Tuesday, 7 November 2023

जंगल का राजा कहा जाने वाला शेर शिकार के

 जंगल का राजा कहा जाने वाला शेर शिकार के लिए किए गए अपने 75% आक्रमणों में असफल हो जाता है। मतलब वह सौ में 75 बार फेल होता है। अब आप इससे अपने जीवन की तुलना कीजिये, क्या हम 75% असफलता झेल पाते हैं ? नहीं ! इतनी असफलता तो मनुष्य को अवसाद में धकेल देती है। पर शेर अवसाद में नहीं जाता है। वह 25% मार्क्स के साथ ही जंगल का राजा है।


इसी घटना को दूसरे एंगल से देखिये ! शेर अपने 75% आक्रमणों में असफल हो जाता है, इसका सीधा अर्थ है कि हिरण 75% हमलों में खुद को बचा ले जाते हैं। जंगल का सबसे मासूम पशु शेर जैसे बर्बर और प्रबल शत्रु को बार बार पराजित करता है और तभी लाखों वर्षों से जी रहा है। उसका शत्रु केवल शेर ही नहीं है, बल्कि बाघ, चीता, तेंदुआ आदि पशुओं के अलावा मनुष्य भी उसका शत्रु है और सब उसे मारना ही चाहते हैं। फिर भी वह बना हुआ है। कैसे ?


वह जी रहा है, क्योंकि वह जीना चाहता है। हिरणों का झुंड रोज ही अपने सामने अपने कुछ साथियों को मार दिए जाते देखते हैं, पर हार नहीं मानते। वे दुख भरी कविताएं नहीं लिखते, हिरनवाद का रोना नहीं रोते। वे अवसाद में नहीं जाते, पर लड़ना नहीं छोड़ते। उन्हें पूरे जीवन में एक क्षण के लिए भी मनुष्य की तरह चादर तान कर सोने का सौभाग्य नहीं मिलता, बल्कि वे हर क्षण मृत्यु से संघर्ष करते हैं। यह संघर्ष ही उनकी रक्षा कर रहा है।


जंगल में स्वतंत्र जी रहे हर पशु का जीवन आज के मनुष्य से हजार गुना कठिन और संघर्षपूर्ण है। मनुष्य के सामने बस अधिक पैसा कमाने का संघर्ष है, पर शेष जातियां जीवित रहने का संघर्ष करती हैं। फिर भी वे मस्त जी रहे होते हैं, और हममें से अधिकांश अपनी स्थिति से असंतुष्ट हो कर रो रहे हैं।


मनुष्य को अभी पशुओं से बहुत कुछ सीखने की आवश्यकता है।।

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ ची ९.३७ टक्के दराने परतफेड

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ ची ९.३७ टक्के दराने परतफेड

 

            मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज,२०२३ ची परतफेड ४ डिसेंबर २०२३ रोजी आहे. वित्त विभागाच्या अधिसूचना क्र.एलएनएफ-१०.१३/प्र.क्र.३४/अर्थोपाय २९ नोव्हेंबर२०१३ अनुसार ९.३७ टक्के दराने महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२३ अदत्त शिल्लक रकमेची ३ डिसेंबर२०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ४ डिसेंबर२०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाच्या शैला ए. सचिव (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

             "परक्राम्य संलेख अधिनियम१८८१" अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान: कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी असेल. या कर्जावर ४ डिसेंबर२०२३ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धीपत्रात नमूद आहे.

            सरकारी प्रतिभूती विनियम२००७ च्या उप-विनियम २४(२) व २४ (३) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्याच्या दुय्यम बँकाकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडेत्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

             तथापिबँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावीनियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावेयासाठी९.३७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२३ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस  "प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे      यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेतयाची विशेष नोंद घ्यावी.

             रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांनारक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील,असे वित्त विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

००००

जल दिवाळी’ :“महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला” अभियान देशभरात सुरु

 जल दिवाळी’ :महिलांसाठी पाणीपाण्यासाठी महिला अभियान देशभरात सुरु

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाची जलदिवाळी मोहीम

 

            नवी दिल्ली6: घराघरांत शुध्द व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे या उद्दिष्टातून ‘जल दिवाळी’ : महिलांसाठी पाणीपाण्यासाठी महिला अभियान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे  देशभरात सुरु करण्यात आले आहे.  या अभियानाव्दारे जल प्रशासनाच्या यंत्रणेत महिलांचा समावेश करण्यात येईल व त्यांना या क्षेत्रातही काम करण्याची संधी  उपलब्ध होऊ शकेल.

            गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जल दिवाळी मोहीम सुरू केली आहे – महिलांसाठी पाणीपाण्यासाठी महिलामंत्रालयाने अटल मिशन फॉर रिजुवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) या प्रमुख योजनेअंतर्गत ही मोहीम सुरू केली आहे. जलदिवाळी मोहिमेचे उद्दिष्ट 550हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये महिला बचत गटांच्या जल प्रशासन यंत्रणेला भेटी देणे आहे.

जल दिवाळी मोहिमेविषयी

            गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (AMRUT) अंतर्गत हा प्रगतिशील उपक्रम सात ते नऊ नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहील. जलदिवाळी मोहिमेत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) देखील सहभागी होत आहे. या मोहिमेचा नॉलेज पार्टनर’ ओडिशा अर्बन अकादमी आहे. जल प्रशासन प्रणाली अंतर्गत स्थापन केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांना (WTP) महिलांना भेट देण्याचा उपक्रम आहे. यामुळे महिलांना त्यांच्या घरात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या महत्त्वाच्या प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. यासोबतच महिलांना पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रोटोकॉलची माहिती मिळेलज्यामुळे त्यांना त्यांच्या अपेक्षित पाण्याच्या गुणवत्तेची कल्पना येईल.

            देशभरात 3,000 हून अधिक जलशुद्धीकरण सयंत्रे आहेत. या प्रकल्पांची बांधलेली जल प्रक्रिया क्षमता 65,000 एमएलडी पेक्षा जास्त आहे आणि कार्यान्वित क्षमता 55,000 एमएलडी पेक्षा जास्त आहे. या मोहिमेअंतर्गत महिला बचत गट (SHGs) 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना (त्यांच्या शहरातील वनस्पती) भेट देतील. या 550 ची एकत्रित कार्य क्षमता 20,000 एमएलडी आहे.

            भारतासारख्या देशात घरगुती पाणी व्यवस्थापनात महिलांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत महिलांना पाण्याशी संबंधित योग्य माहिती असणे आवश्यक आहे. "महिलांसाठी पाणीपाण्यासाठी महिला" या संकल्पनेवर आधारित गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या जलदिवाळी मोहिमेमुळे महिलांना पिण्याच्या पाण्याच्या प्लांटपासून ते घरापर्यंत शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्याची प्रक्रिया जाणून घेण्यास मदत होईल. याद्वारे त्यांना पाण्याची गुणवत्ता देखील समजू शकेलज्यामुळे प्रत्येक घरात दर्जेदार पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होईल. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 15,000 पेक्षा जास्त बचत गटातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.

दिवाली पहाट में कनॉट प्लेस का सेंट्रल पार्क बन गया मिनी महाराष्ट्र




 दिवाली पहाट में कनॉट प्लेस का

सेंट्रल पार्क बन गया मिनी महाराष्ट्र

 

            नई दिल्ली, 06 : ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’ द्वारा कनॉट प्लेसके सेंट्रल पार्क में आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम दिवाली पहाट’ में प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत के मराठी और हिन्दी गानों पर लोग जमकर थिरके। दिल्ली जैसे व्यस्तता वाले शहर में सुबह 6 बजे लगभग 4 हजार लोग पहुंचे। 05 अक्टुबररविवार  प्रातःकाल की पहली किरण के साथ आरंभ हुआ यह कार्यक्रम करीब चार घंटे चला।

