Friday, 2 August 2024

शास्त्रों में स्वच्छता के सूत्र– हमारे पूर्वज अत्यंत दूरदर्शी थे। उन्होंने हजारों वर्षों पूर्व वेदों व पुराणों में महामारी की रोकथाम के लिए परिपूर्ण स्वच्छता रखने के लिए स्पष्ट निर्देश दे रखें हैं–

 ।।श्रीगणेशाय नमः।।


शास्त्रों में स्वच्छता के सूत्र–


हमारे पूर्वज अत्यंत दूरदर्शी थे। उन्होंने  हजारों वर्षों पूर्व वेदों व पुराणों में महामारी की रोकथाम के लिए परिपूर्ण स्वच्छता रखने के लिए स्पष्ट निर्देश दे रखें हैं–


1. लवणं व्यञ्जनं चैव घृतं

    तैलं तथैव च। 

    लेह्यं पेयं च विविधं 

    हस्तदत्तं न भक्षयेत्।। 

    -धर्मसिन्धू 3 पू. आह्निक


नामक, घी, तेल, चावल, एवं अन्य खाद्य पदार्थ चम्मच से परोसना चाहिए, हाथों से नहीं।


2. अनातुरः स्वानि खानि न 

    स्पृशेदनिमित्ततः।।

    -मनुस्मृति 4/144


अपने शरीर के अंगों जैसे आँख, नाक, कान आदि को बिना किसी कारण के छूना नहीं चाहिए।


3. अपमृज्यान्न च स्न्नातो

    गात्राण्यम्बरपाणिभिः।। 

    -मार्कण्डेयपुराण 34/52


एक बार पहने हुए  वस्त्र धोने के बाद ही पहनना चाहिए। स्नान के बाद अपने शरीर को शीघ्र सुखाना चाहिए।


4. हस्तपादे मुखे चैव पञ्चाद्रे

    भोजनं चरेत्।।

    पद्म०सृष्टि.51/88

    नाप्रक्षालितपाणिपादो

    भुञ्जीत।।

    -सुश्रुतसंहिता चिकित्सा

    24/98

 अपने हाथ, मुंह व पैर स्वच्छ करने के बाद ही भोजन करना चाहिए।


5. स्न्नानाचारविहीनस्य सर्वाः 

    स्युः निष्फलाः क्रियाः।।


   -वाघलस्मृति 69


बिना स्नान व शुद्धि के यदि कोई कर्म किये जाते हैं तो वो निष्फल रहते हैं।


6. न धारयेत् परस्यैवं

    स्न्नानवस्त्रं कदाचन।I

    -पद्म० सृष्टि.51/86


स्नान के बाद अपना शरीर पोंछने के लिए किसी अन्य द्वारा उपयोग किया गया वस्त्र (टॉवेल) उपयोग में नहीं लाना चाहिये।


7. अन्यदेव भवद्वासः

    शयनीये नरोत्तम।

    अन्यद् रथ्यासु देवानाम

    अर्चायाम् अन्यदेव हि ।।

    - महाभारत अनु 104/86


पूजन, शयन एवं घर के बाहर  जाते समय अलग-अलग वस्त्रों का उपयोग करना चाहिए।


8. तथा न अन्यधृतं (वस्त्रं 

    धार्यम्।।

   -महाभारत अनु 104/86


दूसरे के द्वारा पहने गए वस्त्रों को नहीं पहनना चाहिए।


9.  न अप्रक्षालितं पूर्वधृतं

     वसनं बिभृयाद्।।

    -विष्णुस्मृति 64


एक बार पहने हुए वस्त्रों को स्वच्छ करने के बाद ही दूसरी बार पहनना चाहिए।


10. न आद्रं परिदधीत।।

-गोभिसगृह्यसूत्र 3/5/24


गीले वस्त्र न पहनें।


सनातन धर्म ग्रंथो के माध्यम से ये सभी सावधानियां समस्त भारतवासियों को हजारों वर्षों पूर्व से सिखाई जाती रही हैं।

इस पद्धति से हमें अपनी व्यक्तिगत स्वच्छता को बनाये रखने के लिए सावधानियां बरतने के निर्देश तब दिए गए थे जब आज के जमाने के माइक्रोस्कोप नही थे। लेकिन हमारे पूर्वजों ने वैदिक ज्ञान का उपयोग कर धार्मिकता व सदाचरण का अभ्यास दैनिक जीवन में स्थापित किया था।आज भी ये सावधानियाँ अत्यन्त प्रासंगिक हैं। यदि हमें ये उपयोगी लगती हो तो इनका पालन कर सकते हैं।

