Saturday, 6 January 2024

मुंबईत ॲप आधारित 1690 कॅबची तपासणी ; 19.76 लाख रुपयांचा दंड वसूल

 मुंबईत ॲप आधारित 1690 कॅबची तपासणी ;

19.76 लाख रुपयांचा दंड वसूल

 

          मुंबईदि. 5 : मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान विहीत केलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन करणाऱ्यादोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते. मुंबई शहर व उपनगरांत 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ॲप आधारित 1690 कॅब वाहनांची तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या 491 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईपोटी 19 लाख 76 हजार 900 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

           प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत 590 वाहनांची तपासणीमध्ये 107 दोषी वाहनांवर 7 लाख 42 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुंबई (पश्चिम) कार्यालयांतर्गत 782 वाहनांची तपासणीमध्ये 211 वाहने दोषी आढळली आहेत. यामध्ये 7 लक्ष 93 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई (पूर्व) कार्यालयांतर्गत 318 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 173 वाहने दोषी आढळली व त्यांच्याकडून 4 लक्ष 41 हजार 400 रुपयांचे दंडापोटी तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. 

          सर्वोच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यात ॲप आधारित वाहनांसाठी महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ द ॲग्रेगेटर रुल्स2022 करण्यासाठी निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर 2020 रोजी समुच्चयक मार्गदर्शक सूचना ॲप आधारित  कॅब सेवा देणाऱ्या आस्थापनांकरीता निर्गमित केल्या आहेतअसे उपप्रादेशिक परिवहन अधिकारीमुंबई (पूर्व) विनय अहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.      

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा संदर्भातील समितीच्या अहवालाचे सादरीकरण

 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा संदर्भातील

 समितीच्या अहवालाचे सादरीकरण

 

 

 मुंबईदि. 5 :  राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला सामाजिकआर्थिकराजकीयशैक्षणिकमाहिती - तंत्रज्ञानकृषिक्रीडाकला व मनोरंजन इ. क्षेत्रातील विविध बाबींची आणि विषयांची माहिती मिळावी यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्व ओळखून महाराष्ट्र शासनाने  महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967  मंजूर केला आहे. यामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी पुर्नगठीत करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाचे आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर सादरीकरा करण्यात आले.

सदर अधिनियम 1 मे 1968 रोजी संमत झाला असून त्यास 50 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यामध्ये कालानुरुप बदल करण्याची आवश्यकता असल्याने सुधारणा सुचविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या  ग्रंथालय संचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967 सुधारणा समिती पुर्नगठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवालाचे ग्रंथालय संचालनालयाने सादरीकरण केले.

यावेळी  अहवालातील आवश्यक कालानुरुप सुधारणांच्या प्रारुपास मंत्री श्री. पाटील यांनी मान्यता दिली व त्याबाबत पुढील विहित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यातील ज्या गावांची लोकसंख्या 3 हजार आणि 5 हजार पेक्षा जास्त आहेपरंतु  तिथे शासन मान्यता प्राप्त ग्रंथालय नाहीतअशा गावांची एकूण संख्या व इतर माहिती सर्वेक्षण करून सादर करावीअशा सूचनाही  मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या. तसेच सन २०१२-१३  पासून  मान्यता व दर्जा बदल करुन देणे शासनाने स्थगित केले आहे. या बाबीवर नवीन कालसुसंगत निकष तयार करून प्रस्ताव तातडीने सादर करावेत. तसेच शासकीय ग्रंथालय इमारतींची दुरुस्ती व नूतनीकरणाचे आवश्यकतेनुसार सविस्तर प्रस्ताव सादर करावेतअसे  निर्देश मंत्री श्री.पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना  दिले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीउपसचिव प्रताप लुबाळप्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर व समितीचे सदस्य सचिव व प्र.ग्रंथालय उपसंचालक शशिकांत काकड उपस्थित होते.

