Thursday, 4 July 2024

लोणावळा - भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

 लोणावळा - भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या

पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. 3 : लोणावळा येथील भुशी धरण धबधब्यातपुण्याच्या हडपसर भागातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना दुर्दैवी आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तसेच अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले. भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईलअशी घोषणाही त्यांनी विधानसभेत केली.

विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून भुशी धरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीभुशी धरण परिसरातील दुर्घटना दुर्दैवी असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. या निधीतून संभाव्य धोकायदायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणेकुंपण घालणेसुरक्षिततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील. पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी माहिती फलक लावणेसुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आदी कार्यवाही आधीपासूनच करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दुर्गम धोकादायक स्थळीही सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानसभेत सांगितले.

------०००००-----

विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा

 विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी

गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांचा सहभाग

मतदान केंद्र उपलब्ध होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा

मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

            मुंबईदि. 3 : आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम2024 घोषित केला आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आयोगाने शहरातील उत्तुंग व समूह इमारतींमध्ये तसेच निवासी गृहरचना संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यावर भर दिला आहे.

            सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागाच्या 22 ऑगस्ट2012 रोजीच्या परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतील मतदार नोंदणीस पात्र होणारे रहिवासीसोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना पुरवावी. त्याचप्रमाणे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी सोसायटीतील रहिवाशांना मतदार नोंदणी व दुरुस्ती करुन घेण्याबाबत आवाहन करावे.

            गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र सुरु करण्याकरिता आपल्या गृहनिर्माण संस्थेचे नावपत्तानोंदणी क्रमांकअंदाजित मतदार संख्या इत्यादी माहितीसह आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) / मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच Online अर्ज भरण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या http://ceo.maharashtra.gov.in ऑनलाईन पद्धतीने या संकेत स्थळावरील https://forms.gle/twLTGpjzzy2x9eV36 व https://forms.gle/z261Ah4DDgQxSEvs9 या गुगल लिंकवर आपला अर्ज भरता येणार आहे.             मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम2024 (दुसरा) या राष्ट्रीय महत्वाच्या कार्यक्रमामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. रहिवाशांसाठी निवासाच्या जवळ आणि सोयीच्या ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेगृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

000

चर्मोद्योग महामंडळावरील संचालक, सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर

 चर्मोद्योग महामंडळावरील संचालकसदस्यांच्या

नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर

-  मंत्री गुलाबराव पाटील

मुंबईदि. 3 : चर्मकार समाजातील नागरिकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून चर्मकार महामंडळाच्या संचालक मंडळाच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर करण्यात आलेला आहे,अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

चर्मकार समाजातील नागरिकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याबाबत सदस्या उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होतात्यास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, चर्मोद्योग महामंडळाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. महामंडळामार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाच्या बाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. देवनार येथील महामंडळाच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक लेदर हब क्लस्टर व प्रशिक्षणजागतिक दर्जाचे विक्री केंद्र याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी चर्मकारांना फायबर स्टॉल देण्याच्या सूचना दिल्या असून संत रोहिदास यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याबाबत महानगर पालिकेच्या यंत्रणेला सूचित केलेले आहेअशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिली.

 या चर्चेत सदस्य भाई गिरकरप्रवीण दरेकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

०००० 

सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बांधकाम निर्धारित वेळेत करणार

 सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे बांधकाम निर्धारित वेळेत करणार

मंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि. ३ :- सांगली जिल्ह्यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयास जुना बुधगाव रोडवरील जागा मंजूर आहे. या जागेत कार्यालयीन इमारत बांधकाम प्रगतीपथावर असून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

