Wednesday, 13 November 2024

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४१३६ उमेदवार

 राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४१३६ उमेदवार

 

मुंबईदि. १२ : राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. राज्यात एकूण ४१३६ उमेदवार आहेत ज्यामध्ये ३७७१  पुरूष३६३  महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.

राज्यातील एकूण उमेदवाराचे नाव, पत्ता, राजकीय पक्ष, मतदारसंघ आदी संपूर्ण यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

Tuesday, 12 November 2024

निवडणूक काळात ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त; वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात

 निवडणूक काळात ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त;

वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात

 

मुंबईदि. १२ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेतज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नयेअशी तरतूद आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणा कार्यरत असूनप्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके (एस.एस.टी.) आणि भरारी सर्वेक्षण पथके (एफ.एस.टी.) तैनात आहेत. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ६ हजार पथके आणि १९ अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या आहेत.

स्थिर आणि भरारी पथकांना प्रत्येक वाहनाची तपासणी करून संशयास्पद काही आढळल्यास पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत. निवडणूक काळात विविध पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक हवाई मार्गाने दौरे करतातत्यांचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांची देखील तपासणी केली जाते. सर्वच नागरिकांच्या वाहनांची तपासणी केली जाते व त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही. स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त असलेल्या ठिकाणांहून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी होतेपथकामध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल आणि इतर विभागाचे कर्मचारी असतात. तपासणी करताना नागरिकांना त्रास होणार नाहीयाची दक्षता घेतली जाते. संशयास्पद वस्तू आढळल्यासजसे की पैसादारूमौल्यवान धातूत्या जप्त करून नियमाप्रमाणे कारवाई केली जाते.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेदरम्यान आतापर्यंत सर्व अंमलबजावणी यंत्रणा व स्थिर आणि भरारी पथकांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करून कार्यवाही केली आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. तरीही असा कोणताही प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्याससी-व्हिजिल ॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा करण्यात आले आहे.

कुलाबा मतदारसंघातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांनी पुढे यावे

 कुलाबा मतदारसंघातील मतदान टक्केवारी

वाढवण्यासाठी मतदारांनी पुढे यावे

- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

 

मुंबईदि. १२ : लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेऊन मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जागरूक व जबाबदार नागरिक म्हणून कुलाबा मतदारसंघातील मतदारांनी पुढे यावेअसे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी येथे केले.

बायव्ह्यू मरीना गार्डनकफ परेड येथे आयोजित कुलाबा परिसरातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आयोजित खुल्या संवाद उपक्रमात डॉ. कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले कीयेत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी राज्यभरात मतदान होणार आहे. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये कुलाबा मतदारसंघाचा समावेश होता. राज्याच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या क्षेत्रात वेगळे स्थान असलेल्या कुलाबा सारख्या नामांकित ठिकाणातील मतदान टक्केवारी कमी असणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे निवडणूक आयोग मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची जनजागृती करण्याचे काम करत आहे. राज्यात विविध मतदारसंघात जनजागृती उपक्रमाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनी मतदान प्रक्रियेविषयी व्यापक आणि कृतीशील दृष्टिकोन ठेवावाअसे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.

मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सोपे व्हावे म्हणून मतदार यादी संकेतस्थळावर तसेच वोटर ॲपवर उपलब्ध आहे. विधानसभा निवडणुकांसाठी उंच इमारती व गृहसंकुलांसाठी १,१८५ मतदान केंद्रेवाहनतळ सुविधातसेच दोन किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्रांची सुविधा दिली आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेतमतदारांनी मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी केले.

तुळशीचे औषधी गुण* , तुलसी विवह

 *‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*

🪴   *तुळशी विवाह*   🪴


*"तुळशीचे पान. एक त्रैलोक्य समान*

*उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळशी माऊली*

*नाही आणिक साधन, एक पूजन तुळशीचे*

*न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळशीसी*

*योगायोग न लगे काही, तुळशीवाचुनी देव नाही"*


*अशाप्रकारे संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.*


*🌿एकंदरीत भारतीय समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे. समुद्रमंथनातून  जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. प्रत्येकाच्या दारी तुळशीवृंदावन असतेच. नित्य नियमाने तिची पूजा केली जाते सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते देवळात परमेश्वराला तुळशीपत्र वाहिले जाते. आजकाल जागेअभावी वृंदावन बांधणे शक्य नाही म्हणून मातीच्या कुंडीत तुळशीचे रोप लावतात.* 


