Monday, 8 April 2024

महामार्गावर काय होतंय माहीत आहे का, *"घरी कुणीतरी वाट पाहत आहे"*

 😀आदरणीय 

महामार्गावर काय होतंय माहीत आहे का, 

*"घरी कुणीतरी वाट पाहत आहे"* 

असा फलक लावल्यामुळे लोक उत्सुकतेपोटी 

गाड्या भरधाव चालवतात आणि अपघात 

होतात आणि शिवाय घरी कोणीच आलेलं नसतं.


त्यापेक्षा *"घरी बायको वाट पहात आहे"* 

असा फलक लावा, नाही लोकांनी वेग 

निम्मा केला तर बघा. 

रमत गमत उद्या परवा पोहोचतील .

🤣😂🤣😂

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

 लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

            मुंबई दि. ७ : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत

            रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड अश्या ६ जिल्ह्यात प्रत्येकी १ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल.

या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण ६,०४,१४५ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.



दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप



            भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

Sunday, 7 April 2024

जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक

 *जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट शिक्षण प्रसार महर्षी  प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली विद्यापीठे.*


👉🏻इ.पू.२८४ : *उजैन विद्यापीठ* - राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त

👉🏻इ.पू.२८२ : *सांची विद्यापीठ* - राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त

👉🏻इ.पू.२८० : *तक्षशिला विश्वविद्यालय*

👉🏻इ.पू.२७९ : *गंधार विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२७० : *नालंदा विश्वविद्यापिठ* - सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त

👉🏻इ.पू.२६८ : *उदन्तपूर विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६६ : *सारनाथ विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६५ : *मथुरा विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६४ : *दंतपूर विद्यापीठ* - जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त.

👉🏻इ.पू.२६३ : *मथुरा विद्यापीठ*

👉🏻इ.पू.२६० : *नागरा विद्यापीठ* - अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी.

👉🏻इ.पू.२५८ : *पवनी विद्यापीठ* - भंडारा महाराष्ट्र

👉🏻इ.पू.२५७ : *गिरनार विद्यापीठ* - जुनागड गुजरात

👉🏻इ.पू.२५६ : *एरागुंडी विद्यापीठ* - कुर्णाल,आंध्रप्रदेश

👉🏻इ.पू.२५५ : *गुन्टु विद्यापीठ* - कोपबल म्हैसुर

👉🏻इ.पू.२४५ : *जगदलपूर विश्वविद्यालय* - बांगलादेश

👉🏻इ.पू.२४३ :- *कोसम्बी विद्यापीठ* - अलाहाबाद पासून ३० कि.मी.

👉🏻इ.पू.२४० : *विक्रमशिला विश्वविद्यापीठ* - भागलपूर बिहार

हत्ती चें बळ

 *माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.*  

पण, पाठीमागून हात ठेवल्यामुळे, हत्तीला विश्वास वाटत होता की, आपला मालक आपल्याला मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर चढवून घेत होता.  

*प्रेरणा देणे एक साधी कृती एवढेच.*


आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत, ज्यांना पाठिंबा किंवा प्रेरणा देणारे कोणी नसल्यामुळे ते मागे पडले आहेत.


कधीकधी काहींना वाटत असते, जर आम्ही जागरूक/अपडेट असतो, जर कोणी आम्हाला आधार आणि प्रेरणा दिली असती तर आम्ही फार काही करू शकलो असतो... 


आपण हे सर्वाणसाठी करू  शकत नाही, परंतु काहींसाठी, काही कठीण वेळी आपण ते करू शकतो.


*प्रेमाचा एक साधा शब्द, सकारात्मकता किंवा शक्ती आणि समर्थनाचे काही प्रेरक शब्द एखाद्याचे आयुष्य कायमचे बदलू शकतात.*

🙏🙏

आम्रऋतुच्या सर्वांना शुभेच्छा !!*

 आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं 

प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |

आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां 

श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||


अर्थात,


फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून नारळाच्या पोटात [मनात] पाणी  झालं. फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला. उंबराचं फळ तर फुटलंच.  केळ्यानी मान खाली घातली. द्राक्ष काळपट तर पडली आणि लहानही झाली. जांभूळ [हेव्यानी] जांभळं पडलं आणि हे सगळं  मत्सरामुळे बरं !


*◆ आम्रऋतुच्या सर्वांना शुभेच्छा !!*



🍁🙏🍁🙏🍁🙏🍁🙏🍁

वर एक *बाटली* आणि एक *बाटला* दिसत आहे.

 वर एक *बाटली* आणि एक *बाटला* दिसत आहे.

   

 *यांची वैशिष्ट्ये*

   

   *बाटली ७५० एम् एल् ची आहे तर बाटला १४.५० किलोचा आहे.*


    *७५० एम्एल्* च्या बाटलीची किंमत साधारण *१३०० रूपये* आहे.

   तर *१४.५ किलोच्या बाटल्याची किंमत ९०० रूपये आहे*


     *१३०० रुपयांची* ही *बाटली* तीन माणसांमध्ये दोन तासात रिकामी होते.....


    तर *९०० रुपयांचा* बाटला संपवायला तीन माणसांना साधारण *४०* दिवस लागतात......


    विषेश म्हणजे *१३०० रुपयांची बाटली* दोन तासात रिकामी करताना ते तीघे त्या *९०० रुपयांच्या बाटल्याच्या* नावानी गळे काढत असतात.


    आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या संपूर्ण देशात त्या *९०० रुपयांच्या बाटल्याचा* जितका खप होतो त्याच्या तीनपट त्या *१३०० रुपयांच्या बाटलीचा* खप केवळ महाराष्ट्रात होतो.


    त्या *बाटलीची किंमत* उद्या जर *२००० रुपये* झाली तरी त्याविरोधात कोणही कोणतीही बोंबाबोंब करणार नाही.

     पण तो *बाटला* जर *९०० रुपयांवरून ९५० रुपये* झाला तर मात्र सर्वत्र गदारोळ माजवला जातो.

    *एक वास्तव*


दिलखुलास' या कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुलाखत

 दिलखुलासया कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुलाखत

 

            मुंबई: दि,7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुर्वातयारी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची 'कायदा व सुव्यवस्था या विषयावर मंगळवार दि. 9 एप्रिल 2024 रोजीआकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.  प्रसारित होणार आहे. ही मुलाखत भंडारा  जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी घेतली आहे.

 

       लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूररामटेकचंद्रपूरगडचिरोलीभंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे.यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. भंडारा  जिल्ह्यातील  जिल्हा पोलीस प्रशासनाची पुर्वतयारी कशा पद्धतीने सुरु आहे याविषयी 'दिलखुलासकार्यक्रमातून भंडारा जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. मताणी यांनी माहिती दिली आहे.

000


Featured post

Lakshvedhi