Tuesday, 11 June 2024

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र

 राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र

स्थापनेच्या कामाला गती

मंत्री शंभुराज देसाई

  

            मुंबईदि. 11 : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वारंवार उद्भवत असलेली पूर परिस्थितीभूकंप प्रवण क्षेत्रात येत असलेला पाटण तालुका व रायगडरत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत असलेला चक्रीवादळाचा फटका या आपत्तीजनक परिस्थितीमुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण केंद्र व मुख्यालय कोयनानगर येथे करण्यात येत आहे. कामाची निकड लक्षात घेता या कामाला यंत्रणांनी प्राधान्य देवून गती द्यावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

            मंत्रालयात कोयनानगरता. पाटणजि. सातारा येथे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणेबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस अति. पोलीस महासंचालक अर्चना त्यागीअतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखेअतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) राजकुमार व्हटकरराज्य राखीव पोलीस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखेगृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भटअवर सचिव नारायण मानेतर  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. गलांडेजिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

            केंद्रासाठी जमीन मिळून बराच कालावधी झाला असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणालेया कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. पर्यावरणीय परवानग्यांचा प्रस्तावाचा संबंधित विभागाने पाठपुरावा करावा. या कामासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. हे प्रशिक्षण केंद्र जागतिक दर्जाचे झाले पाहिजे.प्रशिक्षण केंद्राची निवडलेली जागा मौजे गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) ही निसर्गरम्य व पर्यटनीय ठिकाण आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्र पर्वतीय स्टेशनमधील इमारतीप्रमाणे करण्यात यावे. प्रशिक्षण केंद्राला पर्यटकांनीही भेटी दिल्या पाहिजेअशा दर्जाचे बनविण्यात यावे,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

              मंत्री श्री. देसाई पुढे म्हणालेया केंद्रासाठी अंदाजपत्रक तयार करून निधी मागणी प्रस्ताव सादर करावा. पुढील दोन महिन्यात काम निविदा प्रक्रियेवर आणण्याची दक्षता घ्यावी. पोलीस गृहनिर्माण महामंडळाने आपल्या प्राधान्य क्रमाच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी वास्तू विशारद नियुक्त करून विस्तृत प्रकल्प तयार अहवाल तयार करावा. स्थानिक प्रशासनाने राज्यस्तरावरील संबंधित विभागराज्य राखीव पोलीस दल यांच्याशी संमन्वय ठेवून काम गतीने पुढे न्यावे, अशाही सूचना केल्या.

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेत वाढ

 विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या

मतदानाच्या वेळेत वाढ

           

            मुंबईदि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दिनांक २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढविण्यासाठी केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने  मान्य केली असून; आता मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.

            या निवडणुकीसाठी शुक्रवार३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता बुधवार, दि.२६ जून रोजी मतदान तर सोमवारदि.१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहेअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

000

 भवताल मासिक: मे २०२४ अंक !


नमस्कार.
"भवताल मासिका" चा मे २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

• पाण्याचे पूर्व-नियोजन मगच विकास (राजेंद्र पवार)
महाराष्ट्राच्या विविध भागांतील एकूण पाणी उपलब्धी, पाण्याची नेमकी सद्यस्थिती, भविष्यातील वाढती मागणी, आत्ताच लागलेली संकटांची चाहूल, त्याचे दुष्परिणाम व त्यावरील सुरू असलेले उपाय आदींबाबत वस्तुस्थिती मांडणारा लेख.

• प्रदूषणाच्या विळख्यात वनस्पती! (डॉ. रोहन शेट्टी)
झाडांच्या वाढीवर औद्योगिक वायू प्रदूषणाचा गंभीर परिणाम होत असल्याचे हे पुणेकर संशोधक डॉ. रोहन शेट्टी यांच्या टीमने युरोपमध्ये केलेल्या संशोधनाअंती सिद्ध केले आहे. त्या अनुषंगाने प्रदूषण झाडे आणि पर्यावरण यांची मांडणी करणारा लेख.

• वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे? (सुनील भोईटे)
अलीकडे काही मंडळी वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडून वनस्पतींची ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. वनस्पतींच्या नावाची ही आगळीवेगळी, पण अतिशय महत्त्वाची गोष्ट! 'भवताल' मंचावरील हा नवा उपक्रम...

• वासुकीच्या निमित्ताने... (भवताल टीम)
पृथ्वीवर कधीकाळी महाकाय सापांचा मुक्त वावर होता हे जिवाश्मांच्या अभ्यासावरून उघडकीस आले. हे संशोधनाबद्दल आणि प्राचीन काळातील सापांबद्दल मांडणी करणारा लेख.

• असे झाले भवताल गेट-टुगेदर
पर्यावरणासाठी काही करायचंय... या तळमळीतून २०१५ मध्ये ‘भवताल’ नावाचं एक बीज रोवलं. त्याचे रूपांतर एका डेरेदार वृक्षात झाले आहे. या वृक्षाला जोपासण्यासाठी अनेक हात हिरीरिने पुढे सरसावले. या सर्वांसाठी १८ मे २०२४ हा दिवस संस्मरणीय ठरला. निमित्त होते, ‘भवताल’च्या आगळ्या-वेगळ्या गेट-टुगेदरचे!