आइये जाने दांतो का इलाज करने वाले आयुर्वेदिक दंतमंजन के बारे में, जिन्हें आप खुद अपने घर पर ही बना सकते हो।

 आइये जाने दांतो का इलाज करने वाले आयुर्वेदिक दंतमंजन के बारे में, जिन्हें आप खुद अपने घर पर ही बना सकते हो।

🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹

सेंधा नमक

🌹👇🌹👇🌹

 पिसा हुआ सेंधा नमक को दांतों पर मलते रहने से दांत जड़ों से मजबूत होते हैं। सेंधा नमक दांतों में जमी गंदगी को दूर करता है साथ ही कैमिकल रूप से जमें हुए एसिड़ को भी खत्म करता है।


नींबू का मंजन बनाने का तरीका

🌹👇🌹👇🌹👇🌹👇🌹👇🌹

नींबू को आप छाया में सुखा लें फिर इन्हें कूट लें और पाउडर तैयार करें। इस पाउडर को आप दांतों पर मंजन करें। यह दांतों को मोती जैसी चमक दिलवाता है।


बादाम का मंजन कैसे बनाएं

🌹👇🌹👇🌹👇🌹👇🌹

बादामों के छिलकों को जलाकर उन्हें पीस लें और उसमें थोड़ा सेंधा नमक डालकर मंजन बना लें। इस मंजन के प्रयोग से दांतों की चमक बढ़ती है।


आम का पत्तों का मंजन

🌹👇🌹👇🌹👇🌹👇🌹

आम के ताजे पत्तों को चबा-चबा कर खाएं और थूकते रहें। नियमित रूप से कुछ दिनों तक करते रहने से दांत जड़ से मजबूत हो जाते है। यदि आम के पत्तों को छांव में सुखाकर उन्हें जला लें फिर उसका चूर्ण बनाकर दांतों पर लगाने से दांतों की उम्र लंबी होती है।


 बेकिंग सोडा

🌹👇🌹👇🌹👇🌹

सेंधा नमक, बेकिंग सोडा, सिरका के साथ फिटकरी को मिला कर दांतों पर मंजन के तौर पर प्रयोग करें।


नारियल का तेल

🌹👇🌹👇🌹👇🌹

कुल्ला तेल से करें यह प्राचीन समय का नुस्खा है जो दांतों की गंदगी को दूर करता है। नारियल तेल से कुल्ला करने से दांत साफ होते हैं।

कुछ देर तक कुल्ला करने के बाद दांतों को मुलायाम और सूखे ब्रश से दांतों को साफ करना चाहिए।


प्राकृतिक तेल का प्रयोग

👇🌹👇🌹👇🌹👇🌹👇

दांतों के लिए पुदीने का तेल, दालचीनी का तेल, लौंग का तेल आदि एंटीबैक्टीरियल हैं जिनका इस्तेमाल दांतों की सफाई के रूप में किया जा सकता है।


सरसों का तेल

👇🌹👇🌹👇🌹👇

दांतों को जड़ से मजबूत करने में सरसों का तेल का प्रयोग करना चाहिए यह भी एक प्राचीन उपाय है। सरसों के तेल में नमक, हल्दी को मिलाकर डेली दांत मांजने चाहिए।


मिट्टी का प्रयोग

🌹👇🌹👇🌹

चिकनी मिट्टी को रात को पानी में भिगो कर रखें और सुबह और शाम मसूड़ों पर लगाते रहने से थोड़े ही दिनों में आपके दांत मजबूज हो जाएगें।

यदि मसूड़ों में दर्द और सूजन है तो एलोवेरा और हल्दी का पाउडर को मिलाकर बना हुआ पेस्ट को मसूड़ों पर लगाने से मसूड़े ठीक होते हैं।

पानी से भी ब्रश कर सकते हो। एैसा करने से दांत में फंसे खाने को आराम से निकाला जा सकता है।


दालचीनी 

🌹👇🌹👇🌹

दालचीनी मुंह की बदबू को कम करती है साथ ही मुंह में किसी तरह के कीड़े को नहीं लगने देती है। दालचीनी पूरी तरह से एंटी बैक्टीरियल है।


जीरा

🌹👇🌹

जीरे को हल्की आग में सेक लें और इसका नित्य सेवन करें। यह मुंह की दुर्गन्ध को कुछ ही दिनों में जड़ से खत्म कर देगा।


इन आसान तरीकों से आप अपने घर में ही प्राकृतिक दांतमंजन बना सकते हो। यदि दांत ठीक हैं तो आपकी सेहत भी ठीक हैं।

🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🅿️🔱🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹

*आदिपंढरी

 *आदिपंढरी* 



वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते.


मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर

 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा

सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर

 

            मुंबईदि. १ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहेअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतरभारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून2024 रोजीच्या पत्रान्वये दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

            मात्रभारत निवडणूक आयोगाने  दि. १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असूनसुधारित कार्यक्रम जाहीर केला आहेतो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणीमतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणमतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ.आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेचअस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे,  विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे,  कंट्रोल टेबल अद्ययावत करणेनमुना १-८ तयार करणे१ जुलै२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे - २५ जून ते ५ ऑगस्ट २०२४. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- ६ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ६ ते २० ऑगस्ट २०२४.

            विशेष मोहिमांचा कालावधी- दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणेअंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २९ ऑगस्ट २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- ३० ऑगस्ट २०२४.

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे दुसरे जागतिक कृषी पारितोषक २०२४ महाराष्ट्राला जाहीर · एक लाख डॉलरचा वैश्विक पुरस्कार · मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शासनाच्या दूरदर्शी कृषी आणि पर्यावरण धोरणांचा गौरव

 वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे

दुसरे जागतिक कृषी पारितोषक २०२४ महाराष्ट्राला जाहीर

·       एक लाख डॉलरचा वैश्विक पुरस्कार

·       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शासनाच्या दूरदर्शी कृषी आणि पर्यावरण धोरणांचा गौरव

 

            मुंबईदि.३१ :- युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी शाश्वत विकासहवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात पर्यावरण रक्षणअन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून शाश्वत विकास धोरण राबविली जात आहेत. या सर्व प्रयत्नांची आणि पर्यावरणकृषी क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलेल्या पावलांची दखल घेत वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा २०२४ चा दुसरे जागतिक कृषीपर्यावरण पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झाले आहे. फोरमच्या चेअरमन प्रा.रुडी रॅबिंग्ज यांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे २६ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहेत. एक लाख डॉलरची पुरस्कार रक्कमचांदीची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

            या पुरस्कारांसाठी राज्यातील पर्यावरण रक्षणअन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.

बांबू मिशन राबविण्याचा निर्णय

            मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेतले आहेत. यात २१ लाख हेक्टर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठे बांबू मिशन राबविण्याचा निर्णय आहे. नंदुरबार येथील धडगांव तालुक्यातील ७० गावच्या सरपंचांनी केंद्रीय फलोत्पादन सचिव प्रभातकुमार यांच्या समोरच आमचा प्रश्न बांबू लागवडीशिवाय सुटणार नाहीअशी मागणी केली. केंद्रानेही त्याला होकार दिला. या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्री. पवार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख २० हजार एकर जमिनीवर केंद्र आणि राज्य मिळून हरित पट्टा निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. या अभियानासाठी अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. याशिवाय शासनाने १२३ प्रकल्पांना मार्गी लावून सुमारे १७ लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याचा चंग बांधला आहे.

परिवर्तनकारी निर्णय

            भारतातील पहिले मायक्रो मिलेट क्लस्टर व बांबू क्लस्टर लातूर जिल्ह्यात लोदगा येथे सुरु करण्यास मागील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मान्यता दिली होती.  तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा निर्णय घेणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. याशिवाय लाखो शेतकऱ्यांना नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण करण्याची सुरवातही केली आहे. तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावाराळा-भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करणारे महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे.

बांबू लागवडीसाठी अनुदान

            अलिकडेच औष्णिक वीज केंद्रांनी बायोमासमध्ये बाबुंचाही वापर करावा, असे निर्देश दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे बांबूपासून दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या टुथब्रशशेव्हिंग कीट यासारख्या वस्तू तयार करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे प्लॅस्टीकचा कचरा कमी होण्यास मदत मिळणार आहे. यासाठी बांबूची लागवड वाढणे आवश्यक असून त्याकरिता मिशन मोडवर काम होत आहे. बांबू लागवडीसाठी हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शिर्डी आणि मुंबईसह शक्य त्या सर्वच विमानतळांच्या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरिता पोलाद आणि अन्य धातुंच्या ऐवजी बांबुचा वापर करण्यावर भर देण्याचेही राज्य सरकारने धोरण आखले आहे,असेही श्री. पटेल यांनी नमूद केले आहे.

            वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे २०१८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. कृषी शास्त्रज्ञ प्रा.स्वामीनाथन या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पहिल्या पुरस्कारचे मानकरी ठरले आहेत. यापूर्वी १० जुलै रोजी दिल्ली येथील अग्रीकल्चर टूडे ग्रुपतर्फे महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्राने पर्यावरण रक्षणशाश्वत विकासासाठी केलेल्य कामाची दिशा जगाला भावली म्हणूनच या पुरस्कारासाठी शिंदे यांची निवड करण्यात आलीअशी माहिती श्री. पटेल यांनी दिली.

00000


 

महसूल आणि पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा

 महसूल आणि पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये

 योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई, दि.१ या वर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी 'महसूल पंधरवडा'  तसेच 'पशुसंवर्धन पंधरवडाआयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या धर्तीवर शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा. वयोश्रीलेक लाडकीअन्नपूर्णा‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चा आरंभ कार्यक्रम मंत्रालयातील परिषद सभागृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी   उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलमहसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेमहसूल व पशुसंवर्धन पंधरवडा दोन्हीसाठी नागरिकांना शुभेच्छा देताना आनंद होत आहे. नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे.

     श्री.शिंदे म्हणाले कीकृषीआरोग्यसिंचनजलसंपदासहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी  अधिक गतीमानपरस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमुख काम करावे. जिल्हास्तरीयतालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारीकर्मचारी यांनी लोकांपर्यंत जावे.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीपंधरवड्यानिमित्त विविध योजना लोकांपर्यंत नेऊन शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल यासाठी कडक कारवाई करावी.

महसूल विभागाने अधिक लोकाभिमुख होऊन काम करावे - उपमुख्यमंत्री

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीशासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटक यामध्ये सहभागी होत आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख होत अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल पंधरवडा यशस्वी होईल.  पोलीस विभागाच्या धर्तीवर महसूल विभागास देखील जिल्हा नियोजन समितीतून वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

             संगणकीकरणामुळे शासकीय कार्यालयात येण्याची गरज कमी झाली आहे. ग्रामीण भागात महसूल व पशुसंवर्धन विभाग दोन्ही महत्त्वाचे आहेत. शेतकरी व दूध उत्पादक यासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जावे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

शासनाच्या योजना व धोरण पोहोचवावेत –महसूल मंत्री

            महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले कीपंधरवड्याच्या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व धोरण पोहोचवावेत. उपक्रम राबवताना  पालकमंत्रीआमदार लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. विविध उपक्रमांच्या निमित्ताने सैनिकांचे कुटुंबीयमहाविद्यालयीन युवकवयोवृद्ध नागरिक महिला समाजातील विविध घटक यांना सामावून घेत महसूल पंधरवड्याचा हा उपक्रम यशस्वी करावा. पशुसंवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने राज्यातील दूध भेसळ विरोधात कारवाई केली जावी.

            प्रास्ताविकात अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी महसूल पंधरवड्याच्या आयोजनाचे महत्व सांगून या उपक्रमाचा तपशीलवार माहिती दिली. 

०००००

 

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

 शाब्बास स्वप्नील’... तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

मुख्यमंत्री शिंदेउपमुख्यमंत्री पवार यांनी साधला पॅरिसमधील स्वप्नीलशी

 दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

            मुंबईदि. १ : - ‘शाब्बास स्वप्नील’... तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेसअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईलअसे जाहीर केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरिसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडेविश्वजित शिंदे यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संपर्क साधला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीस्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षकआई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यकत्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसहत्याला मार्गदर्शन करणारेप्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीमहाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नेमबाजी स्वप्नीलचे हे यश आनंददायी आहे. स्वप्नीलचा महाराष्ट्राला रास्त अभिमान आहे. नेमबाजीतील या क्रीडा प्रकारात पदक पटकावणारा स्वप्नील एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. आपण राज्यातील विविध क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूप्रशिक्षक यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीपायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. राज्यातील क्रीडा संकुलांच्या सुविधांचाही विस्तार करत आहोत. ऑलिंपिकहून परतल्यानंतर स्वप्नीलचे महाराष्ट्रात स्वागत आणि यथोचित सत्कार केला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

            ऑलिंपिकवीर स्वप्नील म्हणाला कीपुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्येच सराव करताना नेमबाजीचा चांगला पाया घातला गेला. माझ्या यशात कुटुंबीयांसहआईच्या मायेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्रीमती देशपांडेश्री. शिंदे यांचा मोला वाटा आहे.

            या संवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्वप्नील कुसाळेचे आई-वडीलप्रशिक्षकमार्गदर्शक सर्वांचे अभिनंदन केले.

०००००


Featured post

Lakshvedhi