                                               

मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबतची राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा

 मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबतची

राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

     -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

          मुंबईदि. 5 : राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावीयासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसेच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रीनीती आयोगयूजीसीनॅक यांच्याशी समन्वय करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

          याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागानी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

          आज मंत्रालयात नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात दिल्लीत होणाऱ्या प्रस्तावित राष्ट्रीय परिषदेविषयी पूर्वतयारीच्या बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीउच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकरतंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकरराष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा) संचालक निपुण विनायकउपसचिव अशोक मांडे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णीप्र-कुलगुरू अजय भामरेपुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावीकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र जळगाव विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरीशैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्यासह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

          मंत्री श्री. पाटील म्हणाले कीराज्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विविध उपक्रम व नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत असताना अधिक स्पष्टता यावी आणि अधिक माहिती व्हावीयासाठी नीती आयोगाकडे विभागाने कार्यगट निर्माण करून पाठपुरावा करावा. सध्या राज्यात २०० महाविद्यालयामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (आयकेएस) सुरू असून त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

          महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणाचे ब्रॅंडिंग होण्यासाठी मुंबईत परिषद आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागमुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध परिसंवादाचे आयोजन, विविध सत्रात राज्यातील शिक्षणाविषयाची माहितीयोजनाउपक्रमविविध विद्यापीठात प्रशिक्षण, अभ्याससत्राच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात यावे. जेणेकरून राज्यातील उच्च शिक्षण विभागाची सकारात्मक प्रतिमा देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. इतर शासकीय आणि खाजगी नामांकित विद्यापिठांनी विविध विषयावर दिवसभर कार्यशाळा आयोजित करावी. यात देशभरातील किमान १० राज्यांतील विद्यापीठांना निमंत्रित करावे. या सर्व विषयांचे पुस्तक काढता येईलअसेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागात सोशल मीडियाचा वापर वाढवा

          महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नाविन्यपूर्ण व धोरणात्मक सुधारणांची माहिती देशभरातील विद्यार्थीविद्यापीठ यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे. यामुळे विभागाने वेबपोर्टल तत्काळ अपडेट करून त्यामध्ये बदल करावेत. राज्यभरातील विद्यापीठेविविध प्रशिक्षणेअभ्यासक्रमयोजनाउपक्रमप्रयोग याची एकत्रित सारांश रूपातील माहिती विद्यापीठनिहाय घेता येईल. मराठीसोबत हिंदीइंग्रजीगुजरातीतमिळ भाषातही सारांश तयार करावेत. जेणेकरून देशभरातील सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील विद्यापिठांशी जोडले जातील. शिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे एक्स हॅन्डल तयार करून यावरही माहितीपूर्ण मजकूर वेळोवेळी अपडेट करण्याच्या सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

          फ्लेम विद्यापिठाचे प्रा. युगांक गोयल यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सादरीकरण केले.

००००

धोंडीराम अर्जुन/ससं/


 

वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र

  

वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र

                                                            - राज्यपाल रमेश बैस

 

          नाशिकदि ५ : वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासोबतच उद्दिष्टे निश्चित करणेकौशल्ये सुधारणे आणि खुल्या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी आतापासूनच वेळेचे नियोजन करावेअसा संदेश राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दिला.

          संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज झालात्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संदीप विद्यापीठाचे कुलगुरू पंडित नित्यानंद झाचेअरमन डॉ. संदीप झाउपकुलगरु डॉ. राजेंद्र सिंन्हामाजी खासदार प्रभात झाअलोक झाआर्यन झा उपस्थित होते.

          राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीया व्यासपीठावर सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहेत्यांचेदेखील यावेळी विशेष अभिनंदन करतो. अशा कार्यक्रमांमधूनच आजच्या युवा पिढीशी संवाद साधता येतो. देशाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. ही तरुण पिढी उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार असून आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणार आहे. संदीप विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाची सुरुवात करण्यात आजची ही युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणारयात शंका नाही. आज विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत आणि अभ्यासाप्रती असलेले समर्पण आज ज्या स्थानावर घेऊन गेले आहे. याचे श्रेय विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या प्राध्यापक आणि पालकांना जाते. आतातुम्ही सर्व करिअरच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. प्रत्येक दिवस नवीन आव्हाने आणि नवीन धडे घेऊन येईल. ही आव्हाने संधी म्हणून स्वीकारण्यास सज्ज व्हाअसे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी विद्यार्थ्यांना केले.