            सेंट्रल पार्क में मंच सज्जा बहुत कलात्मक की गई थी। दिल्ली में निवास करने वाले मराठी परिवार के लोग साढ़े पांच बजे से ही पहुंचने लगे थे। आधा घंटा में ही बैठने की जगह नहीं बची। गायिका वैशाली सामंत जैसे मंच पर आईं। लोगों का उत्साह दोगुना हो गया। इसके बाद शुरू हुआ गीतों का सिलसिला लगातार चार घंटे तक चला।

            यह भीड़ देखकर वैशाली सामंत भी अचरज में थीं। उन्हें अंदाजा नहीं था कि दिल्ली में वह भी सुबह के समय इतने लोग उन्हें सुनने आएंगे। मराठियों का स्नेह देखकर वह अपनी पसंद की बजाय लोगों की फरमाईस वाले गीत ज्यादा गायीं। महाराष्ट्र के सुप्रसिद्ध लावणी गीतसंगीत पर तो लोग नाचने लगे। हर उम्र के लोग जमकर नाचे। कहां कार्यक्रम दो घंटे चलना थालेकिन लोगों का उत्साह और फरमाईस से यह चार घंटे चला।

            मंच से थोड़ी दूरी पर एक दर्जन से अधिक फुड स्टाल लगाए गए थे। जहां महाराष्ट्र का पसंदीदा बड़ा पावदही के साथ साबूदाना की खिचड़ीमिसल पावचिवड़ा के अलावा नास्ते की कई किस्से मौजूद थीं। यहां पंढ़रपुर में विराजे भगवान विट्ठल और रूकमणी के साथ संत ज्ञानेश्वर और संत तुकाराम की प्रतिमा आकर्षण का केन्द्र रही। यह सेल्फी प्वांइट बन गया थाजहां सेल्फी लेने वालों की भीड़ लगी थी।

            देश की राजधानी में दिल्ली मराठी प्रतिष्ठान वह डोर बन गया है जो महाराष्ट्र से दूर रह रहे अपने लोगों को जोड़कर रख रहा है। प्रतिष्ठान मराठी परिवार को अपनी लोक संस्कृतिलोक कला और परम्परा से बांधने के साथ उसे संजोने और संवारने का काम प्रमुखता से कर रहा है। 2014 में वैभव डांगे द्वारा दिल्ली में निवास करने वाले मराठी परिवारों को उनके जड़ से जोड़े रखने के लिए दिल्ली मराठी प्रतिष्ठान का गठन किया गया। जो आज दिल्ली के मराठी समाज और मराठी संस्थाओं का विश्वसनीय मंच बन गया है। प्रतिष्ठान द्वारा 2016 में दीपावली के शुभअवसर पर महाराष्ट्र में होने वाले दिवाली पहाट की शुरूआत की गई थी। इस बार यह आठवां आयोजन था। जिसमें दिल्ली निवासी मराठी परिवार बढ़-चढ़कर हिस्सा लिए।

Monday, 6 November 2023

मुंबईत ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत 'पु. ल. कला महोत्सव २०२३'

 मुंबईत ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत 'पु. ल. कला महोत्सव २०२३'

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार उद्धाटन

 

            मुंबईदि. ६: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या वतीने ८ ते १४ नोव्हेंबर२०२३ या कालावधीत 'पु. ल. कला महोत्सव २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगण प्रांगणात होणार आहे. रसिकांना या महोत्सवात साहित्यगायनवादननृत्यनाट्य अशा विविध कला प्रकारांवर आधारित विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. उद्घाटनानंतर कलांगण येथेच काफिलाकोल्हापूर या संस्थेचा मराठीहिंदीऊर्दूप्रेम साहित्यावर आधारित 'जियारतहा कार्यक्रम सादर होईल.

