Sunday, 19 November 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन एकात्मता दिनाची दिली शपथ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन एकात्मता दिनाची दिली शपथ




          मुंबई, दि. १९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त आज विनम्र अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही दिली. 


          मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी दिवंगत गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना त्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही दिली. 


                                        00

            माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन.


            मुंबई,दि 19: भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


           मंत्रालयातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त श्रीमती सौनिक यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.


यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्याचे निर्देश सर्वसामान्यांची विकासकांनी अडवणूक करू नये

 विलेपार्ले प्रेमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्याचे निर्देश

सर्वसामान्यांची विकासकांनी अडवणूक करू नये


-----------------------------------

खार पूर्व संक्रमण शिबिरात नागरिकांच्या गैरसोयी दूर करा

-मु

 

मुंबई दिनांक १८: विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाला दिले.  मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्याने झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे तयार होऊ नयेत यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाने जागरूक राहून समन्वयाने कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सर्वसामान्यगोरगरीब नागरिकांना घरे मिळावीत म्हणून आपण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासक विनाकारण अडवणूक करत असतील तर नियमानुसार लगेच कारवाई करा, असेही निर्देश त्यांनी दिले.   

            विलेपार्ले प्रेमनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व सांताक्रूझ खार पूर्व येथील शिवालिक व्हेंचर्सच्या प्रकल्पासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. माजी मंत्री रामदास कदमकुणाल सरमळकरप्रेमनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कृष्णा कदम व इतर प्रतिनिधीपोलीस आयुक्त विवेक फणसाळकरगृहनिर्माण अपर मुख्य सचिव वल्सा नायरझोपडपट्टी पुनर्वसनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडेबृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. 

प्रेमनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास त्वरित करण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभाग आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने योग्य ती पावले तातडीने उचलावीत. तसेच या ठिकाणाहून निष्कासित करण्यात आलेल्या १४०७ पैकी ८५० झोपडीधारकांना गेल्या आठ वर्षांपासून भाडे मिळालेले नाही. हे भाडे ६१ कोटी असून नव्याने निश्चित होणाऱ्या विकासकाकडून हे थकीत आणि पुढील भाडे नियमानुसार मिळाले पाहिजे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. थकीत भाडे मिळत नसल्याच्या प्रश्नावरून उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी प्रलंबित आहे. काही व्यक्ती येथील झोपडीधारकांची दिशाभूल करीत असून त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याच्या तक्रारी आहेत, त्यावर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत लगेच कारवाई करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

 

खार पूर्व येथे संक्रमण शिबिराच्या अडचणी दूर करा

सांताक्रूझ खार पूर्व येथे गोळीबार भागात शिवालिक व्हेंचर्सतर्फे पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या झोपडीधारकांच्या गैरसोयी दूर करून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिले. येथील निष्कासित करण्यात आलेल्या ७५०० झोपडीधारकांना नियमानुसार थकीत आणि चालू भाडे मिळेल हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

*****

Saturday, 18 November 2023

छठ पूजेनिमित्त पूजा साहित्याचे वाटप उत्साहात

 छठ पूजेनिमित्त पूजा साहित्याचे वाटप उत्साहात

आमदार अतुल भातखळकर यांची उपस्थिती  

कांदिवली पूर्व विधानसभेत आज ठिकठिकाणी होणार छठ पूजा


मुंबई : कांदिवली पूर्व विधानसभेत उद्या रविवार, दि. 19 रोजी होणाऱ्या छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते भाविकांना गन्ना वाटप, साडी वाटप तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्याचे वाटप मोठ्या उत्साहात पार पडले.

भारतीय जनता पक्ष आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि जोशात छठ पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेच्या निमित्ताने आज कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला संकुल येथील महाराणाप्रताप उद्यान आणि पोयसर येथील अजमेरा कंपाउंड येथे भाविक, भक्तांना पूजा साहित्याचे वाटप आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

संपूर्ण विधानसभेत एकूण सहा ठिकाणी रविवारी छठ पूजा होणार असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. लोखंडवाला संकुल येथील महाराणा प्रताप उद्यान, साईबाबा मंदिर समोर, हनुमान नगर येथील वडारपाडा रोड क्रमांक २ येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मैदान आझाद चाळ, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह मैदान, गोविंद शेठ चाळ, श्रीराम नगर, दळवी प्लॉट स्कूल मैदान, राम नगर, राजीव गांधी मैदान, ठाकूर कॉम्प्लेक्स, प्रमोद नवलकर उद्यान, ठाकूर कॉम्प्लेक्स तसेच मालाड पूर्व येथील सक्सेरिया चाळ, गोविंद नगर महापालिका शाळेजवळ येथे छठ पूजा संपन्न होणार आहे. या पूजेच्या निमित्ताने आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाली 



आहे. 

वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे

 वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे

आमदार अतुल भातखळकर यांची टिका


मुंबई : कांदिवलीमधील भारतीय जनता पार्टी आणि मी स्वतः छटपुजेला विरोध करतोय, हा वर्षा गायकवाड यांचा आरोप अत्यंत खोडसाळ स्वरूपाचा असल्याची टिका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

आमदार भातखळकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि आपण स्वतः कांदिवली पूर्व विधानसभेत छटपुजा अत्यंत उत्साहात साजरी करतो. येथे काँग्रेसच्या माजी नगरसेविका छटपुजा करत होत्या मात्र लोकांनी त्यातील आर्थिक गफलतीविषयी तक्रारी केल्या, म्हणून मुंबई महापालिकेने त्यांना परवानगी नाकारली ही वस्तुस्थिती आहे. माझ्या कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे हनुमान नगरमध्ये दोन ठिकाणी, पोयसरमध्ये तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी छटपूजा साजरी करत असते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच उत्साहात आणि जोशात लोखंडवाला येथील महाराणाप्रताप उद्यान येथे भाजपच्या वतीने जोरदार छटपुजा साजरी करण्यात येणार आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी अशा स्वरुपाचे खोडसाळ आरोप करू नयेत, असेही आमदार भातखळकर म्हणाले. 

!! संकल्प करा !!*

 💐🌸🌷🍀🍂🌿🌹🌼🌻🍁🌺

                  *!! संकल्प करा  !!*


 *एखाद्याला चांगले नाही म्हणता आले, तरी त्याला वाईट तरी म्हणू नका, नाही त्याचे कौतुक करावे वाटले, तरी त्याला नाउमेद मात्र करू नका.*


 *नाही कोणाला अन्नाला लावता आले, तरी कोणाच्या ताटातील घास ओढून घेऊ नका.नाही कोणाच्या मनात जागा बनवता आली, तरी कुणाच्या मनातून उतरू नका.*


 *नाही कुणावर दया दाखवता आली तरी चालेल पण निर्दयी मात्र बनू नका. नसेल कुणाला मदत करण्याची तुमची इच्छा पण त्याच्या गरजेची टिंगल तरी करु नका.*


 *पटत नसतील त्या गोष्टी तुम्ही नाही केल्या तरी चालतील पण,न पटणाऱ्या गोष्टींचे ओझे घेऊन जगू नका सांगूनही पटकन ज्यांना समजत नसेल अशांना चार हिताच्या गोष्टी सांगू नका.*


  *जेवढ्या गोष्टी सहज आठवतील तेवढ्याच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. डोक्यावर विचारांचे गाठोडे साठवून जगण्यात काहीच मजा नाहीये. करता आलंच तर प्रेम मात्र चांगल्या विचारांवर अवश्य करा.*


_*आवडणाऱ्या गोष्टी जर सहजशक्य असतील तर त्या गोष्टी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. पण अशक्य अशा आवडत्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःची कुतरओढ करून घेऊ नका.*


 *मनातून उतरून जाण्यापेक्षा, मनात घर करण्याचा वसा घेऊया. नाही जरी जमले हे, तरी कुणाला न दुखावता जगूया. माणसातल्या माणुसपणाला जागवूया...!!*

 🙏🌹

Friday, 17 November 2023

ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार

 ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची

100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरु करावे

 

            मुंबई, दि. 17 : आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईलअसा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षात प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची 100 टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

            मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची तसेच  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच सारथी महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसेग्रामविकास मंत्री  गिरीश महाजनअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक नरेंद्र पाटीलसामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगेव्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेचसारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकरउमाकांत दांगट मधुकरराव कोकाटे,  डॉ. नवनाथ पासलकर  यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमराठा समाजाला स्वतःचे स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) उच्च न्यायालय अलाहाबादन्यायमूर्ती मारोती गायकवाड (निवृत्त)न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) या तीन सदस्यीय समितीचे कामकाज प्रत्यक्ष  सुरू झाले असून  त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. ही समिती टाटा सामाजिक विज्ञान संस्थागोखले शैक्षणिक संस्था आणि ऑल इंडिया पॉप्युलेशन सायन्स या तीन नामांकित संस्थाच्या माध्यामातून सर्वेक्षणाचे काम करणार आहे. तसेच आतापर्यंत सुरू असलेल्या नोंदीच्या कामात मराठवाड्यात 22 हजार कुणबी नोंदी नव्याने आढळल्या असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

             राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील लाभार्थींना उद्योग व्यवसायासाठीच्या कर्जाचा व्याज परतावा करण्याची सुविधा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात सुरु आहेसर्व जिल्ह्यात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करावेत्याचसोबत महामंडळाच्या विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून मराठा समाजातील रोजगार इच्छुकांसाठी रोजगार नोंदणी सुविधा उपलब्ध करुन द्यावीअशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

            मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय तसेच विभागीय यंत्रणांचा आढावा घेऊन सर्व जिल्ह्यात महामंडळांच्या स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था करण्याचे सूचित केले. यासाठी प्राधान्याने महसूलकौशल्य विकास तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांच्या अखत्यारीतील जागेत महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याचे सूचित केले ज्या ठिकाणी अशी जागा उपलब्ध नसेल त्याठिकाणी भाडयाने खाजगी जागेत तातडीने जिल्हा कार्यालयाची व्यवस्था कार्यान्वित करण्याचे सूचित केले. तसेच विभागीय स्तरावर महामंडळाने त्यांच्या विभागीय समन्वयकांच्या माध्यमातून रोजगार नोंदणी सुविधा सुरु करुन इच्छुकांचे रोजगार मेळावे आयोजनसंबंधित कंपन्यासोबत समन्वय साधावा. नोकरी इच्छुकांना मुलाखत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे या माध्यमातून जास्तीत जास्त संख्यने रोजगार संधीची निर्मिती करावी. त्याचसोबत कर्ज इच्छुक लाभार्थींना व्यवसाय सुरु करण्यासाठीचे प्रशिक्षण प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने सारथी संस्थेसोबत समन्वय करण्याचे सूचित केले.

            महामंडळाच्या योजनेमुळे व्यापक प्रमाणात लाभार्थींना सहाय्य मिळत आहेत्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नवी मुंबई येथे महामंडळाच्या भवन उभारण्यासाठी सिडकोकडे पाच एकर जमीन ग्रहण करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. महामंडळाने कर्ज दिलेल्या 71 हजार 376 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या रोजगाराची माहिती संकलित करावी. तसेच महामंडळाच्या पाच हजार कर्ज लाभार्थी यांची कर्ज परतफेड पूर्ण झाली आहेत्यांचे सर्वेक्षण करावे अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी संबंधितांना दिल्या. दहा हजार ते दोन लाख पर्यंतच्या बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचा निर्णय उपसमितीने घेतला आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत शिक्षणासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचाही निर्णय उपसमितीने घेतला असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

सारथीच्या पीएचडी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा तातडीने घ्यावी

            या बैठकीत मंत्री श्री.पाटील यांनी सारथीच्या पीएच.डी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परिक्षा तातडीने घेण्याचे सूचित केले. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थांना गुणवत्ता यादीनुसार फेलोशिप देण्याची प्रक्रिया राबवण्याचे सूचित केले. तसेच सारथी संस्थेच्या योजना अमंलबजावणीचा आढावा घेऊन त्यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षणस्पर्धा परिक्षा यासह शेतकरी वर्गासाठीच्या सर्व योजनांची प्रवेश प्रक्रिया तसेच प्रशिक्षण संस्था यांची निवड प्रक्रीया पारदर्शकपणे करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांची मुलाखत

 दिलखुलास, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्मसिटीगेली सेहचाळीस वर्षे कार्यरत आहे. या महामंडळामार्फत चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. याचबरोबरच मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळामार्फत विविध अनुदान योजनाही राबविण्यात येत आहे. चित्रपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी यंदा महामंडळ गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजारकरीता सहभागी होत आहे. या महोत्सवात कोणते चित्रपट सादर करणार आहेतमहोत्सवाचे वेगळेपण काय आहेया उपक्रमासाठी महामंडळाने कशी तयारी व नियोजन केले आहे. याबाबतची माहिती महामंडळाचे श्री. पाटील यांनी 'दिलखुलास' व 'जय महाराष्ट्र'  कार्यक्रमातून दिली आहे.

             दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवारदि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रणधीर कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://x.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

Featured post

Lakshvedhi