• इको अपडेट्स
(अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.)
...

सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

नावनोंदणीसाठी लिंक :

(आपण २०२४ या वर्षाची वर्गणी भरली नसल्यास रु. ५९० इतकी वार्षिक वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला "भवताल"चा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी,

G-pay: 9822840436
UPI: abhighorpade@okhdfcbank

• संपादक

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


Good Morning*🌹🌹

 *Company of good people is like walking into a perfume shop. Whether you buy the perfume or not, you are bound to get the fragrance.*


*Good Morning*🌹🌹

द आर्ट ऑफ फाइंडिंग फ्लो

 *नवीन पुस्तकं.......‌*


*द आर्ट ऑफ फाइंडिंग फ्लो......*

लेखक:- डेमन झहरियादेस 

अनुवाद:- विशाखा कुलकर्णी 

पाने:- 192

किंमत:- 250/-

सवलतीत:- 225/-(कुरिअर चार्जेससह)


आर्ट ऑफ फाइंडिंग फ्लो हे डेमन झहरियादेस यांचं अतिशय सुंदर पुस्तक आहे. एखादं काम आपल्याला मनापासून आवडत असेल तर ते करताना आपण अगदी रंगून जातो. तल्लीनतेची उच्च पातळी गाठतो. त्यावेळी आजूबाजूचा परिसर, वेळ, सोयीसुविधांचा अभाव, अशा अनेक गोष्टींचा विसर पडतो. मनात इतर विचार किंवा भावनांचे कल्लोळ नसतात. फक्त आपण स्वतः आणि ती कृती असे एकमेकांशी जोडलेले असतो. एका छान लयीत ती कृती चालू असते. 

        अशावेळी आपली सर्वोच्च क्षमता वापरली जाते. आपल्या हातून अतिशय सुंदर निर्मिती होते.  गायक, चित्रकार, नृत्यांगना, शिल्पकार, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, अशा व्यक्तींना हा अनुभव येतोच. सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा कधी कधी हा अनुभव घेतात. त्या तल्लीनतेतून बाहेर आल्यावर आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं की हे सगळं कसं काय झालं? असं अत्युच्च काम विक्रमी वेळेत पुन्हा करता येईल का? प्रत्येक गोष्टीत ही तल्लीनता मिळवता येईल का? अगदी निश्चितपणे," हो, मिळवता येईल" असं याचं उत्तर आहे. लेखकाच्या स्वअभ्यास व स्वानुभवातून आलेलं हे सकारात्मक उत्तर आहे. आपल्या इच्छेनुसार फ्लो झोनमध्ये प्रवेश कसा करावा, तो टिकवून कसा ठेवावा याचं तपशीलवार मार्गदर्शन हे पुस्तक करतं. संपूर्ण क्षमतेनं, थकवा न जाणवता, अलौकिक आनंद मिळवत काम करण्याचा अनुभव आपल्या इच्छेनुसार घ्यायचा असेल तर या पुस्तकात दिलेले स्वाध्याय नक्की पूर्ण करा. त्यासाठी हे पुस्तक आपल्या संग्रही असणं आवश्यक आहे.


*या पुस्तकात...*


*• मनाची फ्लो स्टेट आणि त्याचे आश्चर्य वाटावे असे परिणाम.*


*• चार ट्रिगर्स जे फ्लो स्टेट मिळवून देतात.*


*• 'फ्लो'चे आठ शत्रू आणि त्यांच्यावर विजय कसा मिळवायचा ?*


*• फ्लो स्थितीमध्ये जाण्यासाठी सविस्तर ॲक्शनप्लॅन.*


*• आपण फ्लो स्टेटमध्ये आहोत हे कसे ओळखावे ?*


*• फ्लो स्थितीत गेल्यानंतर ती स्थिती टिकवून ठेवण्यासाठी पाच युक्त्या*


*• फ्लो स्टेटची संभाव्य गडद बाजू (त्यावर नियंत्रण कसं ठेवावं.)*


*(कृपया पोस्ट शेअर करावी हि विनंती.........)*


शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

            

            मुंबईदि. १० :  राज्यातील शेतकरीवितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५  उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

             खरीप हंगामात बियाणेखते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री  (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४०००  क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

            संबंधितांनी व्हॉट्सॲपटोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणीनिविष्ठांची गुणवत्ताकिंमतसाठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवतानानावपत्तासंपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.

           ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.   शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतीलअसे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक - पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध

 विधान परिषदेच्या शिक्षक - पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक

छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध

 

             मुंबईदि.१० :  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधरकोकण विभाग पदवीधरनाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार२६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत  छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

            या निवडणुकीकरिता  उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज सोमवार१० जून २०२४ रोजी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

             उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार१२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६  जून २०२४ रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

Featured post

Lakshvedhi