          ध्येय ठरवतांना अपयशी होण्यास घाबरू नका. अपयश हा जीवनाचा एक भाग आहेजीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशापुढे खचू नका. जगातील यशस्वी लोकांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्याससमजते की अपयश हे त्यांच्या जीवनाचा देखील एक भाग आहे. पण त्यांनी त्या अपयशाला संधी म्हणून स्वीकारले आणि त्याच संधीच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

          विद्यार्थ्यांमधील क्षमताकौशल्ये आणि ज्ञान जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचे जतन करणे आवश्यक आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी करिअरसोबतच मानसिक आरोग्याची ही काळजी घ्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. हे नवे शैक्षणिक धोरण प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. भारतीय विचार परंपरा आणि तत्वज्ञानात ज्ञानशहाणपण आणि सत्याचा शोध हे नेहमीच सर्वोच्च मानवी ध्येय मानले गेले असल्याचे  राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

          चेअरमन श्री. झा यांनी मार्गदर्शन केले.          पंडित नित्यानंद झा व प्रभात झा यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाचे उप कुलसचिव श्री. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना पदवीदानाची शपथ दिली. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी व सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

0000


 

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर

 मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर

 मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर


ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना 'कृ. पा. सामक' जीवनगौरव
संदीप आचार्य, विनया देशपांडे, दीपक भातुसेंना उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३ या वर्षीच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली.'कृ. पा. सामक' हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत यांना जाहीर झाला आहे.
उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी (मुद्रित ) ' लोकसत्ता' चे प्रतिनिधी श्री. संदीप आचार्य यांची तर वाहिनीच्या (दृकश्राव्य)  उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी 'CNN News 18' च्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. वार्ताहर संघाचा सदस्य पुरस्कार लोकमतचे श्री. दीपक भातुसे यांना जाहीर झाला आहे.
६ जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज या पुरस्कारांची घोषणा संघाचे उपाध्यक्ष महेश पवार आणि सरचिटणीस प्रवीण पुरो  यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार श्री. अभय देशपांडे, श्री. मंदार पारकर, सदस्य सचिव श्री. खंडूराज गायकवाड यांच्या निवड समितीने या पत्रकारांच्या नावांची पुरस्कारासाठी केलेली शिफारस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीने मान्य केली.
सर्व पुरस्कार विजेत्यांचे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
             

महेश पवार                   प्रवीण पुरो                                
 उपाध्यक्ष                    सरचिटणीस

अनुशेषाची पदे तात्काळ भरण्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सूचना

 अनुशेषाची पदे तात्काळ भरण्याचे

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सूचना

   

     मुंबईदि. 5 : राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने मुंबई दौऱ्यामध्ये राज्य शासनाच्या संस्थाराष्ट्रीयकृत बँका आणि विमा कंपन्या यांच्या समवेत आढावा बैठका घतेल्या. सर्व अनुशेषाची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीतअशा सूचना या बैठकांमध्ये केल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले.

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी श्री. हलदर यांनी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आयोगाचे सदस्य सुभाष पारधीअंजू बाला उपस्थित होते.

श्री. हलदर म्हणालेअनुसूचित जाती कर्मचाऱ्यांचे आरक्षण रोस्टर अद्ययावत ठेवावे. अनुसूचित जाती उमेदवारांना भरती पूर्व आणि पदोन्नती पूर्व प्रशिक्षण दिले जावे. प्रत्येक संस्थेने एससी सेलची स्थापना करावीतक्रार निवारण यंत्रणा अंमलात आणावीअशा शिफारसी देखील आयोगाने केल्याचे त्यांनी सांगितले. 

