Sunday, 6 October 2024

आरे जेवीएलआर से बीकेसी' मेट्रो 3 के पहले चरण का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा किया गया लोकार्पण

 


'आरे जेवीएलआर से बीकेसीमेट्रो के पहले चरण का

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा किया गया लोकार्पण

 

मुंबईदिनांक: 05 अक्टूबर:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा हरी झंडी दिखाकर कोलाबा-बांद्रा-सीप्ज मुंबई मेट्रो लाइन-3,- यह मुंबई की पहली पूरी तरह से भूमिगत मेट्रो लाइन- 'आरे जेवीएलआर से बीकेसी’ के पहले चरण का लोकार्पण किया गया है।

इस अवसर पर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकौशल विकास मंत्री और मुंबई उपनगर के पालक मंत्री मंगलप्रभात लोढास्कूल शिक्षा मंत्री दीपक केसरकरमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन की प्रबंध निदेशक श्रीमती अश्विनी भिडे सहित अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा मुंबई के यातायात को गति देने वाली मेट्रो के पहले चरण का लोकार्पण किया गया। इसके साथ ही मुंबई और ठाणे क्षेत्र में 32 हजार 800 करोड़ रुपए की विभिन्न शहरी विकास परियोजनाओं का भूमि पूजन किया गया। इसके अलावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना का लाभ दिया वितरित किया गया। प्रधानमंत्री श्री. मोदी ने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स के एक मेट्रो स्टेशन पर पहली मेट्रो को हरी झंडी दिखाई। इस दौरान उन्होंने बीकेसी से सांताक्रूज तक का सफर मेट्रो से किया। प्रधानमंत्री श्री.मोदी ने अपनी यात्रा के दौरान मेट्रो में 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाके लाभार्थी बहनों और विद्यार्थियों मजदूरों से बातचीत की।

इस दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों द्वारा मेट्रो कनेक्ट-मेट्रो सेवा का 'मोबाइल ऐपका लोकार्पण भी किया गया। यह ऐप नए फीचर्स के साथ यात्रा अनुभव को बेहतर बनाएगा और नागरिकों की सुविधा के लिए उपयोगी होगा। इसके साथ ही मेट्रो परियोजना पर आधारित 'कॉफी टेबल बुकका भी अनावरण प्रधानमंत्री श्री मोदी के करकमलों द्वारा किया गया। इसमें भूमिगत मेट्रो यात्रा की शानदार तस्वीरों का संग्रह है। मेट्रो 3 (आरे-बीकेसी) की यह लाइन (रूट) रविवार अक्टूबर 2024 से शुरू किया जाएगा। मेट्रो प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वे इस मेट्रो से सफर अवश्य करें।

 

मेट्रो के पहले चरण की विशेषताएं

यह परियोजना आरे जेवीएलआर से बांद्रा-कुर्ला-कॉम्प्लेक्स तक 12.69 किलोमीटर की है। इसमें कुल 10 स्टेशन (भूमिगत और जमीन (ग्राउंड) पर स्टेशन) हैं। इस परियोजना की लागत (चरण-1) 14120 करोड़ रुपए है।

 

0000

आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो 3 च्या पहिल्‍या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

 आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ मेट्रो 3 च्या पहिल्‍या टप्प्याचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई दि. 5:  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाईन 3, या मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेवरील आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या च्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या वाहतुकीला गती देणाऱ्या मेट्रो च्या पहिला टप्प्याचे लोकार्पण झाले.तसेच मुंबई व ठाणे परिसरातील 32 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे भूमिपूजनआणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी बांद्रा-कुर्ला संकुल येथील मेट्रो स्टेशन येथे पहिल्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांनी बीकेसी ते सांताक्रुज असा मेट्रो प्रवास केला. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी प्रवासादरम्यान मेट्रोमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनी आणि विद्यार्थीमजूर यांच्याशी संवाद साधला.

यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो कनेक्ट- 3 या मेट्रो सेवेच्या मोबाइल ॲपचे ही लोकार्पण करण्यात आले. हे ॲप नवीन वैशिष्ट्यांसह प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी उपयुक्त असणार आहे. याचबरोबर मेट्रो 3 प्रकल्पावर आधारित कॉफी टेबल बुकचे अनावरणही प्रधानमंत्री श्री. मोदी  हस्ते करण्यात आले. यामध्ये भूमिगत मेट्रो प्रवासाच्या नेत्रदीपक फोटोंचा संग्रह आहे. मेट्रो 3 (आरे- बिकेसी) हा मार्ग रविवार दि.5ऑक्टोबर 2024 रोजीपासून सुरू करण्यात येणार असून नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावाअसे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

मेट्रो च्या पाहिल्या टप्प्याचे वैशिष्ट

हा प्रकल्प आरे जेव्हीएलआर ते वांद्रे-कुर्ला- कॉम्लेक्स असा 12.69किलोमीटरचा आहे. यामध्ये एकूण 10 स्थानके (भूमिगत व एक 1 जमीन स्तरावरील स्थानक) असणार आहेत. याचा प्रकल्प खर्च (टप्पा-1)-  ₹14120 कोटी इतका आहे.

