Saturday, 13 April 2024

सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती

 सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्ताने 

महान सामाजिक क्रांतिकारक, शिक्षणतज्ञ, कृषितज्ञ, अर्थतज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, प्रकाशक, आद्य शिवचरित्रकार, शिवजयंती जनक, आधुनिक मराठी कवितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अँड काँट्रॅकटिंग कंपनीचे कार्यकारी संचालक अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीने ठसा उमटवणारे तसेच स्त्री पुरुष समता, जाती निर्मूलन, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप, सामाजिक न्याय आणि आंतरजातीय विवाह असे कृतिशील कार्यक्रम राबवणारे, आधुनिक भारताचे शिल्पकार, महात्मा जोतीराव फुले यांना विनम्र अभिवादन...🙏

1- करोडपती असलेले महात्मा फुले हे 1890 साली मरण पावतात;  तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्यामुळे समाजातील काही कर्मठ लोक अग्नी देवू देत नव्हते;   

यशवंत मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत ; हा खेळ बराच वेळा  चालला;  महात्मा फुले यांचा पार्थिव देह पडून आहे; तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला शेवटी सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला. 

विचार करा जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचारधारेच्या प्रभावाने विटंबना करतात.  यावर फुले अनुयायी विचार करतील काय?  

 


2 - दुसरी एक घटना अशी की महात्मा फुले यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती;  अतिशय गरीब अवस्थेत खायला अन्न नाही राहायला घर नाही; 

अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही;  


अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली;


तर मग तीचे प्रेत तसेच पडून आहे; पण दफन करायला पुढे कोणीही आले नाही; दिवसभर ते प्रेत सडत आहे त्याचा वास येतोय; जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही; शेवटी पुणे महानगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंस्कार केला.  


विचार करा त्या काळात या फुल्यांच्या वडीलांचे मासिक उत्पन्न बारा लाख रुपये होते; तर रतन टाटा यांच्या उत्पन्न फक्त वीस हजार रुपये होते म्हणजे फुल्याकडे दोनशे एकर शेती होती व काही प्रमाणात फुलझाडे लावत;  संदर्भ (हरी नरके लिखित पुस्तक ) 


विचार करा आम्ही शिकून साहेब बनावे यासाठी फुल्यांनी  जीवनाची माती केली पण त्यांचा शेवट हा पशु प्रमाणे व्हावा ही बहुजनांना साठी शरमेची गोष्ट आहे; जगाच्या पाठीवर फुले हालहाल होवून मेले मग आम्ही घरात त्यांचा फोटोदेखील लावत नसू तर हा किती कृतघ्नपणा करत आहोत याचा विचार केला पाहिजे;   


एकदा सावित्रीबाई फुले आपल्या पतीला  म्हणाल्या की आपण मेल्यावरही बहुजन समाजाचे कसे होईल? ही चळवळ पुढे कोण चालवणार?  तेव्हा फुले उत्तर देताना सांगितले की "माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून बहुजनाच्या घरात महात्मा फुले जन्म घेतील"


विचार करा फुल्यानी बहुजनावर किती विश्वास ठेवला  मग सांगा आतापर्यंत किती फुले जन्मले? एकही नाही.. मग महात्मा फुले चुकीचे बोलले की त्यांचे अनुयायी चुकीचे वागले याचा आम्ही विचार केला पाहिजे..   


जर उदयोगपती असलेले हे फुल्यांनी समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारस जीवंत राहिले असते व आजचे रतन टाटा ;बिर्ला; अंबानी; सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन या साऱ्या श्रीमंत लोकांना महात्मा फुले यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते एवढे गर्भश्रीमंत राहीले असते  पण फुलेंनी समाज हितासाठी स्व वडीलोपार्जित सम्पत्तिचा त्याग केला आज आम्ही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार देखील जोपासत नाही...



🙏🙏🙏🙏

लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

 लोकसभा निवडणूक 2024

महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

 

               मुंबईदि. 12 : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे.

            राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांबरोबरच १० टक्के अधिक अशा एकूण २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

            या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

            मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.

            मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.


महापुरुष डॉ. आंबेडकर’ लघुपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे 14 एप्रिलला प्रसारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना

  

महापुरुष डॉ. आंबेडकर’ लघुपट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ

या चित्रपटाचे 14 एप्रिलला प्रसारण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना

            मुंबईदि. 12: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारदि. 14 एप्रिल 2024 रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित एका माहितीपटासहचित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी 133 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सकाळी 11 वाजता महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी 1 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे.

            ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्सफेसबुकयूट्यूब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

             ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेचलाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट 17 मिनिटे कालावधीचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै 1968 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

            या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहेतर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहेतर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी...

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयभारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमहाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

            स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्रीभारतीय संविधानाचे शिल्पकारमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिकासंघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा.

            या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनीतर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखलेमृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवालाअरूण साधूदया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. सल्लागार श्याम बेनेगल आहेतचित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्यासंगीत अमर हल्दीपूरफोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

००००

मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करावे

 मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करावे

     -जिल्हाधिकारी संजय यादव

 

          मुंबई, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मुंबई जिल्हा प्रशासनाची भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिल्या. 

             जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी अप्पर आयुक्त कोकण विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड ,उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, अप्पर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी) उन्मेष महाजन, सर्व शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, सर्व अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी व आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांची मतदार केंद्रनिहाय संख्या लक्षात घेवून त्याठिकाणी व्हील चेअरवाहतूक इत्यादी बाबतचे नियोजन करावे. तसेच मतदान केंद्रावर सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर  प्राथमिक वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होऊ शकतीलयाबाबत देखील नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

            मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी  23 एप्रिल 2024 पर्यंत अजूनही आहे, यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवमतदार जनजागृती विशेष मोहिम राबवून नवमतदार नोंदणी वाढवावी.

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हिजील (cVigil) हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.   या ॲपमध्ये नागरिकांनी नोदविलेल्या तक्रारी व यावरील केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा  बैठकीत घेण्यात आला.

          मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था,  स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा एनजीपीएस पोर्टल वरील तक्रारी,रूट मॅप आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला. 

00000

Friday, 12 April 2024

स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम

 स्थलांतरित, असंघटित कामगारांना

शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम

 

            मुंबईदि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमधील दि. १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरित किंवा असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम एप्रिल ते मे २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत राबविली जात आहे.

            या प्रक्रियेमध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी किंवा तपासणी करून स्थलांतरित व असंघटित कामगारांना उचित शिधापत्रिका वितरित करुन शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तत्काळ देण्यात यावेत, अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आलेल्या आहेत.

            ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त स्थलांतरित व असंघटित कामगारांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण  विभागाने केले आहे.

००००

दिलखुलास' कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

 ‘दिलखुलासकार्यक्रमात

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

 

            मुंबईदि१२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'लोकसभा निवडणूक २०२४या विषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शनिवार दि.१३ एप्रिल आणि सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            आदर्श आचारसंहितानिवडणुकीचे कामकाज सुरळित करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली सर्व कार्यवाहीमतदार जनजागृती उपक्रमकायदा व सुव्यवस्था   कार्यवाहीमतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याविषयी सविस्तर माहिती श्री.स्वामी यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून  दिली आहे.


लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

 लोकसभा निवडणूक 2024

महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद

 

               मुंबईदि. 12 : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे.

            राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांबरोबरच १० टक्के अधिक अशा एकूण २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

            या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये पावणे ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

            मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.

            मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

००००

Featured post

Lakshvedhi