Friday, 17 November 2023

क्षेपणभूमीवरील कचऱ्याची जलदगतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती; आठवडाभरात कृती आराखडा सादर करावा

 मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नगर विकास मंत्र्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक

क्षेपणभूमीवरील कचऱ्याची जलदगतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती;

आठवडाभरात कृती आराखडा सादर करावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

            मुंबईदि. 16 : मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डंपिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा  कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबईतील मुलुंडकांजुरमार्ग आणि देवनार या क्षेपणभूमीवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावली जावीक्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवावेतअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            यासंदर्भात केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.  त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

            वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिकमहापालिका आयुक्त आय. एस. चहलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराजमहानगरपालिका अतिरीक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते. केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा विभागाचे सचिव मनोज जोशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

            मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने सद्य स्थितीत अस्तित्वास असलेल्या कचऱ्याचे जलदगतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

            मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खत निर्मितीवीज निर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. कांजुरमार्ग येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात यावाअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत उपलब्ध असणाऱ्या खारभूमीचा देखील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन सार्वजनिक कामाकरीता वापर करता येईल याबाबीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

             स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत महानगरांमधील स्वच्छतेसोबतच क्षेपणभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या मोहिमेला गती देऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

००००

तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणालीसक्षम व पारदर्शी करण्याची गरज

 तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणालीसक्षम व पारदर्शी करण्याची गरज


- राज्यपाल रमेश बैस


राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या 77 व्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन


 


            नागपूर दि. 16 : कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन कर प्रणालीत अधिक सुलभता तसेच पारदर्शकता आणल्यास करदात्यांमध्ये विश्वास निर्माण होईल, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            येथील राष्ट्रीय कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या 77 व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्यपाल श्री. बैस बोलत होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य रवी अग्रवाल, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक जयंत दिद्दी, अपर महानिदेशक मनिष कुमार, अपर महानिदेशक सिद्दरमप्पा कपत्तनवार यावेळी उपस्थित होते.


            जग अत्यंत जवळ येत असून येत्या काळात कर संकलन प्रणाली जागतिक स्तरावरुन संचलित व्हावी याचा विचार होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले, भावी अधिकाऱ्यांना उत्कृष्ट प्रशासक म्हणून घडविणारे हे प्रशिक्षण या तुकडीला परिपूर्ण करेल. असे प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यात राष्ट्रीय कर अकादमी महत्वाची भूमिका पार पाडेल. करदात्यांसोबत योग्य व्यवहार करुन करसंकलन करणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल. आपले कर्तव्य बजावताना आदर्श परिमाणांसोबत तडजोड न करता नैतिकता व सदाचाराचे पालन करुन या पदाला योग्य न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


            सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी डेटा संकलन ही महत्वाची जबाबदारी राजस्व विभागावर असणार आहे, यासाठी या विभागाला पारदर्शी भूमिका पार पाडावी लागणार आहे. राष्ट्रीय कर अकादमीने आपली गौरवशाली परंपरेची जोपासना करुन अधिकाधिक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असतांना यावर्षी 77 वी तुकडी प्रशिक्षित होत आहे हे अभिमानास्पद आहे. 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प आपण पूर्णत्वास नेणार आहोत, असा आशावादही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.


            अकादमीमध्ये स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे ही प्रणाली जगात सर्वोत्कृष्ट असून सर्व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे यामुळे शक्य झाले असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य रवी अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.


            प्रदीप एस यांनी 77 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीचे प्रोफाईल वाचन केले. प्रधान महासंचालक जयंत दिद्दी यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती हर्षवाणी सिंग यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्या

त आले.


00000


Thursday, 16 November 2023

मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा

 मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील

स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबईतील प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम मोहिम स्वरुपात करावे


            मुंबई, दि. 16 : मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले.


            वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.


            मुंबईतील प्रमुख रस्ते, पदपथ, चौक याठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ देखील लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.


            मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मोहिम स्वरूपात काम करतानाच प्रत्येक भागात रस्ते, पदपथ, गटारं साफ करण्यासाठी दररोज ५० ते १०० कामगार साफसफाईचे काम करतात अशा ठिकाणी अन्य भागातले कामगार तेथे बोलावून साधारणत: एक हजार कामगारांकडून त्याभागाची साफसफाई करून घ्यावी, अशा प्रकारे मुंबईतील प्रत्येक भागात डिसेंबर महिन्यापासून मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.


            सुमारे १०८ स्थानकांच्या माध्यमातून लाखो मुंबईकर उपनगरीय रेल्वेतून दररोज प्रवास करीत असतात. प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो. अशावेळी ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.


००००



 

श्रीमंत*

 *श्रीमंत*


मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...


नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...


श्रीमंत या शब्दाची व्याख्या ...म्हणजेच...

 पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात समाविष्ट आहेतच...


फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...


गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...


अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...


अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...


बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...


सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...


"मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...


ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...


सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. 

मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...


वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...


पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत. 


कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही), 

कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...


कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. 

आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...


प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम,

 Long Term नियोजन केलेलं आहे. 

रितसर कागदपत्रे, 

त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. 

कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...


स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.


कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या कार्यक्रमालाही आवर्जुन जातात..

कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...


उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे माणूसकी या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...


आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...


पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. 


तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा...

तो करायलाच हवा.

तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...


आपण खुप श्रीमंत  व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!


             पिंपळाच्या रोपासारखं ...

             खडकावर उगवता आलं पाहिजे,

             निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर 

             चालता आलं पाहिजे. 

             वादळांचं काय....

             ती येतात आणि जातात,

             मातीत घट्ट पाय रोवून

             उभं रहाता आलं पाहिजे.

या दिपावलीच्या मनापासून शुभेच्छा देताना आपण असे  " " श्रीमंत " व्हावे हीच मनोकामना ! 🙏


🌟💥💫🌠🌅🌇🎁🎉

विकसित भारत संकल्प यात्रेच्या राज्यस्तरीय मोहिमेचा नंदुरबारमधून शुभारंभ

 विकसित भारत संकल्प यात्रेच्या राज्यस्तरीय मोहिमेचा नंदुरबारमधून शुभारंभ

 

            नंदुरबारदिनांक 15: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यात माहितीशिक्षण आणि संवादासाठी आजपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा  दाखवून केला.

 

            भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा" या कार्यक्रमाचे उद्घाटन देशातील 75 आदिवासी जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड येथील उलिहातू येथून करण्यात आले. या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दृरदृश्य प्रणालीद्वारे नंदुरबार येथून सहभागी झाले होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटीलजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावितखासदार डॉ. हिना गावितराज्यपाल यांच्या सचिव श्वेता सिंघलआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हाधिकारी मनीषा खत्री आदी यावेळी उपस्थित होते.

 

शासकीय योजनांच्या जनजागृतीचे ध्येय संकल्प यात्रेतून साध्य होईल- राज्यपाल रमेश बैस

 

यावेळी राज्यपाल श्री. बैस म्हणालेआदिवासी बांधव तसेच देशातील वंचित समुदायासाठी विविध शासकीय योजना आहेत. या योजनांची जनजागृतीचे ध्येय या विकसित भारत संकल्प यात्रेतून साध्य होईल. सन 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अशा जनजागृती यात्रांची गरज आहे.

 

केंद्र सरकारचे काम निरंतर प्रेरणा देणारे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

आज तिसऱ्या जनजाती गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान उलिहाटू (झारखंड) येथे उपस्थित राहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. तसेच, देशातील 75 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. सर्वांचा विकास हे उद्दीष्ट ठेऊन सुरु असलेले केंद्र सरकारचे काम राज्य शासनाला प्रेरणा देत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

 

लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याची संकल्प यात्रा-डॉ. विजयकुमार गावित

 

            यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणालेभारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीतअशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहीम 15 नोव्हेंबर2023 ते 26 जानेवारी2024 या कालावधीत आखण्यात आली आहे.