0000


जय जय भवानी, मनरमणी

 जय जय भवानी,  मनरमणी,  मातापुरवासिनी  |

चवदा भुवनांची स्वामिनी,  महिषासुरमर्दिनी  |

जय जय भवानी  ॥ धृ ॥


नेसूनि पाटाऊ,  पिवळा हार शोभती गळा  |

हाती घेऊनिया त्रिशूळा भाळी कुंकुम टिळा  ॥

जय जय भवानी  ॥ १ ॥


अंगी लेवूनिया काचोळी,  वर मोत्याची जाळी  |

हृदयी शोभतसे,  पदकमळी कंठी हे गरसोळी  ॥

जय जय भवानी  ॥ २ ॥


पायी घागरिया,  घूळघूळ नाकी मुक्ताफळ  |

माथा केश हे कुरळ,  नयनीही काजळ  ॥

जय जय भवानी  ॥ ३  ॥


सिंहावरी तू बैसून मारिसी दानवगण  |

तुजला विनविती,  निशिदिन गोसाविनंदन  ॥

जय जय भवानी  ॥ ४ ॥

नेरळ ग्रामपंचायतीत डेंग्यू रुग्ना

 


देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमूळे महाराष्ट्राला मिळाली गती

 देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टमूळे 

महाराष्ट्राला मिळाली गती 



मुंबई दि. ५ (प्रतिनिधी) : गेल्या १५ वर्षात आणि मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात, देवेंद्र फडणवीस यांनी एकसंध पायाभूत धोरणासाठी एक आराखडा तयार केला, ज्यात अनेक मेट्रो मार्ग जोडण्याचा, महामार्ग बांधण्याचा प्रयत्न केलाआज या सर्व ड्रीम प्रोजेक्ट ला गती मिळाली आहे. येत्या काळात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण बनविण्याचे  महाराष्टाचे स्वप्न पूर्ण आहे. 

फडणवीस यांच्या कार्यकाळात 701 किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग किंवा समृद्धी महामार्गांसह राज्यातील काही महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना मंजुरी आणि प्रारंभ झाला, ज्याने आधीच प्रमुख औद्योगिक केंद्रांमधील प्रवासाचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे.
मेट्रो 3 चे आजचे उद्घाटन त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या प्रकल्पांच्या वाढत्या यादीत भर घालते, ज्यात मेट्रो मार्ग 2ए, 7 आणि 4, तसेच जलमार्ग आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा समावेश आहे. मेट्रो 3 मुळे भारतातील सर्वात गर्दीच्या शहरी केंद्रांपैकी एक असलेल्या मुंबईतील कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दौऱ्यांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारचा भर अधिक ठळकपणे दिसून आला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह 29,400 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रयत्नांचा उद्देश केवळ गर्दी कमी करणे हा नाही तर मुंबईचा भविष्यातील विकास शाश्वत आहे हे सुनिश्चित करणे हा आहे.

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी एमएमआरडीए आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासारख्या संस्थांशी जवळून काम करण्यासाठी फडणवीस यांनी एक समर्पित वॉर रूम उभारला. यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी सुव्यवस्थित होण्यास आणि नोकरशाहीतील विलंब टाळण्यास मदत झाली  पंतप्रधान मोदी आज मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या प्रवासातील आणखी एका टप्प्याचे उद्घाटन करत असताना फडणवीसांनी घातलेला पाया महाराष्ट्राच्या शहरी आणि प्रादेशिक परिदृश्याला आकार देत आहे,

--------------------------------------------------------


देवेन्द्र फड़णवीस के ड्रीम प्रोजेक्ट ने दी महाराष्ट्र को गति 


मुंबई जिला. 5 (प्रतिनिधि): पिछले 15 वर्षों में और मुख्यमंत्री के रूप में अपने कार्यकाल के दौरान, देवेंद्र फड़नवीस ने एक एकीकृत बुनियादी ढांचा नीति के लिए एक रूपरेखा तैयार की, जिसमें कई मेट्रो लाइनों को जोड़ने, राजमार्गों का निर्माण करने की मांग की गई और आज इन सभी स्वप्न परियोजनाओं ने गति पकड़ ली है। आने वाले वर्षों में आधुनिक तकनीक और सुजलाम सुफलाम को पूर्ण करने का महाराष्ट्र का सपना पूरा हुआ है।

