Sunday, 10 December 2023

पालघर जिल्हा परिषदेचा अखर्चित निधीला फेब्रुवारी २०२४ पर्यंत खर्च करण्यास परवानगी

 पालघर जिल्हा परिषदेचा अखर्चित निधीला फेब्रुवारी २०२४ पर्यंत

 खर्च करण्यास परवानगी

 

-ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन

 

          नागपूर दि.८:  सन २०२०-२१ व सन  २०२१-२२ या वित्तीय वर्षांमध्ये पालघर जिल्हा परिषदेला प्राप्त एकूण निधी पैकी काही निधी अखर्चित राहिला असून सदर अखर्चित निधी खर्च करण्यास वित्त विभागशासन निर्णय दि. १६ ऑक्टोबर २०२३ अन्वये फेब्रुवारी २०२४ पर्यंत परवानगी देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषद मध्ये दिली.

 

          पालघर जिल्हा परिषदेचा कोट्यावधीचा निधी परत गेल्याबाबतचा प्रश्न सदस्य सर्वश्री डॉ.मनिषा कायंदेनिरंजन डावखरे आदींनी उपस्थित केला होता.त्यावेळी श्री महाजन बोलत होते.

 

           यावेळी श्री महाजन म्हणालेपालघर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागग्रामपंचायत विभागलघु पाटबंधारे विभागशिक्षण विभागआरोग्य विभागमहिला व बालकल्याण विभागबांधकाम विभागपाणी पुरवठा व स्वच्छता विभाग तसेच कृषी विभाग या विभागांचा निधी अखर्चित आहे.सन २०२०-२१  दरम्यान कोविड -१९ संसर्ग,लाकडाऊन झाल्यामुळे अनेक कामांची मंजुरीनिविदा प्रक्रिया व अ़ंमलबजावणी करिता विलंब झाला.तसेच काही तांत्रिक कारणांमुळे निधी अखर्चित राहिला.सन २०२१-२२ मध्ये ९४.५५ टक्के निधी खर्च झालेला असल्याची माहिती श्री महाजन यांनी यावेळी दिली.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप

  

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप

                               १९ हजार हुन अधिक रुग्णांचे वाचले प्राण

 

                मुंबई दि. 10 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

 

                आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १७ महिन्यात १९ हजार पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

                 मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.

                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाखसप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाखऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाखनोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाखडिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाखजानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाखमार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाखएप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाखमे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाखतर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाखजुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाखऑगस्ट मध्ये १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाखतर सप्टेंबर मध्ये विक्रमी १४०८ रुग्णांना ११ कोटी ७७ लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येईल.

                मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.यामध्ये अँजिओप्लास्टीबायपास सर्जरी ,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया केमोथेरपी,  डायलिसिसजन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया,रस्ते अपघात ,विद्युत अपघात ,भाजलेले रुग्ण ,जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.

 

                                                                                ******

 

 

मी कुणाला कळलो नाही* ----------------

 *मी कुणाला कळलो नाही*

       ---------------------------------------

मित्र कोण आणि शत्रू कोण

         गणित साधे कळले नाही..

नाही भेटला कोण असा

        ज्याने मला छळले नाही...

सुगंध सारा वाटीत गेलो

          मी कधीच दरवळलो नाही..

ऋतू नाही असा कोणता

           ज्यात मी होरपळलो नाही..

केला सामना वादळाशी

        त्याच्या पासून पळालो नाही..

सामोरा गेलो संकटाना

           त्यांना पाहून वळलो नाही..

पचऊन टाकले दु:ख सारे

         कधीच मी हळहळलो नाही..

आले जीवनी सुख जरी

           कधीच मी हुरळलो नाही..

कधी ना सोडली कास सत्याची

     खोट्यात कधीच मळलो नाही...

रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण

       मी कुणाला कळलोच नाही...!

       मी कुणाला कळलोच नाही...!


 ‌‌‌                     *- कवी सुरेश भट*

समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांचे प्रभावी अंमलबजावणी करणार

 समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी

रस्ते सुरक्षा नियमांचे प्रभावी अंमलबजावणी करणार

-मंत्री दादाजी भुसे 

 

            नागपूर दि ८समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व सोयीसुविधांसह रस्ते सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

             समृध्दी महामार्गावर १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ घडलेल्या अपघाताबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देतांना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

            मंत्री श्री.भुसे म्हणाले कीहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील १६ ठिकाणांवर सर्व सोयीसुविधांसह पेट्रोलडिझेल पंपस्वच्छता गृहपिण्याचे पाणीचहा- नाश्ता अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करणे याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. वेग मर्यादा फलक ,चिन्ह फलक,सूचना फलक अशा उपाययोजना फलक लावण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरियर्स बसविण्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून 20 टक्के काम प्रगतिपथावर आहे. रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने माहितीपत्रके, फलक लावण्यात आलेले आहेत. 

            हा महामार्ग ज्या ८ जिल्ह्यांमधून जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागाचे प्रत्येकी १ तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ८ वाहने उपलब्ध देण्यात आली आहेत. या पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणेरस्ता सुरक्षा विषयक जागृती करणेवाहन चालकाचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्य करण्यात येतात. या उपाययोजना महामार्गावर अपघात रोखण्यासाठी  करण्यात आलेल्या असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

            वन्य प्राण्यांसाठी ज्या भागात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्या-त्या ठिकाणी पुलाची निर्मिती केली आहे. वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्या कडेला बॅरिकेट लावण्यात आले आहे.