             यावेळी नंदुरबार जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या पाच मोबाईल व्हॅन जिल्ह्यात जनजागृतीसाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मार्गस्थ करण्यात आल्या.

 

ही आहेत संकल्प यात्रेची उद्दिष्टे

         ·          विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे

         ·          माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे.

         ·         नागरिकांशी संवाद-वैयक्तिक यशकथाअनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे.

         ·         यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे.

 

यात्रेची वैशिष्ट्ये

         ·         जनजातीय गौरव दिनाच्या दिवशी शुभारंभ होणाऱ्या या यात्रेत सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून 26 जानेवारी 2024 पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल.

         ·         विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक आखताना स्थानिक परिस्थिती उदा. हवामानसण बाबी विचारात घेतल्या जातील.

         ·         या यात्रेचे समन्वय साधण्यासाठी केंद्र शासन स्तरावरकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्राल ग्रामीण विकास मंत्रालय आणि आदिवासी कार्य मंत्रालय ही ग्रामीण आणि लक्षणीय अनुसूचित जम लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांसाठी नोडल मंत्रालये राहणार असून शहरी भागांसाठीमाहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय ही नोडल मंत्रालये असतील.

००००

                                                                   

 

 

 

Wednesday, 15 November 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील दीपोत्सवाला नवा आयाम !

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गडचिरोलीच्या अतिदुर्गम भा








गातील दीपोत्सवाला नवा आयाम !

 

 विविध वास्तुंचे उद्घाटन तसेच महा जनजागरण मेळावा उत्साहात

 

 महिला पोलीस आणि आदिवासी महिलांसोबत मुख्यमंत्र्यांची अनोखी भाऊबीज

 

            गडचिरोलीदि. 15 :  गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक नवा आयाम दिला.  जिल्ह्यातील पिपली बुर्गी येथे तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या पद्धतीने  दीपोत्सव साजरा केला. नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या या जवानांचे मनोबल उंचावतांनाच त्यांनी आदिवासी बांधवांसोबत भावस्पर्शी एकरूपता साधली.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील पिपली बुर्गीला भेट दिली. या भेटीदरम्यान एटापल्ली उपविभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या  पिपली बुर्गी पोलीस ठाण्यांतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन विविध वास्तुचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पिपली चुनीं येथील पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकिय इमारतीचे भूमीपूजनपोलीस अंमलदार बॅरेक आणि अधिकारी विश्राम गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. तसेच पिपली बुर्गी येथे महा जनजागरण मेळाव्यास  उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी  गडचिरोली पोलीस दलातील  जवान व आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. जवान आणि नागरिकांसोबत फराळ केला.   भाऊबीजेच्या निमित्ताने येथील महिला पोलीस अंमलदार व स्थानिक महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे भावस्पर्शी औक्षण केले. 

            मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महा जनजागरण मेळाव्यात उपस्थित असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक भेट वस्तू व साहित्याचे वाटप झाले. तसेच  विद्यार्थ्यांना सायकलशालेय व क्रीडा साहित्य देण्यात आले. 

            मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी गडचिरोली पोलीस दलाच्या मागील कामगिरीचा आढावा घेऊन उत्कृष्ट कामगिरीबाबत अभिनंदन केले. या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील पोलीस जवान अतिशय निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असून त्यांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणालेयेथील विशेष अभियान पथकाची टीम ही अतिशय सक्षम असून तिच्या कर्तृत्वाची उच्च स्तरावर दखल घेण्यात येत असते. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाकडून पोलीस दादा लोरा खिडकीसारखे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. यातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास होण्यास मदत होत आहे. गडचिरोलीचा विकास हा सरकारचा ध्यास असूननवीन उद्योग आता या जिल्ह्यात येत आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. शालेय विद्याथ्यांनी शासनाच्या मदतीचा लाभ घेऊन आपला विकास साधावा असे आवाहनही त्यांनी केले. 

गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक  संदीप पाटीलजिल्हाधिकारी संजय मीनापोलीस अधीक्षक नीलोत्पल सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारेकेंद्रीय राखीव बटालियचे समादेशक परविंदर सिंहअपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आदी यावेळी उपस्थित होते. 