फड़नवीस के कार्यकाल में राज्य की कुछ महत्वाकांक्षी बुनियादी ढांचा परियोजनाओं को मंजूरी और शुरुआत मिली, जिसमें 701 किलोमीटर लंबा मुंबई-नागपुर एक्सप्रेसवे या समृद्धि राजमार्ग शामिल है, जिसने पहले ही प्रमुख औद्योगिक केंद्रों के बीच यात्रा को बदलना शुरू कर दिया है। मेट्रो 3 का आज का उद्घाटन इसमें जोड़ता है उनके नेतृत्व में शुरू की गई परियोजनाओं की सूची बढ़ती जा रही है, जिसमें मेट्रो मार्ग 2ए, 7 और 4, साथ ही जलमार्ग और स्मार्ट यातायात प्रबंधन प्रणाली शामिल हैं। मेट्रो 3 से भारत के सबसे भीड़भाड़ वाले शहरी केंद्रों में से एक मुंबई में कनेक्टिविटी में काफी सुधार होने की उम्मीद है। प्रधानमंत्री मोदी की हाल की महाराष्ट्र यात्रा ने बुनियादी ढांचे के विकास पर सरकार के फोकस को उजागर किया है। कुछ महीने पहले उन्होंने 29,400 करोड़ रुपये की कई परियोजनाओं का उद्घाटन किया था, जिसमें ठाणे-बोरीवली जुड़वां सुरंग परियोजना और गोरेगांव-मुलुंड लिंक रोड शामिल थी. इन प्रयासों का उद्देश्य न केवल भीड़भाड़ को कम करना है बल्कि यह सुनिश्चित करना भी है कि मुंबई का भविष्य का विकास टिकाऊ हो।

फड़नवीस ने बुनियादी ढांचा परियोजनाओं की प्रगति की निगरानी के लिए एमएमआरडीए और महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम जैसी एजेंसियों के साथ मिलकर काम करने के लिए एक समर्पित वॉर रूम की स्थापना की। इससे परियोजना कार्यान्वयन को सुव्यवस्थित करने और नौकरशाही देरी से बचने में मदद मिली है, जैसा कि प्रधान मंत्री मोदी ने आज मुंबई की बुनियादी ढांचा यात्रा में एक और चरण का उद्घाटन किया है, फड़नवीस द्वारा रखी गई नींव महाराष्ट्र के शहरी और क्षेत्रीय परिदृश्य को आकार दे रही है।

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली

 बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली












---प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

·         प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन

·         नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता

·         23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ

·         कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित

·         पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ

·         राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण

 

वाशिमदि.5 : -  बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृतीप्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईलअसे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटनकिसान सन्मान संमेलन तथा विविध विकासकामांचे लोकार्पणलाभाचे वितरण झाले. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहानमत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंहउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवराष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीरपालकमंत्री संजय राठोडग्रामविकास मंत्री गिरीश महाजनकृषी मंत्री धनंजय मुंडेखा.अनुप धोत्रेआ.चंद्रशेखर बावनकुळेआ.निलय नाईकआ.भावना गवळीआ.किरण सरनाईकआ.लखन मलिकआ.वसंत खंडेलवालजिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले ,बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. उद्गाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो. संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावीअसे आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केलेत्यामुळे त्यांचे कौतुक करतो. संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृतीप्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईलअसे प्रधानमंत्री म्हणाले.

बंजारा समाजातील महापुरुषांनी देशासाठी  खूप मोठे योगदान दिले. राजा लकी सिंगसंत सेवालाल महाराजस्वामी हाती रामसंत रामराव बापू महाराजांसह अनेक संतमहंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम मार्गदर्शन केले. केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचललेअसल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. आज शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

 

 

महाराष्ट्र सरकारने ५० हजार करोड रुपयांच्या वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नागपूरवर्धाअमरावतीयवतमाळअकोलाबुलढाणा या जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. अमरावती येथील नुकतेच टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन  झाले. राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीला सशक्त करणारी योजना असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.  

 

संग्रहालयामुळे बंजारा संस्कृतीपरंपरांचे दर्शन घडेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नगारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक व सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. खऱ्या अर्थाने पोहरादेवी येथे काशी उभी राहिली असून बंजारा संस्कृतीपरंपरांचे दर्शन होणार आहे. जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाने आपली संस्कृती जपली. आता त्यांच्या या संस्कृतीचे जतन संग्रहालयाच्या माध्यमातून होणार आहे. संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 700 कोटीचा निधी वितरित केला आहे.

