेत! 


येती सोमवती अमावास्या २६ मे २०२५ ला आहे, या दिवशी आपण ही समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा आपल्याकडून करवून घेण्याची प्रार्थना मैय्याला करत आहोत! तरी इच्छूक नर्मदाभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा!


ह्या परिक्रमेला हिंदीमध्ये 'समुद्र पंचकोशी परिक्रमा' म्हणतात. उत्तरेत विविध तीर्थक्षेत्रांमध्ये पंचकोशी परिक्रमा केल्या जातात. तशी ही समुद्र पंचक्रोशी परिक्रमा! नर्मदा मैय्या सागराला मिळते तेथील उत्तर किनाऱ्यावर ही परिक्रमा केली जाते. पंचक्रोशी म्हणजे पाच कोसांचा परिसर! एक कोस म्हणजे दोन मैल किंवा ३.१२ किलोमीटर. म्हणजेच ही परिक्रमा साधारणपणे १५.०६ किलोमीटर परिसरात होते. येत ढोबळमानाने, ती २० किलोमीटर आहे. ती चालत किंवा वाहनाने करता येते. मी वाहनाने केली. ती जवळपास २५ किलोमीटर होते.


गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील वागरा तालुक्यातील या पंचक्रोशी परिक्रमा मार्गात दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन आल्यामुळे तिथल्या गावांमध्ये एकसंधता आली आहे. या मार्गात मुख्यत्वे पाच गावे आहेत. दहेज, अंभेटा, जागेश्वर, लुवारा आणि लखीगाम ही ती गावे. 


या समुद्र पंचक्रोशी परिक्रमेला 'नवनाथ परिक्रमा' असंही म्हणतात. या मार्गावर महादेवाची नऊ स्थाने असल्याने हे नाव प्रचलित आहे. प्रत्येक स्थान विशिष्ट आहे. त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यांची स्थापना देव आणि ऋषींच्या हस्ते झाली आहे. आजवर तेथे हजारो अनुष्ठाने झाली आहेत. तिथल्या अनेक कहाण्या आहेत. सर्व मंदिरे प्राचीन असल्याचे अनेक पुरावे आहेत. शासनाने रस्ते जोडणी उत्तम केली आहे. शिवाय मंदिर  परिसर कात टाकत आहेत. त्यामुळे यात्रा सुफळ संपूर्ण होते.


*गुढार्थ:* पंचक्रोशी अथवा पंचकोशीचा अर्थ स्थूलातील तीर्थयात्रेचा किंवा अंतराचा नसून ही सूक्ष्मातील पंचकोश यात्रा आहे, ही अध्यात्मिक विकासयात्रा, अंतरातील यात्रा आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश असा साधनामार्ग प्रवास करायचा आहे. या अशा यात्रेतून आम्हाला बाहेरचे भटकणे थांबवून अंतरानंदात स्थिर व्हायचे आहे, हा अनंरानंद प्रवास आहे. याला किती दिवस लागतील ते आपापल्या स्थितीवर, प्रयत्नांवर, साधनेवर आणि भगवत्कृपेवर अवलंबून आहे. या अशा यात्रेतून आमचे संसारमागणे थांबवून कुठेतरी आतला प्रवास सुरू करायचा आहे. ही सिद्धस्थाने आपले भगवद्प्रेम वाढवून पंचकोशीच्या अंतर्प्रवासात मदत करतात.


*समुद्र पंचक्रोशी अथवा नवनाथ यात्रा क्रम:*

*(१) मीठीतलाई गोलकुंड, भीमनाथ*¹ तीर्थ (परशुराम संकल्प स्थान)*


*(२) हरीधाम तीर्थ, जमदग्नी तपोभुमी (मार्कंडेश्वर, शुकेश्वर):* श्री हरि महाराज आश्रम या सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी हे शिवलिङ्ग स्थापित केलं आहे. हरि महाराज आश्रमात राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणि पुरातन हवेली प्रमाणे रचना आहे. इथे काही लोक गुजरात मधील विविध ठिकाणांहून नियमित सेवेसाठी येत असतात.


*(३) परशुराम तीर्थ:* या मार्गावरील अति-प्राचीन स्थळ! स्वतः भगवान परशुराम यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. इतक्या शतकांच्या गाळात भर पडून पडून आता जमीन मंदिराच्या शिखराला भिडली आहे. साहजिकच दर्शन घ्यायचं असेल तर खाली उतरून जावं लागतं. मंदिराचं बांधकाम साधं आहे. पुजारी सभामंडपातच राहतात. आलेल्या सर्वांची बडदास्त ठेवतात. नियमित भोजन प्रसाद देतात. आजूबाजूचे रहिवासी सुद्धा खूप सेवाभावी आहेत. या ठिकाणी शेकडो संत महंत साधना करून गेले असल्याने साधकांसाठी ही योग्य अशी जागा आहे.


*(४) लोटणेश्वर, समुद्र व रेवा संगम स्थान, लख्खाबावा (लक्ष्मणगिरी महाराज) समाधी:* या परिक्रमा मार्गावर पांडव येऊन गेल्याचे काही दाखले आहेत. त्यापैकी ही एक जागा आहे. भीमाने तप करून सिद्धी मिळवली ती ही जागा असं काही लोक सांगतात. साक्षात नंदिकेश्वर यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. त्याचं रक्षण व्हावं म्हणून भीमाने त्यावर लोटा ठेवला होता म्हणून लोटेश्वर असे नाव पडले. काही लोक त्याला लुटणेश्वर देखील म्हणतात. या शिवलिङ्गाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार. नंदिकेश्वरांनी जिथे पाय ठेवला तिथेच हे शिवलिङ्ग तयार झालं. त्यामुळे त्याचा आकार गायीच्या खुरांसारखा आहे. त्यामुळे लोक त्याला 'गाय नी खरी' (खुर) शिवलिङ्ग सुद्धा म्हणतात. हे देखील प्राचीन स्थळ असल्यानं आपल्याला जमिनीत उतरून जावं लागतं.


*श्री लखाबावा दादा मंदिर:* लोटेश्वर महादेव प्रांगणातच येथील प्रसिद्ध सिद्धपुरुष श्री लखाबावा दादा यांचं समाधी स्थळ आहे. नर्मदाभक्त आणि सिद्धी प्राप्त असलेले हे प्राचिनकालीन स्थानिक कोळी समाजातील संत पुरुष आहेत. निपुत्रिक आणि व्यावसायिक अडचणी असलेल्या लोकांना इथे प्रचिती येत असल्याने नवस फेडणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. समाधीवर शिवलिङ्ग स्थापित असून गाभाऱ्याच्या दरवाजावर लखाबावा दादा यांचं 'स्थान' आहे. खूप वेगळी अशी ही जागा आहे. (काही मराठी लोक - विशेषतः काही मराठी युट्युबर परिक्रमावासी, बाबांच्या नावाचा उच्चार लख्खाबाबा करतात पण तो तसा नसून लखाबावा दादा असाच करावा असं स्थानिकांनी आवर्जून सांगितलं!) जवळच लखाबावा दादांच्या गुरूंची समाधी देखील आहे. मंदिर प्रांगण नीटनेटकं आहे. सर्व सोयीसुविधा आहेत. जवळच लखाबावा दादांचे तळे आहे. त्याला साधारणपणे वर्षभर पाणी असतं.


*(५) भूतनाथ*²-कुंडनाथ*³-तुंडनाथ*⁴:* येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश लिङ्ग स्वरूपात स्थापित आहेत.  त्यांची स्थापना महादेवांनी केली आहे. जवळच श्री सिकोतर माता मंदिर आहे. मंदिराजवळ दाट बाभळीचं वन आहे. भीमाने बाण मारून तयार केलेलं बाणेश्वर कुंड आणि शिवलिङ्ग आहे. पुरातन कालीन स्मशान आहे. दाट झाडी असल्याने व आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र झाल्याने हा जंगल भाग निलगायी, साप, तरस, कोल्हे आणि शेकडो पक्षी यांचा अधिवास झाला आहे. सोबतीला अनेक साप आणि शेकडो मोर आहेत. दानशूर गुजराती समाजाच्या उपक्रमांमुळे सहज अन्न उपलब्ध होत असल्याने अक्षरशः मयूर-वन आहे की काय असं वाटावं इतके मोर इथे आहेत. लोकांसाठी अन्न दान नियमितपणे सुरू असतं. अनेक तंत्र साधक इथे मुक्कामाला असतात अशी माहिती मिळाली. सेवेसाठी वडोदरा (बडोदा) आणि भरुचहून अनेक जण नेहमी येतात. 


*(६) मोक्षतीर्थ अथवा मोखडेश्वर अर्थात मोक्षनाथ*⁵:* हे दिव्य क्षेत्र शक्ती स्थापित असून त्यांस श्री मनकामेश्वर महादेव मंदिर असंही संबोधलं जातं. मुख्य मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. प्रांगणात नर्मदा मैय्याचं देखणं मंदिर आहे.


