🚩⚜🚩🔆🕉🔆🚩⚜🚩
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*अलंकापूरीतून*
*सार्थ योगी जीवनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*संत ज्ञानेश्वर महाराज*
*संजीवन समाधी सोहळा*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🚩⚜🚩🔆🙏🔆🚩⚜🚩
*बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल !!*
*श्री ज्ञानदेव तुकाराम !!*
*पंढरीनाथ महाराज कि जय !!*
*श्री ज्ञानेश्वर महाराज कि जय !!*
*श्री तुकाराम महाराज कि जय !!*
*हा प्रत्येक मंदिरात होणारा जयघोष असो वा पंढरपूर.. देहू.. आळंदी वारीत "ज्ञानोबा माऊली तुकाराम" चा जयघोष म्हणजे जगात सर्वाधिक वेळा झालेला.. होणारा जयघोष. हा जयघोष करा असे कुणी कुणाला आजवर सांगितले नाही. पण उत्फुर्तपणे होत आहे.*
*हा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा जनमानसावरचा पगडा. ज्ञानेश्वरानंतरच्या सर्वच संतांनी ही भक्ती चळवळ घरोघरी पोहोचवली. भारतीय संस्कृती संस्काराचे फायदे प्रत्येक घराला प्राप्त होत आहेत.*
*जगातील सर्वच विव्देषाचे कारण माऊलींना ज्ञात होते. माऊली हरिपाठात म्हणतात..*
*कोणाचें हें घर हा देह कोणाचा ।*
*आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥*
*सामान्य जनाला जात.. वर्ण.. देहयष्टी.. घर.. संपत्ती.. पद.. प्रतिष्ठा सर्वच गोष्टीचा अभिमान.. अहंकार असतो. या सर्वाचा भोग घेतो तो त्याचा देह. हा देह टिकविण्यासाठी सतत धडपड सुरू असते. पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे.. त्याचा मालक कोण हे मात्र त्याला ठाऊक नसते.*
*पण योगी जनांचे तसे नसते. त्यांना जीवन उद्दिष्ट ठाऊक असते आणि पूर्णत्वाची कल्पनाही असते. याविषयी गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाने विचारलेल्या सात प्रश्नांच्या उत्तरात विस्तृत विवेचन केलेले आहे.*
*ज्ञानेश्वर माऊली हे योगी. जे योगी असतात ते जन्मभर भगवंताचे नामस्मरण करतात. त्यांनी इंद्रियविजय प्राप्त केलेला असतो. योगी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून कोसो दूर असतात. त्यांच्यावर मायेचाही प्रभाव पडत नाही. सुख असो वा दुःख ते स्थितप्रज्ञ असतात. त्याकडे समबुद्धीनेच बघून ते अविचल असतात.*
*योगीजनांना अंतकालाची जाणीव होते. त्यांच्या डोक्यात अंतःकाली भगवंताशिवाय कोणतेच विषय नसल्याने काही इच्छापुर्तीसाठी ते पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अंतकाळी त्यांच्या देहाला यातनाही होत नाहीत. मायेला दूर सारुन ते आनंदाने परमधामात येतात. पण संजीवन समाधी रुपातील त्यांची स्पंदने.. उर्जा चैतन्यदायी ठरते.*
*तुळशीच्या.. फुलांच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरुंना वंदन करुन ॐ कार स्मरण करतात, तेव्हा या प्रिय भक्ताला आदि.. अनंत अर्थातच कधीही नष्ट न होणाऱ्या अक्षरधामात.. परमधामात सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्ण अवतरतात. जन्मानंतर परमेश्वराने सोपविलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते.*
*ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात हेच दृश्य होते. उपस्थित संतजनांना याची कल्पना होती. पण तरीही उपस्थित कुणालाही भावनावेग आवरणे शक्य नव्हते. नामदेव, जनाबाई सह अनेक संतांनी याचे वर्णन केलेय. ज्ञानदेवांनी त्यांचे गुरु आणि बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव असो वा लहानशी मुक्ताई यांचीही माया दूर सारली. माऊलींनी त्यांना त्रास देणाऱ्यांविषयीही अवाक्षर काढले नाही. याउलट त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला. समतेची वाट दाखवली.*
*ज्ञानेश्वरी.. चांगदेव पासष्टी.. हरिपाठ.. अमृतानुभव हे माऊलीचे ज्ञानामृत भक्ताना सदैव संजीवनी देत आहे. माऊलींची आत्मरुप चैतन्य उर्जा.. स्पंदने मात्र भागवत भक्तांना आजही जाणवतात.*
*संजीवन समाधीच्या ७२८ वर्षानंतरही दरवर्षी लाखो भक्त माऊलींचे हे नित्य अनुभवतात. भौतिक जगात सुख.. समाधान.. मनःशांती.. आनंद प्रत्ययास येणारी ही देवाची आळंदी. इथेच नाही तर गावोगाव या माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्य भक्त हरिनाम संकीर्तनात दंग आहेत.*
*या ज्ञानियाच्या राजाने भक्तीतून विवेकी होत सत्य ज्ञान प्राप्तीचा मार्ग प्रदान केला. हा भागवत धर्म प्रसाराचा वारसा पूढे अनेक संतांनी त्याच निष्ठेने चालवला. समाजात एकोपा.. शांती आणि प्रत्येक कुटुंबात सौख्य प्रदान झाले. याचे दर्शन दरवर्षी पंढरी वारीत लाखो हरिभक्तांच्या रुपाने घडते. सदगुरु गुरु निवृत्तीनाथांनी माऊलींच्या मनात रोवलेल्या मोगऱ्यांच्या फुलांचा सुगंध या शिष्याने जगभर पसरवला. माऊली विश्वविख्यात आहेत.*
*सत्य ज्ञानाचा.. विवेकाचा शाश्वत सुखाचा भक्ती मार्ग दाखवणे हे माऊलींचे या देशावर अनंत उपकार आहेत. अमृत रसमय खजीना प्रदान करणाऱ्या.. जगातील प्रत्येक जिवासाठी पसायदान मागणाऱ्या जगत माऊलींच्या चरणावर वंदन करुया.*
🌹🛕🌸🔆🙏🔆🌸🛕🌹
*समाधी घेऊन जाई ज्ञानदेव*
*सोहळा अपूर्व जाहला गे माये*
*निवृत्तीनाथांनी चालविले हाती*
*पाहुन ती मूर्ती धन्य वाटे*
*आपण निर्गुण मागे परी दान*
*विश्वाचे कल्याण-निरूपण*
*सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ*
*मायेचे हे बळ राया बोले*
*ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट*
*फुटली पहाट ब्रम्हज्ञान*
*नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो*
*वैकुंठासी जातो ज्ञानराया*
*सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ*
*सज्जनाचे बळ समाधान*
*गुरू देई शिष्या समाधी आपण*
*देवा ऐसे मन का बा केले ?*
*पद्माचे आसन घालविले जाण*
*ओंकार ते पूर्ण पंचप्राण*
*पैलतिरी हाक आली आज कानी*
*करूनी निर्वाणी बोलविले*
*ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला*
*कैवल्यचि झाला भक्तजन*
🌷🍃🌸🛕🌺🛕🌸🍃🌷
*गीत : अशोकजी परांजपे* ✍️
*संगीत : कमलाकर भागवत*
*स्वर : सुमन कल्याणपूर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*‼️जय जय रामकृष्ण हरी ‼️*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-२९.११.२०२४-*
🌻🥀🌷🌿🌺🌿🌷🥀🌻