सबका साथ सबका विकास’  हे ब्रीद घेऊन चालणारे नरेंद्र मोदी यांनी संत सेवालाल महाराजांचे तत्व स्वीकारले आहे. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहेही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम  करण्याचे कार्य सुरू असून ही योजना बंद होऊ देणार नाही. या योजनेतून राज्यातील २ कोटी पेक्षा अधिक महिलांना तीन महिन्यांचे सहाय्य वितरण करण्यात आले आहे. राज्य सरकार समाजातील शेतकरीकष्टकरीयुवक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे राज्य सरकार हे आता आपले लाडके सरकार झाले आहेअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

 

बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट केला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला ते  आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरिता व त्याच्या उद्घाटनासाठी आले आहेत. मोदीजींचे बंजारा समाजाशी एक घट्ट नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे पोहरागडाला भेट देणारे पहिले प्रधानमंत्री आहेत.

राज्याचा मुख्यमंत्री असताना रामराव बापूंनी मला पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी आज बंजारा विरासत संग्रहालय उभे राहिले आहे. मंदिराचा विकास झाला आहे. पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण केले. मोदीजींनी किसान सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो किसान महासन्मान योजना आणली. या योजनांचे हप्ते प्रधानमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना  दिवसा वीज देण्याचे आश्वासन राज्य शासनाने पूर्ण केले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पाच सौर उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल श्री.फडणवीस यांनी देखील प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. 

 

विरासत संग्रहालय गौरवाचे प्रतिक - उपमुख्यमंत्री अजित पवार

बंजारा विरासत संग्रहालय हे बंजारा समाजाची संस्कृतीपरंपरावारसाअस्मिताइतिहास याचे गौरवशाली प्रतीक ठरेल. या संग्रहालयाच्या रूपाने एक वैभवशाली व भव्य वास्तू येथे उपलब्ध झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून निसर्गपूजक लढवय्या बंजारा समाजाच्या संस्कृतीपरंपरांचे सर्वांना दर्शन घडेल असा मला विश्वास आहे.

 

या संग्रहालयासह विकास आराखड्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 25 कोटी रुपये देऊन केली होती. नंतर श्री.फडणवीस यांनी 100 कोटीचा निधी जाहीर केला. त्यानंतर आता 700 कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीअसे  उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

 

बंजारा समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हावे - पालकमंत्री संजय राठोड

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पोहरादेवी येथे आगमन म्हणजे बंजारा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देशातील या समाजाला राज्यघटनेच्या एका सूचित आणण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. देशभर बंजारा समाजाची संस्कृती व भाषा एकसारखी आहे. त्यामुळे बंजारा भाषेला संरक्षित करण्यासाठी तिचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावाअसे पालकमंत्री म्हणाले.

बंजारा तांड्यांचा चतुरस्त्र विकास होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. स्वदेश योजनेंतर्गत पोहरादेवीच्या विकासासाठी केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे. यवतमाळवाशिम जिल्ह्यांत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटीसह अन्य करांमध्ये सूट मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासन सातत्याने शेतकरी हिताचे उपक्रम राबवत आहे. सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीच्या दरात आवश्यक बदल करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक दर देऊन किमान आधारभूत किंमत ठरविली जात आहे. युरीया आणि डीएपीचे दर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीतत्यामुळे यावर शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देतेअसे श्री.चौहान म्हणाले.

केंद्रीय मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग म्हणालेपशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा प्रधानमंत्र्यांच्याहस्ते आरंभ होत आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत लिंग वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामुळे वीर्याची मात्रा सुमारे २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिपगौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहे. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलांची कमी दरात निवड करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

 

विविध उपक्रमांचा आरंभलोकार्पण व लाभाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीस बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण केले व पाहणी केली तसेच बंजारा बांधवांशी संग्रहालयात संवाद साधला. मुख्य समारंभात 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला. सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे हजार कोटी रुपयांच्या व्या हप्त्याचेही वितरण केले. सुमारे 23 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा आरंभ केला.    

प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी निधी अंतर्गत हजार 920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. सुमारे हजार 300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित केल्या. पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ  करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

 

 

 

श्रद्धेबरोबर पावित्र्य जपणे सुद्धा फार महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि येणाऱ्या आपल्या पिढीसाठी.

  श्रद्धेबरोबर पावित्र्य जपणे सुद्धा फार महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि येणाऱ्या आपल्या पिढीसाठी.


Featured post

Lakshvedhi