            गुरुवारी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजता नवीन लघुनाट्यगृहात पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या 'शतदीप उजळलेया शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाने महोत्सवाची पहाट सजणार आहे. त्यासोबतच सायंकाळी ६:३० वाजता ओमकार अंध-अपंग सामाजिक संस्थेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले दिव्यदृष्टी असलेले कलाकार मल्लखांबाचे सादरीकरण करणार आहेत तर सायंकाळी  ७:३० वाजता अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळवाशी यांच्यावतीने कलांगण येथेच गायनवादन व नृत्याचा आनंददायी आविष्कार अर्थात 'संगीत संध्यारंगणार आहे.

            शुक्रवारी १० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबई यांच्या वतीने पु. ल. आणि बंगाल यांचा साहित्यिक आणि सांगितिक भावबंध उलगडणारा 'शोंगित शिल्पी पी. एल. बाबूहा कार्यक्रम कलांगण येथे सादर होईल. यात रवींद्र संगीतासाठी अरुंधती देशमुखबाऊल संगीतासाठी डॉ. उत्तरा चौसाळकर सहभागी होणार असून ज्येष्ठ पत्रकार हेमकांत नावडीकर हे पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यकमाचे निरुपण धनश्री लेले करणार आहेत.  सायंकाळी ७:३० वाजता कलांगण येथेच विदुषी आशा खाडीलकर आणि सहकारी 'पु. ल. एक आनंदस्वर" या पु. ल. देशपांडे यांच्या सांगितीक कारकिर्दीवर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत.

            शनिवारी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं.५ वाजता पं. मिलिंद रायकर आणि सहकारी 'व्हायोलिनचे रंग-तरंगया कार्यक्रमात शास्त्रीयउपशास्त्रीयतसेच पाश्चात्य व चित्रपट संगीतातील व्हायोलिनच्या सुरांचे अनोखे सादरीकरण करणार आहेत. तद्नंतर सायंकाळी ७ वाजता संस्कार भारतीकोकण प्रांताचे गुणवंत कलाकार महाराष्ट्रातील विविध लोककलांचे संगीतमय सादरीकरण 'लोकरंग दिवाळी संध्याया कार्यक्रमात करणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम कलांगण येथे होणार आहेत.

            दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोमवारी १३ नोव्हेंबर २०२३ सायं. ६ वा. अभिजात रंगयात्रा या संस्थेचे कलाकार संग्रहापलिकडचे पु.ल.’ हा पु. ल. देशपांडे यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत. तद्नंतर उत्स्फूर्तठाणे यांचे कलाकार अभिवाचननाट्यप्रवेश यांसह दृकश्राव्य सादरीकरणातून 'स्त्री व्यक्तिरेखा.... पु. ल. यांच्या लेखनातल्याहा कार्यक्रम कलांगण येथे सादर करणार आहेत.

            मंगळवारदि. १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७ वाजता पं. शैलेष भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मधुर स्वरांनी 'अभ्यंग संगीत साधना महोत्सव - दीपावली पहाटकलांगण येथे रंगणार आहे. तर बालदिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सकाळी १० वाजता नवीन लघुनाट्यगृहात, 'फुलवा मधुर बहारहे संगीत बालनाट्य कलांगणमुंबई ही संस्था सादर करणार आहे. सायंकाळी ५ वाजता नवीन लघुनाट्यगृहातभारतीय मूर्तीकलेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून 'भगवतीहा स्त्री-शक्तीचा जागर करणारा  कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकारी सादर करणार आहेत.

            पु. ल. कला महोत्सवाची सांगता रात्रौ ८ वाजता पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'अभ्यंग संगीत साधना महोत्सव अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने कलांगण येथे होणार आहे.

            'पु. ल. कला महोत्सवांमध्ये सादर होणारे विविध कार्यक्रम हे सर्वांसाठी विनामूल्य आहेत. तरी सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा', असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी- माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त

आजी- माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद

विधान परिषदेत ८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

            मुंबईदि. ६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृहविधान भवनमुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली.

            संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. या सभागृहाने आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. माँटेग्यू- चेम्सफर्ड समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियमान्वये बॉम्बे लिजिस्लेटिव्ह कौन्सिलची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी १९२१ रोजी टाऊन हॉलमुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची सभापतिपदी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी १८६२ ते १९२० या कालावधीत गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिलचे कामकाज चालत असे. सन १९२१ मध्ये नारायण चंदावकर यांच्या रुपाने प्रथमच भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषदेचा शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. मात्र, 'कोविड १९महामारीमुळे त्यावेळी जाहीर कार्यक्रम आयोजित करता आला नाही. या पार्श्वभूमीवर आता हा कार्यक्रम होईल.  

            विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या नियोजनासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गटनेतेसदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमंत्रीदोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

            स्नेहमेळाव्यासह 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व', 'आमच्या आठवणीतील विधान परिषद' (असे सदस्य...असे प्रसंग) या विषयांवर परिसंवाद होईल. याशिवाय 'विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधान परिषद या दुसऱ्या सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्ये', 'गेल्या १०० वर्षातील महत्वपूर्ण विधेयकेठराव', 'लोकहिताच्या महत्वाच्या प्रश्नांवरील चर्चा', 'शंभर वर्षे शंभर भाषणेआणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुकअशी पाच प्रकाशने प्रस्तावित आहेत.

०००००

एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद’ रेसकोर्स मुंबई येथे ७ नोव्हेंबर रोजी ‘रन फॉर आयुर्वेद’

 एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद’

रेसकोर्स मुंबई येथे ७ नोव्हेंबर रोजी ‘रन फॉर आयुर्वेद’

                  -  मंत्री हसन मुश्रीफ

 

            मुंबईदि. ६ : केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था आणि आयुष्य संचालनालय यांच्या मार्फत मंगळवार, ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ५.३० वाजता रेसकोर्समहालक्ष्मीमुंबई येथे एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद करीता"रन फॉर आयुर्वेद" आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, 'धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) हा केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने २०१६ मध्ये "आयुर्वेद दिवस" म्हणून घोषित केला आहे. या वर्षी आयुष मंत्रालय 8 वा आयुर्वेद दिवस 2023 ‘एकात्मिक आरोग्यासाठी आयुर्वेद’ या घोषवाक्यासह साजरा करीत आहे. जी 20 च्या पारंपरिक औषधावर आणि G20 प्रेसिडेन्सीची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ या घोषवाक्यासह प्रत्येक दिवशी प्रत्येकासाठी आयुर्वेद"मानव प्राणी वनस्पती- पर्यावरण इंटरफेसवर लक्ष केंद्रित करणे हे उद्दिष्ट आहे.

            यादरम्यान आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले  की, आर. आर.ए.पी. केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन संस्था, पोदार मेडिकल कॅम्पस, वरळीमुंबई येथे सन 1986 पासून आरोग्य सेवा तसेच असंसर्गजन्य रोग (जसे की कर्करोगमधुमेहरक्तदाब) इत्यादीवरील क्लिनिकल संशोधनात काम करत आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेली परिघीय संस्था आहे. सीसीआरएएस, नवी दिल्ली ही आयुर्वेदिक विज्ञानातील संशोधनासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च स्वायत्त संशोधन संस्था आहे.

            या संदर्भात विविध मंत्रालयेराज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि जगभरातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आयुष मंत्रालयाने सीसीआरएएसला केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि भूमी आरोग्यासाठी जनसंदेशलोकसहभाग आणि लोकचळवळ निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी प्रभारी सहायक निदेशक डॉ. आर.गोविंद रेड्डी यांनी पोदार केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अधिक माहितीसाठी संपर्क करा: 022-24927259, 24947822, 9820284671, ईमेल: ahini Interday.cerimurtioiingmon.cotn and huurestoday.org.in. या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

00000000

Featured post

Lakshvedhi