            या भावस्पर्शी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक शिवराज लोखंडे यांनी तर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांनी आभार मानले.

 

0000

 

                                                                   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा

महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा




मुंबई दि.15:-वनसंपदा, खनिज संपदा व कला यांनी समृद्ध असलेले झारखंड राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. वृक्ष व निसर्गाची पूजा करणारे आदिवासी लोक या राज्यात आहे. निसर्ग रक्षणाला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे लोकांनी निसर्ग संपदेचे रक्षण केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 15 नोव्हे) महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच 'झारखंड राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांचे स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये साजरा करण्याच्या सुचनेनुसार झारखंड राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन येथे साजरा करण्यात आला. झारखंडचे सुपुत्र महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन करुन राज्यपालांनी झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. झारखंड राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून राज्य कला, चित्रकला व नृत्य या क्षेत्रात समृद्ध असल्याचे राज्यपालांनी सांगितले. झारखंड राज्याचे दोन वर्षे राज्यपाल म्हणून काम करणे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्व राजभवनांमध्ये विविध राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे केल्यामुळे राज्यांच्या संस्कृतींची ओळख होत आहे व त्यातून राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याला चालना मिळत आहे, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी झारखंड सरकारचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, जय फाउंडेशन व रुद्र प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून झारखंडच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात छट पूजा, छऊ नृत्य, कावड यात्रा, पैका नृत्य, फगुआ नृत्य, करम नृत्य, माघे नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते जय व रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह, खासदार संजीव नाईक, झारखंड येथील कलाकार सृष्टीधर महतो व लखन गुरिया, लालमती सिंह, सीमा सिंह, तसेच इतर कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा झारखंड स्थापना दिनानिमित्त संदेश दाखविण्यात आला. झारखंड राज्याची माहिती दाखविणारा लघुपट देखील यावेळी दाखविण्यात आला. राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभार प्रदर्शन केले. 000 Jharkhand State Formation Day Celebrated in Maharashtra Raj Bhavan Maharashtra Governor Ramesh Bais describes Jharkhand as the finest creation of God Maharashtra Governor Ramesh Bais today described Jharkhand as one of the finest creations of God. Stating that Jharkhand is endowed with bountiful nature, minerals and art, the Governor said the government is giving due importance to promoting the rich arts of Jharkhand. Recalling his tenure as Governor of Jharkhand, the Governor said the State has tribes that worship trees and nature. He said that attaching religious significance to protection of nature has helped the cause of preservation of biodiversity. The Governor was speaking at the State Formation Day programme of Jharkhand organised for the first time at Maharashtra Raj Bhavan Mumbai on Wed (1 Nov). The programme was organised as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India. Paying rich tributes to Shahid Birsa Munda on his birth anniversary, Governor Bais said he had the privilege of serving as the Governor of Jharkhand before coming to Maharashtra. The Governor said the celebration of the Formation days of various states and Union Territories in all the Raj Bhavans across the country had strengthened the cause of unity and national integration. A cultural program showcasing the folk dance and culture of Jharkhand was presented by the artists from Jharkhand. The cultural programme was organised in association with the Directorate of Cultural Affairs Jharkhand, Jai Foundation and Rudra Pratishthan. Chhat Puja, Chhau dance, Kavad Yatra, Paika dance, Fagua dance, Karam dance, Maghe dance etc. were presented in the cultural programme. The Governor felicitated the founder of Rudra Pratishthan and Jay Foundation Dhanajay Singh, former MP Sanjeev Naik, artists Srishtidhar Mahato and Lakhan Guriya, Smt Lalmati Singh, Seema Singh and other artists on the occasion. The video message sent by Jharkhand Governor C P Radhakrishnan was shown on the occasion. An audiovisual film on Jharkhand State was shown on the occasion. Secretary to the Governor (Addl Charge) Shweta Singhal delivered the welcome address, while the Comptroller of the Governor's Households Arun Anandkar proposed the vote of thanks. 0000

Featured post

Lakshvedhi