Tuesday, 7 May 2024

ANOSOGNOSIA : म्हणजे काय?हा तात्पुरता विस्मरण आजार आहे.

 ANOSOGNOSIA : म्हणजे काय?


पॅरिसमधील इन्स्टिट्यूट ऑफ मेमरी अँड अल्झायमर डिसिज (IMMA) Hospital चे फ्रेंच प्रोफेसर, ब्रुनो डोर यांच्या मते, Anosognosia हा तात्पुरता विस्मरण आजार आहे.


त्यांनी सर्वांना समजेल अशी उदाहरणे देत तात्पुरत्या विस्मरण आजाराची लक्षणे समजावून सांगितली आहेत.


जर एखाद्याला त्याच्या स्मरणशक्तीच्या तात्पुरत्या विस्मरण समस्येबद्दल माहिती असेल त्याला अल्झायमर नाही. 

Anosognosia या आजाराशी निगडित काही उदाहरणे.


१. कुटुंबांतील व्यक्तींची, जवळच्या व्यक्तींची नावे विसरणे.

२. काही वस्तू, सामान वगैरे कुठे ठेवले हे चटकन न आठवणे.


ही "ॲनोसोग्नोसियाची" किंवा तात्पुरत्या विस्मरणाची लक्षणे आहेत.


 साठ आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये काही अशी लक्षणे असतात जी आजाराची लक्षणे नसून वयपरत्वे असतात.


 सर्वसामान्यपणे:

  1. एखाद्या व्यक्तीचे नाव विसरणे.

  2. घरातील एखाद्या खोलीत गेल्यावर आपण तिथे का गेलो हे न आठवणे.

  3. चित्रपटाचे शिर्षक, अभिनेता/अभिनेत्रींची नावे न आठवणे.

  4. आपला चष्मा, चाव्या किंवा अन्य वापरातील वस्तू कुठे ठेवल्या ते न आठवणे किंवा त्यांचा शोध घेण्यात वेळ वाया जाणे.


साठ वर्षांनंतर, बहुतेक सर्व लोकांना या अडचणी येतात. परंतु हा विस्मरण रोग/आजार नाही. 


कृपया खालील विधाने सर्वांनी लक्षात घ्यावीत.


"ज्यांना आपण विसरतो याची जाणीव आहे, त्यांना स्मरणशक्तीबाबत कोणतीही गंभीर समस्या नाही."


 "ज्यांना स्मरणशक्तीचा आजार म्हणजे अल्झायमरचा त्रास आहे, त्यांना स्मरणशक्तीबाबत काय होत आहे याची जाणीवच नसते."


 प्रोफेसर ब्रुनो डोर, बहुसंख्य लोकांना त्यांच्या विस्मरणांबद्दल चिंता न करण्याचा सल्ला देतात.


"आपण स्मरणशक्ती कमी झाल्याबद्दल जितकी जास्त तक्रार करू तितकी स्मरणशक्तीचा आजार होण्याची शक्यता कमी असते."


न्यूरोलॉजिकल फिटनेससाठी पुढील चाचण्या जेष्ठ मंडळींनी कराव्यात. यासाठी फक्त डोळ्यांचा वापर करावा. (चष्मा असल्यास चष्म्यासह.)


 1- खालील तक्त्यामध्ये C शोधा!

 OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO OOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOCOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOOO


 2- जर तुम्हाला C सापडला असेल तर खालील तक्त्यामध्ये 6 शोधा.

 999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999999969999999999999999999999999999999999999999999999999999999999999999


 3- आता खालील तक्त्यामध्ये N शोधा.

लक्ष द्या, हे थोडे अधिक कठीण आहे!

 mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmnmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm


जर तुम्ही या तीनही चाचण्या कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही उत्तीर्ण झालात तर, तुम्हाला न्युरोलॉजिसंबंधी आजार आहे असे वाटत नाही. तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे टेस्टसाठी जाण्याची गरज वाटत नाही.


वरील निरीक्षणे उत्तीर्ण झाल्यास तुमचे वय जास्त असूनही तुमचा मेंदू योग्य कार्य करतो आणि त्याचा आकारात नॉर्मल आहे हे सिद्ध होते. तुम्हाला अल्झायमरचा धोका नाही.


जर, तुम्हाला हा लेख तुमच्या वरिष्ठ मित्रांसोबत शेअर करायचा असेल तर जरूर करा. त्यांना धीर येईल.


आपले सर्वांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी जावो.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

 

            मुंबईदि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात  दुपारी १ वाजेपर्यंत  सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे.

        तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर - ३२.७१  टक्के

सांगली - २९.६५  टक्के

बारामती - २७.५५   टक्के

हातकणंगले - ३६.१७  टक्के

कोल्हापूर -  ३८.४२ टक्के

माढा - २६.६१  टक्के

उस्मानाबाद -  ३०.५४ टक्के

रायगड - ३१.३४   टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग -  ३३.९१  टक्के

सातारा -  ३२.७८  टक्के

सोलापूर - २९.३२   टक्के

**

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

 

        मुंबईदि.,७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ मे  २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदार संघात ११ वाजेपर्यंत  सरासरी  १८.१८  टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर - २०.७४ टक्के

सांगली - १६.६१ टक्के

बारामती - १४.६४ टक्के

हातकणंगले - २०.७४ टक्के

कोल्हापूर -२३.७७ टक्के

माढा -१५ .११ टक्के

उस्मानाबाद -१७.०६ टक्के

रायगड -१७.१८ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के

सातारा -१८.९४ टक्के

सोलापूर -१५.६९ टक्के

000

देशासाठी आपले योगदान द्यायचे चुकवू नका. Nivdanuk ayog

 प्रिय मतदार, 


देशासाठी आपले योगदान द्यायचे चुकवू नका. मतदानाचा दिवस हा कोणतीही सबब सांगण्याचा दिवस नाही! आपले मत द्या आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सामील व्हा. 


मतदानाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी भेट द्या ceo.maharashtra.gov.in 


- भारत निवडणूक आयोग


Dear Voter,


Don’t miss out on doing your bit for the country. Voting Day is a no-excuse day! Cast your vote and join the biggest celebration of democracy. 


For any voting-related information, visit: elections24.eci.gov.in.


- Election Commission of India

लेखांकन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची


व्यवस्थापन लेखांकन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते

 चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न

तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची

 

            मुंबईदि. ६ : देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना, व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या कार्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असेलअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

            आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनाचे औचित्य साधून व्यवस्थापन लेखांकन व्यवसायाचे नियमन करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 6) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते. 

            अर्थव्यवस्था वाढत असताना व्यवस्थापन लेखापालांची मागणी वाढणार असून खासगी तसेच सरकारी संस्थांमध्येही या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सेवेच्या संधी निर्माण होतीलअसे राज्यपालांनी सांगितले.

            कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शिक्षणआरोग्य सेवाउत्पादनबँकिंगग्राहक सेवा यांसह व्यवस्थापन लेखा क्षेत्रात परिवर्तनकारी बदल होत आहेत. मात्रसायबर हल्ल्यांचे धोके वाढत आहेत. या दृष्टीने व्यवस्थापन लेखापालांनी सायबर सुरक्षेबाबत धोके कमी करण्यासाठी प्रभावी आणि परवडणारी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

            विविध क्षेत्रांमधील कौशल्यांमुळे अनेक शतके भारत जगातील आर्थिक महासत्ता होती. आज कौशल्य व पुनर्रकौशल्यावर भर देण्यात येत असून कौशल्य विकास कार्यात आयसीएमएआय संस्थेने शासनाला सहकार्य करावे तसेच आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

            उदघाटन सत्राला भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारीइन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष अश्विन दलवाडीउपाध्यक्ष बी बी नायकव्यवस्थापन लेखांकन समितीचे अध्यक्ष नीरज जोशीडॉ. आशीष थत्तेचैतन्य मोहरीरसंस्थेचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.  संस्थेतर्फे व्यवस्थापन प्रबंधन क्षेत्रातील संधी व नवी आव्हाने : शाश्वत वृद्धी आणि सायबर सुरक्षाया विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

0000

 


 

Maharashtra Governor inaugurates Seminar on Management Accounting

 

            Mumbai, May 6 : Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a National Seminar organised by the Institute of Cost Accountants of India on the occasion of International Management Accounting Day at Y B Chavan Auditorium in Mumbai on Mon (6 May).

            The theme of the Seminar was "Navigating the New Frontier: Management Accounting in the Era of Real-Time Insights, Sustainable Growth and Cybersecurity".

            The inaugural session was attended by Prof Manoj Tiwari, Director, IIM Mumbai, CMA Ashwin Dalwadi, President, Institute of Cost Accountants of India (ICMAI), CMA B B Nayak, Vice President, Chairman Management Accounting Committee CMA Neeraj Joshi, CMA Dr Ashish Thatte, CMA Chaitanya Mohrir, members and students.

 

0000


लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा खर्च नीटपणे तपासून घ्यावा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुरजकुमार गुप्ता यांचे निर्देश

 लोकसभा निवडणकीसाठी उमेदवारांचा खर्च नीटपणे तपासून घ्यावा

केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुरजकुमार गुप्ता यांचे निर्देश

            मुंबई उपनगरदि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या नियम व अटींप्रमाणेच झाला पाहिजेअसे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च)सुरजकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.

            लोकसभेच्या मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाकरिता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून श्री. गुप्ता यांची नियुक्ती झाली असून ते 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई उत्तर-मध्य अंतर्गत येत असलेल्या विलेपार्लेचांदिवलीकुर्ला (अनु.जाती)कलिनावांद्रे (पूर्व) आणि वांद्रे (पश्चिम) या सहाही मतदार संघांना श्री. गुप्ता यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.

उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेटीसाठी उपलब्ध राहणार

            सध्या श्री. गुप्ता यांचा मुक्काम आणि कार्यालय वांद्रे येथील इंडियन ऑईलच्या विश्रामगृहात असून त्यांना भेटण्याची वेळ जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात दुपारी १ ते २ अशी ठेवण्यात आली आहे. श्री. गुप्ता यांनी मुंबई उत्तर-मध्य २९ मधील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. निवडणुकीच्या कामकाजाबाबत त्यांनी माहिती घेऊन होत असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून मार्गदर्शनही केले. निवडणुकीचे कामकाज नियमाप्रमाणे व्हावे यासाठी त्यांनी मुंबई उत्तर-मध्यच्या सर्व मतदारसंघांना व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालयांना भेटी देऊन कामकाज आणि त्याबाबतच्या नोंदी नियमाप्रमाणे होत असल्याबाबत खात्री करून घेतली आहे.

बँक खात्यांतील नोंदीबाबतही सजग राहण्याच्या सूचना

            उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केले असल्याने उमेदवारांच्या खर्चाची तपासणी तसेच त्यांच्या बँक खात्यांतील नोंदीबाबतही सर्व संबंधितांनी सजग राहण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.

0000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी

  

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक

तीन वेळेस करणार उमेदवारांच्या खर्चाची तपासणी

 

मुंबई उपनगरदि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 करीता मुंबई उत्तर पश्चिम  मतदारसंघातील खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वहीची तपासणी करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे

            निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे कीलोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंद वहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहेनिवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांकदिनांकवार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 9 मे 2024, गुरुवारसकाळी 10 ते सायंकाळी 5. द्वितीय तपासणी, 13 मे 2024, सोमवारसकाळी 10 ते सायंकाळी 5. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवारसकाळी 10 ते सायंकाळी 5. तपासणीचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी, 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघअर्थ  सांख्यिकी सभागृह,  प्रशासकीय इमारतआठवा मजलाशासकीय वसाहतवांद्रे (पूर्व), मुंबई- 400051

            तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट E-1, भाग ‘’, ‘’, ‘’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoce, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/Bank Statement, सर्व परवाने (वाहनरॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित  राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईलअसेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

Featured post

Lakshvedhi