            मंत्री श्री भुसे म्हणाले,संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात असतांना झालेल्या या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणारे १३ प्रवासी मृत्यूमुखी पडले व २२ प्रवासी जखमी झालेले आहेत. या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली असून या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या १५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार ०२ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

            अपघातग्रस्त वाहनाची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने केली आहे. वाहनाची नोंदणीकृत आसन क्षमता 17+1 अशी असताना या वाहनांमधून बेकायदेशीर रित्या 34 प्रवासी प्रवास करत होते. या वाहनास वेग नियंत्रक बसविलेले नव्हते. तसेच वाहनाच्या आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहेवाहन चालकास प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील वाहन चालवण्यात येत होते. वाहनाचा कर वैध नसताना वाहन रस्त्यावर आणले इत्यादी त्रुटी या अपघातास कारणीभूत असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले. या महामार्गामुळे 900 किमी अंतर वरून 700 किमी अंतर झाले आहे.वेळ,आणि डिझेल, पेट्रोलची बचत देखील होत आहे.१५ जिल्ह्याचा विकास होत आहे.तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर ही शहरे जवळ आली आहेत. हा एक सकारात्मक प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            अपघातातील १३ मृत प्रवासीयांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये पाच लाख याप्रमाणे एकूण रुपये ६५,००,०००/-(रुपये 65 लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

            परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी:६६८२२ टायर तपासणी,

रिफ्लेक्ट नसलेली ९४८ वाहन ,ब्रेथ ॲनालाइजर 21265,लेन कटिंग 4931,ओव्हर स्पीड 612,नो पार्किंग5898,दोषी वाहने,10581,एकूण दंड वसूल 27लाख 25 हजार 455 करण्यात आला आहे. तसेच समृद्धी महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास हजार 500 वाहनचालकाचे समुपदेशन करण्यात आले आहे.राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणेअतिवेगाने वाहन चालविणेही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. रस्त्यावरील व महामार्गावरील अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांमार्फत नियमितपणे तसेच विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

या लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,सदस्य अनिल परब,अनिकेत तटकरे,राजेश राठोड यांनी सहभाग घेतला होता.

जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेसाठी जमा रक्कम उमेदवारांना परत करण्याची कार्यवाही सुरू

 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेसाठी जमा रक्कम

उमेदवारांना परत करण्याची कार्यवाही सुरू

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन

            नागपूर दि. ८ :  ग्राम विकास विभागाची मार्च,२०१९ व ऑगस्ट,२०२१ मध्ये होणारी पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

            यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रा. राम शिंदेप्रवीण दरेकरनिरंजन डावखरेअभिजित वंजारीडॉ.मनीषा कायंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री.महाजन बोलत होते.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीपरीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परतावा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी बँक खात्याची माहिती द्यावी. उमेदवारांकरीता बँक खात्याची माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक सुस्थितीत सुरू असून उमेदवारांकडून मागणी प्राप्त झाल्यानुसार उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट शिथिल करण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री महाजन यांनी यावेळी दिली.

००००


महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार

 महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार


               सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत


            यासंदर्भातील उपप्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री सावंत बोलत होते.


            यावेळी मंत्री श्री सावंत म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध विभागांसह महानगरपालिका, जिल्हा परिषदेतील औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात “महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहे. आरोग्य सहसंचालक दर्जाचा व्यवस्थापक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे आहेत. राज्य सरकारचे विविध विभाग आपापल्या गरजेनुसार औषधे, वैद्यकीय उपकरणे, साहित्यसामग्री आदींची खरेदी करतील.


            वेगवेगळे विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्रकारचे औषधे, उपकरणे वेगवेगळ्या दरात खरेदी करत होते. प्राधिकरणामुळे एकात्मिक पद्धतीने खरेदी करता येणार असल्यामुळे अविलंब खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामळे यापुढील औषध खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार असल्याचे मंत्री श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.


००००

नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयास वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपये

 नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयास

वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपये

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर दि. ८ : नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीने रुग्ण सेवेकरिता यंत्रसामग्रीऔषधे व सर्जिकल साहित्य या वैद्यकीय सुविधासाठी १३ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

यावेळी मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले कीमेयो आणि मेडिकल रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी सध्या औषधे व यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच यासंदर्भात आणखी काही समस्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील.

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार

               सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत

            यासंदर्भातील उपप्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री सावंत बोलत होते.

            यावेळी मंत्री श्री सावंत म्हणाले की,  राज्य शासनाच्या विविध विभागांसह महानगरपालिकाजिल्हा परिषदेतील औषधेवैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहे.  आरोग्य सहसंचालक दर्जाचा व्यवस्थापकमुख्य लेखा व वित्त अधिकारीमुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे आहेत. राज्य सरकारचे विविध विभाग आपापल्या गरजेनुसार औषधेवैद्यकीय उपकरणेसाहित्यसामग्री आदींची खरेदी करतील.

            वेगवेगळे विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्रकारचे औषधेउपकरणे वेगवेगळ्या दरात खरेदी करत होते. प्राधिकरणामुळे एकात्मिक पद्धतीने खरेदी करता येणार असल्यामुळे अविलंब खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामळे यापुढील औषध खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार असल्याचे मंत्री श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

००००


Featured post

Lakshvedhi