Thursday, 4 July 2024

चर्मोद्योग महामंडळावरील संचालक, सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर

 चर्मोद्योग महामंडळावरील संचालकसदस्यांच्या

नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर

-  मंत्री गुलाबराव पाटील

मुंबईदि. 3 : चर्मकार समाजातील नागरिकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून चर्मकार महामंडळाच्या संचालक मंडळाच्या नियुक्तीबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर करण्यात आलेला आहे,अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

चर्मकार समाजातील नागरिकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याबाबत सदस्या उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होतात्यास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, चर्मोद्योग महामंडळाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. महामंडळामार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाच्या बाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. देवनार येथील महामंडळाच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक लेदर हब क्लस्टर व प्रशिक्षणजागतिक दर्जाचे विक्री केंद्र याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी चर्मकारांना फायबर स्टॉल देण्याच्या सूचना दिल्या असून संत रोहिदास यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याबाबत महानगर पालिकेच्या यंत्रणेला सूचित केलेले आहेअशी माहिती मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिली.

 या चर्चेत सदस्य भाई गिरकरप्रवीण दरेकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

०००० 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi