Wednesday, 17 April 2024

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

 दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

          मुंबई दि. 16 : जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे.  या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.

            दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.

            विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.    

            भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.

0000


मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘स्वीप’तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम

 मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात

स्वीपतर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम

 

            मुंबईदि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी स्वीप अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील एसएनडीटी महिला विद्यापीठात नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला.

            या कार्यक्रमात एसएनडीटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींद्वारे मतदान जनजागृतीसाठी पोवाडा सादर करण्यात आला. या पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी निवडणुकीत मतदानाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. या निवडणुकीत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देखील मतदारांना या पोवाड्याच्या माध्यमातून केले. धनश्री काशिदज्ञानेश्वरी दळवी व अनुश्री वैद्य या विद्यार्थिनींनी हा पोवाडा सादर केला. यावेळी विद्यापीठाच्या प्राचार्या  डॉ. जसवंती वाम्बुरकर व प्राध्यापक  चित्रा लेले उपस्थित होते.

          मुंबई शहर जिल्ह्यात स्वीपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात जनजागृती तसेच पथनाट्य स्पर्धांसह प्रभातफेरी आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

         ‘स्वीपच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा याबाबत जनजागृतीसाठी मदत होणार आहे. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावीत्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावेमतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावालोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा स्वीपचा मूळ उद्देश आहे. समाजमाध्यमांद्वारे देखील मतदार जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेलअसा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केला.

        ‘स्वीपच्या कामाचा आवाका पाहता जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. सर्व कार्यालयांनी विशेषतः शाळामहाविद्यालयांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. मतदानावेळी त्याचे चांगले परिणाम दिसून येतीलस्विपच्या मुंबई शहर जिल्ह्याच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी व्यक्त केला आहे.

        कुलाबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्वीपतर्फे सीमा खानशरयू लाडउर्मिला तांबेमधुकर वाडीकरप्रकाश कापसेसमीर मोहितेलहू चौगुले उपस्थित होते. सीमा खान यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे महत्व व मतदान करण्याबाबत माहिती दिली.

        या कार्यक्रमासाठी १८७ - कुलाबा विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदेश डफळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

0000

शैलजा पाटील/विसंअ


 

 


मोफत नेत्र तपासणी

 


वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

 वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक

तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

 

            मुंबई, दि. 16 :  महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांक गाठलेला असून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून पहिल्यांदाच रूपये ३ लक्ष कोटींचा टप्पा पार केलेला आहे. या वर्षी राज्याचे वस्तू व सेवा कर संकलनरूपये ३.२ लक्ष कोटी एवढे झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदवलेली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त,माझगाव,मुंबई यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

       महाराष्ट्र राज्यातील वस्तू व सेवा कर संकलनाचा देशातील (रूपये २०.२ लक्ष कोटी) सकल वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के नोंदविला असून गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्का वाढ दिसून येत आहे. तसेच वस्तू व सेवा कर संकलनातील राज्याचा वाढीचा दर (१८ टक्के) हा देशाच्या सरासरी दरापेक्षा (१२ टक्के) अधिक आहे.

       राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करताराज्यास वस्तू व सेवा करातून रूपये १,४१,७०० कोटी एवढ़ा उच्चांकी महसूल मिळालेला असून त्यामध्ये राज्य व सेवा कर (SGST) रूपये ९३,४०० कोटी तर एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामधुन रूपये ४८,३०० कोटी एवढा महसुल प्राप्त झालेला आहे. राज्य वस्तू व सेवा कर महसुलात राज्याने गतवर्षीच्या तुलनेत २०.२ टक्के एवढी वृद्धी नोंदवलेली असून एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामध्येही २४ टक्के (मागील वर्षातील Ad hoc वगळता) एवढी वृद्धी दिसत आहे. पेट्रोल व मद्य उत्पादनावरील मूल्यवधीत कराचा महसूल रूपये ५३,२०० कोटी एवढा आहे.      

      वस्तू व सेवा करमुल्यवर्धित करव्यवसाय कर यांच्या एकंदरीत महसुलाचा राज्यातील वृद्धी दर हा ११ टक्के असुन तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अंदाजित सकल राज्य उत्पादनातील वृद्धी दराहून (१० टक्के) अधिक आहे. एकंदरीत महसुल जमा ही २०२३-२४ साठी निर्धारीत अर्थसंकल्पीय अंदाज रूपये १.९५ लक्ष कोटीहून ही अधिक आहे.

       महितीच्या विश्लेषणाच्या आधारे करण्यात आलेल्या धडक कारवायामध्ये अन्वेषण शाखेने जवळपास १२०० प्रकरणात २००० कोटी रूपयांचा महसुल गोळा करून दिलेला आहे. तसेच २४ प्रकरणात अटकेच्या कारवाया केल्या आहेत. अन्वेषण शाखेने गोळा केलेला महसुल हा आतापर्यंतच्या सर्व आर्थिक वर्षांतील सर्वाधिक आहे.

0000


संवेदनशील भागातील मतदान पथके रवाना गडचिरोलीत 65 मतदान केंद्रावर 267 मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

 संवेदनशील भागातील मतदान पथके रवाना

गडचिरोलीत 65 मतदान केंद्रावर 267 मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

            गडचिरोली दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 65 मतदान केंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 267 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

            गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मुलचेराएटापल्लीभामरागडअहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहचविण्यात येत आहे .

000

A Mammoth Exercise

            Gadchiroli-Chimur Constituency of Maharashtra state witnessed today beginning of a mammoth exercise of transporting polling personnel to interior polling stations. District Gadchiroli has a difficult terrain requiring the administration to use Helicopters for transportation of 850 poll personnel to 206 polling stations. ECI has given permission for this transportation at P-3 (3 days before poll-day). The exercise started today early morning at 6.30 a.m. and 65 polling parties comprising of around 267 polling personnel were dispatched for ‘Difficult to Reach’ polling stations. Blessings of weather added to the enthusiasm and vigour of polling parties to undertake the task of enabling first part of the ‘Festival of Democracy’ which is scheduled on 19th April.

जून फर्निचर,

 येत्या 26 एप्रिलला  "जुनं फर्निचर" नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय.ट्रेलर पाहूनच चित्रपट बघायची इच्छा होतेय.... (कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन - श्री महेश वामन मांजरेकर)


*कलिंगडात अशी जगदंबा मातेची नयनरम्य कलाकृती साकारली * *अशा सनातनी कलाकाराचे त्रिवार अभिवादन 🙏🙏

 *कलिंगडात अशी जगदंबा मातेची नयनरम्य कलाकृती साकारली *

*अशा सनातनी कलाकाराचे त्रिवार अभिवादन 🙏🙏


Featured post

Lakshvedhi