*🌿तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडते. तुळशीचे महत्त्व आणि माहात्म्य अनन्यसाधारण आहे. देवपूजा श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते. भगवान श्रीविष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून तुळशीला हरीप्रिया म्हणतात.* 


*🌿तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.*


 *💠तुळशी विवाह पूजन💠* 

*🌿घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची वा तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कर्ता स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.*


*🌿कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते. त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्या समवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.*


💠 *पूजन आख्यायिका💠* 


*🌿याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतीव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावर विष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात.*


*🌿ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.*


*💠तुळशीचे औषधी गुण* 💠


*🌿भारतीय समाजात तुळशीला एवढे मानाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छवासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते, त्यामुळे हवा शुद्ध रहाते ती कफनाशक व पाचक आहे सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे. तुळशीची पाने, आले व गूळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो.*


*🌿चहा कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले तुळशीची पाने जेवल्यानंतर चावून खाल्यास पचन चांगले होते. तुळशीरस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. रक्तातील, कोलस्ट्रोल कमी होते. कोलायटिस, अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे काडे, मेदवृद्धी, डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत*


*🌿स्मरणशक्ती वाढवण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिर्‍या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्याचे पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लघवी स्वच्छ होत.*


*💠तुळशी विवाहामागील अर्थ* 💠*


*🌿तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी म्हणजेच 'तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी।' देवाला पूर्णपणे वरण्याची क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही.*


*🌿देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत आहे. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस या गोष्टींचे प्रतीक आहे.*


*🌿आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी त्यांची प्रार्थना ऐकते. तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र सोहळा मानला जातो. तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना तेजाने प्रकाशमय करतात. तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात. आपल्यात देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते. म्हणूनच तुळशी व‍िवाह करविला जातो.* 


*🌿म्हणूनच या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू या!🙏🏻🙏🏻*

        *‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ठाण्यात 20.75 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

 राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;

ठाण्यात 20.75 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

मुंबईदि. 12 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यात अंजूरगाव आणि आलीमघर खाडीमध्ये हातभट्टी केंद्रावर 11 नोव्हेंबर रोजी सामुहिक धाडसत्र मोहिम राबवून एकूण सात गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईत 200 लीटर क्षमतेच्या 354 ड्रम्स, 1000 लीटर क्षमतेचे तीन बॉयलर व अन्य हातभट्टी साहित्याचा मुद्देमाल जप्त केला. सदर माल हा नाशवंत असल्यामुळे जागेवरच नष्ट करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत 20 लाख 75 हजार आहे. 

या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये सात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. विधानसभा निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करून हातभट्टी दारूअवैध मद्य निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग धाडसत्र राबवित आहे. अवैध मद्य निर्मितीविक्री याविषयी तक्रार द्यावयाची असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 18002339999 वर द्यावीअसे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे,  कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई पार पडली आहे. या कारवाईमध्ये ठाणे उपअधीक्षक वैभव वैद्यदुय्यम निरीक्षक टी. सी. चव्हाणआबा बोडरेसहा. दुय्यम निरीक्षक एच.एम देवकातेरणजीत आडेए. एम कापडेजवान संदीप धुमाळअविनाश जाधवरामचंद्र पाटीलराजू राठोडभाऊसाहेब कराडनारायण जानकरविनोद अहीरेप्रवीण धवणेरूपेश खेमनारनितीन लोखंडे यांनी सहभाग घेतलाअसे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

००००

आचारसंहिता भंगाच्या ५,२३० तक्रारी निकाली; ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या ५,२३० तक्रारी निकाली;

५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त


 


मुंबई, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ५ हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५,२३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.


५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त


राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 विधानसभा निवडणुकीसाठी

४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 

            मुंबई दि. १२ : केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे.            

            नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३गोंदिया ३२ आणि सोलापूर २९मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिमसिंधुदुर्गगडचिरोली हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.

            महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

            'महिला नियंत्रित मतदान केंद्रस्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालयपोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहीलअशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

            जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२अकोला ६अमरावती ८औरंगाबाद १३बीड ८भंडारा ८बुलढाणा ७चंद्रपूर ९धुळे ५,  जालना ६कोल्हापूर १०लातूर ६मुंबई शहर १२नागपूर १३नांदेड ९नंदुरबार ४,  उस्मानाबाद ४पालघर ६परभणी ८पुणे २१रायगड ९रत्नागिरी ६सांगली ८सातारा १७,  ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

००००

Featured post

Lakshvedhi