सांगली जिल्ह्यातील उप प्रादेशिक परिवहन विभागांची कार्यालय एकत्रित करण्याबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयास जुना बुधगाव रोडवरील ४४.७६ आर एवढी जागा मंजूर आहे. या जागेत कार्यालयीन इमारत बांधकाम प्रगतीपथावर असून इमारतीचे फर्निचरइतर अनुषंगिक कामकाज पूर्ण होताच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे त्या जागेत स्थलांतरण करुन नियमितपणे कामकाजाला सुरवात होईल. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयसांगली येथे प्रशासकीय कामकाज व शिकाऊ अनुज्ञप्तीचे काम केले जाते. सावळी येथे पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे कामकाज व पाटगांव येथे परिवहन संवर्गतील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र व नुतनीकरणाचे कामकाज केले जातेअशी माहिती मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार

 महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची 

प्रभावी अंमलबजावणी करणार

- मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ३ : नागरिकांना पारदर्शकगतिमान व कालबद्ध सेवा मिळण्यासाठी शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा केला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक  उपाययोजना करण्यात येतील, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी  विधानसभेत सांगितले.

राज्यात लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना  सदस्य प्रकाश आबिटकर यांनी मांडली होती.

मंत्री श्री. देसाई म्हणाले कीया कायद्याअंतर्गत 662 सेवा अधिसूचित केल्या आहेत. हा कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत 16 कोटी 42 लाख 47 हजार पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. 15 कोटी 53 लाख 29 हजार पेक्षा अधिक अर्जावर कार्यवाही केली आहे. जवळपास 94.57 टक्के हे प्रमाण आहे. या कायद्याने नागरिकांना  पारदर्शकगतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. सर्व विभागांनी वेळेत नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देत या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिवविभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांच्या समवेत लवकरच  बैठक घेण्यात येईल.

नागरिकांना  कालबद्ध सेवा मिळण्यासाठी आणि शासनाची प्रतिमा अधिक उंचाविण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून  जनजागृती करण्यात येईलअसेही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी  सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य बच्चू कडूअतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला होता.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ करिता ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस सुरुवात

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ करिता

ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस सुरुवात

 

नवी दिल्ली, 3 : देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना गौरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र शिक्षक 27 जून 2024 पासून शिक्षण मंत्रालयाच्या https://nationalawardstoteachers.education.gov.in/Login.aspx या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन स्व-नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे.

या वर्षी, कठोर, पारदर्शक आणि ऑनलाईन निवड प्रक्रियेद्वारे तीन टप्प्यात - जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर - 50 शिक्षकांची निवड केली जाईल. निवड झालेले शिक्षक 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिवसाच्या निमित्त आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जातील. हा समारंभ नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केला जाईल.

पुरस्काराचे उद्दिष्ट :

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवशी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करणे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी निष्ठेने आणि समर्पितपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

पात्रता निकष:

राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन, स्थानिक निकाय आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश मंडळाशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक/उच्च/उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शाळा शिक्षक आणि मुख्याध्यापक पुरस्कारासाठी पात्र आहेत.केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा (केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, संरक्षण मंत्रालय संचालित सैनिक शाळा, अणुऊर्जा शिक्षण संस्था आणि आदिवासी कल्याण मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा यासह)केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) शी संलग्न शाळा.

अधिक माहितीसाठी :

               राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांबद्दल अधिक माहितीसाठी, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या : https://nationalawardstoteachers.education.gov.in/Login.aspx. या संकेतस्थळाला  भेट द्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे.

तुमच्यामुळे मला लाडकी बहिण योजना मिळणार नाही."

 काल बायको म्हणाली,

"तुमच्यामुळे मला लाडकी बहिण योजना मिळणार नाही."


मी म्हटलं,

"का, बरं "


ती म्हणाली,

"तुम्ही टॅक्स भरता, तुमच्या नावावर चारचाकी गाडीची नोंद आहे."


मी म्हटलं, 

" ठीक आहे."


ती म्हटली,

"ठीक कसलं, आता मला महिन्याला तुम्ही ₹१५०० द्यायचे आहेत."

विषय संपला.


#लाडकी बायको योजना

Featured post

Lakshvedhi