0000

शैलजा पाटील /विसंअ/


 


राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला 'विकसित भारत'

 राष्ट्रीय युवा महोत्सवातून युवा शक्तीला 'विकसित भारत'

साकार करण्याची प्रेरणा मिळेल

-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिकला होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या 'शेकरूशुभंकराचे चित्र,

बोधचिन्हबोधवाक्याचे अनावरण

 

          मुंबईदि. ५ : राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला 'विकसित भारत @२०४७'  संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या 'शेकरूया शुभंकराचेबोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले.

          या निमित्ताने नाशिक येथे महोत्सव स्थळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक  उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसेग्रामविकास मंत्री गिरीष महाजनक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळखासदार हेमंत गोडसेआमदार प्रा. देवयानी फरांदेसीमा हिरेॲड माणिक कोकाटेडॉ. राहुल आहेरॲड राहुल ढिकलेहिरामण खोसकरविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेक्रीडा आयुक्त सुहास दिवसेजिल्हाधिकारी जलज शर्मा,   मनपा आयुक्त अशोक करंजकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलनाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. वर्षा शासकीय निवासस्थानी आमदार मनिषा कायंदेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीक्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते. तर केंद्रीय कुटूंब कल्याण व आरोग्य मंत्री डॉ. भारती पवारआमदार दिलीप बोरसेकेंद्रीय सचिव मीता राजीव लोचन दृकश्राव्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा ‘शेकरू’ हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले कीमहाराष्ट्राचा ‘शेकरू’ हा दिमाखदार प्राणी राज्याचे वैशिष्ट्य असून तो सर्वासमोर पहिल्यांदाच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांततामैत्रीगतीशीलता आणि पर्यावरण प्रेमाचं प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल.

          यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाच्या बोधचिन्ह आणि बोधवाक्यघोषवाक्यांचेही अनावरण करण्यात आले. युवा के लिए - युवा द्वारा’ हे बोधवाक्य आहे. तर महाराष्ट्रासाठी सशक्त युवा- समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्राला जी-२० नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी चालून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. त्यासाठी मोठ्या वेगाने तयारी सुरु आहे. यातून महाराष्ट्राची संस्कृती व कला परंपरा ही देशभर पोहचवता येणार आहे. सोळा वर्षांनंतर महाराष्ट्राला या युवा महोत्सवाच्या आयोजनाचं यजमानपद मिळाले आहे. यात जास्तीत युवक सहभागी होतील. हा महोत्सव उद्घाटनापासून ते समारोपर्यंत दिमाखदार होईलअसे नियोजन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

          नाशिक शहराला प्रभू श्रीरामचंद्र यांचे पदस्पर्श झाले आहेत. तर तिकडे अयोध्येत श्रीराम मंदिर साकारले जात आहेतयाचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीवंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. मंदिर पूर्णत्वास जात असतानाच आपल्याला श्रीरामांचे पदस्पर्श झालेल्या नाशिकमध्ये आपणास युवा महोत्सवांच्या आयोजनाची चांगली संधी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. अशा या नगरीत देशभरातील युवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाईल. त्यासाठी सर्व यंत्रणांनी पुरेपूर काळजी घ्यावीकाटेकोर नियोजन करावेअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

          क्रीडा मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीदेशातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी देशात या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही संधी महाराष्ट्राला मिळालीयाचा आनंद आहे. स्वामी विवेकानंद हे समाज सुधारक व ज्यांच्या विचारातून लोकांमध्ये क्रांती घडविण्याचे काम केले आहे. त्यांचे विचार आजही सर्व युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देत आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून कलासाहित्यतंत्रज्ञानविज्ञानसंस्कृती यांचा अनोखा अनुभव नाशिककरांना घेता येणार असल्यानेजास्तीत जास्त युवक व नागरिकांनी या युवा महोत्सवाचा लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.  क्रीडा आयुक्त श्री. दिवसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नाशिक येथे युवा वर्गखेळाडूनागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथील तपोवन मैदानावर १२ ते १६ जानेवारी या कालावधीत आय़ोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशामधील ८ हजार युवक सहभागी होणार आहेत.  

0000


Featured post

Lakshvedhi