*(७) दुधेश्वर, दुधनाथ*⁶, दाहेजग्राम:* हे शिवलिङ्ग दधिची ऋषींनी स्थापन केलं आहे. दधिची ऋषींची तपोभूमी म्हणून दाधिच गावाचे कालांतरानं 'दहेज' नामाभिधान झालं. मंदिर प्रांगण अतिशय देखणं आहे. गाभाऱ्यात गेल्यावर उज्जैनच्या महाकालेश्वर महादेवाची आठवण यावी, अशी एकंदर रचना आहे. इथे नित्य स्वरूपात विविध अनुष्ठाने होत असल्यानं त्यासाठी एक वेगळा हॉल आणि पुजाऱ्यांची- भाविकांची निवास व्यवस्था चांगली आहे. अंगणात पक्ष्यांच्या राहण्याची सुंदर सोय केलीय.


*(८) नीलकंठेश्वर, दाहेजग्राम:* दहेज गावाच्या दिशेनं निघाल्यावर अगदी मुख्य हमरस्त्यावर दिसणारं हे मंदिर नीलकंठ महादेव स्थापित आहे. सध्या इथेही जीर्णोद्धार जोरात सुरू आहे. हे शिवलिङ्ग बाणलिङ्ग स्वरूप आहे. प्रांगणात बेल, वड आणि पिंपळ वृक्ष आहेत.  निवास आणि पूजन व्यवस्था आहे.


*(९) चंद्रमौलेश्वर, अंबेठाग्राम अर्थात उमियानाथ*⁷:* अंभेटा गावातील श्री कृष्णानंद आश्रमाच्या सात्त्विक आणि देखण्या प्रांगणात हे मंदिर आहे. देवळापासून रेवा संगम जवळ असल्यानं परिक्रमावासियांच्या निवासाची सुंदर व्यवस्था इथे आहे. महादेवाजवळ माता आशापुरा, श्री उमियानाथ, नर्मदा मैय्या आणि कालभैरव मंदिरे आहेत. येथून जवळच एक तलाव आहे.


*(१०) सिगनाथ*⁸, सुवाग्राम*


*(११) जागेश्वर अर्थात जागनाथ*⁹ मीठीतलाई गोलकुंड:* जागेश्वर गावाचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेलं हे जागनाथ महादेव मंदिर आहे. मंदिर प्रांगण खूप मोठं आहे. व्यवस्था उत्तमच आहे. देवळात गणपती, हनुमान, कालिका, सरस्वती, दुर्गा विग्रह आहेत. गावकऱ्यांच्या उपक्रमांसाठी आणि परिक्रमावासियांच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. महंत वृक्षप्रेमी आहेत; त्यामुळे असंख्य फुलझाडं उत्तमरित्या सांभाळली आहेत. वैयक्तिक अनुष्ठाने आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी निवास आहेत.


जागेश्वर जवळच *मिठीतलाई* आहे. याच ठिकाणी परिक्रमावासी रेवा संगम पार करून उत्तर तटावर उतरतात. सध्या गुजरात शासनातर्फे परिक्रमावासियांना तटावर येणं सोपं व्हावं म्हणून विशाल जेट्टी बांधली जात आहे. या जेट्टीजवळ दहेज-घोघा (भावनगर) रो-रो फेरी सर्व्हिस जेट्टी आहे. दक्षिण गुजरात मधून सौराष्ट्रात जाण्याचा जवळचा मार्ग यामुळे उपलब्ध झाला आहे. मिठीतलाई मध्ये मोठा आश्रम असून उत्तम निवास व्यवस्था आहे. नर्मदा मैय्याचं मोठं मंदिर आहे.


*तर अशी नऊ महादेव (नवनाथ*) स्थाने झाली की आपली समुद्र पंचक्रोशी परिक्रमा पूर्ण झाली!* 


सोबत हा यात्राक्रम सुंदर व योग्य अशा पौराणिक माहितीसह दोन भागात देत आहे, जो यात्रा करण्यापूर्व नर्मदाभक्तांनी अवश्य जाणून घ्यावा.


(१) https://youtu.be/tlu-AvHDr8g?si=D91--YQID6tfQeFF


(२) https://youtu.be/Gu69djMP_v4?si=Kzai3594NOxRtdvQ


 

*नमामि देवी नर्मदे!*

श्रीकृष्ण वसंत पुराणिक

Featured post

Lakshvedhi